व्यावसायिक लोकं,99/-,999/-,9999/- अशा किंमती मुद्दाम का वापरतात?

1,073 Views

व्यावसायिक लोक 99,999,9999 अशा किमती मुद्दाम का वापरतात?

आपण मार्केट मध्ये फिरताना बघीतलं असेल की,अनेक ठिकाणी 99,999, 9999 अशा स्वरूपाच्या किंमती लेबलवर टाकलेल्या असतात,कधी प्रश्न पडलाय तुम्हाला कि,”संपूर्ण किंमत टाकण्याऐवजी ( ज्याला whole price म्हणतात ) अशा थोड्या कमी किंमती का टाकल्या जातात ?

तर समजुन घ्या,कि ही psychological pricing आहे, ज्याला charm pricing किंवा मोहक किंमत म्हणलं जातं.

या पाठीमागे फार मोठा गेमप्लान असतो,या पाठीमागे मानस शास्त्राचा मोठा हात आहे.

तर समजून घेऊया अशा प्रकारे किमती का टाकल्या जातात .

Psychological influence:

समजा एखादी किंमत 499 अशी लिहिली गेलेली आहे, आपण ती किंमत डावीकडून उजवीकडे वाचतो, जगातील जास्तीत जास्त भाषेमध्ये असंच वाचलं जातं, तर वरिल आकड्याची cent value, म्हणजे शे किंमत कशी वाचली जाईल?तर चारशे नव्यान्नव, या एका रुपयामुळे तो आकडा पाचशे वाचला जात नाही, तर चारशे असा वाचला जातो, त्यामुळे तो आकडा एक रुपयामुळे कमी वाटायला लागतो,आणि ग्राहक सहजपणे ती वस्तु खरेदी करतो.

Perceived Gain :

कोणतीही व्यक्ती असू दया, तिला काही पैसे वाचवले कि, चांगलं वाटतं, महिलावर्गाला तर हा प्रकार जास्त आवडतो, आणि अशी किंमत टाकल्यामुळे समोरच्याला काहीतरी पैसा वाचवला, याचा सहज आनंद मिळतो, त्यामुळे ग्राहकाला ही अशी किंमत जास्त मोहक वाटते.

बहुतेक ग्राहकांना ही किंमत dicounted किंमत वाटायला लागते, रिटेल ग्राहकांना हा त्यांचा विजय वाटतो आणि त्याच्या कडून खरेदी लवकर होते .

Odd number game : Charm pricing मध्ये मद्दाम शेवटचे अंक हे odd नंबर्स ठेवले जातात.

अशा किंमती ठेवल्याने तो आकडा अजुन जास्त आकर्षक वाटतो .

त्यामुळे अशा किंमती अनेक ठिकाणी दिसतात.

📌 कोण वापरत नाही ?

ज्या व्यवसायांना त्यांची ओळख ही कमी किंमत.. अशी बनवायची नसेल ते शक्यतो Whole price जशी 1000,5000,10000, अशी ठेवतात.
या ठिकाणी जो ग्राहक असतो,तो किंमती ऐवजी प्रौडक्टला वॅल्यु देतो,त्यामुळे Luxury item मध्ये किंवा high ticket item मध्ये चार्म प्राईसिंग वापरली जात नाही.

त्याठिकाणी Round,Nice,While किंमत वापरली जाते.

📌 तरी देखील,
चार्म प्राइसिंग ही संपूर्ण मार्केटमध्ये वापरली जाते, हा एक यशस्वी प्रकार आहे.
जर …. तुम्ही जो प्रॉडक्ट विकताय, तो लवचिक असेल,अनेक विक्रेते तस्साच सेम प्रॉडक्ट विकत असतील, कोण विकतंय? हे ग्राहकाच्या दृष्टीने तितकंसं महत्वाचं नसेल, किंवा ग्राहक फक्त एका नजरेत बघुन तुमचा प्रॉडक्ट खरेदी करणार असेल (impulse buy ) तर चार्म प्राईसिंग वापरा.

आणि आपल्या व्यवसायात विक्री वाढवा .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *