व्यवसायात स्पर्धा आहे ? या प्रकारे सामना करा !

#स्पर्धकाचे_घर_असावे_शेजार

©निलेश काळे

📌 बिजनेस मेंटरिंग करताना मुलं असा अनेक वेळा विचारतात की , “सर असाच व्यवसाय सांगा ,ज्याच्यात बिलकुलच स्पर्धा नसेल,त्या व्यवसायात चांगला पैसा असेल आणि तो व्यवसाय बाराही महिने चालू शकेल” !

दुसऱ्या दोन गोष्टी ठिकैत ! पण स्पर्धा नसणारा व्यवसाय कशासाठी करायचाय? किंवा असा व्यवसाय असतोच का? हा मोठ्ठा प्रश्न आहे !

मुळात असा विचार करणंच समस्येचे कारण आहे……

कारण ????????आपण मनुष्य समाजप्रिय प्राणी आहोत,आणि आपण एवढी प्रगती केली,कारण आपल्याला स्पर्धा होती !

📌 सध्या गुगल/फेसबुक/ट्विटर आणि एप्पल या चारही कंपन्यांच्या सीईओ चौकशी चालू आहे, कारण ??या कंपन्यांनी स्पर्धकांना संपवण्याचा कट रचला असा आरोप आहे.

असो तो विषय वेगळा आहे ,पण आपण आणि स्पर्धक यांचं नातं कसं असावं ?

आपण आपल्या स्पर्धकाला संपवले पाहिजे का ? आणि आपण आपल्या स्पर्धकाची भीती बाळगून व्यवसाय केला पाहिजे का ? याची थोडक्यात चर्चा करू.

विषय इंटरेस्टिंग होणार आहे !

📌 आपण जर नवीन नवीन व्यवसायाला लागलोय तर आपल्याला व्यवसाय करताना सगळ्यात मोठा त्रास स्पर्धाकाचा होतो,कारण ??आपल्याला असं वाटतं कि,तो आपले ग्राहक कळवतोय,आपल्याकडे येणारा पैसा थांबवतोय आणि आपल्याला जास्ती नेटाने काम करायला भाग पाडतो, मग स्पर्धा का विषयी लोकांच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होते आणि शत्रुत्वाची भावना कधीही असणे कामाचे नाही.

📌 दहा वर्षापूर्वी मी जेंव्हा व्यवसाय चालु केला, त्यावेळी माझे स्पर्धक होते, “मद्रासी लोक”.
त्यांची भाषा कळत नव्हती, मला काय म्हणायचंय त्यांना कळेना आणि त्यांचं काय चाललंय मला उमजेना !

पण आज तेच लोकं माझे चांगले मित्र आहेत !

मग चला,,,
दहा वर्षाच्या अनुभवातून काही सांगतो !

(1) #It_is_not_the_Only_Competition:

आपण आपल्या स्पर्धेला कमी करून बघतो, आपल्याला जे लोक आजुबाजुला दिसतात, .आपल्याला वाटतं तेच माझे स्पर्धक आहेत, आपण त्यांच्यावरच खार खातो,

हे उगाचच आले असं वाटायला लागतं.

पण मुळात आपण स्पर्धेला जरा कमी करून बघतोय,,कसं??? ते समजून घ्या !

समजा आपली जिम आहे आणि आपल्या गावांमध्ये अजून तीन वेगवेगळ्या जिम आहेत, एकमेकांचा काही संबंध नाही, एक गावाच्या मध्यभागी दुसरी गावाच्या टोकाला.

तसा काहीही संबंध नाही ,पण तरीही आपण त्या दुसऱ्या जिमच्या मालकाला आपला शत्रू मानून बसतो, आता थोडा खोलवर विचार करा, ग्राहक फिटनेस राखण्यासाठी फक्त जिम लावतात का ????तर तसं नाहीये लोक स्वतःसुद्धा ग्राउंड वर रनिंग करतात ,डॉक्टरांकडे जातात टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम बघून ते घरच्या घरी करतात,योगा क्लास लावतात…. मग हे पण आपले स्पर्धकच झाले ना ???

बघ लोकांकडे पैसा आहे पण ते फक्त जीम वर खर्च करण्यासाठीच आहेत का? तर नाही, ते पैसा हॉटेलमध्ये, थेटरमध्ये,नेटफ्लिक्ससाठी,सुद्धा खर्च करतात.

याचा अर्थ असा आहे की लोकांचा फोकस फक्त आपल्या एकट्याच्या धंदयावर पैसा खर्च करण्याचा नाहीये, लोक अन्य ठिकाणी पैसा खर्च करतात, तर मग हे सगळेच ठिकाण आणि हे सगळेच लोक आपले स्पर्धक झाले ना? पण आपण त्या 2_4 जिम मालकांना आपल्या शत्रू म्हणून बसतो हे कितपत योग्य आहे?

एखाद्या चांगल्या व्यावसायिकाने इतका लहान विचार करून चालत नाही ,आपले उद्याचे ग्राहक कुठे सध्या कुठे कुठे पैसा खर्च करत आहेत ?याचा अभ्यास करा आणि त्यांना मग तशा प्रकारे आपल्याकडे बोलवा तशा प्रकारे जाहिरात करा , लोकांना महत्त्व पटवून द्या, मग लोक येतील.

(2) #Study_Competition :

📌 बरेच व्यावसायिक मोटिवेशनच्या गप्पा ऐकून स्पर्धकांचा विचार करणे सोडून देतात, कारण ????त्यांना त्या सो-कॉल्ड गुरूने सांगितलं असतं की, “स्वतःवर फोकस करा त्रास करून घेऊ नका”

पण मुळातच ही गोष्ट अर्धसत्य आहे , आपण तिला थोडी आपण वेगळ्या अँगलने घेतो, त्यांचं सांगणं वेगळ्या प्रकारे असतं आणि आपण वेगळ्या प्रकाराने घेतो.

बघा असं म्हटलं जातं की

“keep your friends Close and competition closer”

“आपल्या मित्रांना आपल्या जवळ ठेवा आणि स्पर्धकाच्या व्यवसायाला फार जवळ ठेवा”!

याचा अर्थ काय ?तर आपण ज्यांना स्पर्धक मानतो ते ? ते नेमकं कशाप्रकारे मार्केटिंग करत आहेत? कशाप्रकारे प्रॉडक्ट काढत आहेत? आणि कशाप्रकारे ऑफर देत आहेत?त्यांच्याकडे असं काय आहे?ज्यामुळे ग्राहक तिकडे जातोय? याची माहिती आपल्याला असायलाच हवी,

इथे वेळ घालवाच… Study Them!

अगदी हजारो वर्षापासून जगातले सर्व सर्व देश इतर देशांमध्ये आपले गुप्तहेर पाठवतात ते याच्यासाठीच.

📌 (3) #Study_them
#But_focus_on_your_Customers:

आपण आपल्या स्पर्धकांना जवळ ठेवलं पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे हे जितकं खरं आहे, तितकंच आपण आपल्या ग्राहक सेवेवर/ आपल्या प्रॉडक्ट कॉलिटीवर आणि आपल्या प्राईसिंग वर तेवढेच लक्ष दिले पाहिजे.

स्पर्धकांचा तुम्ही कितीही अभ्यास केला तरी त्याचा आपल्या आर्थिक गणितावर उपयोग होणार नाही ना? शेवटी आपण आपल्या ग्राहकांना ज्या प्रकारे व्हॅल्यू देतो ,ग्राहक तेवढेच पैसे आपल्याला देणार आहेत,त्यामुळे वरच्या पॉइंटला अनुसरूनच ही गोष्ट देखील लक्षात ठेवावी की, आपल्याला त्यांचा फक्त अभ्यास करायचा, प्रेशर घ्यायचं नाहीये, आपल्याला फोकस आपल्या ग्राहकांवरच करायचा आहे, आपण आपली ग्राहक सेवा चांगली करायची आहे.

📌(4) #Think_long_term:

आपण आपल्या स्पर्धाकाचा गळा घोटून त्याचा जीव घेऊ शकतो का?????

तर….. नाही किंवा असं म्हणा की तसं करणं आपल्याला कायद्याला अनुसरून पण नाही.

समजा आपला स्पर्धक आपल्याला त्रास देतोच आहे,तो आपल्यासारखे उत्पादनात काढतोय, आपल्यासारखीच सेम2सेम सर्विस देतोय किंवा आपल्यासारखीच ऑफर काढत असेल ,तर काय करायचं?तेव्हा थोडसं शांत राहा आणि या गेमला मॅरेथॉन रेस सारखं खेळायचं !

बघा व्यवसायामध्ये शेवटी महत्त्व हे पैशाला आहे,धैर्य राखण्याला आहे, आणि आपण फक्त थोडीशी कळ काढायला शिकलो ,थोडासा लॉंग टर्म चा विचार करायला शिकलो,तर ही रेस आपण नक्की जिंकू शकतो !

( अनुभवाने सांगतोय )

📌(5) #Collaborate_Profit_from_competition:

ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये पक्के पाय रोवतो, त्या वेळेला आपले स्पर्धक देखील आपल्याला मानायला लागतात,त्यांच्या नजरेमध्ये आपली देखील प्रतिष्ठा तयार होते.

पुढे एक क्षण असा येतो,की आपले स्पर्धक आपल्याला फोन करतात, त्यांच्याबरोबर काम करण्याची ऑफर देतात ( उद्योगनितीमध्ये आपण अनेक इतर लोकांशी नेहमी “युती” करतो.)

आपण मार्केटमध्ये बघत असाल, अनेक कंपन्या दुसऱ्या स्पर्धक कंपनीबरोबर डायरेक्ट पार्टनरशिप करतात, काही बिघडत नाही !

आपल्या प्रॉडक्ट सेम असू द्या किंवा भिन्नभिन्न असू द्या ,जर आपण मार्केटमधल्या चांगल्या व्यवसायका बरोबर (ज्याला “राईट-फिट”असं म्हणलं जातं ) जर पार्टनरशिप केली, आपण स्पर्धा एकतर संपवतो आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त प्रॉफिट कमावण्याचा मार्ग शोधून ठेवतो.

**********************

📌जगमध्ये समाजवादाचे प्रयोग सपशेल अपयशी झालेले आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था मजबुतीने उभ्या आहेत आणि इथून पुढे देखील ते यशस्वी होताना दिसतील, म्हणजे???? ज्यांच्यामध्ये स्पर्धेला अतिशय चांगला वाव आहे.

फक्त धैर्य >>चिकाटी >> संयम >> स्पर्धा करण्याची तयारी आणि लॉंग टर्म मध्ये खेळण्याची तयारी ठेवा,गेम आपलाच आहे.

📌 ” स्पर्धेशिवाय प्रगती नाही”

तात्पर्य :”स्पर्धेला समजू नका मजबूरी ”
इथे भिडावं लागतं उभं आडवं जसं जमेल तसं .
जो भिडायला शिकला तो टिकायला शिकला !
कारण ? इतिहास साक्षी आहे, भेकड राहुन फक्त विनाश होतो .

********************************

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा!
© निलेश काळे.
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
अभिनव चौक, नळस्टॉप,पुणे.
9518950764.

Udyogniti कडुन बिझनेस मेंटरिंग घ्यायचीये तर त्यासाठी विविध पर्याय आहेत, खालील नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता.
श्री ओमकेश मुंडे सर :
office : 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “व्यवसायात स्पर्धा आहे ? या प्रकारे सामना करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *