वेगवेगळे ब्रान्डस एकत्र येऊन धंदा का करतात ? त्याची काय गरज ?

Cross_Promotion_काय_असते?

©निलेश काळे.

📌 आता हे काय असतं ?

📌 Wikipedia च्या व्याख्येनुसार ज्यावेळी दोन Non – Competing brand एक दुसऱ्याचे प्रॉडक्ट किंवा सेवा,डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या ग्राहकांना सुचवतात,या प्रक्रियेला क्रॉस प्रमोशन म्हणायचं !

📗#Referance_हा_वेगळा

इथे गडबड करू नका !
ज्यावेळी एखादी व्यक्ती … दुसऱ्या व्यक्तीला सुचवते कि , त्याच्याकडे जा चांगला माल मिळतो , तेंव्हा तो रेफरन्स असतो,पण इथे तसं नाही !
इथे एक यशस्वी व्यवसाय, आपल्या ग्राहकाला एखादया दुसऱ्या कॅटेगरीतील व्यवसायाबद्दल सांगतो त्याला क्रौस प्रमोशन म्हणायचं.

📒 #डबल_फायदा

कुठलीही प्रमोशनल ऍक्टीविटी करायची म्हणली, कि त्याला पैसा लागतो, आणि पैसा काही झाडावर उगवत नाही , तेंव्हा त्याला सांभाळून खर्चायचं असतं ,
तर …
हा प्रकार जवळपास बिनखर्चिक आहे ! म्हणजे एकष्ट्रा पब्लीक पर्यंत पोहचायला ,एकष्ट्रा खर्च होत नाही !

📙Different_target_Audience_भेटतो

मार्केट मधे जेंव्हा एखादी कंपनी आपले प्रॉडक्ट विकायला आणि प्रसिद्ध करायला चालू करते तेव्हा काही विशिष्ट वर्ग त्याचा फॅन बनतो .

हे जरूरी नाहीये कि ,दोन व्यवसायांचा टारगेट कस्टमर एकच असावा,पण जेंव्हा क्रॉस प्रमोशन होतं तेंव्हा एकमेकांचा ग्राहक वर्ग एक दुसऱ्याला मिळतो .

📕Equally_successful_partnership

हा प्रकार पण सोयरीक केल्यासारखाच असतो .

हे बघीतलं जातं कि,समोरचा पण त्याच्या क्षेत्रात तेवढाच यशस्वी आहे का ? जेवढे आपण आपल्या क्षेत्रात ?

नाही तर तर ते बैलेन्स होत नाही .

जसे Google आणि Nestle चं आहे,त्याच्यामुळेच तर Android च्या वर्जन्स ला Nestle च्या चौकलेट्स ची नावं दिली गेलीत जसं … Kitkat

📗Own_product_of_different_category

कधी कधी कंपनी मोठी असते,त्यांचे अनेक प्रॉडक्ट असतात जे जनरल पब्लीक ला माहिती पण होत नाहीत , त्यांचं क्रॉस प्रमोशन केलं जातं .

जसे महिन्द्रा ची गाडी घ्या ,,,, आणि Mahindra च्या हॉलीडे क्लबची मेंबरशीप मिळवा !

Wipro च्या LED/ CFL बल्ब वर संतूर साबण मिळवा !

KFC च्या कॉम्बोत Pepsi पण मिळते .

मालक एकच असतो ,पण प्रमोशन असं होतं

📒कधी कधी एकतर्फी सुद्धा होतं

बऱ्याचदा आम्ही आमच्या प्रॉडक्ट मधे इतके भारी घटक वापरलेत हे सांगताना,त्या सांगितलेल्या घटकांचं प्रमोशन आपोआप होतं.

जसं कार उत्पादक लिहितात :

आमच्या कारमधे ,बेज इंटीरीयर आहे Apple कारप्ले आहे,Bose चे साऊंड आहेत,ABS system आहे

आता दुसऱ्या कंपनीने यांना म्हणलं नाहीये कि,तुम्ही सांगा !

पण यांना स्वतःचा मोठेपणा मिरवायला ते सांगावं लागतं !

हा प्रकार सगळीकडे आहे,आत्ताच्या परिस्थितीला तर फारच आवश्यक आहे ,तेंव्हा चांगला पार्टनर शोधा आणि क्रॉस प्रमोशनसाठी टायअप करून घ्या.

📌परवडतं ते

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध ,पुणे.
9518959764
Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *