वाईट परिस्थितीतून “COMEBACK” करण्यासाठी 8 टिप्स

820 Views

Comeback करताना उपयोगी पडतील अशा आठ टिप्स

©निलेश काळे .

📌 मित्रांनो सरकारने तर सगळं ओपन करायचं ठरवलंय, पण या लॉकडाऊन मुळे आणि कोरोना नंतरच्या परिस्थितीमुळे अनेक व्यावसायिकांचा पार कंबरडे मोडलय , परिस्थिती कोणापासून हे लपून राहिलेली नाहीये किंवा कुणाचीच परिस्थिती अशी फारशी चांगली नाही.

अनेकांना या #रॉकबॉटम पासून वर सरफेस पर्यंत येताना दमछाक होणार आहे .

अशा कठीण प्रसंगात आपल्याला कमबॅक बॅक करावा लागणार आहे.

📌 विषय लिहायला घेतलं याचं कारण साधं आहे ,
“अनेकदा आयुष्यामध्ये सगळं संपल्यासारखं वाटलं” “बँकेतले बॅलन्स संपलं” “नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला” “परिस्थिती वाईट निर्माण झाली” पण अशा परिस्थितीमधून सुद्धा तिला तोंड देऊन वर येताना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आपल्याच काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.

📌 ज्यांना या परिस्थितीचा फटका बसला नाही त्यांनी स्वतःला सुदैवी समजावं, तुमच्या करता हा लेख कदाचित नसेलही, परंतु जे लोक सध्या अंडरप्रेशर आहेत, त्यांच्यापर्यंत तरी आपण हा लेख सहज पोहोचवू शकता आणि आज त्याची गरज आहे.

(1) #नेमकं_काय_चुकलंय_ते_लिहून_काढा:

आता तुम्हाला वाटेल याने काय साध्य होणार आहे? परंतु स्वतःच्या चुकांचं पोस्टमार्टम करायला सुद्धा जिगर लागतं, ते पोकळ व्यक्तींचे काम नाही.

ज्यावेळी एखादी टीम ऑलम्पिक मध्ये गेम हारते, त्यावेळेस संध्याकाळी बसून ते पूर्ण गेमचा व्हिडिओ बघतात,

आता दिवसा खेळलेल्या गेमचा व्हिडीओ संध्याकाळी बसुन बघण्यात काहीच पॉईंट नाही ,परंतु तरीदेखील सगळी टीम त्याचं अवलोकन करते कशासाठी????

तर त्या चुका पुढच्यावेळेस टाळण्यासाठी.

आपण पण ज्या चुका केल्या त्या लिहून काढल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.

“माझ्या मित्राने मला धोका दिला” “त्याने मला साथ दिली नाही”
“अजून कोणी काय केले नाही”
असे दुसऱ्यांचे दोष काढत बसायचं नाहीये , कारण आता त्याला काहीही अर्थ नसतो.

याला इथे कोणीही भाव देत नाही.
इथे फक्त आपण काय करू शकलो असतो, माझं नेमकं काय चुकलं ? हे शोधणे , हा विचार फार महत्त्वाचा आहे.

(2) #आपण_इतके_वाईट_नाही #किंवा_इतके_चांगले_पण_नाहीत :

दिवस चांगले असताना आपल्या डोक्यात हवा गेलेली असते , आपल्यासारखे हुशार आपणच असा तोरा असतो , पाहिजे तसा खर्च करतो , अविचाराने सुद्धा वागतो ,
कारण डोक्यात हवा गेली ना? की माणसाचे पाय जमिनीवरून वर उचलले जातात

दुसरी स्टेज अशी कि .

वाईट परिस्थिती आली की, आपण स्वतःला नाव ठेवायला चालू करतो मी फारसा चांगला नाही मला काहीच जमत नाही अशी स्वतःची अवहेलना करायला चालू करतो.

दिवस वाईट असताना या दोन्ही गोष्टी एखाद्या व्यक्तीनं खरोखर करू नयेत. जेवढं होईल तेवढं न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला योग्य मार्ग दिसू शकतो.

(3) #पुढच्या_फटक्यासाठी_तयारीने_यावं

बॉक्सिंग चा गेम मध्ये ज्या वेळी आपण पहिला फटका जोरदार खातो गडबडतो गोंधळतो तेंव्हा डोळ्याभोवती तारे फिरतात पण हाच फटका आपल्याला खरोखर जागं करतो .

पहिला फटका खाल्ल्यानंतर माणूस जरा जास्त सजग होतो आणि त्यानंतर दुसरा फटका तेवढा जोरदार लागू शकत नाही कारण आपण तयार असतो.

आता आपल्याला हा पहिला फटका बसलाय असं समजा, म्हणून जमिनीवर पडून राहण्यापेक्षा, जास्त तयारीने मैदानात परत उतरा ,

पण पण आता जरा जास्त तयारीने या !

(4) #मित्रांनो_पडून_राहू_नका :

लहानपणी पोहणे शिकत असताना आपल्या नाकातोंडात कित्येकदा पाणी गेले असणार…. पण नाकात पाणी जात आहे , म्हणून ज्यांनी पोहणे थांबवले ती लोकं आयुष्यात पुन्हा कधीही पोहायला शिकू शकत नाहीत

आपण यूट्यूबला अनेक व्हिडिओ बघतो ,ज्यामध्ये समोरचा हा अनेक वेळा प्रयत्न करून शेवटी स्वतःचं ध्येय साध्य करतो, ते VDO आपल्याला बघायलासुद्धा आवडतात,

कारण कितीतरी वेळा तो पडतो , प्रयत्न करतो, परत पडतो आणि शेवटी तो जिंकल्यानंतर आपल्याला सुद्धा चांगले वाटते .

हे असंच आहे ज्यांनी प्रयत्न करणे सोडून दिलं / ज्याने बॅकऑफ केलं, ज्याने पाठ टेकवली , त्याला या जगात शून्य किंमत आहे.

असे सोडून दिलेले माफीवीर तुम्हाला लाखोंनी या ठिकाणी भेटतील, परंतु ज्याने परत परत प्रयत्न केले त्याला काही ना काही तरी सांगण्यायोग्य साध्य झाल्याशिवाय राहत नाही.

बहुतेक या लोकांनाच बाजीगर म्हणलं जातं , आणि यांचेच किस्से सांगितले जातात !

(5) #दुध_पोळलंय_ना ? #ताक_पण_फुंकून_प्या :

📌 ज्यावेळी परिस्थिती चांगली असते त्यावेळी आपण अनेक निर्णय धडाधड घेतो .

त्यावेळी काही निर्णय चुकले तरी आपल्याला काही वाटत नाही , जसं थोडं तरी पोळलं तरी आपण मलमपट्टी करतो ,पण एकदा का मोठा चटका बसला माणसाने जरा जास्तच सावध व्हावं.

ताक पण फुंकून प्यावं.

(6) #फेल_झाल्याचा_शिक्का_कपाळावर_घेऊन_मिरवू_नका :

ज्यावेळी आपलं स्वतःच फार मोठं नुकसान करून घेतो त्यावेळी माणूस स्वतःच्या स्वतःलाच जास्तीत जास्त त्रास द्यायला चालू करतो.

जग जरी फार काही बोललं नाही तरी आपलं स्वतःबरोबर असणारं भांडण काही संपत नाही .

आपण स्वतःला फेल झालेल्या लोकांच्या कॅटेगरीमध्ये ठेवून स्वतःवरच ओरडायला लागतो.

बघा,,, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला या स्वतःच्या शरीराबरोबर ,या मेंदू बरोबर जगायचं आहे .

स्वतःला कमी समजून आपण कधीच फार मोठी उन्नती करू शकत नाही.

त्यामुळे निर्लज्ज माणसासारखं स्वतःला जास्तीचे शहाणं समजलं तरी हरकत नाही, पण स्वतःला गाढव समजून घेऊ नका.

लाज शरम सबकुछ सोडून देऊन परत कामाला लागा !

(7) #योग्य_व्यक्तींकडून_मदत_घ्यायला_लाजू_नका:

या परिस्थितीमध्ये सुद्धा खूप असे लोक आहेत ज्यांना या बदलत्या वातावरणाचा काहीही फरक पडलेला नाही.

आपल्या ओळखीत असे खूप लोक असतील ज्यांना आपण मदत मागितली तर ते मदत द्यायला लगेच तयार असतील,,,पण मागणे हे आपल्या स्वभावाला पटत नाही,

पण हे समजून घ्या की दरवेळी मागणं वाईटच असतं असं काही नाही.

सुशांतसिंगने आपल्या मित्रांकडे मानसिक आधाराची मागणी केली असती , “थोडंसं माझ्याबरोबर बोला” “माझा ऐकून घ्या” ही मागणी केली असती, तर त्याला गळ्याभोवती फास लावून घेण्याची गरजच पडली नसती !

आपण फक्त मागत नाही ! आवाज काढत नाही ! निमुटपणे सहन करतो !

लोकांचा प्रॉब्लेम असतो आहे कि गरजेचे वेळी आपण इतरांकडे मदत मागत नाही शंभरापैकी नव्वद लोक नकार देतील पण सगळेच लोक वाईट नसतात ज्याला जे शक्य आहे त्याप्रमाणे लोक मदत करतीलच फक्त आपण इमानदारीने मागणी केली पाहिजे

आपला भारतीय इतिहास असा आहे की,शत्रूच्यासमोर सुद्धा जर आपण प्रामाणिकपणे इमानदारीने एखाद्या गोष्टीची मागणी केली,तरीदेखील तो नाकारत नाही,मग अशा परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी जर आपण कोणाच्या समोर काहीही मागणी केली, तर कोणीही आपल्या मदतीला येणार नाही,असं कसं होईल?

लहान लेकरांला भूक लागली कि,ते मोठयाने रडतं /ओरडतं,म्हणजे लक्षात आलं का ? कि , मागणे नैसर्गिक आहे !

एकूण एक धर्म ग्रंथात सांगीतलंय ….

” मागा >>>> मिळेल ” !

(8) #ComeBack_Story_वाचा :

सध्या युट्युब वर अनेक मोटिवेशनल स्पीकर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत.
संदीप माहेश्वरी सारख्या लोकांनी कित्येकांना डिप्रेशन मधून बाहेर काढले आहे.

या लोकांची स्पीच ऐैका,कमबॅक स्टोरीज वाचा,या जगात असे अनेक लोक आहेत ,हजारोच्या संख्येने आहेत ज्यांनी परिस्थितीवर मात करून परत उभारी घेतली आहे सांगायला गेलं तर अशी उदाहरणं लाखोंनी सापडतील.

जगात अनेकांना आपल्यापेक्षा अपार दुःख आहे, त्यांच्याकडे साधने नाहीत,शरीराचे अवयव कमी आहेत , कोणाकडे संभाळण्यासाठी फार मोठं कुटुंब आहे,कोणाकडे उत्पन्नाचे मार्ग नाहीत,अनेकांकडे शिक्षण नाही,पण तरीदेखील ही लोकं संकटाच्या छातीवर पाय देऊन घेऊन उभी राहतात .

लांबचं बघायचं नाही ?
तर तुमच्या कुटुंबात बघा,तिथे सुद्धा अनेक लोक असे असतील, त्यांच्याकडे बघा ,
ही मंडळी त्या दुःखातून कशी बाहेर आली ?त्यांनी असं काय केलं ?आणि त्यांनी काय नाही केलं? याचा सगळा इतिहास तुम्हाला एका वेळेस फक्त त्यांच्याकडून ऐका,त्यांचेशी बोला !
आणि उभारी घ्या !
कारण या परिस्थितीमधून आपल्याला सगळ्यांनाच बाहेर पडायचेय

आज असा पराक्रम करण्याची आपल्याला फार गरज आहे,तुम्ही सुद्धा पराक्रमी आहात फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी कणखरपणे उभे राहा.

एवढी एकच अपेक्षा या लेखातून मला तुमच्याकडून करायची आहे .

शुभेच्छा .

©
निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क ,औध , पुणे .
9518950764

Office : 9146101663

Previous Post Next Post

3 thoughts on “वाईट परिस्थितीतून “COMEBACK” करण्यासाठी 8 टिप्स

  1. खूपच मुद्देसूद लेख आहे,सर्व सामान्य जणांना लगेच समजू शकेल अश्या भाषेत आपण समजावून सांगितले आहे,आपले धन्यवाद,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *