स्टार्टअप चालु करायचंय ना ? मग या पाच गोष्टी नीट लक्षात घ्या .

Most important Element of any Startup

📌 आपलं सध्या एखादा स्टार्ट चालू असेल ?किंवा आपल्याला दुसरा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल? तर कोणत्या एका महत्त्वाच्या फॅक्टरवर लक्ष दिलं पाहिजे ???याचं एक एनालिसिस स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी न केलेलं आहे ,याच्यामध्ये त्यांनी दोनशे वेगवेगळ्या स्टार्ट अपचा अभ्यास केला ,त्यामध्ये यशस्वी स्टार्ट सुद्धा आले आणि फेल झालेले स्टार्ट अप सुद्धा आले ,याचा शेवटी ज्यावेळेला त्यांनी डाटा काढला, त्यावेळेला अतिशय शॉकिंग अशी गोष्ट समोर आलेली आहे आणि आज हीच एक शॉकिंग गोष्ट या लेखातून आपल्या समोर मांडत आहे.

*Idea*:

बरेच नवीन वाचक आम्हाला रेगुलर लिहतात “सर बिजनेस ची चांगली एखादी आयडिया सांगा”

पण व्यवसाय नुसत्या आयडिया वर सुरू होतात का हो????????

चहा बनवणे ही एक साधी गोष्ट आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, चांगल्या प्रतीचे दूध घेतलं, साखर पत्ती प्रमाणात टाकली ,विलायची वगैरे मसाला व्यवस्थित प्रमाणात वापरला, झाला.. …उत्तम प्रतीचा चहा तयार.

पण फक्त येवले आणि बाकी तत्सम अमृततुल्य एजन्सी सोडल्या तर बाकी किती जण यशस्वी आहेत?

साधारणपणे एखादी आयडिया कोणीही अगदी कोणीही नीट नीटकी हाताळली त्याच्यावर काम केलं तर चांगला उद्योग उभा राहणं शक्य आहे.

आयडिया फुकट असतात ,त्याला पैसे द्यायची गरज पडत नाही ,मग हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा कसा असू शकतो?

*******************************

*Business model* :

असे अनेक व्यवसाय आपण बघू शकतो , ज्याचं बिझनेस मॉडेल अतिशय परफेक्ट आहे .

हे व्यवसाय मॅनेजमेंटच्या दृष्टीने मोनेटायझेशनच्या दृष्टीने मार्केटमध्ये असणाऱ्या डिमांड च्या दृष्टीने परफेक्ट असतात म्हणजे टेक्निकली बघायला गेला तर यांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसते

परंतु यांनासुद्धा कित्तेक वेळेला अपयशाचा सामना करावा लागतो

*******************************

*Team*:

आपण असं बघा तो ज्या वेळेला एखादी टीम एखाद्या उद्योगाला पाठीमागे परफेक्टली उभी असते, त्यावेळेला तो उद्योग मार्गाला लागतो, परंतु अनिल धीरूभाई अंबानी यांच्या व्यक्तीमध्ये हे असं का घडलं नाही? व्हिडीओकॉन च्या पाठीमागे अतिशय चांगली टीम होती ,अगदी त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये जपान वरून आलेली माणसं होती पण तरीही व्हिडीओकॉन दिवाळखोर झाली का झाली हा प्रश्न अजूनही कायम आहे.

अनेक बचत गट वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालू करतात ,त्यांचा तर युएसपी त्यांची टिम असते , मग तरी सुद्धा असे स्टार्टअप दणक्यात विक्री करू शकत नाहीत?

*Funding*: ”

“शुन्यातुन विश्व तयार करणे ,हे वाक्य आपण कित्येक वेळा ऐकले असणार आहे ,आपल्या आजूबाजूला देखील असे अनेक लोक असतात जे मोठ्या अभिमानाने सांगतात की ,आम्ही या व्यवसायाची उभारणी कर्जाच्या पैशातून केलीये वगैरे

म्हणून जेव्हा कोणी कधी म्हणतो की मी व्यवसाय चालू करू शकलो नाही कारण माझ्याकडे पुरेसं फंडिंग नव्हतं, त्यामुळे समजून जा कि तो व्यक्ती कारणं सांगतोय.

वरील सगळ्या पॉईंटचा आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर, या सगळ्या गोष्टींचा एखाद्या स्टार्टच्या यशावर किंवा अपयशावर थोडाफार परिणाम होतो ,परंतु एखाद्या स्टार्टअप अतिशय दणक्यात यशस्वी होतं, त्याच्या पाठीमागे एक फॅक्टर सगळ्यात मोठा आहे आणि तो म्हणजे??? टायमिंग

*Timing* :

वरील पाच मुद्द्यांपैकी कोणताही मुद्दा एवढा प्रभावी नाही जेवढ व्यवसाय सुरू करण्याचं टाइमिंग हा आहे.

मला सांगा साधारणपणे ज्यावेळेला पावसाळा सुरू होतो, त्यावेळेसच सगळे शेत शेतकरी पेरणी का करतात?

याचं साधं सोपं आणि सिंपल कारण आहे …..कारण ती टाइमिंग योग्य असते.

ज्या वेळेला आपली टाइमिंग चुकली त्यावेळेला कोणतंही स्टार्टअप उभारी घेऊ शकत नाही.

पेटीएम,OLA ,UBER ,JIO , NETFLIX, YOUTUBE या सगळ्या कंपन्यांनी टाइमिंग गाठली आणि या टायमिंग बरोबर यांची वाढ झाली,
म्हणून,ज्या वेळेला आपण एखादं नवीन स्टार्टर चालू करत असता किंवा एखादा नवीन काम करत असतात, त्या वेळेला बाकीचे फॅक्टर आपल्याकडे असतील किंवा नसतील, याचा फारसा विचार करत बसू नका ,ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की वरील पाच फॅक्‍टर पैकी काहीही आपल्याला सोयीस्कर नसेल ,परंतु टायमिंग योग्य असेल ,तर त्यावेळी डोळे झाकून सुरुवात करावी.

कोणत्याही गोष्टीची जाहिरात करण्यासाठी /कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात करण्यासाठी /आपल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी/ आपल्या व्यवसायामध्ये नवीन कामगारांची भरती करण्यासाठी/ एकंदरीतच आपला व्यवसाय अजून वाढवण्यासाठी ,आपल्याकडे पुरेसे फंड नसतील तर मिळू शकतात, आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल तर ते मिळवू शकतो ,आपल्याकडे बिझनेस मोडेल परफेक्ट तयार नसेल, तर ते सरळ हसत खेळत होऊ शकतं, अगदी आपल्याला जे काही सुरू करायचे आहे त्याची पूर्णपणे आयडिया नसेल, तर त्याची सुद्धा माहिती होऊ शकते, पण फक्त टाइमिंग चुकवू नका, गेलेला वेळ आणि हातातून गेलेली संधी परत परत येत नसते.

© निलेश काळे
उद्योगनितीबिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764.

Office: 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “स्टार्टअप चालु करायचंय ना ? मग या पाच गोष्टी नीट लक्षात घ्या .

  1. आपले मुद्दे अगदी समजण्यासारखेच आहेत,आपणाशी काही चर्चा करायची आहे,पण आपणास कधीही फोन करून चालणार नाही कृपया आपल्याशी चर्चा करण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *