सहन करायची कॅपिसीटी संपत चाललीये ? तर हे आर्टिकल नक्की वाचा !

1,588 Views

#कॅपिसीटी_संपू_देऊ_नका.

©निलेश काळे

सध्या आजूबाजूला एवढया घटना घडताहेत कि , डोकं बधीर व्हायला झालंय , मोठाले लोक म्हणताहेत ,,,

“आपली कॅपिसिटी संपली ” !

“असं कसं चालेल ” ?

उद्योजकाच्या बाबतीत तर उजाडणारा प्रत्येक दिवस परिक्षाच बघणारा असतोय , रोज सहन करावे लागणारे ताण, कटकटी , भानगडी या इतक्या नित्याच्या होऊन जातात कि , पुढे पुढे त्याचं काही वाटतही नाही , जसे कष्ट करणाऱ्या हाताला घट्टे पडतात तसे व्यापाऱ्याच्या मेंदूला पडलेले असतात ,

पण या क्षेत्रात नवीन नवीन उतरणाऱ्यांसाठी काही बाबी नक्की लक्षात ठेऊन वागण्यासारख्या आहेत , आता तुम्ही म्हणाल कि हे तत्वज्ञान आहे का ? तर नाही ! हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे , बरं वाटलं तर नक्कीच शेअर करा !

📌#make_Unsensitive_yourself:

एका प्रयोगात शोधलं गेलंय कि एक सामान्य माणसाच्या डोक्यात चोविस तासात 50,000 विचार येतात , म्हणजे समजा एखादयाने आपल्याबद्दल दिवसातून दहा वेळा विचार केला तरी त्याचं अॅव्हरेज 0.02% येतंय ,,, याचा अर्थ काय ?

मग उगाचच लोकं आपल्या बद्दल कसा विचार करताहेत याचा आपण विचार करून आपलं डोकं सेन्सेटीव करायचंय ?

बघा दुखावला गेलेला कोणताही अवयव जेंव्हा जास्त सेन्सेटीव होतो ना तेंव्हा त्याला वाऱ्याच्या झुळूकीचाही त्रास होतो , काही ठिकाणी काही वेळा बधीर बना ! काही बिघडत नाही !

📌#Stop_pleasing_Everyone :

हे एक शाश्वत सत्य आहे कि , आपण सर्वांना , सर्व वेळी आनंदी किंवा खुश ठेऊ शकत नाही , ही गोष्ट अगदी Impossible आहे .

आपल्या घरातच बघा ना , बायकोला खुश करायला जावं तर आई नाराज , आणि आईला खुश करायला जावं तर बायको तोंड फिरवते , काय करावं काय माणसाने ?

तर कोणालाच खुश करायच्या फंदयातच पडायचं नाही , हं स्वतःला आनंद वाटतोय का एखादी गोष्ट करायला ? तर बिनधास्त करा !

“मन चंगा तो कटोरी में गंगा ” !

📌 #Be_True_to_yourself_only

आपल्याला काय खरं वाटतं , आपली विचारसरणी काय आहे? , आपल्या व्हॅल्युज काय आहेत ? त्यावर ठाम रहा !
उगाचच दुसऱ्यांना तुमची मापं काढण्याचा अधिकार कशाला दयायचाय ?
दुनिया गाढवावर बसून प्रवास करू देत नाही , गाढवाला डोक्यावर बसवुन नेऊ देत नाही आणि सगळ्यांना पायी पण चलु देत नाही .
आपला चॉईस काय आहे ते आपल्यालाच ठरवावा लागतो, मस्त कलंदर बनू ना !

📌#Cut_Negativity:

आपल्या भोवतालचं वातावरण आपल्या डोक्यावर खरोखरच परिणाम करत असतं , आपण कोणत्या लोकांबरोबर रहातोय ? त्यांचे विचार काय आहेत ? वातावरणातील vibrations कसे आहेत ? यावर आपली विचार करायची शक्ती पक्की होते किंवा बिघडते , आपल्या आजूबाजूला सतत निगेटीव बोलणारे लोक असतील तर त्यांना अगोदर बाजूला सरकवा , चांगला संग करा , असल्या डिप्रेशन मधल्या लोकांची संगत करण्यापेक्षा एकांत कितीही परवडला !

📌#Mind_your_Business:

लोकं प्रगती करू शकत नसण्याचं मोठया कारणांपैकी एक कारण म्हणजे , “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ! ”

आपलं चित्त , आपलं संपूर्ण लक्ष फक्त आपल्याच गोष्टी नीट निटक्या करण्यावर लावलं तर किती भलं होईल बरं ?

म्हणून आपण इकडं तिकडं लक्ष घालण्याऐैवजी स्वतःची सुधारणा करण्यावर भर दयावा , आणि दुसरा कोणी आपल्यात लुडबुड करू लागला तर त्याला एकच शब्दात सांगावे ,,, ” तु तुझं बघ ” .

ताणच नको !

📌#Stop_to_be_Perfect:

कोणत्याही परिस्थितीला Six Sigma म्हणजे अत्युच्च लेवलचं परफेक्ट करायला गेलो तरी त्याचा रेशो 99.99999 % च येणार ,

या जगात 100% काहीही नसतं .

त्यामुळे कोणीही जरी कितीही माईचा लाल जरी आला तरी त्याला शक्य नाही .

मग उगाचच आपल्या बुडाचा जाळ्धुर करण्यात काय पॉईंट आहे?होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे पण परफेक्ट …. सोडून बोला !

📌#Stop_Overthinking:

आपलं मेंदू आपला मित्र आहे , हे आजपर्यंत आपण ऐकलं., वाचलं असेलच,पण जर का एकदा अती विचार करायची सवय लागली रे बाबा ,तर हेच डोकं बधीर होऊन आपल्याला त्या डेथट्रॅप मध्ये अडकवू शकतं , त्यामुळे काहीही करा ! पण अती विचार नकोच !

कारण आपण आपली स्वतःची priority आहोत , आपलं जर उद्या काही बरं वाईट झालं तर हे नाव ठेवणारे नाहीत येणार आपल्या कुटुंबाला पोसायला !

📌 आपली जिंदगी फार शॉर्ट आहे मित्रांनो ,,, याला …. “लोकं काय म्हणतील यावर बरबाद करायलाच नको ” !

सरळ सरळ दुर्लक्ष करायला शिका .
ही पण फार मोठी कला आहे !

असे लेख वाचायला आवडतात का ? मग आमचे हे बिझनेस पेज लाईक करा !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
Aundh.Pune .
9518950764 .

तुम्हाला बिझनेस मध्ये अडचणी आहेत का ? आम्ही आपली मदत करू शकतो , कारण आम्ही पण व्यापारीच आहोत तसे .

कॉल करा :

उद्योगनिती ऑफीस :
ओमकेश मुंडे सर : 9146101 663 ,

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *