वाचण्यासारखं पुस्तक : झिरो टू वन

#powerful_Book

#zero_to_One

#लेखक_पीटर_थील

© #निलेश_काळे .

आज आपण ज्या पुस्तकांची समरी बघणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे , “झिरो टू वन ”

या पुस्तकाचे लेखक पीटर थील , हे स्वतः एक फार मोठे उद्योजक आहेत ज्यांचं नाव फोर्बसच्या लिस्ट मध्ये आहे .

📌आज आपण जी गूगल पे, फोन पे , पेटीएम वापरतो , ते अमेरिकेतल्या पेपाल नावाच्या एका ॲपची कॉपी आहेत , हे ॲप पिटर थील आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून बनवला होता .

📌त्यानंतर त्यांनी ते Ebay या वेबसाईटला 1.5 billion ला विकून टाकला, त्यानंतर पीटर थील आणि त्यांच्या मित्रांनी मिळून लिंक्ड इन , यूट्यूब या सारख्या कंपन्यांची निर्मिती केली.

📌 म्हणजे काय आहे हे सर्वसामान्य लेखक नसून संशोधक लेखक आहेत, आणि त्यांनी या पुस्तकामध्ये काही अशा गोष्टी सांगितलेले आहेत ज्यामुळे आपण फार मोठ्या स्वरूपाची कंपनी कशी तयार करावी ?याची काही सूत्रे दिलेले आहेत .

📌यामध्ये पीटर फिल यांनी बेसिक 3 पॉईंट सांगितलेले आहेत

(1) #Build_it_On_Contrarian_Truth:

📌 उद्या लोक कोणत्या गोष्टीला महत्त्व देणार आहेत?

उद्या लोक काय वापरणार आहेत?

आणि उद्या लोकांच्या गरजा काय असतील? हे आपल्याला समजलं पाहीजे !

📌आज जेवढ्या कंपन्या जगामध्ये टॉपवर आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कंपन्या ह्या लोकांच्या उद्याच्या गरजा भागवण्यासाठी तयार झालेल्या आहेत, फेसबुक , गूगल, यूट्यूब, एप्पल, ओला यासारखे कंपन्या उद्या काय आवश्‍यक आहे? याची चाचपणी करून तयार झाल्या.

याला पीटर थील कॉन्ट्रारियन ट्रूथ असे म्हणतात .

अशा प्रकारच्या व्यवसाय घsवणारे लोक वेगळ्याच दुनियातले असतात, अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांना लोक पागल समजले जातात .

आणि या प्रकारच्या उद्याच्या सत्याला , कॉन्ट्रेरियन ट्रुथ म्हणले जाते .

यात पण एक छोटासा धोका आहे,

कारण हे दोन प्रकारचे असतात 1) ज्यांची वेळ आलेली आहे आणि 2) ज्याची वेळ अजून येणे बाकी आहे जसं भारतामध्ये इलेक्ट्रिकल वाहने येणार हे ठरलेलं आहे पण त्यांना अजून यायला वेळ आहे हे तेवढंच खरं पण ज्यावेळी लोकांनी त्या गोष्टीसाठी अगोदरपासून तयारी केली ते जास्त फायद्यात राहतील आणि ज्यांना अजून तयारी चालूच करायची आहे ते मात्र यांच्यापासून दूर राहतील .

#2_Dominate_small_market

📌Peter Thiel म्हणतात की आपण मोठ्या समुद्रातला लहान मासा बनवून व्यवसाय चालू करण्यापेक्षा छोट्या तलावात ला मोठा मासा बनवून व्यवसाय चालू करावा.

📌हे व्यवसाय चालू करण्याचा एक तत्त्व आहे .

त्याला असं म्हटलं जातं की आपण Niche मार्केटला डॉमिनेट करतोय .

उदाहरणादाखल आपण असे बघूया की जेफ बेजोस ने ज्यावेळी अमेझॉन चालू केलं त्यावेळी त्यांनी सगळ्यात गोष्टी एकदाच विकायला आणल्या नाहीत , त्यांनी सुरूवात फक्त आणि फक्त पुस्तकांच्या डिलिव्हरी करण्यापासून केली .

स्वतः सगळं करायचे ,एकटेच डिलिवर करायचे अशा प्रकारे त्यांनी यावेळी पुस्तकांमध्ये कोणीही होम डिलिव्हरी देत नव्हतं पुस्तकाची कोणीही ऑनलाइन खरेदी करत नव्हतं ,,त्यावेळी त्यांनी पुस्तकांची ऑनलाईन विक्री करायला चालू केली आणि पुस्तकाची विक्री करणारी नंबर एक साईट बनली .

#3_Monopoly_करिता_प्रयत्न_करा !

भयंकर कॉम्पीटिशन असणार्‍या मार्केटमध्ये सहाव्या बरोबर सातवे होऊन धंदा कसा करण्यात काय पॉईंट आहे ? आपली मोनोपोली राहत नाही आणि व्यवसायाला थोडे दिवस का होईना मोनोपोली ची गरज असते.

आता मोनोपली म्हणजे काय हे समजून घेऊ !

ज्यावेळी मार्केटमध्ये आपण एकटेच असतो की जो स्पेशल प्रॉडक्ट किंवा सेवा देतो किंवा स्पेशल एकंदरीत एकूण मार्केटवर आपलं राज्य असतं त्याला मोनोपोली मानल्या जातं !

📌 बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की ही वाईट आहे किंवा मोनोपोलीमुळे धंदे वाढत नाहीत परंतु आपल्याला वाढ होण्यासाठी थोडे दिवस का होईना मोनोपोली मिळवावी लागते.

📌 आणि प्रत्येक व्यवसायिकाचं असं स्वप्न असतं कि आपण थोडीतरी मोनोपोली मिळवावी , आज आपण अनेक कंपन्या बघू शकतो ज्यांनी कि आजही त्यांची मोनोपोली जपली आहे.

📌जसं Apple ने प्रीमियम मोबाईल मध्ये आपलं स्थान अजूनही टिकवून ठेवलेला आहे,, गुगलने सर्च इंजिनमध्ये मोनोपोली जपून ठेवलेले आहे,, फेसबुकने नेटवर्कमध्ये आपली मोनोपली जपून ठेवली आहे आणि ॲमेझॉन ने सुद्धा आपली मोनोपली जपून ठेवलेली आहे.

या कंपन्यांचं मोठं होण्याचं पाठीमागचा सूत्र आहे कि हे लोक आपल्या धंद्याला फार सिरिअसली घेतात.

📌पीटर थील च्या झिरो टू वन या पुस्तकाचे हे तीन सारांश आहेत

(1)कॉन्ट्रॅरियन ट्रूथ वर स्वतःचा व्यवसाय उभा करा.

( 2 )मोठ्या मार्केट मधला छोटा प्लेयर होण्यापेक्षा छोट्या मार्केट मधला मोठा आपल्या बना .

(3 )कुठल्याही प्रकारे, कशाही प्रकारे आपली मार्केटमध्ये थोडे दिवस का होईना मोनोपोली मिळवण्याचा प्रयत्न करा.

📌या पुस्तकाचं नाव झिरो टू वन याच्यासाठीच आहे कारण पीटरथील यांनी स्वतःचे बीजनेस पण असे केले की जिथे लोकांना काहीही माहीत नव्हतं ज्या क्षेत्रात लोकांना ज्ञान नव्हतं त्या क्षेत्रातून त्यांनी बिझनेस सोबत केले आणि आज ते अरबो रुपयांचे बिझनेस झालेले आहेत .

📌एक पासून पुढे पण आकडे असतात ,, अनंतापर्यंत आकडे असतात.

📌 एक ते अनंतापर्यंत आकड्याचा याचा अर्थ असा की ,,आपण आहे त्या बिजनेस मध्ये म्हणजे ज्या बिजनेस मधलं ज्ञान सगळ्यांना आहे, असा लोकांसारखा बिजनेस चालू करून, तोच लोकांवर स्पर्धा करून,कॉम्पिटिशन करून भाव कमी-जास्त करून बिझनेस करणे.

📌 पण आपण संशोधन करून तयार केलेला बिजनेस असाच झिरो टू वन

📌या पुस्तकामध्ये पीटर थील यांनी अनेक सिक्रेट सांगितले आहेत.

📌हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे, कदाचित या पुस्तकाचा मराठी भाग सुद्धा आपल्याला मिळू शकेल, तेंव्हा हे पुस्तक अवश्य विकत घ्या आणि नक्की वाचा,,, याचा फायदा आपल्याला आपला बिजनेस उभा करण्यासाठी 100% होऊ शकतो.

शुभेच्छा .

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टन्टस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *