वाईट परिस्थितीतुन बाहेर पडायच्या 11 प्रॅक्टीकल टिप्स

1,328 Views

#Life _ Coaching :

” वाईट वेळेतून मार्ग कसा काढावा “?

© निलेश काळे

नेहमी सगळं चांगलं चांगलंच
व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं , पण निसर्ग त्याच्या कृत्यातून सांगतो कि , असं कधीही असणार नाही .
चांगली वेळ जाऊन वाईट वेळ येणारच आणि वाईट जाऊन चांगली !
पण आपण वाईट / कठीण काळाचा बाऊ करतो , इतके निराश होतो , इतके हतबल होतो कि , कुठलीही प्रेरणादायी कहाणी आपल्याला त्यातून बाहेर काढू शकत नाही !
अशा वेळी मनाला स्थिर करणे अत्यावश्यक बनते . आणि त्यासाठी समजून घ्यावे लागतात काही निसर्गनियम ( कारण हे सर्वत्र सारखे आहेत ) .

नियम 1 )
Every Thing Changes :
आपण किती स्वतःची आपटून घेऊ , पण हा नियम कधीही बदलत नाही कि , प्रत्येक गोष्ट बदलते .

confuse झालात ?

पण लक्षात घ्या , निसर्गात सगळ्या गोष्टी सतत् बदलत असतात , आपल्यावर आज वाईट वेळ आहे , मनासारख्या गोष्टी घडत नाहीत , लोक साथ देत नाहीत किंवा पाहिजे तसे उत्पन्न होत नाही , मग उठतो आणि फाशी लावून घेतो !
घंटा ..
इथे माणसे , त्यांचे विचार , सभोवतालची परिस्थिती , मार्केट , व्यवस्था सगळं सतत बदलत असतं , त्यामुळे कधी – केंव्हा तुमचा वेळ बदलेल हे सांगताच येत नाही .
त्यामुळे हिंमत हारू नका .
भिडा ! ! ! डायरेक्ट भिडा !
व्यवस्था बदलतात !

2) Everything is within you:

आजकाल झालंय कसं ? कि मला माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बाहेरून पाहिजे .
यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात इकडे पळ , तिकडे पळ . याला हात दाखव त्याला कुंडली दाखव .
ही ट्रिटमेंट घे ती , ट्रिटमेंट घे .

पण निसर्ग सांगतो . कि तुमच्या प्रॉब्लेम ची चावी तुमच्याच दिमागात ठेवलीये मी !
इकडे तिकडे काय बावळ्यासारखं फिरता .

आत डोकवून तर बघा जरा ..
सगळ्या दुनियेला विचारता ना पैसे देऊन ? एकदा स्वतःच्या मेंदूला तर निट निटकं विचारा !

ही जी सगळी Enlightned झालेली थोर व्यक्तीमत्वे होऊन गेली , ती काय याला त्याला विचारण्यातच वेळ घालवत होती काय ?

नाही न !
म्हणुन हा नियम , चावी आतच शोधा , बघा कधी _ कधी वेळ जास्त लागू शकतो तर कधी कमी , पण फक्त एक आयडीया पाहिजे , एक आयडीया मिळाली कि झालं .

3) overcame in Past :

कठीण काळात कसं होतंय माहितय ?
असं वाटायला लागतं कि , ” आपण निव्वळच पोकळ आणि Useless आहोत ” , जेवढया शिव्या आपल्याला तोंडपाठ आहेत तेवढया स्वतःला देऊन घेतो .
पण ………….
हे एकदा आठवून बघा , कि ” आजवर आपण कित्येक अशक्यप्राय गोष्टी केल्यात ” .
कित्येक भल्याभल्यांना जमलं नाही ते आपण लिलया करून टाकलंय .
कितीतरी स्टॅन्डर्ड सेट केलेत .
कितीतरी अशा गोष्टी केल्यात की ज्या जमणं इतरांना निव्वळ इंम्पोंसिबल होतं .( आठवा बरं एखादी गोष्ट तशी )

आठवली ???

बघा जमतंय तर !

त्या काळापेक्षा तर या काळात तुम्ही अजून कितीतरी अनुभवी आणि स्ट्राँग आहात .

म्हणून तर पोरांना इतिहास शिकवतात ना ! नाही तर 100 मार्कांसाठी दूसरा एखादा विषय नसता का ठेवला ?

स्वतःला इतिहासात बघा एकदा !
रिवाईंड करुन . उमेद भेटेल .

4) Everything is Temporary :

आपल्याला परमनंट नौकरी आणि स्टेबल इन्कम आवडतं ना ???

त्या विक्रम लेंडर ने पृथ्वीचे Gif video बनवून पाठवले ना ? तरी कळेल कि आपली पृथ्वीच स्टेबल नाही .एका जागेवर परमनंट नाही .
मग परिस्थिती कशी …. ” परमनंट ” राहील ?
आपल्या ऋषीमुनींनी पण सांगून ठेवलय …. ही सगळी शाळाच टेम्पररी आहे .

धार्मिक प्रवचन नाही देतय . पण
हा नियम हेच सांगतो .
Everything is Temporary … टेन्शन घेऊ नका !

5) Others overcame the same :

मी त्रासात आहे या पेक्षा जास्त दुःख कशाचे होतय आपल्याला ???? कि , तो सुखात आहे ! .
त्याच कसं अगदी सुरळीत चाललंय ! , त्याची लाईफ किती झक्कास आहे ! ,

बावळ्यांनो ,,, ज्याचे त्याला माहित असतंय कि बुडा खाली किती अंधार आहे तो .
आणि हो !
त्याला पण तेवढच झगडावं लागलं असेल ना ! त्याची परिस्थिती बदलण्यासाठी ? का उगाचच आपलं ?
बघा ! मॅरेथॉन जिंकण्यासाठी विजेत्याला पूर्ण अंतर पळावं लागतं का नाही ?
आजवर बघीतलाय का एखादा रेसरनर ? ज्याला त्याच्या बापाकडे मोठ्ठा बंगला आहे म्हणून बक्षीस दिलंय़ .
नाही ना !
म्हणून लक्षात घ्या ,. सगळ्यांना तेवढाच घाम गाळावा लागतो एकदम सेम टू सेम .

6) Just keep showing up :

बघा कोणी काही मायीच्या पोटातून सगळं शिकून येत नाही ,
रोज रोज प्रॅक्टीस करावी लागते…
मायकेल शूमाकर घ्या , मायकेल फ्लेप्स वा उसेन बोल्ट ….
यांनी रोज रोज नित्यनेमाने कित्येक वर्ष प्रॅक्टीस करत गेले , तेंव्हा कुठे त्यांना चॅम्पीयन म्हणून नाव मिळाले .
इथे Law of Averages कामाला येतो .
करत रहा , फक्त करत रहा .. फळ भेटतचय….
पंक्तीतच जर बसला नाहीत तर वाढप्या काय येऊन घास भरवणार नाहीये.

7) Great Things need Time & efforts :

अशी एक म्हण आहे कि , ” Rome was not built in a Day ” .
खरंय ….
हे सत्य कधीच डावललं जाऊ शकत नाही कि , महान गोष्ट घडवून आणायची असली कि , त्याला थोडा वेळ जाऊ दयावा लागेल आणि कष्ट उपसावेच लागतील .
” दे रे हरी पलंगावरी ” म्हणलं कि मग देव रट्टे देत असतो .

घ्या , थोडा वेळ घ्या , काही बिघडत नाही , मेहनत घ्या , पण मला लगेच यश पाहिजे ही असली … पोकळी मागणी स्वतः कडेच करू नका .

वेळ लागतोच .

8) Ask for Help :

” मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे ” हे वाक्य काही फक्त भाषणात वापरायचच वाक्य नाहीये .
गुहेपासून …5G मोबाईल पर्यंतचा प्रवास हा , आपण एकमेकांच्या साथीने केलाय .
एकत्र शिकार केली , एकत्र शेती केली , एकत्र उन्नती केली , आणि आता थोडीशी अडचण आली की , स्वबळाची आणि स्वाभिमानी बाण्याची भाषा करता काय ?
निसर्ग सांगतो इतरांची मदत घ्यावी लागेल , आणि लागेल तशी , त्या प्रमाणात , त्या मर्यादेत घ्यावी पण त्यात काही वाईट नाही , फक्त अवलंबीत्व नसावे .
मदत मागा हरकत नाही , यात शरमेची बाब काहीच नाही , उलट वेळेवर मदत मागणे हे शहाणपणाचे लक्षण आहे.

9) Someting It’s Good to not Accomplish :

दहा वर्षापूर्वी एखादी गोष्ट पाहिजे होती , पण मिळाली नाही .
पण जर मिळाली तरी आज आयुष्य भलतंच असतं , असं घडलंय का काही तुमच्या बरोबर ?

कधी _ कधी काही गोष्टी न मिळालेल्याच बऱ्या असतात .
त्याचं महत्व आपल्याला नंतर लक्षात येतं .

असं काही आहे तुमच्या आयुष्यात ?तर आठवा ! आणि एकदा Thanks म्हणा !

10) focus what you can control :

Over thinking हा एक दोष आहे ,
आणि नाही त्या गोष्टिबद्दल आपण भलताच विचार करत बसतो ,
दोन प्रकारच्या गोष्टी असतात
1) ज्या आपण कंट्रोल करू शकतो
2) ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही .
आणि जास्तीत जास्त त्रास हा 2 नंबरच्या परिस्थीतीमुळे होतो .

दया ना सोडून , कशाला रिकामा वेळ त्यात घालवता ?
त्याच गोष्टींवर वेळ खर्चावा ज्या आपल्या आवाक्यात आहेत ..
बाकी सगळं गेलं उडत .
पण हे सगळं काय असंच जमेल ?
जमतं खरंच जमतं , फोकस फक्त कामाच्याच गोष्टीवर ठेवायचा .
फक्त “पक्षाचा डोळा दिसला पाहिजे ”

मग नेम बसतो .

Last Point सर्वात आवडता माझा

11) We are Blessed , else is Bonus :

आपण धडधाकटपणे मस्त जगतोय , हातात 4G मोबाईल आहे , ही पोस्ट वाचतोय असं म्हणल्यावर तर आपण स्वतःला लकी म्हणलं पाहिजे .
एवढं आयुष्य सुद्धा कित्येक दुर्भागी लोकांच्या नशिबी येत नाही . ‘

” गेल्या वर्षी , त्याच्या अगोदरच्या वर्षी वारलेला एखादा मित्र आठवा ” .

गेला का नाही तो उठून

आपण धडधाकटपणे जगतोय , हसतोय ,, खातोय ,पितोय प्रगतीच्या वाटेवर आहोत हे काय कमीये काय ?

हे तर आपल्यासाठी बोनस लाईफ आहे .

एन्जॉय करा ! ताण घेऊ नका !
आपल्याला कोणी “हे का साध्य केलं नाहीस ” ! म्हणून सुळावर चढवणार नाहीये !

.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

लेख आवडला तर शेअर करा .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध, पुणे.
Whatsapp / 9518950764

Previous Post Next Post

4 thoughts on “वाईट परिस्थितीतुन बाहेर पडायच्या 11 प्रॅक्टीकल टिप्स

  1. तुमचे लेख चागले आनी वैचारिक आहेत मेदू ला चलना मिलते धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *