व्यवसायाच्या सुरूवातीलाच या 6 चुका महागात पडतात.

#Business_Coaching :

#व्यवसायाच्या_सुरुवातीच्या_काळात_करू_नये_अशा_चुका :

©निलेश काळे .

उद्या घडतील अशा चुका सांगणे , त्यातून मी किती शहाणा आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे हा या लेखाचा उद्देश नाहीये , पण घाटामध्ये वळणं दाखवणाऱ्या पाट्या लावल्या नाहीत तर गाडया कन्फ्युज होतील कि नाही ? तसा हा प्रकार समजा ! यातल्या कित्येक चुका स्वतः केल्या होत्या ,त्याचे परिणाम पण भोगले! म्हणून हा सगळा लेखन_ प्रपंच केलाय , बघा काही सापडतय का कामाचं !

📌 Dont make just because they say :

व्यवसाय करताना मार्केट सर्वे हा सर्वात पहिली पायरी आहे , इथे होणारा एक झोल आहे तो ओळखला पाहिजे , कारण बऱ्याच लोकांना हे क्लिअर माहिती च नसतं कि पाहिजे काय आहे ? लोकं बऱ्याचदा आदर्शवादाचे बोलतात , आणि त्यावर विसंबून जर आपण प्रॉडक्ट डिजाईन केले किंवा विक्रीला आणले तर पश्चात्ताप होऊ शकतो .
a) माझं गाव छोटं आहे एकाने हे बघीतलं कि पिझ्झाचं दुकानच नाहीये इथे, दहा पाच जणांना विचारलं आणि केलं चालु, ? शेवटी जे व्हायचं तेच झालं दहा रुपयाचे दोन वडापाव खाणाऱ्या मार्केटला ते सत्तर रुपयाला एक पिज्जा देणारे दुकान मानवले नाही , बंद पडले .
(b ) दुसरं उदाहरण आहे ते एका मोठया फ्लॉप चं ,,, सेगवे नावाची दोन चाकाची बेटरी ऑपरेटेड एका माणसाला उभं राहून जाता येईल अशी गाडी मार्केटला आली होती , सगळं चांगलं होतं , त्या स्टार्ट अप मध्ये स्टीव जॉब्स आणि जेफ बेझोज ने पण मोठी गुंतवणुक केली होती . पण परिणाम ग्राहकच नाही आले त्याला घ्यायला आणि स्टार्ट अप फ्लॉप झाले .

म्हणून फक्त मार्केट सर्वे वर विसंबून न राहता , लोकांना अॅक्च्युअली पाहिजे आहे का ? हे डोळसपणे बघा .

📌 Don’t work Alone :
ही एक फार मोठी समस्या आहे , आपण विचार करतो , कि चला एकटेच कामं करू तेवढेच पैसे वाचतील , आपलं कामं पण होतील , सिक्रेटस पण आपल्यातच राहतील , म्हणून बसतो आपण एकटेच झटत .
पण इथे चुक होते आणि आपली चांगलीच धावपळ उडते , आपला युक्तीवाद असतो कि जरा बस्तान बसलं कि मग माणसं घेऊ आणि ते योग्य पण आहे , प.ण टीम पाहिजेच असा विचार पक्काच असेल तर मिळते ना ? कमी पैशात टीम .
त्यामुळे ही चुक करू नका , गरज असेल ,परिस्थिती असेल तर टिम घ्या ! यश लवकर जवळ येतं

📌 Don’t Expect Quick Results

ही अजुन एक गोष्ट चुकते आपली ,
आपल्याला लगे लगे रिजल्ट पाहिजे , नफा दिसला पाहिजे, अरे ही काय नौकरी आहे का ? तिस तारखेला पेमेंट अकाऊंटला यायला , इथे वेळ लागतो , तो पिरियड तीन महिने ते एक वर्ष पर्यंत असू शकतो , क्रॉस चेकिंग म्हणून आपण दिवसाचे गणित मांडून बघू शकता पण , लवकर निष्कर्ष काढून मोकळे होणे योग्य नाही .

📌 Don’t Be Emotional , be Rigid and strong :

भावनिक माणसं मनाने खूप साधी सरळ आणि सोप्पी असतात , तितकेच ते आपल्या पेक्षा इतरांचाच जास्त विचार करतात , याला आपण सद्गुणी म्हणतो , पण गल्ल्यावर बसल्यानंतर हा सद्गुण काहीही कामाचा नाही , ” धंदे के टाईम पर कोई दोस्ती नही ” ही एक मोठी गोष्ट ध्यानात ठेवावी ,
व्यापारी कम्युनिटी मध्ये स्वत : च्या बापाकडून सुद्धा पैसे घेतात , अशी हजारो उदाहरणे सापडतील आपल्याला , आणि ती लोकंच यशस्वी आहेत , त्यामुळे , इमोशनल फुल बनून राहु नका , स्ट्राँग आणि बोल्ड बना !

📌 Spend Little time on Little stuff

आपल्याकडे वेळेची कमतरता नेहमीच असणार आहे , म्हणून पहिल्यापासुनच हा मंत्र लक्षात ठेवा , कमी महत्वाच्या कामावर कमी वेळ घालवा , जास्त वेळ क्रिएटीव थिंकीग वर खर्च करा ना ! ते महत्वाचं आहे !
म्हणून तर इंग्रजांनी फक्त क्लेरिकल कामांसाठीच भारतातले लोकं वापरले आणि आपल्यावर 200 वर्ष राज्य केले .
या सुत्राला डेलिगेशन म्हणतात , छोटे छोटे कामं इतरांवर सोपवा आणि आपण व्हॅल्यु अॅडीशन कशी करता येईल ते बघा !

सतरंज्या टाकणे आणि उचलणे ही कामे सुद्धा नेत्यांनी केली तर झाल्या मग सभा !

येतंय ना लक्षात ?

📌 Don’t seek too much fund to start :

मध्यंतरी आपल्या फेसबुक पेजवर एक कार्यकर्ता प्रत्येक पोस्टवर एकच कमेंट करायचा ” कोणी मुद्रा लोन करून देतंय का ? 20% कमिशन देतो ” !

दरवेळी तेच !

हा मोठ्ठा आणि गहन प्रॉब्लेम आहे ,

मान्य ! पैशाशिवाय धंदा होत नाही !

पण फक्त बक्कळ पैशानेच धंदा होतो हे पण तितकच खोटं य !

उलट खूप जास्त पैसे असले , अनूभव नसला तर तो धंदा जास्त फास्ट बूडतो !हे पण तेवढंच खरंय त्यामूळे थोडेफार असतील त्यातूनच चालू करा ! हा हूँ करत करत पैसे जमतील .
एकदा गाडी धक्क्याला लागली कि झालं .
कशाला पाहिजे भली मोठी रक्कम ?

📌 Don’t start with family members & friends :

वर लिहिलंय एकटे चालु करू नका आणि शेवटचा पॉईंट फॅमिलीतल्या लोकांना घेऊन चालु करू नका !

असं लिहिलय म्हणल्यावर जरा कन्फ्युजन होतंय का ?

तर त्याचा अर्थ तसा नाहिये !

मार्गदर्शक किंवा सोबती म्हणून फॅमिली मेंबर्स ठीक आहेत , पण कर्मचारी म्हणून फॅमिली वापरणे जरा तापदायक ठरू शकतं , काय होतं ? कि जसं आपण आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामं करवून घेऊ शकतो तसे मेहूणा , साडू किंवा साल्याकडून करवून घेऊ शकतो का ?
साधी गोष्ट आहे , नाही करवून घेऊ शकत त्यामुळे अगदी सुरुवातीलाच नातेवाईक गुंतवू नका !
पुढच्या पुढे बघून घेऊ .

अशा प्रकारे काही गोष्टी होत्या ज्या टाळता येणं शक्य आहे , काही पटतील काही पटणार नाहीत पण या बऱ्यापैकी सत्य आहेत , त्यामुळे या वर विचार करा आणि वापरात आणा ! फायदाच होईल !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा

निलेश काळे
उद्योगनीती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office no : 9146101663 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *