व्यवसायातून भरपूर पैसे कमवायचेत ना?मग स्वतःला या दहा सवयी लावून घ्या बरं !

व्यवसायातून चांगले पैसे कमवाचेयत ना?मग या दहा सवयी लावून घ्या.

©निलेश काळे

एक पक्कं मडकं बनवायला फक्त मातीचा चिखल करून गोष्टी पूर्ण होत नाहीत , त्याच्यावर संस्कार करावे लागतात सेम वे एका नॉर्मल व्यक्तीला पक्का बिझनेसमन बनवायला पण अनेक प्रकारे घडवावं लागतं तेंव्हा कुठे तो या Competition मध्ये टिकू शकतो .

अनेक बिझनेस बुक्स मधुन काढलेली ही लिस्ट आपल्यासमोर मांडतोय ही संस्कारांची यादी रोजच्या आयुष्यात पाळली तर आपण पण पक्के उद्योजक व्हाल यात काहीच शंका नाही !

📕(1) Touch it once :

आपला वेळ,आपली एनर्जी,आपले मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर FINISH नावाच्या पुस्तकातील हे तत्व कायम लंक्षात ठेवा !
“एक काम एकदा हाती घेतलं कि ते संपवल्याशिवाय थांबायचं नाही”.

ससा आणि कासवाच्या गोष्टीतला ससा, ते काम पूर्ण करत नाही,मध्ये मध्ये थांबतो आणि शेवटी हारतो .

तसंच आपल्याला पण सवय असते , पून्हा बघू,नंतर करू,उद्या करूया म्हणायची , आणि तो उद्या कधीच उजाडत नाही !

त्यामुळे ही टाळाटाळ करायची सवय आजच्या आज बंद करा , एकतर हातात काम घ्यायचे नाही , आणि घेतले तर पूर्ण केल्याशिवाय सोडायचे नाही हे तत्व पाळायला चालू करा , बघा किती मस्त बदल व्हायला चालू होतील .

*************************************

📕(2) write down your plan

जगातील प्रत्येक धर्मात किमान एक तरी असा ग्रंथ आहे , ज्यात कसं वागायचंय हे सांगितलंय !
का बरं असं ?
तोंडी पण सांगता आलं असतंच कि ,
मुद्दा असा आहे कि लिहून दिलेल्या ऑर्डर्स पक्क्या लक्षात राहतात , म्हणून तर सरकारी ऑर्डर्स Written असतात .
तसंच आदल्या रात्री उद्याच्या कामाची यादी बनवा ( याला To Do List म्हणतात ) स्वतःला अशा लिहुन ऑर्डर्स दिल्या कि कामं फार सोप्पी होतात .
जगातल्या सगळ्या टॉप उद्योजकांची ही आवडती सवय आहे , ही सवय आहे का तुम्हाला ? नसेल तर आजच लावून घ्या ! याला पर्यायच नाही .

*************************************

📗(3) Set Small Goals :

एकदा का आपण टाळाटाळ करायची नाही हे ठरवलं कि हौसेने कामाला लागतो , स्वतःला सांगून टाकतो ,Finish करायचंय ना ? मग आता थांबायचे नाही !

दादा थांबा जरा !

माणसाचा मेंदू Cycle मध्ये काम करतो , ती मशीन नाही , त्यामुळे तो नॉनस्टॉप आठ / दहा तास काम करून शिणून जातो , त्यामुळे काय करा कि ऑर्डर्स देतानाच छोट्या छोटया पार्ट मध्ये दया .

आपण ताटातलं जेवण एकदाच खातो का ? एक एक घास खातो ना ? तसं पूर्ण करायच्या कामाचे पण बारीक बारीक तुकडे करा !

आणि एक _ एक पूर्ण करत चला !
ही आयडीया भारी आहे .

*************************************

📘(4) Plan Ahead :

तहान लागली कि विहिर खणायला घेऊ नये असं आपले आजोबा_ पणजोबा पण सांगून गेलेत ,,, एकतर विहीर पूर्ण व्हायला वेळ लागतो आणि दुसरं पाणी गढूळ असतं , लगेच पिता येत नाही , त्यासाठी वेळ असतानाच विहीर खोदून ठेवावी लागते .

तसंच काहीसं व्यवसायात पण आहे , आपल्याकडे खूप वेळ आहे ,, पुढच्या पुढे बघू हे असलं वागणंच नको !

उन्हाळ्यात बघा ना ! मुंग्या किती अॅक्टीव असतात , का ? तर त्या पावसाळ्याची जमवाजमव करतात ,

उद्या पुन्हा त्रास नको म्हणून , जे त्या इतक्या छोट्या किडयाला कळतं ते आपल्याला कळू नये का ?

म्हणून वाट बघत बसू नका , उद्याची तयारी आत्ताच चालू करा .

**************************************

📙(5) Stop Over Committing:

निवडणुकीत उमेदवार का पडतात ?
याचं सर्वात मोठ्ठं कारण शोधलंय का कधी़ ?
याचं सर्वात महत्वाचं कारण आहे , दिलेली मोठी मोठी आश्वासने न पाळणं , गरज नसताना काहीही भंपक आश्वासने देतात , मग तोंडच नसते सांगायला कि ,का पुर्ण केली नाहीत ती ?
याला Over Committing म्हणलं जातं,आणि हा एक मोठा अवगुण आहे , सोप्पंय ना हो ? जेवढी आपली ताकद आहे तेवढंच बोला कि , आगाऊपणा कोण करा म्हणतंय ?
तेंव्हा Over Committing बिल्कुल नको .

************************************

📘(6) Stop Multitasking :

” एक ना धड,भाराभर चिंध्या ” याला म्हणतात ,
“सगळं मीच करणार”, कारण?
“मला सगळच जमतं” ! मरा मग !

इथे आपण माती खातो ,भावड्या , नसतं रे जमत ! हे मी करणार,ते मी करणार आणि ते सुद्धा मीच करणार ! असल्या भाबडया गोष्टी नसतात जमत

जास्त ताणलं कि तुटत असतं ते !

मग काय वाजवणार ?आणि कसं वाजवणार ?

तसंच आहे हे , जिंदगी ( बिजनेसमनची तर त्यातल्या त्यात ) एक आर्केस्ट्रा आहे,आणि आर्केस्ट्रा फक्त एकटया माणसाचा नसतोय !
त्यामुळे हा पॉईंट बिल्कुल विसरू नका,योग्य कामासाठी योग्य व्यक्तीला हाताशी घ्या ! एकटेच कडमडू नका सगळीकडे !

लढाया या सैन्याची मदत घेऊन लढल्या जातात,वैयक्तीक पराक्रम तिथे पुरत नाही.

*************************************

📒(7) Start with Hardest Thing*:

टु डू लिस्ट तयार केल्यावर त्यात अनेक कामं असतात,काही सोपी आणि काही अवघड,त्यात मग कोणती कामं अगोदर करावी ? तर Brian Tracy त्यांच्या Eat the frog first या पुस्तकात लिहीतात ,, अवघड काम सुरूवातीलाच करून टाका,मग बाकीची सोप्पी सोप्पी कामं साईड/साईडने होत राहातील .

इथे मानसशास्र कामी येतंय,बघा एक तर अवघड आणि महत्वाचं काम करून मोकळं झाल्यावर एक तर टेन्शन कमी होऊन जातंय आणि इतकं अवघड काम केलंय ना मग लहान कामाची काय औकात ? या हुरुपाने लहान कामं पटापट होऊन जातात,अगदी निवांत पणे त्यामुळे ताण घेऊ नका ! अस्संच करा !

जशी To do list बनवाल तशीच एक not to do list बनवा , म्हणजे अशा कामांची लिस्ट तुम्ही करणार नाहीत .

जी तुम्ही इतरांकडून करून घ्याल,याचं कारण सोप्पं आहे,

सगळं स्वतः करून कसं चालेल?

***********************************

📕📌(8) Determine when you are most productive?

काहींना पहाटे पहाटे कामे उरकतात , तर काहीजण पुर्ण रात्र मस्त कामं करू शकतात , असं का बरे ?
तर याचं कारण ज्याचं त्याचं वैयक्तीक असू शकतं , वि .स . खांडेकर म्हणत ,, “मला दाढी करताना कथा सुचतात ” ! तसंच आपला पण काही स्पेशल वेळ आहे का ? ज्या काळात आपण प्रचंड ताकदीने काम करू शकता !
असा वेळ आपल्याच लक्षात आला पाहिजे,किमान सुरूवातीच्या काळात तरी !
त्या त्या वेळेला आपण नीट encash करायला शिकलो कि आपलं खूप काम सोप्पं होतं .

************************************

📌(9) Minimise interruption:

ICU,ऑपरेशन थिएटर्स,मिटिंग रुम्स,टेस्टींग लॅब्स अशा ठिकाणी आपण बेधडक जाऊ शकत नाही,या ठिकाणी बाहेरच बोर्ड असतात Do Not Disturb चे .
का बरं असतं असं ..Focus नावाचं पुस्तक वाचा !

त्यातही सांगितलंय आणि जनरली पण बघा कि,डिस्टर्ब होत असताना महत्वाची कामं नाही करू शकत , त्यासाठी बाकीच्या गोंधळापासून दूर व्हावं लागतं ! आपली सारी शक्ती एकाच गोष्टीवर केंद्रीत करावी लागते .

आजकाल तर सोशल मिडिया मैसेजेसला सर्वात मोठा अडथळा मानला जातो,त्यामुळे कित्येक चांगल्या कंपन्यांमध्ये स्मार्टफोनच्या वापराला बंदी आहे.

त्याचं कारणच फोकस न होणे हे आहे,त्यामुळे जेंव्हा जेंव्हा महत्वाचे कामं करायला घ्याल तेव्हा तेंव्हा interruption होणार नाही याची काळजी घ्या .

*************************************

📕(10) Set the time Limit :

आपण कार्पोरेट मध्ये नेहमी बघतो , कि कर्मचारी सतत टारगेट बद्दल बोलत असतात,भलेही CEO ची लेवल असो कि,डेवलपर अथवा सेल्स मधील कोणाचीही त्यांना कोणतेही टारगेट पूर्ण करण्याकरिता टाईम लिमिट दिली जाते , त्यामुळे काय होतं ???
तर लोकं प्रचंड उर्जा लावून कामं करतात !

जो फरक 20/20 आणि Test क्रिकेट Match मध्ये असतो,तसाच फरक असतो टारगेट आणि टाईम लिमिट देऊन केलेल्या कामात आणि कितीही वेळ घ्या ! पण काम करा या फॉर्म मध्ये .

त्यामुळेच तर टाईप लिमिट मध्ये काम करणे हे उद्योजकाचे सर्वात मोठे लक्षण आहे .

सध्या कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस 5 केल्यामुळे मोठी चर्चा चालुये !

असु दे ,
” पण त्या पाच दिवसात तरी सेट टाईम मध्ये कॉर्पोरेट सारखं काम करणार का हे ? ”

असो,
वरिल दहा पॉईंटस आपल्याला पक्के व्यापारी बनवण्यासाठी अत्यावश्यक आहेतच,त्यामुळे स्वतः पण यावर अभ्यास करून काम करावे आणि आपल्या उद्योजक मित्रांपर्यंत यांना फॉरवर्ड करावे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट, आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

office :
9146101 663,

Previous Post Next Post

2 thoughts on “व्यवसायातून भरपूर पैसे कमवायचेत ना?मग स्वतःला या दहा सवयी लावून घ्या बरं !

  1. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    सर खूपच महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हा व्यवसायिकांना छोट्या छोट्या स्वरूपात देत असतात त्यानुसार ती माहिती आचरणात आणणे सहज शक्य होते जसे की तुम्ही उदाहरण दिले आहे जेवणाचे आपण जेवण एकदाच करत नाही एक एक घास खात असतो त्याच प्रमाणे तुम्ही थोडी थोडी माहिती देत असतात त्यामुळे ती आचरणात आणणे सहज शक्य होते अशीच माहिती देत राहाल ही अपेक्षा आणि आम्हा नव व्यावसायिकांचा व्यवसायवृद्धीसाठी चाललेला प्रयत्न सफल कराल आपली मदत यापुढेही अशीच राहू द्या परत एकदा
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *