व्यवसायात 1OX वाढ हवीये? तर या ओरिजनल टिप्स फॉलो करा

#Powerful_Books

#The10X_Rule

#लेखक_Grant_Cardone

ग्रँट कार्डाॅन हे अमेरिकन लेखक , बिझनेसमन,इन्वेस्टर आणि मोटिव्हेशनल सेल्स कोच आहेत.

यांचे 10X सेमिनार्स सगळ्या जगभर होतात,इतर ज्यांनी कुणी हे शब्द वापरलेत, त्यांनी ग्रँट कार्डोनची कॉपी केलीये.

📌सन 2017 मध्ये जगातला नंबर 1 सेल्स ट्रेलर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे,ते स्वतःच्या प्रायवेट जेटने फिरतात,त्यांच्याकडे स्वतःचे दोन हेलीकॉप्टर्स आहेत,या सर्व वाहनावर दोनच अक्षरे असतात,10X ( आपण गुगल करू शकता) एवढी ओळख पुरेशी आहे !

📌त्यांचं हे प्रसिद्ध पुस्तक,10X Rule,त्यांच्या वेगवेगळ्या सेल्स सेमिनारचा सार आहे .

📌या पुस्तकामध्ये लेखक लिहितात,कि जर आपण आपलं ध्येय आहे त्याला जर दहा पट मोठा केलं तर आपण जास्त यश लवकर मिळू शकतो पण त्यासाठी आवश्यक काही गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत तर त्या आपण पुढील प्रमाणे बघू

#Ten_times_your_Goal :

📌आपलं चुकते कुठे माहितेय का? कि, आपण थोड्या गोष्टीवर समाधान मानून टाकतो.

मला एवढ भेटलं तरी, पुरेसं आहे ,मला तेवढे भेटल तरी पुरेस आहे.

अशाप्रकारे आपण आपली वृत्ती एकदम थोडक्यावर समाधान मानायची बनवून टाकलीये !

आणि समाधान हाच शब्द आपला घात करतो,आपला सगळ्यात मोठा धोका देणारी बाब आहे माणसांना समाधानी असणे चांगली गोष्ट पण निव्वळ भुक्कड असणं थोडक्यावर शांत बसणे हे यशस्वी माणसाचे लक्षण नाही !

📌 एक तर आपल्याला पाहिजे थोडसं, त्यात आपल्याला मिळणार किती ?आणि मग त्यात आपण सेलिब्रेट करणार किती? म्हणून लेखक म्हणतात की बाबांनो तुमचं स्वतःचं ध्येय मोठ्ठं आभाळाएवढं बनवून ठेवा ! आहे त्यापेक्षा दहा पट मोठं !

📌 जो म्हणतो ना ? कि मला एवढं मिळालं तरी बस्सं, त्यांना निसर्ग सुद्धा कधी हीच भरभरून देत बसत नाही !

📌असं समाधानी राहण्यामध्ये फार मोठेपणा नाही दडलेला..

📌मला खूप पाहिजे, मला खूप पाहिजे हे जेव्हा आपण स्वतःला सांगायला लागतो ना ??? त्यावेळी निसर्ग सुद्धा आपल्याला खूप द्यायची इच्छा ठेवतो !

📌 लेखक लिहितात की समुद्राकडे तुम्ही पाणी मागायला जाताना चमचा का घेऊन काय जायचंय ? किमान बकेट तरी घेऊन जा !

तो देऊ शकतो ! पण आपण आपली मागण्याची पद्धत बदलली पाहिजे !

आजकाल जे श्रीमंत आहे ते अजून श्रीमंत होत चाललेत , त्यांच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वतःच्या इच्छा तरी मोठया करा ! आपण स्वतःचे ध्येय मोठे करत नाही, स्वतःच्या अकाउंट लिमिट करून टाकलं ,कंपाउंड आपणच लावलं ,तर त्याची वाढ होणार कशी?

म्हणून लेखक म्हणतो, तुम्हाला श्रीमंत व्हायचे ना लखपती होण्यापेक्षा करोडपती होण्याची अपेक्षा बाळगा, तुमचं मन तुमचं डोकं त्यादृष्टीने कामाला लागेल .

मला थोडंच पाहिजे, थोडसं चालतं अशा अपेक्षा करू नका ! ठेवायचं तर मोठ्या अपेक्षा ठेवा मग बघा आपण आणि भोवतालची परिस्थिती सुद्धा कशाप्रकारे कामाला लागते ?

#Ten_Times_more_actions:

आपलं परंपरा सुद्धा सांगतात की नुसती साखर साखर म्हणून तोंड गोड होत नाही.

त्याच्यासाठी त्या डब्याकडे जावं लागतं,तो उघडावा लागतो,साखर काढावी लागते आणि तोंडात टाकावी लागते .

तेव्हा तोंड गोड होतं फक्त तोंडाने साखर साखर,असा जप करून तोंड कधीच गोड होत नाही .

इथे कृतीला महत्त्व आहे .

लढाई कितीही लहान असो वा मोठी असो ती सगळ्यात तयारीनिशी उतरतात, सगळी ताकद पणाला लावतात ,आणि मग छोट्या ध्येयासाठीसुद्धा जास्त जास्त ताकद लावायची सवय लागली की मग आपली ध्येये साध्य व्हायला सुरुवात होऊन जाते.

म्हणून लेखक म्हणतात की फक्त आपले ध्येय दहापट मोठी करून बसू नका .

नुसतं हाताची घडी घालून,शांत बसून काही उपयोग नाही,आपण फक्त डोक्याला ऑर्डर देऊ मला एवढं पाहिजेत आणि मी जागेवरुन उठणार नाही,असं चालेल का बाबा?

नाही चालणार असं कधीच झालं नव्हतं आणि आपल्याला असं कोणीही आणून देणार नाहीये

त्याच्यासाठी आपल्याला मोठी पावले उचलावी लागतील,जास्त काम करावे लागेल आणि आपली जी कृती आहे?? ती दहापट मोठी करावी लागणारेय, त्या कृतीतूनच आपल्याला मोठी यश मिळणार आहेत.

#Create_Your_own_Luck:

बऱ्याच जणांना नशीब या गोष्टीवर फार भरोसा असतो ,, जेंव्हा एखादा व्यक्ती यशस्वी व्हायला लागतो तेव्हा लोक म्हणतात की तो फार लकी आहे,तो फार नशीबवान आहे, त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या !

पण लोक हे लक्षात घेत नाहीत की त्याने स्वतःचे ध्येय किती मोठे ठेवलं? आणि त्या ध्येयासाठी तू किती जंगजंग पछाडलं? लोकांना त्यांचं असं जादुई वाटायला लागतं पण त्या कशा पाठीमागे त्यान उपसलेले कष्ट कोण बघतंय ?

या अंधारात केल्या गेलेल्या मेहनतीला लोक लक म्हणतात !

विराट कोहली स्टेडियम उतरल्यानंतर फार जोरात फटके मारू शकतो खेळतो लोकांना वाटतं पण हे बघत नाही की तो रोजच्या रोज की प्रॅक्टिस करतो किती घाम गाळतो

मग लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे तुम्ही तुमच्या ध्येयासाठी प्रचंड कष्ट करा आणि लोकांना ती गोष्ट जादू आहे का काय ?अशी वाटली पाहिजे .

मेजर ध्यानचंद यांची हॉकी स्टीक कित्येकदा तोडून बघीतली गेली हे बघायला कि त्यात स्प्रिंग तर नाही ना ?

त्यानी ध्यानचंद यांचे परफेक्ट शॉट्स बघीतले होते , पण त्यांनी पण त्यांना काय माहित होतं की , या माणसाने स्वतःचं लक,भयंकर प्रॅक्टीस करून घडवलंय .

#Do_not_have_fear:

भीती कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला भीती वाटते,पण ती किती वाटली पाहिजे?याची काय लिमिट बाळगणार आहात का नाही?

📌 लोकांनी भीतीचा एवढा बाऊ करून ठेवलाय,की नानाप्रकारच्या भीतीमुळे लोक निव्वळ घराच्या बाहेर पडत नाही .

स्वतःचा पराक्रम सिद्ध करत नाहीत स्वता :ला कमी लेखतात.

हे चूक आहे ना, आजही माणूस जर भीत-भीत राहिला असता तर आपण आज गुहेत असतो.

आपण एवढी प्रगती केली नसती

जेवढी काही ही माणसाने प्रगती केली आहे ती त्याने भीतीला दूर केल्यामुळेच झाली आहे.

लेखक म्हणतो ,

फियरचा लॉंग फॉर्म आहे False Event Appearing Real ,

पण जगातल्या सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितले की जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातली आपल्या मनातली भीती काढून बाहेर निघत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही यासाठी आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर निघावं लागेल,अंधाराचा सामना करावा लागेल काहीही झालं तरी भीतीला मारून टाकावे लागेल ! त्याच्याशिवाय आपण यशस्वी होण्याचा दरवाजा उघडणार नाही !

जे लोक भितीला लाथ मारुन बाहेर पडले,इथे त्याच पराक्रमी लोकांची दखल घेतल्या जाते,त्यांची आरती होते ,त्यांच्याच नावाचा गवगवा होतो, आणि त्यांनाच डोक्यावर घेऊन मिरवलं जातं, त्यामुळे डोक्यातून भीती नावाची वस्तू काढून फेका !

📘Do_not_compete_Dominate:

📌दर वेळी आपण लोकांबरोबर फक्त कुत्र्या-मांजराची सारखी स्पर्धा करून जिंकू शकत नाही,अशी स्पर्धा आपल्याला पैसा मिळवून देऊ शकत नाही,आपल्याला मोठेपणा मिळवून देऊ शकत नाही,त्यामुळे अशी व फालतू स्पर्धा करायचा फंद्यात पडायचंच नाही,आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण झाला पाहिजे,आपलं वर्चस्व निर्माण झाला पाहिजे,जोपर्यंत आपलं वर्चस्व निर्माण होत नाही तोपर्यंत झटलंच पाहिजे .

📌आपण बघितलं असेल ,ज्या वेळेपासून जिओ मार्केटमध्ये आलय त्यावेळेपासून त्याने इतरांबरोबर स्पर्धा कधीच केले नाही, दर वेळी त्याने मार्केट वर्चस्व गाजवलं आहे ,ज्याच्या साठी वेगवेगळ्या स्टेटरजी लावाव्या लागतात,त्या त्या लावल्या पाहिजेत

Grant Cardone यांनी त्यांच्या 10X Rule या पुस्तकामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत,जे श्रीमंतीकडे घेऊन जातात .

📌तेंव्हा हे पुस्तक विकत घ्या आणि नक्की वाचा,सध्या लॉकडाऊन पिरियड मध्ये,याचं Audiobook version ,,, वेगवेगळ्या प्लॅटफौर्मवर आपल्याला वाचायला मिळू शकेल .

बिझनेस मॅनेजमेंट संदर्भातील पोस्ट नियमित वाचण्यासाठी ,आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा .
लिंक खाली आहे .

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
Anand Park , Aundh , Pune ,
9518950764 ,

office : 9146 101 663

Previous Post Next Post

4 thoughts on “व्यवसायात 1OX वाढ हवीये? तर या ओरिजनल टिप्स फॉलो करा

Leave a Reply to Swapnil Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *