व्यवसायासाठी बँकेकडून लोन घेताना,हे दाखवा, प्रोसेस लवकर होईल

2,264 Views

Marketing Mix बँकांना दाखवा, त्या तुमचं लोन मंजूर करतील.

…..

Markrting mix हा शब्द मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यासाठी नवीन नाही .
यावर एक मोठा चॅप्टर असतो MBA च्या अभ्यासक्रमात ,
आज आपण हा चॅप्टर चक्क मराठीत समजून घेऊया .
कंपन्या जेंव्हा आपले उत्पादन मार्केटमध्ये घेऊन जातात ,
त्या अगोदर मॅनेजर लोक Marketing Mix चे प्रेझेंटेशन घेतात .
असे प्रेझेंटेशन तयार असेल तर , आपल्याला भांडवल उभे करणे सोपे जाते .
किंवा लिखीत स्वरूपात आपली योजना तयार असली तर बँका पण लोन लगेच देतात

तर Marketing Mix मध्ये 4 किंवा 7 ..” P ” चा बारीक अभ्यास असतो .
तो कसा असतो ? हे पाहूया !

… 1) PRODUCT :

हे सर्वात महत्वाचं P ..
आपले चुकते कुठे माहितेय? …. आपण अगोदर प्रॉडक्ट तयार करतो , आणि नंतर त्यासाठी मार्केट शोधत बसतो, कारण ?आपला विचार असतो कि मला काय जमतंय ते बघू.

पण खरी पद्धत काय असते? तर अगोदर मार्केटची गरज काय आहे? हे ओळखा आणि त्याला अनुसरून प्रौडक्ट डेवलप करावा , जेणेकरून आपण त्यात फसणार नाही.

बघा ,सुरुवातीच्या काळात स्मार्टफोनचे डिस्प्ले फार जात असत , ही गरज ओळखून कंपन्यानी … गोरीला ग्लासची निर्मिती केली …. चालला प्रौडक्ट.

टायर फार पंक्चर होतात मग आले ट्युबलेस टायर्स,अशा प्रकारे गरज ओळखून प्रॉडक्ट काढले तर फ्लॉप होत नाहीत.

2) PRICE : हा कळीचा मुद्दा असतो , उत्पादनाची किंमत तीच मिळते,जी तुमचा ग्राहक देऊ इच्छितो, उगाचच किंमत काहीही ठेऊन उपयोग नसतो , आज जमाना online cross Verification चा आहे,पहिल्यासारखं काहीच्या काही किंमत ठेऊन आजकाल चालत नाही, याचं महत्वाचं कारण Overpriced उत्पादने पडून रहातील पण विकणार नाहीत .
दुसरी यात बाब … Penetration म्हणजे मार्केट मध्ये जागा मिळवेपर्यंत किंमत कमी ठेवणे आणि नंतर सामान्य ठेवणे , Loss leading pricing म्हणजे Jio सारखे … नवीन असतानाच स्वस्तात विकणे आणि बराच काळ नफा न घेता विकत रहाणे .
आता तुम्हाला ठरवायचय कि कोणती निती वापरायचीये?

3) PLACE :

तुमचा प्रॉडक्ट कोठे – कोठे विकला जाणार? आणि त्या दुकानात तो कोठे डिस्प्ले होईल? याची पूर्वतयारी म्हणजे PLACE .
आपले एक शोरूम, ऑफिस किंवा डिस्प्ले काऊंटा वा दुकान कोणत्या एरियात वगैरे असेल ?याचे नियोजन करणे हे या P मध्ये येतं.
याची पूर्वतयारी करावीच लागते.

…. 4) PEOPLE:

यात विचार येतो , ते तुमचा स्टाफ .. कसा वर्तणूक करेल?…
काही ठिकाणचा स्टाफ अत्यंत उर्मट असतो जसे,एअरलाईन्स मधील स्टाफचे अनेक उदाहरणे समोर आले , कंपन्यांवर केसेस पडल्या वगैरे ,
पेट्रोल पंपाचे कर्मचारी सुद्धा अनेकदा उर्मट वागतात,कधी – कधी जाणीव पूर्वक असतं ते ,
मग अशा पंपावर आपण जाणे टाळतो सुद्धा,म्हणून ग्राहक खुश ठेवायचा असेल तर कर्मचाऱ्यांचे नीट वागणे महत्वाचे आहे.

5) PROCESS :

याचं सर्वात चांगलं उदाहरण Dominos आणि McDonald’s मध्ये पहायला मिळतं,और्डर आल्यापासून तुम्ही किती फास्ट त्यावर काम करता? यावर तुमचा व्यवसाय बराच निर्भर असतो,
McDonald’s चा प्रोसेसिंग टाईम हा निव्वळ काही सेकंद तर ,,,Domino’s अर्ध्या तासात डिलीवरी देतं … आता तर Domino’s ने चालत्या ट्रेन मधील ग्राहकाला सेवा देणे चालू केलेय म्हणजे काय Timing असेल ??

नाही तर आम्ही … पंक्चरच्या दुकानात,न्हाव्याकडे आणि ढाब्याबर तासनतास बसून रहातो आमची वेळ येईपर्यंत.

तेव्हा प्रोसेस फार महत्वाची.

…. 6) PROMOTION :

अर्धा टी व्ही च्या प्रक्षेपणाचा वेळ तर कंपन्या ऍड साठी घेत असतात,हा फारच महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्रमोशन, आपण आपल्या उत्पादनांचं प्रमोशन कुठे ?कसं? करणार आहोत हे तयार पाहिजे.
मान्य आहे आपल्याला टिव्ही वर जाणे जाणे जमत नाही,मग ??? कमीत कमी सोशल मिडियावर जायची आपली तयारी आहे का? किंवा ,प्रिंट मिडिया किंवा Expo मध्ये सहभाग घेणे या बाबी तरी आपण करूच शकतो.

मार्कटला बघा,लोक चुकीच्या गोष्टींच प्रमोशन करतात,मग आपण का करू नये ?
स्वतःच स्वतःच्या प्रॉडक्ट बद्दल विश्वास पूर्वक बोलणे सुद्धा प्रमोशन ठरतं … तसेच इतरांनी पण आपल्या प्रॉडक्ट बद्दल बोलले तर खूप झालं .
म्हणून त्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करावे लागतात .

….. 7) PROOF :

Tideची सध्याची ऍड बघीतलीये? यात आयूष्यमान खुराणा, Tide ने कपडे धुऊन दाखवतो, झाला का प्रुफ?

TATA चे मीठ भारी आहे पण ऍडमध्ये ते पाण्यात पूर्ण विरघळते हे दाखवले जाते.

आमच्या Waterproofing मुळे पाणी घरात शिरत नाही किंवा अशी क्रिम लावल्यास मुलांना डास …. चावणार नाहीत, किंवा आमच्या मधाला इतके सर्टिफिकेटस आहेत,हे मुददाम दाखवतात ,,,,
रामदेव बाबांनी तर हनीचा रिपोर्टच आणला … म्हणजे एकंदरीत काय आहे????? तर,आपण Proof सहित तयार असायलाच हवं .
कारण ?बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ! ही मार्केटची रीत आहे.
ही परिस्थिती कधी पण उद्भवू शकते ! त्यामुळे ,आपण Marketing Mix सहित तयारच असावे .
मग आपण शक्यतो फसणार नाही ..
….
…..

भांडवल उभं करायचं असल्यास, कागदावर किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपलं मार्केटिंग मिक्स रेडी ठेवा आणि गरज पडेल तेंव्हा दाखवा

फायदा होईल.

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office: श्री ओमकेश मुंडे सर :
9146101663

Previous Post Next Post

One thought on “व्यवसायासाठी बँकेकडून लोन घेताना,हे दाखवा, प्रोसेस लवकर होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *