व्यवसाय सुरु करताना या 11 गोष्टी नकोच.

838 Views

आपण आजपर्यंत असे लेख वाचले असतील कि,उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी या गोष्टी करा वगैरे,पण आज जरा रिव्हर्स इंजीनिअरिंग करूया.

व्यवसाय चालू करताना करू नयेत अशा 11 गोष्टी बघूया.

1] Dont Start with No Money :

सध्या तुमच्या जवळ पैसे नसतील
तर उद्योग चालू करू नका,का ? आणि कशामुळे?असे प्रश्न उठले ना मनात ?

याचं कारण असं आहे कि व्यवसाय चालू केला कि,तो व्यवस्थित चालू व्हायला वेळ लागेल,त्यातून कमाई चालू व्हायला वेळ लागतो,कधी एक आठवडा , महिना अथवा वर्ष म्हणून आपल्याला पेशंस बाळगावे लागतात.

म्हणून उद्योगासाठी पैसा जमा करण्यासाठी थोडा वेळ जॉब करा , काही प्रॉब्लेम नसतो त्यात,

पण फायनान्शीयल कुशन तरी असते आपल्यासाठी, तेंव्हा फायनान्शियल कुशन घ्या आणि मग व्यवसाय चालू करायचा विचार करा.

2] Dont Expect Free Time:

बऱ्याच जॉब करणाऱ्या व्यक्तींची अशी मानसिकता असते कि, स्वतःचा उद्योग असणाऱ्यांसाठी सगळा वेळ फ्री असतो .

तर तसं बिल्कुल नाही,सुरूवातीच्या काळातही 24 तासांची नौकरी आहे,
त्यामुळे उद्योग चालु करण्याआधी ही मानसिकता बदलाच.

नंतरच्या काळात बिजनेस ऑटोमेट झाल्यानंतर फ्री टाईम मिळू शकतो पण सुरुवातीच्याच काळात नाही.

3] Dont Pick up WRONG business:

घाई करू नका,घाई- गडबडीत चुकीचा व्यवसाय निवडला जाऊ शकतो.

म्हणून आपल्याला झेपेल,साजेल, असाच व्यवसाय निवडा,म्हणजे?नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

यासाठी IKIGAI या जपानीज मैनेजमेंट पुस्तकातील तत्वे वापरा,तुमचा नक्की फायदा होईल .

ते पुस्तक याच सेम नावाने मराठीत आणि ऑनलाईन उपलब्ध आहे.

4] Dont select WRONG partner :

इथे आपण खूपदा चुक करतो ,
फेसबुकवर व्यवसाय भागीदार शोधणाऱ्यांची तर किव येते.
आपण शर्टपँट,जोडी घेताना पण मॅचींग करून घेतो,मग हा तर आपल्या पोटा- पाण्याचा प्रश्न आहे,
इथे चुक करू नका
पार्टनर सोडून जाताना खूप नुकसान करून जातो,म्हणून विनाकारण इमोशनल होऊन पार्टनर निवडू नका.
योग्य टेक्नीकल नॉलेज असणारा, चांगल्या वॅल्युज असणाराच पार्टनर घ्या.

5] Don’t Make Perfect Plan :

या पाँईटला बरेच जण सहमत होणार नाहीत,पण लक्षात घ्या,परफेक्ट नावाची कोणतीच बाब नसते, सुधारणा होत- होत जातात आणि गाडी रुळावर येऊ लागते,त्यासाठी थोडा बहुत प्लान बनवा आणि चालू व्हा !

या परफेक्ट प्लान बनवण्याच्या नादात अनेकांचे प्लान पुर्ण व्हायचे राहुनच जातात.

6 ] Don’t play in bubble :

सुरूवातीपासूनच आपलं कम्फर्ट झोन च्या बाहेर जाऊन व्यवसाय करण्याची तयारी ठेवा,,,,कारण?
आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपण प्रगती साध्य करू शकत नाहीत.

7] Don’t Spend Too Much Money ,:

व्यवसायाला पैसा लागतो हे कबूल आहे,पण कित्येक बाबी आपल्याला फ्री मध्ये अथवा काही दिवसाच्या उधारीवर मिळू शकतात,कित्येकदा intern,Trainee मुलं सुद्धा कामासाठी मिळू शकतात.

त्यामुळे lean मध्ये सगळ्या बाबी करण्याचा प्रयत्न करा, दोन्ही हातानी पैसे उधळू नका.

8] Don’t Start Product Manufacturing :

आपल्या जवळ बिलकुल अनुभव नसेल तर,सुरुवातीला ट्रेडींग अथवा सर्वीस इंडस्ट्री मध्ये व्यवसाय करा.

उत्पादन क्षेत्र जरा किचकट आणि जास्त अनुभव लागणारे क्षेत्र आहे, त्यात परत उत्पादीत प्रॉडक्ट मार्केट ला चालले नाही,तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो,,,,म्हणून मॅन्युफॅक्चरिंग च्या क्षेत्रात,मेन्टरशिवाय किंवा अनुभवाशिवाय उतरूच नका.

योग्य मेंटर सोबतीला असेल ? तर तो तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवल.

9] Don’t be Over Smart :

“मला सगळ्यातलं सगळं कळतं” या मानसिकतेमुळे अनेक चांगले स्टार्टअप्स मातीत जातात,त्यामुळे सतत शिकत रहा !
ज्याच्या कडून शिकायला मिळेल त्याच्याकडून घ्या आणि आपल्या उद्योगात लावा ,फायदाच होईल .

Learnable रहाणं हे प्रगती करण्याचं पहिलं लक्षण आहे .

10 ] Don’t wait Too long ;

एखादया गोष्टी संदर्भात योग्य विचार करणे, सारासार विचार करणे चांगलंच असते, पण……. हा पण महत्वाचा आहे, कि खूप जास्त विचार करत बसू नका, OvetThinking मुळे आपल्यातील पटापट निर्णय घेण्याची क्षमता कमी होते,म्हणून खूप वेळ वाट बघत बसू नका .
चालू व्हा !

11 ] Don’t wait for Right idea :

खूप जण असा प्रश्न विचारतात, “माझ्याकडे लाख रूपयेआहेत बिझनेस आयडीया सांगा, बघा
आयडीया तर फ्री असतात ,पण त्यांचा काय उपयोग ?
आपण लवकर आणि योग्य व रितीने अंमलात आणल्या नाहीत तर चांगल्यातल्या चांगल्या आयडीयाला काहीच अर्थ नसतो.
म्हणून इतरांना इंप्रेस करण्यासाठी नुसत्या बोल बच्चन करून आयडीया विचारत आणि सांगत बसू नका.

योग्य दिसते अशा छोटी आयडीया का असेना,,,, उचला आणि त्यावर मोठं काम करा .

वरिल काही पॉईंट्स वर मतभेद असू शकतात,पण बऱ्याच गोष्टी आपल्या भावी उद्योजकांच्या कामी येऊ शकतात, त्यामुळे हा लेख नक्की शेअर करा.

शुभेच्छा .

निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Previous Post Next Post

2 thoughts on “व्यवसाय सुरु करताना या 11 गोष्टी नकोच.

  1. खूप छान…👌👌👌👍👍👍 प्रत्येक नवंउद्योजकास याचा नक्कीच फायदा होईल…👍👍👍

  2. I am in computer training business from last 16 years. Now bye I’ve some confusion regarding my business decision. I need a mentor advice. So what is your fees for guiding me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *