वादग्रस्त जाहिरात करून विरोध ओढवुन घेणारे Subyasachi आहेत तरी कोण ?

60 Views

Sabyasachi नेमके आहेत तरी कोण ?

अनेक वेळेला एखाद्या व्यवसायिकांनी केलेली जाहिरात, ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते काल परवापासून आपण सोशल मीडियावर बघत असाल की सब्यासाची नावाच्या एका ब्रॅन्ड विरुद्ध मध्यप्रदेशच्या गृहमंत्री असं प्रकरण सुरु आहे.

या वादामुळे शेवटी सब्यासाचीने आपली जाहिरात मागे घेतली .

या कॅम्पेनचा विरोध करणाऱ्यांचं म्हणणं अस कि,य मंगळसूत्राच्या जाहिराती करता जरा उघडेपणा दाखवलेला आहे.

तर आज जाणून घ्या हे डिझायनर आहेत तरी कोण? सब्यसाची मुखर्जी ( त्यांच्या ब्रॅन्डचे नाव देखील Sabyasachi) हे कोलकत्ता बेस Fashion डिझायनर आहेत, ते 47 वर्षाचे असून त्यांची फर्म 1999 पासुन डिझायनर कपडे बनवते.

12000 रु च्या उसन्या भांडवलावर 1999 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने 2014 साली 100 करोडचा टप्पा पार केलेला,अशा प्रकारे टर्नओव्हर असणारी ही पहिली भारतीय डिझायनर “mom & Pop” फर्म आहे, जिचं आजचं व्हॅल्युएशन 11 million डॉलर एवढं आहे .

मुळात डिझायनर कपडे हा भारतीय लोकांचा पार्ट नाही,अशी एक धारणा होती परंतु ज्याप्रमाणे भारतीय लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा येऊ लागलेला आहे, त्याप्रमाणात अशा महागड्या कपड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे,तोच धागा पकडून सब्यासाची यांनी हाय प्रोफाईल क्लाएंटसाठी डिजायनर कपडे उपलब्ध करून दयायला सुरुवात केली .

मनीष मल्होत्रा जसे प्रसिद्ध बॉलीवूड डिजायनर म्हणून मान्यता पावलेत , तसेच सब्यासाची यांची फर्म देखील, बॉलीवुड मध्ये प्रसिद्ध आहे, Sabyasachi bridal collection हे तर लक्झरी कपड्यांमधलं सगळ्यात मोठं नाव .

जवळपास प्रत्येक बॉलीवुडची अभिनेत्री यांची क्लाएंट आहे .

सब्यसाची मुखर्जी हे प्रोफेशनल डिझायनर असुन यांनी NIFT (1999) या संस्थेतून कोर्स करून हे स्टार्टअप सुरु केलंय .

प्रत्येक स्टार्टअपला ज्याप्रमाणे सुरुवातीला त्रास होतो,तसा त्रास सब्यासाची मुखर्जी यांना देखील झाला त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की,सब्यासाची यांनी गुपचुप सरकारी नोकरी करावी,परंतु सब्यासाची यांची भूमिका पुर्ण वेगळी होती.

याच्यामुळे त्यांनी अक्षरशः घर सोडून शिक्षण घेतलं, पॅशन आणि एज्युकेशन यांतून कंपनी उभी केली आणि आज त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन 1200 करोड झालय .

Premium product : सब्यासाची यांना पहिल्या पासून लक्झरी आयटम मध्येच करीयर करायचं ठरवलेलं त्याचं एक उदाहरण घ्यायचं तर, या ब्रॅन्डचा डिजायनर लेहंगा 12 लाख ते 15 लाख या दरम्यान येतो,आणि त्यांचे प्रत्येक प्रॉडक्ट अशीच प्रिमियम प्रायसिंग मध्ये आहेत .

का ?………. तर त्यांचा सुद्धा ग्राहक वर्ग आज उपलब्ध आहेच,दरवेळी तुम्ही सामान्यांसाठीच उत्पादने तयार करायची गरज नाही,जर तुमची उत्पादने प्रिमियम रेंजमधील असतील,तर ते ठिकये.

📌 वाद : दिवाळीच्या अगोदर सब्यासाची या ब्रॅन्डने स्पेशल मंगळसूत्र डिजाईन कलेक्शनची जाहिरात कॅम्पेन चालू केली .

परंतु मोठी चुक अशी झाली,कि यामध्ये मॉडेलचे अर्धवट न्युड शुट करण्यात आले आणि लोकांच्या भुवया उंचावल्या .

अनेकांनी हा आमच्या धर्माचा अपमान आहे,वगैरे जहाल प्रतिक्रिया द्यायला चालु केल्या,मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी तर सब्याची ब्रैन्डला 24 तासाच्या आत जाहिरात मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आणि सब्याचीने ही वादग्रस्त जाहिरात मागे घेतली .

या सगळ्यातून एकच टिचिंग पुढे येते,ती अशी कि तुम्ही कितीही नावाजलेले असा,प्रिमीयम असा,परंतु आज काल तुम्ही लोकांच्या भावने विरुद्ध जाऊन जाहिराती करूच शकत नाहीत,त्यामुळे ज्यांना बिझनेस करायचाय ? त्यांनी अशा वादात न पडलेलंच बरं !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764.
Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *