सोप्यात सोपा व्यवसाय : होम बेस्ड एजन्सी

1,074 Views

.#Home_Based_Agency_Model

©निलेश काळे .

प्रत्येक व्यवसाय असो किंवा उद्योग त्याच्यामधे ग्राहकापर्यंत माल कसा पोहचेल ? आणि उत्पादकापर्यंत त्याची किंमत असणारा पैसा कसा येईल? याची एक व्यवस्थित सोय असते , त्याला आपण बिझनेस मॉडेल असं म्हणतो .
या बिझनेस मॉडेलचे अनेक प्रकार असतात त्यापैकीच हे मॉडेल आहे !

📌 साधारण पणे आपण किराणा दुकानातून अथवा कोणत्याही रिटेल दुकानातून जो माल घेतो तो एका साखळीतून आलेला असतो .

त्यात कोणतीही वस्तू

उत्पादक कंपनी >>> सुपर स्टॉकीस्ट >> डिस्ट्रीब्युटर >> एजंसी >> रिटेलर >> ग्राहक असा प्रवास करते , त्या वस्तूची जी Mrp.असते त्यावर काही ठरावीक टक्केवारी प्रत्येकाला मिळते .

📌 इथे जबाबदारी विभागली जाते , त्यामुळे नफा प्रत्येकालाच मिळतो .

📌 जर आपण एखादे छोटे उत्पादन चालु केले असेल आणि ग्राहकापर्यंत पोहचायचे असेल तर याच साखळीतुन जावे लागते, पण प्रॉब्लेम असा आहे कि , ही मंडळी नव्या उत्पादकांना भाव देत नाहीत , साधी गोष्ट आहे की , या उत्पादनांना PUSH नावाची मार्केटिंग स्ट्रेटजी लावून मार्केटमध्ये बळजबरीने रेटावं लागतं , इथे एनर्जी खर्च होते , वेळेची बरबादी होते म्हणुन स्थिर असणारे व्यापारी सहसा यात रिस्क घेत नाहीत , अशावेळी जे नवीन उत्पादक आहेत त्यांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर या मॉडेल मधुन मिळू शकेल !

📌 थोडं जरा डिटेल मध्ये वाचुन विचार करून बघा ,
समजा…
आपण मसाला व्यवसाय चालु केलाय , गरम मसाला ,हळद ,तिखट, येसुर, मेतकूट ,चटणी, एवढेच उत्पादने तयार करता, नवीन असल्याने पॅकेजिंग वर खूप खर्च करता येत नाही , छोट्या उत्पादकांना थोडया बजेट मध्येच काम करायचं असतं, त्यामुळे मोठया व्यापाऱ्यांच्या ऑर्डर्स त्यांना दयाव्या लागणारे क्रेडीट , रिप्लेसमेंट, या भानगडी ते सहन करू शकत नाहीत आणि वैयक्तीक One2 One विक्री जास्त होत नाही ! अशा वेळी व्यावसायिक परेशान होतात ही परेशानी व्यवसायाची साईज लहान असल्यामुळे होते, आणि “होम बेस्ड एजेन्सी ” हे बिझनेस मॉडेल यावर उत्तम पर्याय असू शकेल !

तर आपण सुरुवात अशी करावी
V
V
(1) आपल्या ओळखीच्या काही महिला निवड करावी ( खरंतर फक्त महिला असं लिहीणे बंधनकारक नाहीये , पुरुष पण करू शकतात )
V
V
(2) त्यांना आपले मसाले वापरायला दयावेत .
V
V
(3) ज्या मैत्रिणी हा मसाला काही % वर विक्री करायला तयार असतील , त्यांना काही छोटे सॅम्पल आणि प्रत्येक मसाल्याचे 2 किंवा 3kg फक्त एवढाच माल दयावा , त्यांनी विक्री केल्याने त्यांचा कसा फायदा होईल ? ते समजावुन सांगावे !
V
V
(4) इथे लक्षात हे ठेवावे लागेल कि , समोरच्या महिलेला 100 रु च्या विक्रीवर किमान 30 रु तरी मार्जिन दयावे लागेल आणि मार्केटच्या रेट पेक्षा जास्त रेट लावुन चालणार नाही .
V
V
(6) इथे आपण होममेकर महिलेला , अगदी थोडया पैशात , किंवा फ्री मध्ये म्हणा व्यावसायिक बनवताय ! त्या त्यांच्या ओळखी मध्ये आपले उत्पादन विक्री करतील आणि पैसा कमावतील आणि त्या आपल्याला पण कमावुन देतील.
V
V
(7) समोरच्या महिलेकडे ब्युटी पार्लर , बांगडयाचे दुकान , कपडयाचे दुकान असेल तर अजूनच उत्तम , पण ज्यांच्याकडे काहीच नाही , त्यांना पण आपण असे विक्रेते बनवू शकता !
कारण ??? साधं आहे , एका व्यक्तीशी ऑनलाईन / ऑफलाईन रितीने किमान 200 लोक जोडलेले असतात , त्यांच्या पर्यंत अशा रितिने सहज पोहचता येईल,भलेही मग त्यांना ग्राहकापर्यंत पोहचायला अॅडवरटाइजचा सपोर्ट दया ! जे त्यांच्या ग्राहकांच्या पर्यंत पोहचायला त्यांना कामी येईल I
V
V
(8) आपल्याला माल , एस.टी ट्रान्सपोर्ट ने किंवा इतर कोणत्याही ट्रiन्सपोर्ट ने त्यांच्या पर्यंत पोहचवता येईल, पैशाचा व्यव्हार काय ? फोन पे / गुगल पे कशानेही होईल !
V
V
(9) एकदा का आपल्याला अशा , दोन/ तीन होम एजन्सीचा अनुभव आला कि , मग त्यांची संख्या वाढवणं सोप्पं होऊन जाईल, त्यानंतर मग थोडं चांगलं लक्ष ब्रॅण्डींग वर दया , प्रॉडक्टची संख्या वाढवा , जे प्रोडक्ट चालत नाहीत,त्यांना बंद करायला मागे पुढे बघू नका,पण किमान आठ ते दहा प्रॉडक्ट तर आवश्यक आहेतच .
V
V
(10) एकदा का होम बेस्ड एजन्सी मधुन आपला माल प्रसिद्ध झाला कि , मग मेन मार्केट लाईनला उतरायला हरकत नाही .

📌 आपला माल विकण्यासाठी स्वस्तातली फौज मिळवण्याचा यापेक्षा सोप्पा मार्ग असू शकत नाही , या प्रकाराला Leverage असं म्हणलं जातं , अशा रितीने आपण कमी पैशात किंवा फ्री मध्ये अनेक शॉप्स चालु करू शकता !

📌 अटी फक्त काही आहेत जसं , आपण स्वतः उत्पादक असायला हवे , प्रॉडक्ट बास्केट मोठी असायला हवी, थोडा पेशंस ठेवायला हवा ,
बाय बॅक गॅरंटी किंवा रिप्लेसमेंटला नाही म्हणायचंच नाही !
माल उत्तम प्रतिचा दयायचा किंमती पण रिजनेबलच ठेवायच्या !

📌 Meesho सारखे अॅप जर घरातल्या महिला व्यावसायिकांना काम देऊ शकतात तर आपण ना नाही ? हा प्रकार अगदी यशस्वी आहे पण सगळ्या गोष्टींना प्रोफेशनली मॅनेज करणे आवश्यक आहे !

📌 अनेक MLM वाले,गोड गोड बोलून ही शक्ती वाया घालवत आहेत आपण त्यांना खरोखरच व्यावसायिक बनवू शकतो,तुमच्या उत्पादनासाठी हे मॉडेल कामी येऊ शकते असं वाटत असेल तर नक्का वापरा !

परफेक्ट आहे सगळं !

हे व्यावसायिक ज्ञान इतरांना मिळायलाच हवंय म्हणुन उद्योगनिती मांडते आहे ! आपण पण यात थोडी मदत करू शकता ,आपण वापरा किंवा योग्य व्यक्तीपर्यंत फॉरवर्ड करा !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा .
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस आनंद पार्क औंध , पुणे !
9518950764 .

दरवेळी फेसबूकवर संपर्क होऊ शकत नसेल , तर आमच्या फ्री व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामिल व्हा संपर्क करा :
श्री ओमकेश मुंडे 9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “सोप्यात सोपा व्यवसाय : होम बेस्ड एजन्सी

  1. आपण अगदी योग्य रित्या शब्दांकित केले आहे. MLM मध्ये ग्राहकाची प्रचंड फसवणूक होत असते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेली उत्पादने, अव्वाच्या सव्वा भावात विकली जातात. त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असे मॉडेल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *