संशोधन आणि समर्पण यावरच उभा राहिलेली हजारो कोटीची कंपनी

एक रुपयाची पण टिव्ही जाहिरात न करता,यशस्वी झालेली कंपनी

91500 कर्मचारी,
सतत 100 वर्ष गुंतवणूकदारांना dividend देणे,
60000 उत्पादने ,
3500 पेटंट्स ,
पूर्ण जगभर उपस्थिती ,
Fortune 500 मधे 97 वा नंबर ,
अती उत्कृष्ट क्वालिटी , हे सगळं देणारी अमेरिकेच्या टॉप 100 कंपन्या मधली एक कंपनी म्हणजे 3M .

📌 ज्या वस्तूंकडे आपण फारसं लक्ष देत नाही, परंतु त्या आपल्या रोजच्या वापरामध्ये कायम स्वरूपी वापरत असतो, अशा उत्पादवर संशोधन करून मार्केटला आणण्या मध्ये या कंपनीचा फार मोठा वाटा आहे, आजकाल आपण जे N-95 ,मास्क आणि सॅनिटायजर वापरतोय अशी उत्पादनांचं निर्मिती ही कंपनी गेली 40 वर्षे करत आहे.

📌ही1902 मधे सुरुवात झालेली एक मल्टिनॅशनल कंपनी आहे , अगदी सुरुवातीच्या काळा मध्येच फार मोठा व्यवसायिक नुकसान सहन करणारी 118 वर्षे जुनी कंपनी आणि तिचा प्रवास आज आपण ज्या लेखांमध्ये बघूया.

📌 तसं बघायला गेलं तर 3Mहे काय कंपनीचा नाव होऊ शकत नाही, हा ब्रँड जरा ऐकायला सुद्धा विचित्रच वाटतो, पण या कंपनीचं नाव फार मोठं होतं (Monasetta mining and manufacturing )आणि लोकांना उच्चार करायला अवघड जायचं म्हणून या कंपनीचं नाव initials वरून घेतले आहे, बाकी काहीही असलं तरी आज ही कंपनी जगामध्ये सगळ्यात मोठा स्टेशनरी ब्रँड आहे

📌 तशी याची सुरुवात पाच वेगवेगळ्या फिल्डमधल्या लोकांनी येऊन 1902 मधे केली याच्यामध्ये 1 डॉक्टर 1 वकील 1चर्मकार आणि 2 रेल्वेतले इंजिनियर होते.

📌 #पहिला_फटका :

यांचं लॉजिक सोप्प होतं, Corundum नावाचं एक खनिज निसर्गामध्ये मिळतं, हे खनिज हिऱ्या नंतर सगळ्यात कठीण असं खनिज आहे, यांना याचा वापर करून सँड पेपर बनवायचा होता आणि तो विकून पैसा कमवायचा होता , पण झालं भलतंच त्यांनी Corundum साठी , जी खाण ( mine ) विकत घेतली होती , तिथे ते मिळालचं नाही , मिळालं ते Arortits ज्याचा काही उपयोग नव्हता , सगळी मेहनत पाण्यात…. कारण? त्याचा वापर करून सॅन्डपेपर बनूच शकत नव्हता .

📌#Never_give_up:
एखाद्या स्टार्टअप ने आपल्याकडचा पैसा / वेळ /श्रम एखाद्या या मोठ्या गुंतवणुकीमध्ये लावावा आणि ती गुंतवणूक पूर्ण फ्लॉप ठरावी याच्यासारखा फटका दुसरा काहीच नाही म्हणून त्या संस्थापकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला ,पण Arbar Argguner नावाच्या त्यांच्या इन्वेस्टरने माघार घ्यायची नाही असं स्पष्ट सांगितलं त्याने स्वतः दुसऱ्या मित्रांबरोबर मिळून 3M वर असणारं 13000 डॉलर्स कर्ज फेडून टाकलं, आणि परत 12000 डॉलर भांडवल म्हणून या नवीन दिलं .

आज जरी काही वाटत नसलं तरी त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती, पण या दोघांनी एखाद्या नवीन व्यवसायात हा पैसा लावण्याऐवजी 3M लाच पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं, खूप कमी लोकांमध्ये असं जिगर असतं, पण या गुंतवणुकीच्या बदल्यात या दोघांना कंपनीचा 60 टक्के वाटा मिळाला.

पण मग तिथून या कंपनीने कधीच मागे वळून बघितलं नाही .

#दुर्लक्षित_गरजांकडे_लक्ष :

📌 समाजामध्ये अशा अनेक गरजा असतात, की ज्याच्याकडे बहुतेक लोकांचं दुर्लक्ष होतं , कारण उद्योजक म्हणवारे सुद्धा एकमेकांची कॉपीच करण्यात मश्गुल असतात पण 3M ही कंपनी सुरुवातीपासूनच Original Research आणि अशा गरजांवर काम करत आहे,

पहिल्या फटक्यातून धडा शिकून त्यांना फंडीग मिळाल्यानंतर त्यांनी योग्य मटेरियल विकत घेऊन एक 2 मजली वर्कशॉप चालू केलं, त्या ठिकाणी सँडपेपर, ग्राईडिंगव्हिल बनवायचं काम चालू केलं, आता या गोष्टी जरी डायरेक्ट घरगुती ग्राहकाच्या कामी येणार नसल्या, तरी वाहन इंडस्ट्री मध्ये याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होत होता .

#B2B_Approach : आपण तयार करत असणारच उत्पादन जर एखाद्या बिझनेसच्या कामी येणार असेल तर त्या प्रकारच्या बिजनेस ला B2B ( बिझनेस टू बिझनेस ) मॉडेल म्हणलं जातं , आणि कंपनीत तयार झालेलं उत्पादन घरगुती ग्राहकाच्या कामी येणार असेल तर त्याला B2C (Business to customer) मॉडल म्हणतात आणि आजही 2020 सालात सुद्धा ही कंपनी b2b या प्रकारचाच व्यवसाय 70% करते.

#Lift:

साधारण 1921 साला पासून वाहन इंडस्ट्री मध्ये हा मोठी तेजी यायला चालू झाली होती आणि या इंडस्ट्री करिता सॅंडपेपर , ग्राइंडिंग व्हील , डक्ट टेप अशा गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज लागायची ,3M ही एकच कंपनी याचे उत्पादन करत असल्यामुळे त्यांना, त्याचा फार फायदा झाला, अशा प्रकारे “आपण तयार असायला आणि मार्केट मधे मागणी यायला” एक वेळ येणे म्हणजे सोने पे सुहागा …

📌 INNOVATION_INNOVATION_And_So_On:

📌शोध लावुन प्रॉडक्ट मार्केट मधे आणण्याचे अनेक फायदे असतात , आणि याचं ग्रेट उदाहरण ही कंपनी आहे,वाहन इंडस्ट्री करिता कार पेंट करताना लागणारे Masking Tape यांनी बनवले – पेटंट घेतले >> 1930 मधे Cello Tape बनवला >> महामंदी आली … यांचा फायदा झाला .

📌 अशा प्रकारे अनेक Verticals मधे समाजउपयोगी उत्पादनांची साखळीच यांनी तयार केली !

📌 आपण सुद्धा कधी ना कधी तरी त्यांच्या 60,000 Product पैकी एखादा प्रोडक्ट कधी ना कधी तरी नक्की वापरला असेल, यांचे अनेक सब ब्रांडस, आणि अनेक Verticals आहेत ,1950साली यांनी एक वेगळा Sub – brand तयार केला आणि घरगुती उत्पादनात उतरले , ते उत्पादन म्हणजे

“Scotch Brite ” पॅड .

📌 “संशोधनात्मक उद्योजकता” कशी असावी? , ही या कंपनीकडून खरंच शिकण्यासारखं आहे , 2017 साली यांचा Research & developmentखर्च होता 1.8billion.

📌 याचा एकूणच अर्थ काय काढायचा ?

तर

📌 फक्त मार्केट मधे उथळ प्रसिद्धी करून ,सारखं समोर राहून प्रसिद्ध होता येतं? असं काही नाही , तर ओरिजिनल संशोधन करून / समाजाच्या कामाच्या गरजा पूर्ण करून देखील यशस्वी होता येतं .

📌 3M कंपनीचा,Made in Korea , N-95 मास्क विकत घेतल्यावर सुचलेला हा लेख ! आणि मग या कंपनीच्या इतिहासाचा धांडोळा ! नाही म्हटलं तरी बरंच काही शिकवून जातो !

📌 या तून एक गोष्ट नक्की एक आदर्श घ्यावा,मेरीट मधे यायला अभ्यासच करावा लागतो,कॉप्या करून फार तर फार आपण नापास होणार नाही बस्स इतकंच !

📌 चला संशोधनात्मक उद्योजकता घडवू !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764.

office : 9146101663

Previous Post Next Post

One thought on “संशोधन आणि समर्पण यावरच उभा राहिलेली हजारो कोटीची कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *