स्टार्टअप्सला कोट्यावधीची फंडिंग कशी मिळते?

#Business_Coaching :

स्टार्टअप्सला Angel Investors एवढे पैसे कसे देतात?

©

खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे होते,Online खूप ठिकाणी आपल्याला खालची अशी वाक्ये वाचायला मिळतात,कि,
1) मुद्रा लोन म्हणजे मृगजळ , मिळतच नाही .
2) बँक मैनेजर कर्जासाठी दारात उभंच करत नाही .
3) पैसा नाही तर धंदा कसा करायचा आम्ही ?

मित्रांनो,सगळेच व्यवसाय फक्त पैशांनी उभे रहात नाहीत,in fact व्यवसाय हा मोठ्ठं कर्ज काढून चालू करूच नये !

बरं या विषयाला खूपच कंगोरे आहेत,सर्वात पहिलं लक्षात घ्या,कि या लेखात मुद्रालोन किंवा कशाचीही वकिली करत नाहीये

बघा,जेंव्हा एखादा व्यवसाय छोटया स्वरूपातून मोठया रूपात जातो , त्यावेळी वेळोवेळी थोडाथोडा पैशाचा पुरवठा लागतो,जो कसाही मॅनेज करता येणे शक्य आहे.

निसर्गाचा नियम पण हेच सांगतो , पीक जेंव्हा लहान असतं,तेंव्हा त्याला अंतराने पाणी द्यावं लागतं,एकदाच जर 5 HP च्या मोटरने सतत पाणी देत रहाल तर त्या पाण्यामुळेच ते पीक सडून जाईल,सेम वे सुरुवातीच्या काळात नवीन अनुभवहीन उद्योजकाला घरून जरी भरपूर पैशाचा सपोर्ट मिळाला तरी लिहून घ्या,प्रगती होणारच नाही .

आजच्या विषयाकडे येऊ,
आपण बघत असाल कि,अगदी नवीन पोरं काहीतरी सुरू करतात आणि अल्पावधीत शेकडो कोटीची झेप घेतात,कसं शक्य होतं ते?कारण यांना
व्यवसाय चालू करण्याकरिता,बँकच पैसा देत नाही,तर Angel investor नावाने जे लोक असतात,ते पण बिनव्याजी कर्ज देतात.

बऱ्याच जणांना हा फंडिंगचा प्रकारच माहित नसेल!

Angel म्हणजे देवदूत, हे इन्वेस्टर चांगल्या स्टार्टअपकडे देवदूतासारखे मदतीला येतात,
म्हणूनच हे नाव पडले असावे कदाचीत .

पण बऱ्याच मराठी स्टार्टअप्सला या साध्या गोष्टी माहितच नाही कि, Angel investorला संपर्क कसा करायचा ?हे लोक कुठे भेटतात?ते नेमके काय बघतात? किती पैसे देतात ? किती भागीदारी मागतात ? किंवा दिलेले पैसे कधी परत मागतात ?

तर जरा समजून घेऊ.

आज भारतात जे स्टार्ट अप्स आहेत त्यातल्या 99.9999 % स्टार्टअप्सला या Angel investors नीच फंडींग केलेलं ( म्हणजे? पैसे दिलेले आहेत ) आहे,म्हणून ते स्टार्टअप्स बँकाच्या दारात चकरा मारत नाहीत,उलट बँकांचे मॅनेजरच यांच्या मागे असतात , आमच्या शाखेत खाते काढा म्हणून .
तर हा काय? आणि कसा प्रकार आहे ?
थोडक्यात पण सविस्तर समजून घेऊया .

*****************************

1). कोण असतात Angel investors ?

ही माणसं, भरपूर पैसेवाले असतात,भरपूर मार्केट अनुभव असणारेच असतात,बहुतेक जण सक्सेस फुल उद्योजक,MD,Vice- president सारख्या पोस्ट वरून आलेले असतात,काहींनी स्वतःचे स्टार्ट अप्स हजारो कोटींना विकले असतात,मग एवढा मोठ्ठा पैसा घेऊन करणार काय ? तर मग ते शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याऐवजी चांगल्या स्टार्टअप्स मध्ये गुंतवून त्यात भागीदारी घेतात,त्यांना मार्गदर्शन करतात,आपला अनुभव त्यांच्या पाठीशी लावतात,आपलं ओळखीचं नेटवर्क मदतीला देतात,कारण?इथून त्यांना Highest return येण्याची दाट शक्यता असते.

*************************
(2) Angel investors कडे कधी पैसे मागावेत ?

आपण लहानपणी वडिलांकडे 5 रुपये जरी मागितले,तर ते सुद्धा हिशोब मागायचे,मग Banks असो? कि Angel investors लगेच पैसे कसे देतील ?

आपली आयडीया मार्केटला टेस्ट करून घेतलेली पाहिजे,,, आपला Revenue चांगला येत असला पाहिजे ,
आपला प्रॉडक्ट मार्केट मध्ये चालला पाहिजे,कारण ?कच्च्या/ पक्क्या स्टार्टअप्सला कोणीही पैसा देत नाही .

असं समजा कि, Angel Investors सूध्दा,वाढ करण्यासाठी पैसा देतात / व्यवसाय,टेस्ट करण्यासाठी नाही . त्यामुळे जमेल तेवढा स्वतःच्या घरातून/पार्टनरशीप मधून थोडा बहुत इकडून तिकडून पैसा घेऊन चालु केलेल्या आणि ग्राहकांना आवडत चाललेल्या स्टार्टअप्स मध्ये Angel investors ,,,100% पैसा लावतात.
बघा काय असतं,कि बँकानी आपल्याला पैसा दिला आणि आपला व्यवसाय बुडाला तरी बँका आपल्याकडून ते पैसे घेणारच,पण Angel investor आपल्या आयडीय वर पैसे लावतात,आपल्या स्टार्ट अपच्या नफ्याचा 10-20% वाटा घेतात,जमेल तसं ते स्वतः आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात,म्हणून जरी स्टार्टअप बुडालं तर,त्यांचं पण नुकसान होतंच,कारण? आपण त्यांच्याकडून कर्ज नाही तर गुंतवणूक घेतलेली असते .

****************************
(3) काय रेडी पाहिजे ? :

बँक मॅनेजर समोर कधी कर्ज प्रकरण घेऊन गेला असाल? तेंव्हा सुद्धा या गोष्टी लक्षात आल्या असतील,कि तो सुद्धा आपल्याला खूप प्रश्न विचारतो ,

तसेच,हे Angel investor सुद्धा प्रेझेंटेशन मागतात .
यात काय काय बघतात बरं ?
1) आपण स्वतः या स्टार्टअपमध्ये पूर्ण वेळ काम करत आहात का? तुम्हाला तुमच्या आयडियावर पूर्ण विश्वास आहे का? दुसरीकडे अर्ध आणि इकडं पार्ट टाईम असं इथे चालत नाही .
2) छोटी का असत नाही , आपली टीम मस्त असली पाहिजे . मार्केटला जे काही स्टार्ट अप्स आलेत (instamojo , ola , flipcart , meeshoo , Nykaa , Udaan ) यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे टीम आहे ती आवश्यक आहे .

(3) आपलं vision,Pitch deck, Business plan,Market Research,market size Analysis,Swot,Growth stratergy,Break Even Analysis,USP identification , Differentiation ,profit statement,positioning Map ,PESTAL Analysis ,
Correct figures ,,, ते अगदी Exit Plan इथपर्यंत हे तयार असलं पाहिजे.

ज्यावेळी Angel investor समोर प्रेझेंटेशन दयाल?त्यावेळी ते काहीही विचारू शकतात, त्यामुळे त्यांना सगळे आकडे परफेक्ट लागतात,उगाचच पोकळ बाता वर ही मंडळी इन्वेस्ट करत नाहीत,शेवटी ते पैसे लावत आहेत,चिंचोके नाही !

****************************
(4) कसं पोहचायचं त्यांच्या पर्यंत?:

facebook किंवा Instagram वर ही लोकं आपल्याला सापडणार नाहीत, तर Linked in किंवा Twitter च्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकतो .
Linked in वर,मस्तपैकी बिझनेस प्रोफाईल बनवून त्यांना संपर्क करा ! काम होईल.
आजकाल अनेक बिझनेस एक्स्पो , बिझनेस नेटवर्कींग इव्हेंट,अगदी Angel Networking Event पण भरतात,त्यात सतत सहभाग ठेवा ,
Business Consulting फर्म्सच्या संपर्कात सुद्धा अनेक Angel Investors असतात,त्यांचेकडून सुद्धा रेफरंस मिळू शकतो .

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन ,, आनंद महिंद्राच्या स्टोरीज सध्या खूप व्हारल होत आहे, ते काहीतरी पेपरमध्ये , सोशल मिडीयात बघतात आणि नंतर त्यात पैसा लावतात .

रतन टाटा सुद्धा खूप स्टार्टअप्सला फंडीग करतात,मध्यंतरी त्यांनी 1Mg हे स्टार्टअप विकतच घेतलं, त्यांनी Biju’s मध्ये त्यांनी सुरूवातीला investment केली होती.

*****************************
(5) कोणत्या प्रकारच्या स्टार्टअप्स मध्ये पैसे लावतात Angel Investors ?

आपला प्रॉडक्ट किंवा सर्विस कितीही छोटी गरज पूर्ण करत असली तरिही चालेल,फक्त ते मॉडेल Genuine असावं आणि परफेक्ट टेस्ट केलेलं असावं,बघा पाठीमागे मी एकदा लिहिलं होतं कि,कॉप्या करून पास तर व्हाल पण मेरीट मध्ये नाही येऊ शकत !

हाच प्रकार आपल्या भारतीयांसोबत होतो,जसं चायना सगळ्या दुनियातले प्रॉडक्टची नकली कॉपी बनवतं,तसं भारतातसुद्धा,बाहेर देशातील स्टार्टअपला कॉपी करायची चढाओढ लागलीये .

एवढंच काय?तर येवले चहा सक्सेस झाला कि,झाले सुरू त्यांची कॉपी करायला , बोर्ड डिजाईन , इंटेरिअर , कप , चहाची किंमत सबकुछ कॉपी .

नाही !
असं चालत नाही !
छोटी असू दया,तुमची आयडीया ओरीजनल पाहिजे .
नसेल तर किमान काहीतरी वेगळेपण सिद्ध करता आले पाहिजे .

जसं Airbnb ला Oyo ने कॉपी केलं , पण Airbnb होम स्टे देतं तर Oyo हॉटेल रूम्स,

पण दोघांनाही फंडींग (प्रचंड फंडीग /जवळ पास 700-1000 करोड ) देणारी Softbank ही एकच कंपनी आहे .

बघा,आपण बँकाकडे काही लाखांसाठी परेशान होतो,पण हे Angel Investors गुंतवणूकीची सुरुवातच 1 ते 7 करोड पासून करतात,पळा किती पळायचय ते , आणि स्वतःला किती मोठं व्हायचय ते व्हा !

Angel investors ने तुमच्या व्यवसायात पैसा लावला तर तुम्ही खरंच मोठ्ठी झेप घेऊ शकता.
तेव्हा यांना शोधा,संपर्क करा,प्रेझेंटेशन दया आणि भांडवल मिळवा.

सगळ्यात शेवटी :
या जगात पैशाची खरंच कमतरता नाही,तुम्हाला कोणी कर्ज देत नाही म्हणून रडत बसू नका,परफेक्ट आयडीया लावली,तर व्याज भरावे लागेल असे कर्ज नाही , तर फुकट वापरायला investment मिळेल , ती पण बीनव्याजी,मग वाट कशाची बघताय ?व्यवसाय नीटनीटका शिका !
गोष्टी प्रॉपर करा,तुम्हाला मोठ्ठं करण्यासाठी प्रचंड पैसा आहे मार्केट मध्ये !

शुभेच्छा .
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध, पुणे.
9518950764.
Office: 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “स्टार्टअप्सला कोट्यावधीची फंडिंग कशी मिळते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *