विक्री करणाऱ्या प्रत्येकाला हा Golden Rule माहिती असलाच पाहिजे

विक्री करणाऱ्या प्रत्येकाला हा Golden Rule माहीती असलाच पाहिजे.

मित्रानो जगातलं सगळ्यात अवघड काम कोणतं ? तर समोरच्याच्या खिशातून पैसा काढणं.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर विक्री करणं.

अनेकांना ही भिती का बरं वाटते कारण ?

का ice-break करता येत नाही ?

का तर माझा अपमान झाला तर काय करू ?

कोणी खरेदीदारच नाही भेटला तर माझं कसं होईल ?

विक्रीच झाली नाही तर कसे ?

अशा प्रश्नांचं काहुर माजतं आणि अनेक जण हजारो मोटिवेशल व्हिडीओबघून सुद्धा घराच्या बाहेरच पडू शकत नाहीत .

या भितीसाठी खालचा नियम हा रामबाण उपाय आहे.

फक्त नीट समजून घ्या !

हा नियम सांगतो कि, ”तुम्ही जर शंभर लोकांच्या समोर आपले उत्पादन मांडले,तर किमान तीन लोकं तरी असे नक्की मिळतील,जे तूमच्याकडून खरेदी करतील म्हणजे करतीलच”.

बघा…..
या पूर्ण विश्वात हजारो तऱ्हेचे माणसं आहेत,प्रत्येकाला काही ना काही गरज नक्की आहे आणि प्रत्येकच जण सतत काही ना काही खरेदी करत असतो .

in fact या दुनियेत सगळीकडे फक्त बाजारच आहे .

तर आज या #Law_of_Averages मधून हेच समजून घेऊया.

ग्राहकाचे तीन प्रकार असतात.
📌1) Hard Nosed Customers ( पटवून सांगायला अवघड असे ग्राहक )

📌2) Medium /Neutral customers.
( मध्यम अवघड असे ग्राहक )

📌3) Easy Customers.
( पटवून सांगण्यास सोप्पे असे ग्राहक )

आपण स्वतः सोडलं तर ही सगळी दुनिया आपल्यासाठी या तिन कॅटेगरीतच विभागलेली आहे.

यांचा प्रकार आणि यांचे वागण्याचे प्रकार जरा नीट समजून घेऊया .

Hard Nosed Customer:

या प्रकारची आपल्या मनात सर्वात मोठी दहशत असते आणि यांच्या मुळेच लोकं सेल्स मध्ये यायला घाबरतात.

या लोकांचं वैशिष्ठय म्हणजे यांना तुमच्याकडून काहीच ऐकून घ्यायचं नसतं .
ही लोकं विक्रेत्याला तुच्छ समजतात , म्हणजे डायरेक्ट कचराच करतात म्हणा ना !
यांना सध्याच्या सप्लायरवर भरोसा असतो आणि त्यांना तो बदलायचाच नसतो.
ही जमात सर्वसामान्य पणे कुठेही आढळते,असं समजा कि 100 पैकी 80 लोकं या विभागात येतात .
अगदी मुरब्बी विक्रेता सुद्धा यांचं मन वळवू शकत नाही,पण एकदा का या लोकांनी तुमच्या नावानं कुंकू लावलं कि झालं मग .

हे आयुष्यभर तुमचेच .

********************

Neutral Medium Customers :

या प्रकारच्या लोकांना कोणाचं काही देणं _ घेणं नसतं, त्यांच्या जुन्या सप्लायर ने माल दिला काय ? आणि तुम्ही दिला काय ?
म्हणजे काय ? तर हे विक्रेत्याशी Emotionally अटॅच नसतातच .

पण आपण कसे चांगले आहोत हे समजावून सांगीतलं तर हे आपले ग्राहक होऊ शकतात .

ही लोकं तुम्हाला सर्वसामान्य जरा जास्त शोधलं कि सापडतात .

आणि उरलेल्या 20% पैकी 10% लोकं ही असतात .

***************************

Easy Customers :

हा प्रकार तसा दुर्मिळ .
पण मार्कटला असतो नक्की .
ही लोकं तुमची वाटच बघत असतात , कारण यांचा पूर्वीचा सप्लायर यांना बदलायचाच असतो .
यांना कितीही नवखा सेल्समन विक्री करू शकतो, त्यामुळे ही लोकं शोधा

बघा विक्रीमध्ये 10 पैकी 1 हा स्कोर ठीक मानला जातो आणि 10 पैकी 3 हा स्कोर उत्तम .

त्यामुळे विक्रीला जाताना घाबरू नका,ही लोकं सापडतातच ,जग कितीही हसलं तरी हा Law of Averages तुमच्या मदतीला आहे.

📌 तेंव्हा बिनधास्त बाहेर पडा, काहीही झालं तरिही आपल्याला ग्राहक मिळणारच आहे,कारण?सगळीकडे लॉ ऑफ ऍव्हरेजेस काम करतो.

तेंव्हा या नियमावर भरवसा ठेऊन विक्री करायला लागा कारण विक्री हाच धंदयाचा ऑक्सीजन आहे ! ती जोरकस पणे केली नाही तर गुदमरुन जाल !

विक्रीसाठी शुभेच्छा !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764 .

📌असे लेख आवडतात ?तर आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि व्यवसायात अडचणी येत आहेत तर बिझनेस कन्सलटिंगसाठी आम्ही !

कन्सलटिंगसाठी कॉल करा :
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “विक्री करणाऱ्या प्रत्येकाला हा Golden Rule माहिती असलाच पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *