व्यवहारात यश मिळवायचंय?मग या सिक्रेट स्किल्स वापरून निगोशिएशन करा

व्यवहारात यश मिळवायचंय?मग या सिक्रेट स्किल्स वापरून परफेक्ट निगोशिएशन करा!

फक्त व्यवसाय करतानाच नव्हे तर एरवीच्या आयुष्यात सुद्धा , आपल्याला हजारो डिल्स कराव्या लागतात,याला आर्ट किंवा स्किल म्हटलं जातं,सायन्स नव्हे,कारण? इथे कोरडे नियम काम करत नाहीत,इथे भावनांचा खेळ असतो.

तेंव्हा जाणून घेऊयात Negotition skills,त्या माणसाने सांगितलेल्या ज्याला Father of Negotiation म्हणतात .

Chris Voss हे FBI चे टॉप निगोशिएटर म्हणुन रिटायर झालेत , ज्यांना जगातल्या सर्व आतंकवादी संघटनांशी निगोशिएशन करण्याचा प्रचंड अनुभव आहे , आणि ज्यांनी शेकडो वेळा हा प्रकार यशस्वी केलाय .

📌 (1) Listen:

हा जगातला सर्वात जुना शिकण्याचा प्रकार आहे,म्हणजे त्यावेळी सुद्धा जेंव्हा आपल्याला संभाषनासाठी भाषा येत नव्हती,समोरच्याला नीट ऐकून घेणे हे बातचीत करता अत्यंत आवश्यक असते,कदाचित त्यामुळेच आपल्याला निसर्गाने कान दोन दिलेत आणि तोंड फक्त एक !

नीट शांतपणे, समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका!त्यामुळे आपल्या सारखी डिल होण्याची शक्यता वाढते.

************************************

📌 (2) Study What is his Motive :

आपण ज्या ज्या वेळी कोणत्याही परिक्षेला जातो,त्या प्रत्येक वेळी अभ्यास करून जातो कि नाही ? तसंच अगदी सेम,समोरचा माणूस कोण आहे ? कसा आहे?त्याला का ही डील करायचीये?त्याचा या पाठीमागे काय हेतू आहे?त्याचा इतिहास कसा आहे ? ते अगदी कोणती मजबूरी आहे का ?वगैरे वगैरे सगळ्या बाजुंचा अभ्यास करूनच मग जायचं,याचे अनेक फायदे होतात !
त्या माणसाची कमजोरी,त्याचे स्ट्राँग पॉईंट,त्याचे हॉट बटन्स आपल्याला नीट नीटके माहित पाहिजेत,म्हणजे? आपल्याला जास्त कलतं माप मिळतं , म्हणून कधी पण आपला होमवर्क तयार पाहिजे .

***********†**********************

📌 (3)Walk Away Power:

ज्यावेळी समोरच्याला हे लक्षात येतं कि ही डिल झाली न झाली तरी आपल्याला काही फरक पडत नाही ! आपण उठायला कधी पण तयार आहोत ,त्यावेळी आपल्यासारखी डिल होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते,जर आपली उठायची तयारी नसेल तेंव्हा समजून जा,कि आपल्याला जास्त किंमत मोजावी लागणार आहे .

याचा अर्थ उद्धट वागायचं,असा घेऊ नये पण उठायची तयारी मात्र पाहिजे.

*************************************

📌 (4) Trial Close & Build Emotional Equity :

काय राव तुम्ही आपले माणसं असून थोडंही कमी करत नाही ? असा डायलॉग ऐकलाय का कधी ? .
ज्यावेळी कोणी असा डायलॉग वापरतो त्यावेळी समोरच्याला विचारच करावा लागतो , याला trial close म्हणतात , बहुतेक लोकं यावर घसरतात म्हणजे घसरतात , अगदी फळ विक्रेते पण तुम्हाला म्हणताणा दिसतील … ” साहेब फक्त तुमच्यासाठी हा भाव ”
अरे ! हे काय आहे ? तर इमोशनल जवळीक साधायचा प्रयत्न !एकदा का जवळीक झाली कि झालं , फार कमी लोकं याला काट वापरतात जसं कि ….
“सेठ धंदा अलग जगह, दोस्ती अपनी जगह”

**************************************

📌 (5) Revision of game plan:

“एखादयाचा गेम करणे ” अशा प्रकारची म्हण आपल्याकडे आहेच तसा हा एक गेमच आहे .
होमवर्क कितीही केला तरीही परिक्षेला जायच्या एक दिवस अगोदर आपण सगळी रिवीजन करतोच कि नाही ? तसं बातचीत कशी होईल ?समोरचा काय बोलला म्हणजे आपण काय बोलायचं ?याची पूर्ण रिवीजन करूनच गेम प्लान करूनच जायचं,म्हणजे?तिथे आपला गोंधळ उडत नाही .

************************************

📌 (6) Ask for the moon:

समजा आपल्याला समोरच्या कडुन 3 वस्तू पाहिजेत , पण समोरच्याला 3 चं मागितले तर तो दोन देणार ,,, मग अशावेळी मागतानाच 7 मागायचे म्हणजे तो समोरचा किमान 3_4 वर येऊन थांबता , एकंदरीतच त्याला पण जिंकल्यासारखे वाटतेच ,,, याला Win_Win पद्धती म्हणतात ,,, तु भी खुश और मै भी !

*************************************

📌 (7) Be Flexible:

वर सांगितल्याप्रमाणे आपण किती जरी तयारी केली तरी ऐनवेळी काहीही घडू शकतं , परिस्थिती कधी कधी आऊट ऑफ कंट्रोल सुद्धा होऊ शकते , मग या ठिकाणी आपण Strong / Rigid राहण्यात अर्थ नाही , मग थोडं लवचीक राहावं लागतं ,
WWF मधली फाईट पण आपण बघतोच , तसंच JUDO ची पण बघतोच ना ! तसं .

परिस्थीती बघून वागणे याला contingency थेअरी म्हणतात .

ही contingency म्हणजे वेळ बघून वागणे तर आपल्याला अत्यंत महत्वाची आहे.

ही वरची लिस्ट आपल्याला,
“भाजीपाला खरेदी करताना असो वा करोडोचे व्यवहार करताना दोन्ही वेळेस नक्की कामी येणार आहे” !

नक्की वापरा .

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *