व्यवसाय यशस्वी करणारा एक जबरदस्त फॉर्मुला:जो नेतेमंडळी पण वापरतात .

व्यवसाय यशस्वी करणारा एक जबरदस्त फॉर्मुला: जो नेतेमंडळी पण वापरतात.

📌 एखादा टॉक शो का यशस्वी होतो?कारण तिथे थोडाफार किंवा खुप जास्त यशस्वी झालेला व्यक्ती आपल्या आयुष्याची आणि करीयरच्या सुरुवातीची आणि उपसलेल्या कष्टाची… “स्टोरी” सांगतो.

आपला बिझनेस असेल तर प्रमोशन करण्याचा हा नंबर एक फार्म्यूला आहे.

असा फॉर्मुला ज्यामुळे कोणताही ब्रॅण्ड,व्यक्ती किंवा संस्था मार्केट मध्ये स्वतःची ओळख करवून देतो आणि आपल्या वस्तुची विक्री वाढवत नेतो. .

ते म्हणजे ….. स्टोरी

तुमच्याकडे एक स्टोरी आहे का ?
का नाहीये?
असेल तर वापरा,
नसेल तर तयार करा .
कशी करायची असते ?
उदाहरणं काय असतात ?

खालील उदाहरण बघा .

एक नेता भाषण करायला उभा ,
मतं दया, तुमचं भलं करतो अशी आश्वासनं देत असतो .
त्यानंतर सुरू होते … Trial Close .
Trial close म्हणजे,तुम्ही आणि मी सारखेच आहोत हे सांगणं .
“मी गरिबी भोगलीय,हे विकलय,ते विकलय,असे कपडे घातलेत,अशा प्रकारच्या घरात राहिलोय, खायला जवारी नव्हती , उपाशी राहीलो, ब्ला ब्ला ब्ला !

काय आहे हे ?
हे आहे ! एक स्टोरी सांगणे.
लोकांना स्टोरी आवडते ,लोकं रीलेट करतात , आणि एकदा का लोकांना वाटलं कि तुम्ही आणि ते वेगळे नाहीत त्यांची आणि तुमची स्टोरी सेम सेम आहे .
तर झालं मग तो ग्राहक तुम्हाला बांधला जातो .

***************************

आपण असा कोणताच ब्रॅण्ड बघणार नाही ज्याला स्टोरी नाही !

xxxx Talks मध्ये लोकं येतात,आपला प्रवास सांगतात मी कसं केलं ?, कसं यश मिळवलं? , किती हाल भोगले? .
हे सगळं एकाच तत्वाला पुढे करतं, ते म्हणजे स्टोरी !

अमिताभ बच्चनची स्ट्रगल स्टोरी सगळ्यांना माहित आहे , पण तीच स्टोरी अभिषेक बच्चनकडे आहे का ?

नाही ! अभिषेककडे ही स्टोरीच नाही .

मग मेन कॅरेक्टरच नसेल तर प्रसिद्धी कशी मिळेल ?

******************************

आज काल TV ऍडमध्येमध्ये पण स्टोरीच सांगितल्या जातात.

साधी गोष्ट आहे .. आम्ही कोणती प्रोसेस वापरतो( जसं एक खोबरेल तेल ब्रांन्ड सांगतो कि आमचं तेलचांगल्या क्वालिटीच्या खोबऱ्यापासून त्यांचं तेल बनतं .

कच्चा माल कुठून आणतो ?(MP के शरबती गेंहू से बना आटा )

कित्ती काळजीपुर्वक निवडून वगैरे आणतो? ( xxx वाला म्हणतो आम्ही केरळातून मसाले निवडून आणतो ,)

हे सगळं सगळं मांडतात Businessman लोक .

हे मांडायचं असतं !
याला Appeal करणारी स्टोरी म्हणतात.

*************************

आजकाल फ्रॅन्चायजी हा प्रकार वाढतोय .
बऱ्याच जणांना वाटतं पटकन इतरांनी आपल्याला फीस देऊन फ्रॅंचायजी घ्याव्या .
पण लक्षात घ्या .
त्यासाठी स्टोरी पाहिजे .
अनुभव पाहिजे .
xxxचहा, xxxभेळ ,xxxवडापाव या सर्वांनी आपल्या स्वतःच्या स्टोरी एक तर सोशल मिडियातून बाहेर पेरल्या अथवा स्वतःच्या आऊटलेटमध्ये लावल्या .
त्यांच्या यशापाठीमागे अनेक कारणं असतील,पण स्टोरी असणं आणि लोकांसमोर मांडणं हे देखील मोठ्ठं कारण आहेच .

*********

“कोणत्याही व्यक्तीचा मेंदू एखादया लॉजीकल . प्रेझेंटेशनला जास्त वेळ स्टोअर करू शकत नाही, पण कथा,कहाण्या विसरत नाही.

तर चला मग आपल्या व्यवसायाच्या प्रवासाची कथा तयार करा आणि इतरांसमोर मांडा,हेच सर्वात मोठ्ठं ओपन सिक्रेट आहे.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

©निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *