विक्री चे बारकावे : स्टॉक सेल आणि ऑर्डरसेल मध्ये काय फरक असतो ?

स्टॉक_सेल आणि #ऑर्डर_सेल मधला फरक काय आहे?

©निलेश काळे

हा लेख त्या नवीन व्यवसाय व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो ,ज्यांना काही दिवसांमध्ये व्यवसाय चालु करायचा आहे.

साधारणपणे “ट्रेडिंग” हा जो व्यापार प्रकार आहे ,त्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट तयार करत नाही किंवा कुठलीही वस्तू सेवा विकत नाही ,
या ठिकाणी आपण काय करतो? तर एखाद्या उत्पादकांनी उत्पादन केलेला माल होलसेल मध्ये किंवा एजन्सी घेऊन विकत असतो आणि तो आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवतो.

तर हे पोहोचवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत

Stock_Sale:

हा प्रकार जवळपास मार्केट मधला प्रत्येक दुकानदार करतो,,, तो होलसेलरकडून किंवा डायरेक्ट कंपनीकडून विकत घेतो आणि आपल्या दुकानांमध्ये एका जागी स्थिर राहून ,,, येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक ग्राहकाला विकत राहतो, हा प्रकार झाला पहिला स्टॉक सेल प्रकार .

यातलाच एक दुसरा पार्ट असा की, आपण एखादी मालवाहू गाडी विकत घ्यायची ,त्यामध्ये हा स्टॉक भरायचा आणि छोट्या छोट्या किरकोळ दुकानदारांच्या दारामध्ये जाऊन तिथे त्यांना विचारायचं की , “आपल्याला मी आणलेल्या मला पैकी काही मला हवाय का”?

आपण आपल्या जवळ असणार्‍या स्टॉकपैकी आपल्याला जो विकेल असा वाटतो , तो माल त्या गाडीत भरलेला असतो आणि ती गाडी किरकोळ दुकानदाराच्या जाते , ही गाडी जेंव्हा त्यांच्या दारात उभी असते तेव्हा दुकानदार बाहेर येतो आणि आपल्या गाडीमध्ये एक नजर टाकतो, त्याला ज्या वस्तू हव्या आहेत त्या त्या तो ऑर्डर करतो ,,,विक्रेता त्या सर्व वस्तूंची लगेच यादी बनवतो, दोघांमध्ये भाव होतात आणि विक्री घडून येते.

याठिकाणी माल ,त्या किरकोळ दुकानदाराचा दारामध्ये आहे ,विक्रेता पण दारात आहे ,माल काढून देणारा एखादा कर्मचारी पण दारात आहे, आणि यादी बनवली गेली ,पाच मिनिटाच्या आत गाडीतला मागणी केला गेलेला सगळा माल हा किरकोळ दुकानदारांच्या दुकानात असतो, तो किरकोळ दुकानदार जी काही रक्कम झाली आहे त्या रक्कम त्या विक्री त्याच्या हवाली करतो आणि अशा प्रकारे हा व्यवहार पूर्ण होतो.

बरेचसे नवीन व्यवसाय करणारे लोक हा प्रकार करतात ,,, ते करण्यामध्ये सुविधा आहे, एक मालवाहू गाडी मग ती ॲपे रिक्षा टाटा एस असो किंवा अन्य कोणतेही ती असली माळ तयार असला की मार्केट तयार असतं.

छोटे भाजीविक्रेते पान मसाला विक्रेते अंडी विक्रेते गोळी बिस्किटस विक्रेते , ऑटो पार्ट्स विक्रेते , इलेक्ट्रिकल सामान विक्रेते, किंवा अन्य कोणतेही विक्रेते ज्यांना गावोगाव फिरून विकायचा आहे ते हाच प्रकार करतात

📌 या प्रकारामध्ये आपण दुकानदाराच्या दारात जात असल्यामुळे दुकानदाराची सोय होते आणि आपल्याला सुद्धा एखाद्या ठिकाणी ग्राहकांची वाट बघत बसण्याची गरज नसते.

📌 या प्रकारामध्ये व्यापारी सकाळीच घराच्या बाहेर निघतात आणि संध्याकाळपर्यंत सुद्धा विक्री करतात त्यांचा दिनक्रम असतो त्याला ते फेरी असं म्हणतात.

📌 हा प्रकार, जरी सुयोग्य वाटत असला तरी, यात कॅश कलेक्शन साधारण असू शकते.

📌 पण अगदी नवीन व्यवसायात उतरत असाल तर स्टॉक सेल करा, चांगला अनुभव पण मिळेल आणि व्यवसाय शिक्षण सुद्धा .

Order_Sale :

आपण एखादा ठराविक भूभागात मध्ये एखाद्या कंपनीची एजन्सी घेतो, आणि त्या भूभागापुरता, त्या कंपनीचा माल तिथल्या दुकानदारांना पुरवतो.

इथे आपली Exclusive मोनोपली असते.

आता हा प्रकार देखील दुकानदारांना त्यांच्या दारापर्यंत मला पोहोचवण्याचा आहे ,पण या ठिकाणी एखादा कर्मचारी पूर्ण किरकोळ दुकानदारांच्या दुकानापर्यंत जातो, त्यांच्याकडून त्यांना काय काय हवं आहे? त्याची ऑर्डर घेतो.

ही ऑर्डर साध्या पॅडवर किंवा नवीन फॉरमॅट मध्ये मोबाईल ॲप्लिकेशन वर सुद्धा घेतली जाते.

आता हा माणूस एका गावातील सगळ्या ऑर्डर जमा करून एजन्सीमध्ये वापरता येतो आणि त्या लिखित ऑर्डर प्रमाणे त्या वेगवेगळ्या दुकानदाराचा मालाला काढला जातो.

आता ज्यावेळी एजन्सीची गाडी, गोडावून मधून दुकानदारांना वाटप करायला निघते ,त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्या दुकानदाराने काय सांगितलेलं आहे ? याची एक यादी असते आणि गाडीमध्ये त्या यादीनुसार भरलेला माल पण असतो.

त्यामध्ये पेमेंट हे मोठे असू शकते , आणि पेमेंट ऑप्शन हे चेक / चेक+ कॅश दोन्ही !

मार्केटमधल्या जवळपास सगळयाच कंपन्या एजन्सी मार्फतच माल विकतात, पण बऱ्याच कंपन्या,फक्त ओरीजनल किंवा पक्कं बिल दयायला लावतात, त्यामुळे हा सगळा व्यव्हार नंबर 1 मध्ये असतो.

आपण जेंव्हा ऑर्डर सेल हा प्रकार अवलंबतो, आपल्याकडे एखादया कंपनीची एजन्सी आणि मनुष्यबळ लागु शकते.

📌 हे दोन्ही प्रकार योग्य आहेत.

📌 कोणताही प्रकार अवलंबा पण मार्केटला माल घेऊन जा ! तेंव्हाच पैसा येतो.

लेख आवडला असेल ?तर इतरांपर्यंत फॉरवर्ड करा .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क , औंध , पुणे .
9518950764.

Office : श्री ओमकेश मुंडे सर 9146101663.

उद्योगनिती हे आमचे व्हेंचर असले तरिही,आपल्या फुड फॅक्टरीसाठी आपण स्टॉकसेलचा प्रकार अवलंबतो .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *