वॉरेन बफे सुद्धा इन्वेस्टमेंट करताना, महाराजांच्या काळातील पद्धत वापरतात .

वॉरेन बफे सुद्धा इन्वेस्टमेंट करण्यापूर्वी “इकॉनॉमीक मोट” बघतात .

Economic Moat हे दोन शब्द प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरन बफेट यांनी मार्केटला दिलेले आहेत ,याचा अर्थ साधारणपणे काय होतो? ते समजून घेण्यापूर्वी आपण थोडे इतिहासात जाऊ

_
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे मोठेमोठे महल बांधायचे किंवा किल्ले बनवायचे, किल्ल्यांमध्ये ते सोनं किंवा आपला पैसा दारुगोळा आपलं कुटुंब यांना ठेवायचे ,एक राजा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करून त्यांची संपत्ती लुटून घ्यायचा , भलेही राजवाड्याच्या किंवा किल्ल्याच्या भिंती दरवाजे मोठे असायचे पण ही सुरक्षा पुरेशी नव्हती, म्हणून मग या राजांच्या इंजिनियर्सनी किल्ल्याच्या भोवती एक पाण्याने भरलेला खंदक करून ठेवायला सुरुवात केली (यालाच Moatम्हणतात ) आता हा खंदक पार करून येऊन मग राजवाडयावर हल्ला करणे समोरच्या शत्रूला तेवढं सोपं राहिलं नाही.

हा खंदक आहे याला इंग्लिश मध्ये मोट म्हणतात आणि याच्यामुळे त्या राजवाड्याची किंवा किल्ल्याची सुरक्षा ही अभेद्य होऊन जायची, फक्त एका गोष्टीमुळे जी सुरक्षा वाढली तो प्रकार त्या किल्ल्याला अजिंक्य बनवून टाकायचा आणि आज तीच गोष्ट बिजनेस संदर्भात वापरले जाते .

वॉरन बफेट जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये इन्वेस्ट करायला घेतात, तेव्हा ते त्या कंपनीचं सगळ्यात अगोदर इकॉनॉमिक मोट बघतात

काल आपण एखाद्या व्यवसायाकडे असणारं कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज म्हणजे काय असतं ?हे बघितलं आहे याच्या पुढे जाऊन एक प्रकार असा असतो ज्याला सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज असं म्हटलं जातं .

ज्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये अतिशय उत्तम प्रकारे सातत्यपूर्ण रीतीने नफा मिळवत राहतात, याचे मुख्य कारण म्हणजे या कंपन्यांकडे एक किंवा जास्त इकॉनॉमिक मोट असतात .

एक साधं उदाहरण घ्या, Fevicol, डी-मार्ट ,रिलायन्स-जिओ या कंपन्या शेअर मार्केटमध्ये सातत्याने चांगले डिव्हीडंट गुंतवणूकदारांना देतात .

यांनी गुंतवणूकदारांचं खूप काही नुकसान केलंय, असं तुम्हाला कधीच दिसणार नाही , कारण? फेविकॉलचा मार्केटमध्ये कोण प्रतिस्पर्धी आहे? रिलायन्स जिओने जितक्या स्वस्तामध्ये इंटरनेटचे प्लान कोणाचे होते? डीमार्ट इतका स्वस्त माल कोण देतं कारण यांनी स्वतःच्या जागेमध्ये त्याने स्टोअर्स उभे केलेत .

आता आपला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण जोपर्यंत आपल्या व्यवसायाच्या आजूबाजूला स्वतःच एक किंवा अधिक Economic Moat तयार करत नाहीत ,आपल्या व्यवसायाची वैशिष्ट्ये तयार करत नाहीत, तोपर्यंत आपला व्यवसाय जगातला कोणताही माणूस कॉपी करून त्याच्यासारखा सेम टू सेम व्यवसाय चालू करू शकेल .

मला बरेच जण विचारतात की सर आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये कुणीतरी इन्वेस्टर पाहिजे, जो ,की आमच्या व्यवसायामध्ये पार्टनरशिप करण्यासाठी काही पैसा लावेल पण लक्षात घ्या जगातला कोणताही इन्वेस्टर आपल्याला सगळ्यात अगोदर इकॉनोमिक मोट मांडायला सांगेल

_आणि जर आपण आपल्या व्यवसायाची इकॉनोमिक मोट त्याच्यासमोर मांडू शकलो नाही तर तो आपल्या व्यवसायामध्ये एक रुपयाही इन्वेस्ट करणार नाही

मागील लेखामध्ये कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज किती प्रकार असतात? मी ही सांगितलेल आहेत, पण आज इकॉनॉमिक मोटचे काही प्रकार मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर ते थोडक्या मध्ये समजावून घ्या यांच्यापैकी काही आपण आपल्या व्यवसायांमध्ये वापरू शकतो .

Widespread Availability/NetWorking .

भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात जा ,तिथल्या दुकानांमध्ये तुम्हाला हिंदुस्तान लिव्हर कोकाकोला, फेविकॉल ,गोदरेज, Colgate , P&G या कंपन्यांचे उत्पादने मिळतील – म्हणजे मिळतील, कारण ?? भारतातले किराणा दुकान या कंपन्यांच्या उत्पादनांचा शिवाय चालूच शकत नाहीत , म्हणजे या कंपन्यांनी किराणा या क्षेत्रांमध्ये डिस्ट्रीब्यूशन चैनल मोठा केलेला आहे .

समजा आपण एखादी जर आपण FMCG मध्ये कंपनी काढली तर, आपल्याला या मोठ्या कंपन्यांना टक्कर देणे शक्य होणार नाही,

एक साधं उदाहरण घ्या, गोदरेज या कंपनीचं गुड नाईट हा ब्रांड फार मोठा आहे त्यांचे साबण शाम्पू आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्पादने आहेत या उत्पादनांसाठी त्यांनी आपलं डिस्ट्रीब्यूशन चैनल मोठं करून ठेवलेला आहे, ज्या वेळी कोरोनाचा प्रसार झाला आणि बाजारांमध्ये मास्क ची मागणी वाढली मास्क उपलब्ध होत नव्हते ,त्यावेळी या कंपनीने Wildcraft नावाने स्वतःचा एक ब्रँड तयार केला आणि तात्काळ आपल्या डिस्ट्रीब्यूशन चॅनेलमध्ये हे अडीचशे रुपयाला एक मिळणारा मास्क टाकला आणि कमालीची गोष्ट म्हणजे अशी की यांचा अडीचशे रुपये चा मास्क हातोहात विकला गेला, कारण वाईल्ड क्राफ्ट ही कंपनी गोदरेज डिस्ट्रीब्यूशन चैनल मुळे सर्व एकदाच पसरू शकली .

म्हणजे या कंपन्यांचं जे नेटवर्क असतं ते इतकं स्ट्रॉंग आहे की त्याच्यापुढे कोणतीही नवीन कंपनी यांना कॉम्पिटिशन देऊच शकत नाही *जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये एक दणकट असं नेटवर्क तयार करू शकला तर ते नेटवर्क आपल्यासाठी अभेद्य कवच बनुन जातो आणि मग कोणीही येऊ दे तो आपल्या बिजनेस ला सोडू शकत नाही हे समजून घ्या .

High Switching Cost

ही Economic Moat कसा काम करतो ? ते जरा समजून घ्या, समजा आपण एखाद्या कंपनीचा सबस्क्रीप्शन पॅक घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण पैसे भरलेले आहेत किंवा आपले डॉक्युमेंट तिथे दिलेले आहेत या कंपनीला सोडून आपण दुसर्‍या कंपनीकडे जाणे हे बर्‍यापैकी महाग पडू शकतो किंवा वेळखाऊ पडू शकतो.

बऱ्याचदा एक व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे जाणं हे महाग असतं म्हणून ग्राहक शक्यतो असा प्रकार करत नाही आणि आहेत या कंपनीबरोबर व्यवसाय करत राहतो असं म्हणलं जातं समजा तुमचं अकाउंट में बँक अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आपले EMI ,CC वगैरे सगळ्या गोष्टी स्टेट बँक ऑफ इंडिया अकाऊंटवर येतात आपले सगळे आर्थिक व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, परंतु समजा उद्याच्याला जाऊन काही गोष्टी अश्या घडल्या कि तुम्हाला त्या बँकेचा कंटाळा आला किंवा त्यांची सर्विस चांगलं वाटत नाही आहे पण एवढा सगळा व्यवहार त्या बँकेबरोबर करत असल्यामुळे सगळाच्या सगळा व्यवहार आपण दुसऱ्या कोणत्या प्रायव्हेट बँकेमध्ये शिफ्ट करू शकत नाही, आणि हा त्या बँकेसाठी फायद्याचा पॉईंट आहे.

कारण ??? आपण जर अशा प्रकारे आपली बँक बदलायला गेलो ,तर ते एक ग्राहक म्हणून आपल्यासाठी फारच किचकट होईल किंवा ते आपल्याला परवडणार नाही आपला वेळ जास्त जाईल म्हणून एक ग्राहक म्हणून आपण या गोष्टी कळत नाही आणि ही बाब त्या बँकेसाठी इकॉनोमिक मोट बनून जाते.

एक साधारण गोष्ट सांगतो आमच्या किल्ले धारूर या गावांमध्ये ,abc जनरल स्टोअर्स नावाचा एक जनरल स्टोअर्स आहे ,या माणसाने गेल्या पंचवीस वर्षापासून लेडीज कॉस्मेटिक्स या क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय,

जगामध्ये जे काही लेडीज साठी तयार होतं ते यांच्या दुकानांमध्ये दुसऱ्या दिवशी उपलब्ध असतं, पण प्रॉब्लेम असा आहे की या माणसाचं तोंड चांगलं नाही , हा माणूस लेडीज ग्राहकाला सुद्धा फाडफाड बोलतो तरीसुद्धा माझ्या गावातील 95 टक्के महिला या दुकानातूनच रेगुलर पणे खरेदी करतात, कारण येथे सातत्यपूर्ण रीतीने फ्रेश स्टॉक उपलब्ध असतो, दुसरी गोष्ट अशी की विलासला जर असं समजलं की एखाद्या महिलेने त्याच्या दुकानातून जाऊन दुसऱ्या दुकानात खरेदी केली आहे, तर त्या महिलेला पुन्हा दुसरी कोणतीही वस्तू विकत नाही, आता ही गोष्ट अव्यवहार्य आहे परंतु त्याची हीच सवय आहे त्यामुळे महिला इतर दुकानातून खरेदी करायचे टाळतात आणि जे काही घ्यायचं आहे ते विलासच्या दुकानातून घेतात म्हणजे त्या महिलेला विलास दुकान सोडून दुसऱ्या दुकानातून खरेदी करणं परवडत नाही कारण त्या दुसऱ्या दुकानात सगळ्या वस्तू मिळत नाहीत.

ही Shifting cost त्या महिला ग्राहकासाठी जरा जास्त आहे आणि हा त्या विलासचा दुकानाचा Economic Moat आहे

इथे सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्या ग्राहकाला अशी सर्विस द्या की आपल्याला सोडून जाणे त्याला परवडणार नाही

Toll Moat.

या प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज ग्राहकांना जबरदस्तीने आपल्याकडे यायला भाग पाडतं ,याचं कारण देखील याप्रमाणे आहे.

जगामध्ये केवळ आपल्याकडं आणि आपल्याकडेच हे उत्पादन किंवा सर्विस किंवा तो सिक्रेट फॉर्मुला उपलब्ध असतं.

याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स.

साधारण चॅनेलवर साधारण चित्रपट किंवा मालिका या सर्वांसाठी खुल्या असतात ,परंतु नेटफ्लिक्स सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार विशेष मटेरियल ते स्वतः तयार करतात, त्यांची स्वतःची इनहाऊस प्रोडक्शन सिस्टीम असल्यामुळे त्यांचे शो ज किंवा शॉर्टफिल्मस या इतर कुठेही उपलब्ध होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यावेळी आपल्याला नेटफ्लिक्स वर उपलब्ध असणारा एखादा शो किंवा सिरीयल बघायची आहे त्या वेळेला आपल्याला जबरदस्तीने का होईना नेटफ्लीक्स सबस्क्रीप्शन घ्यावच लागणार आहे.

या प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या दुकानांमध्ये एखादी अशी विशिष्ट वस्तू आणून ठेवली की जी आपल्या एरिया मध्ये किंवा गावांमध्ये फक्त आपल्याकडेच मिळू शकते तेव्हा ती गोष्ट आपल्या व्यवसायासाठी Toll Moat असते.

वरील सर्व मुद्दे आपण जर एकत्रित पणे करून बघितले तर या सर्व मुद्द्यांचा वापर करून आपण आपल्या व्यवसायामध्ये एखादी मोनोपोली सिस्टीम तयार करू शकतो.

ज्या वेळेला आपण एखाद्या इन्वेस्टर कडे इन्वेस्टमेंट मागायला जाऊ किंवा बँकेकडे कर्ज मागायला जाऊ त्या वेळेला तो इन्वेस्टर किंवा बँकेचा मॅनेजर, आपल्याला आपल्या व्यवसायातील Economic Moat विचारणारच आहे ,त्यामुळे हा इकॉनोमिक मोट तयार करून ठेवणे आपलं साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.

© निलेश काळेे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
5th floor, विघ्नहर चेंबर्स ,
नळस्टॉप,पुणे .
9518950764
Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *