विक्री दरम्यान ही वाक्यं/शब्द वापरू नयेत.

ते शब्द/वाक्य जे विक्री दरम्यान वापरू नयेत

© निलेश काळे

📌 सेल्स प्रोसेस मध्ये विक्रेता आणि ग्राहक यांच्या दरम्यान ज्यावेळेला क्लोजींग ची वेळ यायला लागते त्यावेळी विक्रेता घाई करतो , त्याला काहीही झाले तरीही विक्री करायची असते मग तो असे काही ठेवणीतले शब्द / वाक्य बोलतो जे त्याला वाटतं का क्लोजिंग फायनल करतील , पण नेमके तेच शब्द बुमरँग करतात , आपल्या लक्षात पण येत नाहीत !

कोणते आहे ते वाक्य जरा बघूया !

📌(1) to be honest with you
प्रामाणिकपणे_सांगायचं_झालं तर

म्हणजे आत्ता तो विक्रेता खरं बोलतोय असं मानायचं का ? म्हणजे आत्तापर्यंत तो जे बोलत होता ते लबाडी होतं !

लोक सरळच म्हणतात , खरं तर “तुमच्यासाठी म्हणून ही किंमत सागायलोय ,बाकिच्याना आम्ही एवढी कमी करतच नाही ” .

खोटं … साफ खोटं … ग्राहक ओळखून जातो कि , हे बोलताना सुद्धा तो विक्रेता आपला गेमच करतोय !

मग कशाला वापरायचे हे शब्द ?

त्याला किंमत पटली तर तो घेईलच ना ?

पाणी लावलेलं ग्राहकांना कळतं !

**********

📌(2) Trust Me माझ्यावर_विश्वास_ठेवा :

विक्रेते सहजच म्हणतात , ” माझ्यावर विश्वास ठेवा ” !

तुम्हाला काय वाटतं , जेंव्हा कोणी असं म्हणतं तेंव्हा आपण त्याच्यावर खरंच विश्वास ठेवतो ?

खरं तर विश्वासपात्र माणसाला हे म्हणायची गरजच पडत नाही , ग्राहक जो आलेला आहे तो काहीतरी / थोडा बहुत का होईना ? विश्वास असेल म्हणूनच आलेला आहे ना ? का उगाचच विश्वास ठेवा म्हणायचं ?

असं भिक मागून कोणीही विश्वास ठेवत नसतं,तो कमवावा लागतो ! कारण “Our Action speaks louder than us ”

📌 (3) Sorry to bother you/
आपल्या कामात व्यत्यय आणला असेल तर सॉरी बरंका !

काय ?????????

हे फोनवर घडतं , असं वाटतंय का? कि समोरच्याच्या कामात आपल्या मुळे अडथळा येतोय ,,, तर कॉल करूच नका ना ?

कशाला पहिल्या वाक्यातच सॉरी म्हणायचंय ?

त्याच्यामुळे ग्राहक आणि विक्रेता हे समीकरण एका पातळीवर राहत नाही ! विक्रेता किंवा कॉल करणारा निम्न स्तरावर जातो .

कोणताही व्यवहार ही देवाणघेवाण असते ,सेवा X पैसा , उत्तर X प्रश्न , प्रॉडक्टx पैसा ! इथे कोणीच उगाचच कमीपणा घ्यायची गरजच नाही !

कारण आपण व्यवहार करतोय , भीक नाही मागत आहोत ! क्लिअर आहे !

📌(4) “follow Upघेण्यासाठी फोन केलाय”

WRONG … कंम्प्लीटली चुक आहे हे !
“कोणालाही … हे आवडत नाही !”
ग्राहक चौकशी करतो,आवडलं नाही तर तो विषय तिथेच सोडून देतो,मग अशा ग्राहकाला फोन जातात, ” सर तुम्ही आमच्याकडे अशा अशी चौकशी केली होती”
त्याला आठवत पण नसतंय !
मग …..
” तुम्ही नाही का ? सहा महिन्यापूर्वी , अशी अशी चौकशी केली होती , त्याचा फॉलो अप घ्यायला फोन केलाय | “.

झालं,तिकडून रिप्लाय येतो ,,,, No !

लोकांना खरेदी करायला आवडतं , पण जबरदस्ती विकलं जायला आवडत नाही !
कुणी पिच्छा केलेला आवडत नाही !
अनेकांना समजतच नाही ते ! अनेक बिझनेस कन्सलटंट म्हणवणारे सुद्धा जेंव्हा सेमिनार घेतात, तेंव्हा स्टाफला वारंवार फॉलो अप कॉल करायला लावतात …
असं नसतंय ते !
फॉलोअप तर घ्यायचाच पण त्याला ते कळलं पण नाही पाहिजे,इतक्या सहजपणे घ्यायचा.

(5) Buy:

विकत घ्या असं म्हणणं I

ग्राहकाला हा शब्द आवडत नाही !
“लोकांना खरेदी करायला आवडतं ” !

पण जेव्हा कोणी विचारतं … “तुम्ही हे लगेच खरेदी करणार का ” ? …. ग्राहक अलर्ट होऊन जातो .

मला याच्यासाठी लगेच पैसे मोजावे लागतील … मग ???नकोच ! यामुळे ग्राहक डिफेंसीव होतो .

त्याची ती भावना तर आपल्याला ट्रीगर करायची नाही ना !

कार कंपन्या कडे बघा … त्यांचे शब्द बघा …

” एक नवीन मेंबर घरात आणा ”
” xxxx गोष्टीला आपल्या फॅमिलीचा हिस्सा बनवा “.
“Join the team ”
” आयुष्यात पुढे जायला आवडेल का ” ?
” या प्रॉपर्टीचे मालक बना ”

SURE …..👍

असे भारी भारी वाक्य टाकले ‘ कि ,ग्राहकाच्या लक्षात पण येत नाही कि कधी विक्री करुन झाली !

म्हणून वेगळी वाक्य वापरा ! यामुळे सहज विक्री होते .

📌(6) Contract :

हा शब्द वापरला तर भलेभले मागे हटतात , त्यांना असं वाटतं कि आपण आपली सगळी लाईफच लिहून देतोय , मग लोकं मागे हटतात , कॉन्ट्रॅक्ट हा सिरियस शब्द आहे ! खूप वजनदार , त्याचं ओझं होतं !

मग ??????

ऍग्रीमेंट !

व्वा ! भारी शब्द ! अॅग्रीमेंट या शब्दावर दोन्ही पार्टी मान्य होऊ शकतात , किंवा
Paperwork …

“चला पेपरवर्क करून,बाजूला टाकू ”

या शब्दांमधे थोडा मवाळपणा आहे , भलेही Terms & Condition त्याच आहेत ,फक्त शब्द बदलला !
काम सहज होईल !

📌(7) तुमच्याकडून काही रिस्पॉन्सच आला नाही

अरे दादा … त्याला दयायचा असता ? तर त्याने तेंव्हाच दिला नसता का ? परत परत कशाला विचारतोय ?

तो तुम्हाला टाळतोय हे त्याला माहितंय , मग जे त्याला माहितय तेच काय डबल डबल विचारायचंय ?
ज्याने आपल्या बरोबर व्यवहार केला नाही,त्याला याच्यामुळे Guilty वाटू शकतं,म्हणून हे करू नका !
उलट कॉल करायचाच आहे, तर दुसरी काही तरी माहिती दया ! सहजच त्याच्या टच मधे रहा !

काम भागतंय !

📌 (8) आम्ही त्याच्यापेक्षा फार चांगले आहोत

या एका गोष्टीमुळे अनेकांचा धंदा मार खातो,”आपण चांगले आहेात हे सांगा ना” ?कुणी अडवलंय ?

पण आम्ही स्पर्धकापेक्षा खूप चांगले आहोत , किंवा याच्यापेक्षा पुढे जाऊन लोकं हे सांगतात , कि “स्पर्धक किती वाईट आहे, त्याची क्वालिटी किती खराब आहे ? ” ….. झालं !

तुला कुणी विचारंलंय काय ?

मग गप पड ना ?

दुसऱ्याची बुराई केल्याने आपली इज्जत जात असते, त्याचं कौतुक करायला आवडत नाही का ?

मग … ग्राहकाने विचारले तरी सरळ सांगा,”हो असेल त्यांच्याकडे,मला माहित नाही !”

संपलं !

सोप्पं आहे !

📌 अशा प्रकारे काही शब्द टाळले/ आणि काही योग्य शब्द वापरले तर आपली विक्री वाढेल यात शंका नाही !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा .
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *