व्यवसाय निवडीसाठी वैज्ञानिक पद्धतीने market Research असा करावा

व्यवसाय निवडीसाठी, वैज्ञानिक पद्धतीने market Research असा करावा

जेंव्हा आपण व्यवसाय चालू करणार आहात किंवा नवीन प्रॉडक्ट आणत आहात किंवा अजून काही करत आहात,

आपले आता सगळे अनालिसिस करून झालेत,असं समजूया , कारण अनालिसीस करण्यासाठी ते आपण घरात बसून करतो_

पण आता ज्यावेळी व्यवसाय करायचाय तेंव्हा सगळ्या गोष्टी आपल्या एकट्याच्या डोक्याने ठरवून तर चालत नाहीत ना ?म्हणून मग कन्सेप्ट येते ती मार्केट रिसर्चची

बरेच लोक याला चुकून मार्केटसर्वे म्हणतात,पण सर्वे हा वरवर केला जातो Tourist सारखा,पण Explorer शोधक नजरेने फिरतो , आणि आपल्याला Explorer व्हायचंय

ज्या गोष्टींवर आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतंय त्या गोष्टीची नुसती वरवर माहिती काढून काय उपयोग आहे?

यासाठी रिसर्च करावा लागतो,

त्यामुळे इथून पुढे रिसर्चच करायचा

रिसर्च :म्हणजे पूर्ण शक्ती,मन,बुद्धी एका जागेवर स्थिर ठेऊन बारकाईने सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास करणे,

व्यवसायात अभ्यास म्हणलं कि बऱ्याच जणांना हसू येतं

त्यांचं म्हणणं कि यात काय असतंय अभ्यास करण्यासारखं ?

खरंय

इथेच तर मग 10 पैकी 9 जण फसतात,आणि मोठ्ठ नुकसान करवून घेतात, आपल्याला तसं करायचं नाही म्हणून मार्केट रिसर्च करायचा .
आता या मार्केटरिसर्च आपण असंच करू शकत नाही,त्याच्यासाठी वैज्ञानिक पद्धती आहेत आणि आपल्याला या वैज्ञानिकाने पद्धती माहिती असायला हव्यात

चला तर मग आपण मार्केट रिसर्च कसा करावा यासंदर्भात काही महत्वाचे मुद्दे बघूया.

(1)Prospect : या शब्दाचा अर्थ असा होतो ती व्यक्ती आपला ग्राहक नाहीये पण आपला ग्राहक बनू शकते.

(2)focus Group : याचा अर्थ असा आहे की लोकांचा तो समुदाय ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.

(3)Target Audience: याचा अर्थ ते लोक त्यांना आपल्याला उद्या आपला Product किंवा आपली सेवा विकायची आहे.

📌 Market Research मध्ये आपल्याला बरंच लिखाण करायचं आहे , VDO घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्या व्यवसायाच्या जडघडणी साठी वापरायचे आहेत त्यामुळे , डॉक्युमेंटेशन ची सवय नसली तरी ती लावून घ्या ! याचं फार महत्व असणार आहे !

(1)Go and Ask the People Personally (Primary):

ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये एखादा व्यवसाय करायची इच्छा निर्माण होते त्या वेळेला कागद आणि पेन घ्या आणि सरळ घराच्या बाहेर पडा.

शक्यतो ज्या एरियात आपल्याला कोणीही ओळखत नाही अशा एरियात किंवा इतर शहरात जाउन आपल्याला ज्या प्रॉडक्टबद्दल व्यवसाय करायचाय त्याबद्दल चौकशी करायला चालू करा.

📌शक्य झाल्यास VDO घेण्याचा प्रयत्न करा_
_intelligent प्रश्न विचारा,म्हणजे तर्कशुद्ध उत्तरे मिळतील.

प्रत्येकच जण चांगलं बोलणार नाही पण प्रत्येकच जण वाईट देखील नसतो

ही प्रोसेस वेळ घेऊ शकते,पण याला पर्याय नाही ,करावीच लागेल.

माझ्याऐवजी xxxx ला पाठवतो आणि तो ते काम करील अशा उंटावरून शेळ्या हाकणे नको.

कारण बऱ्याचवेळा लोक थातूर मातूर उत्तरे आणतात जे चुकीचे पण असू शकतात

या इंटरव्हयु मधून इतके सारे माहित नसणारे कंगोरे समोर येतील कि आपण हैराण होऊन जाल,

प्रत्येक वयाच्या ,आर्थिक स्थिती असणाऱ्या , जात , धर्म ,भाषा असणाऱ्याचा इंटरव्ह्यू घ्या , आणि सगळं लिखीत ठेवा.

मग त्यासाठी एखादी प्रश्नावली तयार घ्यावी लागली हरकत नाही.

(2)Online Research (Secondary) :

📌ही पद्धत खूप प्रसिद्ध होऊ लागली आहे

फेसबुक सारख्या माध्यमांवर विशेष प्रॉडक्ट करिता एखादया ग्रुप वर आपण प्रश्न विचारायचा , आणि त्या ग्रुपमधील लोक त्यावर कमेंट करतील.

फक्त कमेंट करणारे कोण आहेत ?कसे आहेत ? किती सिरीयसली कमेंट करताहेत ?या गोष्टी फिल्टर करता आल्या पाहिजेत

या कमेंट मध्ये whistle Blower म्हणजे धोका सiगणाऱ्या कमेंट वर लक्ष दया,जेणेकरून आपण सावध होऊ शकू

कालच एका ग्रुप वर एका ताईने,”द्रोण मशीन घेऊ का”? हा प्रश्न विचारला होता,तर त्यावर 400 कमेंट आल्या ज्यांपैकी 390 लोकांनी सरळ करू नका,हे सांगितलं

झालं ना त्यांचं काम ?

Audience Poll यासाठीच घेतला जातो कारण बहुसंख्य लोक चुकीचे नसतात

(3) Market size समजून घ्या :

प्रत्येकच उत्पादन हे सर्व लोक वापरत नसतात त्याची एक ठराविक मर्यादा आहे , कि किती लोक आपलं उत्पादन वापरतील ?किती लोक वापरणार नाहीत ?या गोष्टीला मार्केट साईज असं म्हणलं जात.
अनेकदा उत्पादक उत्पादन सुरू करण्यापूर्वी मार्केट साईटचा अंदाजच घेत नाहीत , मोठ्या हौसेने आपण उत्पादन चालू करायला जातो आणि नंतर लक्षात येतं की एवढा माल विकायचा कुठे ? ग्राहक तर फार कमी वेळ खरेदी करत आहे , तो जर कमी वेळा उत्पादन विकत घेत असेल तर त्या उत्पादनाची मार्केट साईज कमी आहे ही गोष्ट अगदी नॉर्मल लक्षात येण्यासारखी आहे.

मागील लॉकडाऊन दरम्यान झालेली गडबड लक्षात घ्या,लोकांच्या लक्षात आलं की सैनीटायझरची गरज आहे आणि म्हणून मग वेल्डिंग वर्कशॉपवाल्या लोकांनी डोकं लावून पेडल ऑपरेटेड हॅन्डसनीटायझर डिस्पेंसर मशीन बनवायला चालू केल्या,आता साधी गोष्ट आहे की अशाप्रकारचं मशीन किंवा हे स्टँड प्रत्येक घरांमध्ये तर वापरलं जाणार नव्हतं तर ते काही ठराविक ऑफिस शाळा दुकाने एवढेच लोक हे घेऊ शकत होते पण वेल्डींगवाले लोकं अशा प्रकारे उत्पादन करत राहीली जणू काही सगळी लोक आपलं काम धाम सोडून फक्त यांचं स्टँड विकत घेण्यासाठी यांच्या दुकानासमोर लाईनी लावणार आहेत. आणि व्हायचं तेच झालं.
कालांतराने यांचा माल पडून राहिला.

हे इथे असं चुकतं

(4) Review Competition

खूपदा बरेच जण अतिशय मोटीवेटेड होऊन व्यवसाय चालू करायला जातात जणू काही यांना कोणीही अडवणार नाही ,कोणीही यांना विरोध करणार नाही,अरे पण मार्केटमध्ये अगोदर काही लोक हा व्यवसाय करत आहेत,तुम्ही त्यांचे ग्राहक ओढवून घेणार आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या लोकांसाठी स्पर्धा निर्माण करत आहात आता जेव्हा कोणालाही स्पर्धा निर्माण होते त्या वेळेला ती व्यक्ती विरोध करणारच ती व्यक्तीसुद्धा काही चाली चालणारच कि? मग याचा विचार व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर का करू नये?_
_पण भलतेच मोटिवेट झालेली मंडळी या गोष्टीला विचारात घ्यायला तयारच नसतात, त्यांना असं वाटतं की मी फार मेहनत करणार आहे, मी फार कष्ट करणार आहे,,, अरे पण या गोष्टीला सुद्धा काही मर्यादा आहेत, शेवटी हा फॅक्टर सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे.

त्यामुळे आपल्या स्पर्धकांची नावे त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी त्यांची कुवत त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टीचा डाटा आपल्याकडे असायला हवा

(5) Perform some Experiments :

📌 ज्या वेळेला आपल्याला उत्पादन चालू करायचं असतं त्या वेळेला आपण त्याचे छोट्या प्रमाणावर प्रयोग करून बघायला हरकत नाही ज्या वेळेला आपण आपले प्रयोग जनतेला दाखवतो त्यावेळी जनता आपल्याला त्याच्या संदर्भात फिडबॅक देते नेमका आपला u.s.p. काय आहे नेमकं आपण कुठे सुधारू शकतो नेमकी आपली पॅकेजिंग कशी असायला पाहिजे अजून बऱ्याच गोष्टींवर लोक सल्ला देतात_

याला MVP (minimum viable product ) टेस्टींग असं म्हणलं जातं

या अशा गोष्टींमधून आपला संभाव्य ग्राहक आपल्याला अतिशय मौल्यवान अशी माहिती देतो आणि अशी माहिती आपल्याला फार मोठ्या नुकसान होण्यापासून वाचवू शकते

(6) Talk to the Expert:

📌हा पॉईंट मी एक बिझनेस कन्सल्टंट आहे म्हणून लिहितोय अशातला नाही, परंतु लक्षात घ्या चांगले एक्स्पर्ट लोक आपला वेळ ,पैसा ,श्रम सगळ्याच गोष्टी वाचवू शकतात, त्यामुळे नेहमी ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला एक्सपर्ट भेटतील तेव्हा त्यांची सेवा अवश्य घ्या.

📌 इथे आपण एक एक्सपर्टचा सल्ला घेण्याऐवजी दहा एक्सपर्टचा सल्ला सुद्धा घेऊ शकतो, त्यामुळे आपल्याला एक मोठा View मिळतो जो आपल्या व्यवसायात पुढे जाऊन कामी येऊ शकतो.

अशाप्रकारे मार्केटचा चांगला अभ्यास करून बनवलेला मार्केट रिसर्च रिपोर्ट आपल्याला एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी, एखादं नवीन उत्पादन चालू करण्यासाठी किंवा एखाद्या नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये आपला विस्तार करण्यासाठी नक्की कामी येतो, तेव्हा बिना मार्केट रिसर्च काहीही पाऊल उचलू नये

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

आपल्या व्यवसायात विक्री खालावली असेल,तर कोचींगसाठी आमची मदत घ्या,उद्योगनितीची प्रभावी टेलीफोनीक कन्सल्टींग घ्या, आणि प्रगती करा,कॉल.
श्री ओमकेश मुंडे सर :9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “व्यवसाय निवडीसाठी वैज्ञानिक पद्धतीने market Research असा करावा

  1. Especially in service industry, how to give budgets which will bring our customer to pay us again and again…
    i mean how to generate recurring income from same or existing clients..

  2. I am primary teacher. I live Upalai bk tal. Madha. Dist- Solapur
    I want to start small oil production with telghana . Plz guide
    M . No 9975909685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *