व्यवसाय करताय पण ,मार्केटचे हे 5 प्रकार आपल्याला माहित आहेत का?

1,404 Views

व्यवसाय करताय,पण 5 आपल्याला मार्केटचे 5 प्रकार माहितीयेत का?

📌 आपल्या ग्रुप मध्ये बरेच अशी मंडळी आहेत जी खूप वर्षापासून व्यवसायामध्ये आहेत, त्यांना मार्केट काय असतं ? ते कसं चालतं? वगैरे सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे, परंतु असे अनेक जण आहेत ,ज्यांना अजून या क्षेत्रांमध्ये नवीन एन्ट्री करायची आहे, तर त्यांच्यासाठी म्हणुन आपण समजून घेऊया की मार्केट किती प्रकारचा असतात आणि ते कशा प्रकारे कशा प्रकारे काम करतात ?

1) Consumer Market:

ज्या वेळेला आपण आपला उत्पादन किंवा आपली सर्विस डायरेक्ट शेवटच्या कस्टमरला (End customer ला ) विकतो कि ज्याला खरोखर तो प्रॉडक्ट वापरायचा आहे, त अशाप्रकारच्या मार्केटला कंज्यूमर मार्केट म्हणलं जातं.

अशा प्रकारच्या मार्केटमध्ये आपण जास्त नफा कमवू शकतो परंतु विक्रीचे प्रमाण हे कॉन्टीटी मध्ये कमी असू शकते ,या मार्केटमध्ये आपण कोणत्याही उद्योगाबरोबरच व्यवहार करत नसून थेट कस्टमर बरोबर व्यवहार करत असतो

📌 कोणत्याही प्रकारचे मॉल /रिटेल शॉप्स / डायरेक्ट विक्री /भाजी मंडई/ सिनेमा हॉल/ जिम अशा प्रकारचे व्यवसाय आहे, हे व्यवसाय डायरेक्ट कस्टमरला सर्विस द्यायला लागतात.

त्यामुळे या मार्केटला आपण कंज्यूमर मार्केट असं म्हणू शकतो

(2) Business Market:

📌ज्या वेळेला आपण आपलं उत्पादन किंवा सर्विस एखाद्या दुसऱ्या उद्योगासाठी देतो तेव्हा त्याची मागणी मोठ्या प्रमाणात असू शकते, कारण आपण दिलेला उत्पादन हे समोरच्या उद्योगाचं रॉ मटेरियल म्हणून जर वापरलं जाणार असेल, तर आपल्या उत्पादनाची मागणी ही मोठी असू शकते .

अशा प्रकारचे बिजनेस हे मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात.

📌 आता या ठिकाणी आपल्याला समोरचा उद्योग आपले उत्पादन वापरून सुद्धा नफा कसा कमावेल?, हे बघायचं असतं त्यामुळे तिथे हे किमती या होलसेल भावात जातात.

होलसेल चा अर्थ असा आहे की आपल्याला जास्त Volume च्या बदल्यांमध्ये कमी नफा मिळतो.

अशा अनेक कंपन्या किंवा असे अनेक उद्योग मार्केटमध्ये आहेत जे ,की आपली उत्पादने ग्राहकांना विकतच नाहीत, हे उद्योग फक्त कंपन्यांनाच आपला माल पुरवतात.

म्हणुन या प्रकारच्या उद्योगांना
Business to Business
अथवा
B2B ,असं म्हणलं जातं .

(3) Global Business Market :

📌 ज्या वेळेला एखादा उद्योग एका ठराविक देशांमध्ये आपला माल न विकता किंवा एका ठराविक देशांमध्ये सर्विस न देता पूर्ण जगामध्ये विक्री करत असेल किंवा सर्विस देत असेल तर अशा प्रकारच्या बिजनेसला ग्लोबल बिझनेस असं म्हणलं जातं.

खूप लोकांची अशी इच्छा असते की आपल्या बिजनेस हा जगभर वाढावा परंतु जोपर्यंत आपण आपल्या व्यवसायाचे पाळंमुळं आपण असलेल्या देशांमध्ये पक्के करत नाही तोपर्यंत आपली उपस्थितीही इतर देशांमध्ये थोडसं अवघड असतं.

Global जाणं तसं आता एवढं अवघड राहिलेलं नाही , पण एक अनुभवाची लेवल पार केल्याशिवाय ते शक्य नाही .

📌 Non-Profit / Low- Profit Business:*

खरं तर व्यवसाय हा पैसा कमावण्यासाठी करायचा असतो ,परंतु असे अनेक बिजनेस आहेत त्या ठिकाणी लोक नफा कमावण्याच्या हेतूने व्यवसाय करतच नाहीत .

तिथे बहुत करून उद्योग हे वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला जम बसवलेले असतात आणि समाजाला काहीतरी दयायचं म्हणून हा उद्योग करत असतात.

समोरच्या व्यक्तीचा समाजसेवा करायचा बिझनेस हा आपला पैसा कमवायचा बिझनेस असेल तर, आपल्या साठी तगुन रहाणे खरोखर अवघड बनुन जाते .

जसं समजा आपण R0 filter आणि chill केलेला पाण्याचा जार, 2Oरूपयाला विकतोय आणि आपल्याच एरियात किंवा गावात एखादया उद्योजकाने … गावाचे उपकार फेडायचे म्हणून >> गावातील लोकांना फ्री RO पाणी दयायला सुरू केलं तर,आपला व्यवसाय होणारच नाही .

तेव्हा अशा बिझनेस पासून सावधान .

5) Business with Goverment

गव्हर्मेंट नेहमी समाजोपयोगी उपक्रम स्वतःच्या पैशातून करत नाही,किंवा सरकार कडे तेव्हा पैसा उपलब्ध असेलच असं नाही .

अशा वेळी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांची मदत घेते,याला टेंडर म्हणतात, आणि सरकार अनेक कामे टेंडर देऊन करते.

मराठीत याला निवीदा म्हणतात , सर्वात कमी किंमत ज्या उद्योगाने लावलेली असेल, त्या उद्योगाला तो माल सप्लाय करायचा असतो.

हा देखील एक उद्योगाचा प्रकार आहे, परंतु या उद्योगांमध्ये किंवा या प्रकारच्या उद्योगांमध्ये त्या व्यक्तीकडे काही विशिष्ट स्किल असाव्या लागतात.

जरी सरकार खरेदी करणार असेल, तरिही खरेदी करणारी व्यक्ती ही. कुठल्यातरी पोजीशनवर असते, बऱ्याच वेळेला आपल बिल निघत नाही, खूप वेळा बिलं वर्ष_वर्ष,पेंडींग राहतात ,यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा खूप मोठा असतो,जर या सगळ्या गोष्टी आपण सहन करू शकत असाल किंवा थोडी रिस्क घेऊन सरकार बरोबर व्यवहार करू शकत असाल,तर हे क्षेत्र आपल्यासाठी आहे.

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764
office: 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *