व्यवसाय चालु करताय का ? अगोदर या पाच गोष्टी लक्षात घ्या !

व्यवसाय_निवडताना_समजून_घ्यायच्या_चार_गोष्टी

© निलेश काळे .

📌 हा प्रश्न कधी संपतच नाही,,, कि “सर कोणता बिजनेस करू”?

📌 मार्केटमध्ये अनेक लोक रेडिमेड पॅकेज देऊ लागलेत, “तुम्ही एवढे गुंतवा, तुम्हाला अशा पटीने परतावा मिळेल” किंवा “असा फायदा मिळेल ”

असल्या फालतू गोष्टींकडे आपण जायचं नको आपण रियलटाइम मध्ये विचार करू, अशा गोष्टी ज्या खरोखर work करतील! ज्यांच्यावर आधारित व्यवसाय निवडला तर आपल्याला फार मोठे नाही पण काही ना काही तरी यश नक्की मिळेल !

📌(1) #Find_Not_Solved_Problem”.

व्यवसायाची सगळ्यात साधी सोपी आणि सिम्पल अशी व्याख्या म्हणजे, “लोकांना जे पाहिजे किंवा लोकांची जी अडचण आहे त्याला योग्य मोबदला घेऊन उत्तरं शोधून देणे ” !

जगामध्ये प्रत्येकालाच प्रॉब्लेम आहेत, अशा करोडो प्रॉब्लेम्सला काही ना काही तरी उत्तर आपल्याकडे असेलच ना? कि , जे कोणाच्या ना कोणाच्या तरी कामी पडू शकतात !

त्याच्या वर आधारित व्यवसाय सुरुवात केला /त्याला नीट मेंटेन केलं/ /वाढवला तर ना एक दिवस तो यशस्वी नक्की होणार आहे !

यात काही वादच नाही पण बरीच मंडळी……. “ती उत्तर देतायेत जे प्रश्न कधी कोणी विचारलेच नाहीत ”

म्हणजे असे प्रॉडक्ट इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याची कधी डिमांड झालीच नाही , अशी बळजबरीने मागणी तयार करणे आणि असलेल्या मागणीला पुरवठा करणे यात जमीन-अस्मानचा फरक आहे

📌 अशी बळजबरीने मागणी तयार करायचा प्रयत्न करणारे व्यवसाय किंवा प्रोफेशनल्स काही दिवसांनी डिप्रेशनमध्ये जातात ,, हे असं दाखवतील की मी किती खूश आहे पण नाही….. त्यांचा प्रयत्न फसला तर ते कुठलेच रहात नाहीत…. ना घर के ना घाट के .

📌 त्यामुळे जे खरेखुरे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जे अस्तित्वात आहेत, त्यांनाच सोडण्याचा प्रयत्न करावा त्यातून पैसा कमावण्याचा मार्ग सापडतो उगाचच डुप्लिकेट प्रॉब्लेम च्या नादी लागून वेळ आणि आपली ऊर्जा दोन्ही खर्च होते …..एवढं करू नका !

📌 (2) #Try_to_Sell_What_is_already_selling:

📌मार्केटमध्ये सध्या नवीन स्टार्टअप उघडून श्रीमंत झालेल्या पोरांची प्रचंड हवा आहे, त्यांनी ते साध्य केलं त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे !

पण त्याचे आफ्टर शॉक ज्याला म्हणतात ते समाजामध्ये चलबिचल निर्माण करू लागलेत.

कारण नवीन व्यवसायात उतरू पाहणारा प्रत्येक पोरगा ,,,त्याला काहीतरी वेगळेच करायचय,

असा समज विनाकारण निर्माण झालाय की, आपण काहीतरी जगावेगळं केलं, म्हणजेच आपल्याला कुणी विचारील आणि आपल्याला भरपूर पैसे मिळतील.

तसं नसतंय रे भावांनो , विमानाला उडण्यासाठी सुरुवातीला रन अपच घ्यावं लागतंय, जे मार्केटमध्ये चलतय त्याची विक्री करून अनुभवच घ्यावा लागतोय आणि हे सोपे आहे.

त्याच्यामध्ये Risk लेवल जरा कमी आहे , उगाचच नवीन माणसाने>>नवीन प्रॉडक्ट>> नवीन मार्केटमध्ये आणायला गेलं की ते फार अवघड होऊन बसते, तिथे फार मोठी होऊन जाते BCG मॅट्रिक्स नावाच्या एका चार्ट मध्ये या प्रकारच्या निवडीला सगळ्यात डेंजरस निवड असं म्हणलं जातं कारण येथे फेल होण्याचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात आणि बोहणीच्या वेळेसच जर अपयश आलं तर मात्र पोरं पुन्हा उठतच नाहीत.

त्यामुळे हा प्रकार जरा बऱ्यात बरा आहे.

याला कॅलक्युलेटेड रिस्क घेणे असं म्हणलं जातात आणि अशा व्यावसायिकांना “चिकन-आंत्रप्रुनर”, हा शब्द आहे (ज्या प्रकारे कोंबडी चरत असताना देखील भीत भीतच चरत असते तसाच काहीसा हा प्रकार आहे आणि अशा प्रकारची थोडीशी भीती फार काय वाईट नाही अलर्ट राहणे ते कधी पण बरं असतं ).

📌(3) #It_is_Good_tobe_realistic:

📌हा प्रकार देखील मार्केटमध्ये सध्या खूप जोरात दिसून येतोय, जाहिरात करणारे देखील त्याच रोखाने जाहिरात करत आहेत !

उदा . “ॲमेझॉन सारखी ई-कॉमर्स वेबसाइट बनवून मिळेल ” “दोन हजार -तीन हजार रुपयात आपला ऑनलाईन व्यवसाय चालू करा ”

आता साधी गोष्ट आहे ॲमेझॉन असो अथवा एप्पल , स्टीव जॉब्स असो किंवा इलॉन मस्क ,

या लोकांनी मार्केटमध्ये एक कॅटेगरी निर्माण करून ठेवली आहे आणि ही लोक त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये लीडर आहेत .

आता उगाच उसनं अवसान आणून “मी निघालो ॲमेझॉन सारखी वेबसाइट बनवायला” म्हणून बाहेर पडून पैशाचा धूर करणे कितपत योग्य आहे?

माणसाने उच्च कोटीची ध्येय बाळगणे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे ही चांगली गोष्ट आहे , पण तरीदेखील कुठेतरी रियलियस्टीक विचार करणं, तारतम्य वापरून विचार करणं, हेदेखील आवश्यक आहे का नाही ?

📌 समजा माझ्या डोक्यात विचार असा आलाय की Apple सारखी कंपनी एवढा मोठा पैसा कमावते?
मग मी पण जाऊन Apple सारखा मोबाईल बनवणार आणि एवढेच मोठे पैसे कमावणार ,

चांगलंय …हा विचार पण केला पाहिजे ,पण व्यवसायासाठी इथे एक वेगळी संधी आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी बिझनेस मोडेल असं म्हणलं जातं.

I-Phone फार चांगला विकतोय का? मग मी त्याला लागणारी कव्हर किंवा त्याला लागणारा ग्लास बनवायचा व्यवसाय चालू केला पाहिजे, उगाचच मोठ्याला धडका घेऊन आपलं डोकं फोडून घेण्यापेक्षा त्याला लागणारे पार्ट आपण बनवून दिले तर त्याचा सुद्धा सेल होईल आणि आपला पण सेल होत राहील असा सुद्धा विचार करून बघा कि !

पण आपण ते करण्यापेक्षा एक दुसऱ्याची जिरवायला जातो आणि या नादात नुसती कॉपी करायला लागतो.

ना तुला ना मला घाल कुत्र्याला

📌 (4) #Why_do_Customer_purchase ?

ग्राहकाची मानसिकता ओळखणे हा देखील व्यवसाय चालू करण्याच्या पूर्वीच अभ्यास करण्याचा विषय आहे.

पण असा विचार करताना कोणी दिसत नाही .

लोकांना काय वाटतं की ?
मला जे चांगलं जमतं मी त्याचाच विचार त्याचा व्यवसाय करणार .

नाही रे दादा ग्राहक…

ग्राहक चार/ पाच गोष्टींवर खरेदी करायला बसलेला आहे.

(a)Price
(b) Quality
(c) Selection
(d) Convenience
(e) Personalised service:

(1)#PRICE:

व्यवसायामध्ये आपण कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त चांगली क्वालिटी कशी देऊ शकतो ? याला फार जास्त महत्त्व आहे.

एखादा ,थोडी किंमत कमी करून व्यवसाय जर करु लागला तर त्याच्या पुढे भलेभले गार व्हायला चालू होतात.

पण हे जर न परवडणारे गणित आहे, कारण आपण धंदा करतोय पैसे कमावण्यासाठी आणि तोच जर कमी कमवायचा म्हणलं तर मग आपण व्यवस्था करण्यात काय पॉईंट आहे?

तरीदेखील अनेक लोकं सुवर्णमध्य साधतात आणि मार्केटमधल्या स्पर्धकांना गार करून आपलं उखळ पांढरं करून घेतात, डी-मार्ट याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे.

(2) #Quality:

📌प्रत्येकच ग्राहक हा कमी पैशासाठी खरेदी करतो असं काही नाहीये,

लोकं क्वालिटीला सुद्धा तेवढेच महत्त्व देतात, आपण जर लोकांच्या पेक्षा सुपिरियर कॉलिटी किमतीमध्ये देण्याचा चालू केलं तर?

तर आपल्याकडेसुद्धा ग्राहकांची रांग लागेल

ही ग्राहकांची एक सवय आहे की एकदा ते आपण त्या कॉलिटी चा माल देतोय का? बघतात आणि त्याच्या नंतर पुन्हा पैशाला घासाघीस करत बसत नाहीत.

(3) #Selection :

आजचा ग्राहक हा चोखंदळ आहे, त्याला जरी एक वस्तू खरेदी करायची असली तरीही ही ऑप्शन बघण्यासाठी जास्त गोष्टी लागतात , म्हणजे त्याला फार मोठं सिलेक्शन असायला आवश्यक आहे.

म्हणजे असं की,आपल्याकडे भरपूर व्हरायटी पाहिजे, ती आपल्याकडे असेल ,तर ग्राहक हा नक्की खरेदी करतो.

ही त्यांची एक सवय आहे

(4) #Convenience:

📌बर्‍याचदा ग्राहक हा स्वतःची सोय बघून खरेदी करतो , मान्य आहे की D-Mart मध्ये साखर दोन रुपयाने कमी मिळते ,पण मला त्याच्यासाठी दहा किलोमीटर गाडीवर जावं लागतं.

मी ते करत बसण्यापेक्षा पायी चालत जाऊन पाच किलो साखर घेऊन येऊ शकतो.

म्हणजे जर आपण ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचवायचा प्रयत्न केला तर ग्राहक दोन पैसे जास्त द्यायला मागेपुढे बघत नाही

ती पण ग्राहकाची एक प्रकारची सवय आहे

(5) #Personalised_Attention:

📌जो व्यवसाय ग्राहकांना आवडेल अशा प्रकारे वैयक्तिक सेवा द्यायला तयार आहे इथून पुढे तो फार चांगला चालणार आहे.

Delievery System हे त्यापैकी एक .

कारण??? आजकाल लोकांना पैशाची कमी नाहीये , लोकांना इतरांकडून चांगल्या सेवेची अपेक्षा आहे .

पूर्वीच्या काळी फक्त फॅमिली डॉक्टर असायचे ,पण आजकाल पर्सनल वकील, पर्सनल CA पर्सनल security या गोष्टी वाढू लागल्यात

आपण युट्युब नेहमी उल्लेख करतो, माझं युट्युब होमपेज आणि तुमचे युट्युब होमपेज हे वेगवेगळे असणार ! कारण ???? का युट्युब माझ्या आवडीनुसार ऑप्शन समोर आणतं आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्यासमोर .

याच्यामुळे यूट्यूब सक्सेसफुल आहे कारण ??त्याने प्रत्येक ग्राहकाच्या आवडीचा विचार करूनच आपला बाजार मांडलाय .

📌या या चार पाच गोष्टी होत्या ज्याचा अभ्यास याचा विचार आपण कोणताही व्यवसाय चालू करण्यापूर्वी नक्की करायला पाहिजे.

📌आज-काल…. “येडं उठलं आणि पिटलं हाटलं ” असा प्रकार नाही चालणार आपला स्पर्धक हा पूर्ण तयारीनिशी येणार आहे आपल्याला देखील पूर्ण सज्ज होऊन अच्युतराव लागेल नाहीतर आपला टिकाव लागणं खरंच अवघड आहे !

📌आमच्या ब्लॉगचा प्रयत्न आहे की की वेगवेगळ्या स्तरावर उपलब्ध असणारे मॅनेजमेंट ज्ञान आपल्यापर्यंत मराठीमध्ये पोचवावे आणि हा आमचा प्रयत्न पुढे नक्कीच चालू राहणार आहे.

***************************
© निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
5th Floor विघ्नहर चेंबर्स ,
अभिनव चौक , नळस्टॉप ,पुणे .
9518950764

Call Omkesh Munde Sir : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *