व्यवसाय करताना आपल्याजवळ “या” सॉफ्टस्किल्स नसतील तर व्यवसाय चालणारच नाही.

व्यवसाय करताना आपल्याजवळ या सॉफ्ट स्किल्स नसतील, तर आपला व्यवसाय चालणारच नाही.

📌 एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आपण ज्या वेळी अप्लीकेशन करतो त्या वेळी आपल्या अंगभूत कला बघितल्या जातात जेणेकरून त्या अपॉइंटमेंट देणारयाचा फायदा व्हावा, अशा प्रकारच्या स्किल्सला “हार्ड स्किल्स ” असं म्हणलं जातं,

ज्यावेळी आपल्यामध्ये या ज्या काही विशेष स्कील असतात , जसं की कुकिंग ,पेंटिंग ,डिझाईनिंग , वेल्डिंग तर त्यावर सुद्धा अवलंबून असणारे व्यवसाय करता येतात याला स्कील बेस्ड बिझनेसेस असं म्हणतात .

📌 या तर स्किल आवश्यक आहेतच याच्याशिवाय व्यवसाय उभा राहू शकत नाही ,पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी व्यवसाय वाढीला लागतो त्यावेळी आपल्या अंगामध्ये काही विशेष अशा स्कील असाव्या लागतात आणि या स्किलला सॉफ्ट स्किल असं म्हणलं जातं ,

सध्या अनेक कार्पोरेट कंपन्या आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेत असतात, कारण त्यांना माहित आहे एक लेवल आली की त्याच्यापुढे विकास होण्यासाठी सॉफ्ट स्किल या अतिशय आवश्यक आहेत .

📌 आपण मार्केटिंग ,सेल्स , ॲडव्हर्टायझिंग मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटिंग ,आफ्टर सेल्स सर्विस या किचकट विषयांकडे जाण्याअगोदर हा सॉफ्ट स्किल चा विषय समजावून घेणे आवश्यक आहे ,

कारण बऱ्याचदा काय होतं की हा विषय अतिशय दुर्लक्षित राहून जातो, आणि याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक व्यवसायिकांची वाढ होत नाही , कारण कित्येक व्यवसाय हेच सगळे चांगले चालू असतात ,विक्री होत असते नफा येत असतो, परंतु वाढ दिसत नाही किंवा अचानकपणे आपला ग्राहक इतर स्पर्धक खेचून घेऊन जातो . मग लक्षात येऊ लागतं की

“अरे कुठेतरी काहितरी चुकतंय का “???

आणि त्याचे उत्तरं आपल्याला या सॉफ्ट स्कीलच्या टॉपिक मधून मिळू शकतात .

📌 सॉफ्ट स्किल ची यादी तशी खूप मोठी होऊ शकते परंतु अनेक तज्ञांनी वेगवेगळ्या याद्या तयार करून त्यातून काही महत्त्वाच्या स्कील बाजूला काढलेल्या आहेत तर त्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत? या आपण पुढील प्रमाणे बघू या !

📌 हा विषय अगोदर घेण्याचे कारण असे आहे की इथून पुढे ज्या ज्या वेळी वेगवेगळी टॉपिक येतील त्या त्या वेळी त्या टॉपिक मध्ये काय चुकू शकतो तिथे कोणती सॉफ्ट स्किल वापरून आपल्याला त्याची भरपाई करता येणे शक्य आहे? वगैरे वगैरे चर्चेला घेता येईल.

(1) Communication :

मनुष्य आणि प्राण्यांमधील सगळ्यात मोठा फरक काय आहे? तो आहे संभाषण करण्याचा, कम्युनिकेशन हे आजकाल सगळ्यात महत्त्वाचं होऊन बसलय !
आपल्याला ग्राहकाशी बोलावलं लागतं , आपल्याला डीलरशिप बरोबर बोलाव लागतं , आपल्याला व्यापाऱ्यांशी बोलायचं असतं , अनेक वेळा तर प्रत्यक्ष भेट होतच नाही फक्त फोन वरच चित्र उभं करावं लागतं , मग इथे आधार आहे फक्त संभाषण कलेचा ,

आपल्या बोलण्यातून आपण उर्मट उद्धट गरज नसलेला किंवा असभ्य वाटायला नको अनेक व्यापाऱ्यांकडे माल असतो परंतु त्यांची बोलण्याची तऱ्हा ही उर्मट असते आणि तेवढ्या एका गोष्टीसाठी अनेक व्यापारी करोडोंच्या डील घालवून बसतात त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वतःच्या बोलण्याचा टोन हा संयमित असायला हवा आपल्या बोलण्यातून समोरच्याला आश्वस्त वाटायला हवं आपल्या बोलण्यातून नेहमी मैत्रीचा भाव आला पाहिजे आणि अशाप्रकारे जर आपलं बोलणं ठेवलं तर आपलं बोलणं इम्प्रेसिव्ह होऊन जातं तेव्हा आज पासून आपलं स्वतःचं बोलणं रेकॉर्ड करायला चालू करा आपल्या भाषेमध्ये काही असभ्य शब्द येत असतील आपली टोन जर उर्मट येत असेल तर त्याला बदलायला घ्या ही गोष्ट इतकी सोपी नाही कारण आपल्या तोंडातून जरी शब्द बाहेर पडत असतील तरी ते आपल्या मेंदूतून येत असतात म्हणून करता आपल्या मेंदूला अगोदर वेगवेगळ्या प्रकारे ऑर्डर देऊन जंटलमन बनवावा लागेल करण जंटलमन मेंदू व्यवस्थित बोलतो

**********************************

(2)SelfMotivation:

📌 मी ज्या वेळी सुरुवातीला लिहायला चालू केलं तेव्हा लोकांना फार आवडत गेलं , आजही कित्येकदा मला कमेंटमध्ये लिहीताना feeling Motivated लिहतात .
पण …..
मला ते आवडत नाही,, आता का आवडत नाही हा पण विषय आहे.

कारण बऱ्याच जणांना फक्त मोटिवेशन ,मोटिवेशन आणि मोटिवेशन वाचायची , ऐकायची सवय लागून जाते, पण पुढे त्यातून काहीही करत नाहीत जेवढ्या पुरतं मोटिवेशन मिळालं तोपर्यंत खुश, तोपर्यंत प्रफुल्लित होऊन काम करणार पण ज्यावेळी स्वतःच्या रूममध्ये स्वतःच्या घरामध्ये वापस जातील त्या वेळी परत पहिल्यासारखे फुस्स होऊन जातात .

📌 यात दोष कुणाचा आहे ?जो व्यक्ती समोरच्याला चांगलं सांगतो त्याचा आहे किंवा ऐकतो त्याचा आहे?

📌 मला वाटतं , हा दोष आहे की आपण बाहेरून ताकद घ्यायला जातो पण आतून ताकद जो पर्यंत निघणार नाही तो पर्यंत त्याचा काय उपयोग ?

म्हणून , स्वतःला आतून ढकलण्याची ताकद ठेवा ! कारण लहान मुलांच्या सायकलींना बघा दोन सपोर्टिंग चाक असतात पण एकदा का सायकल चांगली जमायला लागली की , ते चाकं काढून टाकावे लागतात , जर काढले नाहीत तर सायकल फुल स्पीडने चालू शकत नाही , तसंच आहे काही दिवस एक्स्टर्नल मोटिवेशन घ्या पण कालांतराने ही एक्स्टर्नल मोटिवेशन काढून फेका , आतुन स्वतःला सपोर्ट करायला शिका ! तुम्ही एकटेच आहात जे स्वतःला चांगलं जाणता ! मग उगाच बाहेरच्या बॅटऱ्या लावून कुठपर्यंत गाडीला ओढायचं ?

(3)Leadership:

या दुनियेमध्ये लोकांना कोणतीही गोष्ट दुसऱ्याचे ऐकायला आवडते ! समोरच्याने आपलं नेतृत्व करावं आणि आपण निमूटपणे त्याच्या पाठीमागे चालावं याच्यासाठीच हि दुनिया बनलेली आहे !

📌 कोणताही राजकीय पक्ष बघा, कुटुंब बघा किंवा एखादी संघटना बघा त्यात एक व्यक्ती पुढे होऊन सगळ्या फॉलोवर्स ला मार्ग दाखवते ,

या व्यक्तीने दाखवलेल्या वाटेवरच सगळे पाठीमागून येणारे लोक काम करत असतात ,अशा प्रकारे आपण आपल्या व्यवसायांमध्ये लीडर बनले पाहिजे,

📌 निर्भिड ,रिस्क घेणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा, कोणाचाही अपमान न करणारा ,सगळ्यांचे सल्ले मानणारा, असा जो पुढे चालणारा व्यक्ती असतो तो एक चांगला लीडर होऊ शकतो .

विना लीडरशिप कोणत्याच प्राण्यांची टोळी सुद्धा नसते, तर माणसाचा व्यवसाय कसा असू शकेल ?

म्हणून प्रयत्न करा जास्तीत जास्त लीडर चे गुण आपल्या अंगी बाळगण्यची !

📌 आपल्याला वाटेल की ही नेतृत्वगुण जन्मजात असतात पण असं नाहीये नेतृत्वगुण हे शिकून किंवा परिस्थितीने सुद्धा येतात आणि आपल्याला नेतृत्व कसं करायचं शिकावं लागेल असं जर केलं नाही तर आपला व्यवसाय पुढे जाणार नाही

(4) Responsibility:

असं विनोदाने म्हटलं जातं की कोणती गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलणे सोपी असते , म्हणूनच कमजोर मनाचे लोकं जिम्मेदारयांना उचलण्यापेक्षा इतरांवर ढकलतात.

आपल्याला अशी सवय आहे का ?

खरं तर असं ढकला ढकली करणं फार सोपं असतं ,पण हि सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे ,व्यवसायिक म्हणून आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन वागवायच्या असतात ,अनेक निर्णय घ्यायचे असतात ,अनेक निर्णयांचे फटके सहन करायचे असतात, दरवेळी आपण त्याची जबाबदारी इतरांवर ढकलत राहिलो ,तर एक ना एक दिवस आपण संपून जाऊ,

म्हणून जिम्मेदारी स्वतःवर घ्यायला शिका ही एक महत्त्वाची सॉफ्ट स्किल आहे .

(5) TeamWork: :

मराठीत असं म्हटलं जातं की आपण एकटे येतो आणि एकटे जातो पण व्यवसायामध्ये ही म्हण पूर्णतः चुकीची आहे व्यवसाय ही ग्रुप न करायची शिकार आहे आपल्याला अनेक वेळा अनेक लोकांबरोबर समजून घेऊन काम करावे लागेल 13 म्हणून आपल्याला काम करावे लागेल अशा वेळीच आपण एकटे एकटे काम करत असताना असणारे नियम इथे चालत नाहीत

📌 एकटी काम करत असताना निर्णय फक्त आपल्याला एकट्याला घ्यायचे असतात आणि जिम्मेदार आपण परंतु ज्यावेळी आपण ग्रुपमध्ये काम करतो त्या वेळेला पूर्ण ग्रुपचा मिळून एक निर्णय असतो आणि पूर्ण ग्रुप मिळून घ्यायची जिम्मेदारी असते

📌 एमबीए मध्ये तर एक पूर्ण स्वतंत्र HRनावाचं डिपार्टमेंट शिकण्यासाठी आहे.

कारण मनुष्यबळ हा कोणत्याही व्यवसायाचा प्राण आहे आपण कितीही ऑटोमेशन करा आपल्याला माणसं लावावीत लागतात

📌 मनुष्याला भावना आल्या विचार आले मान-सन्मान सगळ्या गोष्टी आल्या आणि या सगळ्या गोष्टी जशा आपल्याला असतात तशा इतरांना असतात हे ज्यावेळी आपण व्यवस्थित समजू शकतो त्यावेळी आपण एक टीम लीडर म्हणून छान काम करू शकतो

📌 टीममध्ये काम करणे ही एक शिकण्यासारखी कला आहे , जी अनुभवाने येतेच पण जर आपल्याला हे माहीत असेल की ,आपण Team शिवाय आपण काहीच नाही आणि टीम आपल्या शिवाय नाही तर अशी कला शिकणे फार सोपे जाते.

तेंव्हा या वरिल सॉफ्ट स्कील संबंधी कामं करायला घ्या ,स्वतःला 1 to 10 च्या स्केलवर जोखा,कि नेमके आपण आहोत कुठे ?

📌 आपण स्वतः देखील या गोष्टी अभ्यासा .

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औध , पुणे
9518950764
office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *