व्यवसायातला सगळ्यात खतरनाक आकडा : एक, का बरं ? वाचा

680 Views

व्यवसायातला सगळ्यात खतरनाक आकडा :एक

©निलेश काळे:

📌 व्यवसाय म्हणलं की आपला अनेक आकड्यांवर संपर्क येतोच कदाचित वरचं हेडिंग बघून तुम्हाला जरा आश्चर्य वाटले असेल पण हे खरं आहे एक हा नंबर आपल्या व्यवसायासाठी खरोखर धक्कादायक असू शकतो ते कसं आपण बघू या

📌 एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तिथे आपण आपला पूर्ण फोकस दिला पाहिजे असं सांगणारी अनेक पुस्तके मार्केटमध्ये आहेत , ती गोष्ट वेगळ्या अँगलने खरी आहे, ऊगाचच अनेक गोष्टी ट्राय करत रहाणे याला ,

“एक ना धड भाराभर चिंध्या म्हणलं जातं ” !

पण ज्यावेळेला आपण मार्केट मधे स्थिर होतो त्यावेळेला .

1)”एका” सप्लायरवर अवलंबून राहणे !
2)”एका” मार्केटवर विसंबून रहाणे !
3 “एकाच प्रकारच प्रॉडक्ट लाईनवर विसंबून रहाणे”!
4) “एका कर्मचारी किंवा पार्टनरवर जिम्मेदारी टाकणे ” !
ही गोष्ट अत्यंत घातक होऊ शकते !

📌 ” एक” नंबर हा भलेही दुसरीकडे कुठेही चांगला असू शकतो, पण या सारख्या बाबींमधे यामुळे डायरेक्ट आपल्या अस्तीत्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो .

📌 आपण खूप वेळा असा चांगुलपणा दाखवण्याच्या नादात, स्वतःच्या पायावर नाही तर डोक्यावर दगड मारून घेतो !

मग , “डोकं फुटले कि डोळे उघडतात !”

📌 असं व्यवसायात होऊ नये, या चुकीचा जाळ आपल्या कुटुंबियापर्यंत येऊ दयायची नसेल तर , इथे सावध रहा !

📌 प्रत्येक गोष्टीला दुसरा ,तिसरा, चौथा ऑप्शन ठेवा !ज्याच्या समोर ऑप्शन नसतो, त्यालाच ब्लॅकमेल केलं जातं !

📌 भावांनो, हीच धंदयाची रित आहे !

📌 ऑप्शन ठेवायला घाबरू नका !

📌 आपण मार्केटमधे पैसे कमावयला बसलोय,सोयरीक करायला नाही !

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध,पुणे .
9518950764

Office : 9146101663

Default image
Nilesh Kale
Articles: 83

One comment

  1. Khup chaan mahiti share kelit sir.once again thank you.

Leave a Reply