व्यवसाय करताना,”बस्टर डग्लससारखे” उठलात तर चॅम्पीयन तुम्हीच,एक रियल स्टोरी

व्यवसाय करताना डगलससारखे उठलात तर चॅम्पीयन तुम्हीच! रियल स्टोरी.


दि .11 फेब्रुवारी 1990

स्थळ : टोकीओ , जापान .

जागतिक बॉक्सींग स्पर्धा , शेवटची मॅच .

जगातला त्यावेळेसचा चॅम्पीयन … माईक टायसन x बस्टर डगलस यांच्या मध्ये .
आजपर्यंत कोणीही माईक टायसन ला बॉक्सींग रिंग मध्ये हरवू शकला नव्हता .
त्याच्या बरोबर बॉक्सिंग साठी बहुतेक सगळेच बॉक्सर कचरत .
कारण माईक टायसन हा अतिशय आक्रामक अवतारात रिंगणात उतरत असे , समोरच्याला दोन फटक्यात गार करण्याची त्याची शैली .
त्यामुळे तो कित्येक वर्ष चॅम्पीयन म्हणून ओळखला जात असे .
आपल्या व्यवसायात देखील असेच अनेक वर्षाचे मुरलेले चॅम्पियन प्रतिस्पर्धी असतात,ज्यांच्याकडेच ग्राहकांचा ओढा असतो , आणि आपण बस्टर डगलस सारखे नवे .

स्पर्धा सुरू झाली .
पहिला राऊंड … माइक टायसनच्या ठोश्यांनी बस्टर डगलसला पूर्ण चित करायला चालू केले,एका मागून एक .
डगलस चा हात टायसनपर्यंत पोचायच्या आत , टायसन दहा पाच पंच मारून पॉईंट कमवायचा .
पहिला राऊंड टायसन जिंकला .
दूसरा , तिसरा , चौथा , पाचवा ,…. आठवा सगळेच राऊंड टायसन जिंकत गेला , बस्टर डग्लस,थकत होता,पडत होता, घाम पुसत होता,सगळी परिस्थितीच वाईट.

लोक फक्त वाट पहात होते … डग्लस च्या हरण्याची,माईक टायसनला पुन्हा एकदा राक्षसी विजय साजरा करताना बघण्याची जणू प्रत्येकालाच घाई झालेली होती,

आपल्या व्यवसायातपण असेच कावळे आपल्या आजूबाजूला बसलेले असतात,आपला तमाशा कसा होतो?हे बघण्यासाठी .
राऊंड नववा …. माईक टायसन … उग्र रूपात् डग्लसवर चालून आला, यापूर्वीच्या राऊंड मध्ये त्याने सुद्धा डग्लस कडून बराच मार खाल्ला असल्याने तो पण चिडलेला,”याला जिवेच मारतो” अशा सूडबुद्धीने पेटलेला तो राक्षस डग्लस वर अक्षरश : तुटून पडला .
आणि काय ???
डग्लस धाडकन रिंगमध्ये कोसळला .
संपलं सगळं !
वाटलं कित्येकांना ,
रेफ्रीने आकडे उलटे मोजायला सुरुवात केली.

दहा,नऊ ,आठ,सात,सहा,पाच , चार,तीन,दोन
आणि डग्लसने इशारा करून सांगितलं.

“मी अजून संपलो नाहीये”
“श्वास चालुये,मग लढणारच”.

इकडे टायसनला मॅच संपवून विजेत्याचा बेल्ट उचलण्याची घाई झालेली,आणि इथे हा पठ्ठ्या हरायला तयार नाही !

दहावा आणि शेवटचा राऊंड.

दोघांनी एकमेकांना ठोसे लावायला सुरूवात केली.

डग्लसला चान्स भेटला,त्याने टायसन च्या जबडयावर दणादण ठोसे मारायला चालु केले.

टायसनला काही कळायच्या आत प्रहारावर प्रहार चालु !

एक जबरदस्त वज्राघात,त्याच्या बत्तीशीवर असणारे टिथगार्ड उडून बाहेर पडले आणि टायसन रिंगमध्ये कोसळला.

कधीच कोणी कल्पना केलं नाही . ते घडले.

नवा चॅम्पीयन …. “बस्टर डग्लस ” .
नंतरच्या एका इंटरव्हयू मध्ये डगलस ला विचारले गेले …

“असं काय होतं कि नऊ राऊंड सपशेल हारल्यानंतर तू टायसनला एकदम नॉक आऊट करून टाकलास ” .

त्याने दिलेलं उत्तर आपल्याला खूप काही शिकवून जाते .

तो म्हणाला,”माझी आई नेहमी इतरांना सांगायची, “माझा लाल एक दिवस टायसन ला हरवून चॅम्पीयन बनेल,आणि फाईटच्या दोन दिवस पूर्वी ती .. ” वारली ” .

यातून आपण शिकण्यासारखं एकच आहे,आपण व्यवसाय ,उद्योग करतो तो कशासाठी करतोय?? हे महत्वाचं आहे.

Simon sinek म्हणतात, “तुमचा WHY, strong पाहिजे.

आपलं कशासाठी ??? हे जर ठाम असेल
तर जगात कोणीच आपल्याला हरवू शकत नाही .
कोणीच आपली जिरवू शकत नाही ‘ !

कणखर उभे रहाण्यासाठी शुभेच्छा .

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क औंध पुणे.
9518950764.

Office :
श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

टिप : Mike Tyson x Buster Dougles असे जर youtube ला सर्च केले त तर या फाईटचा व्हिडिओ बघायला मिळेल…….

असे बिझनेस मोहीवेशनल लेख आवडत असतील , तर आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि इतरांना पण करायला सांगा !
stay strong !

Previous Post Next Post

3 thoughts on “व्यवसाय करताना,”बस्टर डग्लससारखे” उठलात तर चॅम्पीयन तुम्हीच,एक रियल स्टोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *