स्टार्टअप ला फंडिंग मिळवून देणारा Pitchdeck काय असतो?ते वाचा.

PITCH – DECK काय असतो ?
त्याचे घटक काय असतात ?

आपण मागे एका पोस्ट मध्ये बघीतलं होतं कि ,Angel investors पैसे देतात,आपल्या स्टार्ट अपला मोठं करण्यासाठी.

जसं एखादी नौकरी मिळवण्याकरिता आपण आपला बायोडाटा,CV वगैरे तयार करून घेऊन जातो ना?तसं, ज्यांच्या कडून आपल्याला फंडिंग मिळवायची आहे? त्यांच्यासमोर काहीतरी प्रपोजल माहिती स्वरूपात ठेवावी लागेल ना ? investor समोरच नव्हे तर Bank Managers समोर सुदधा प्रपोजल हे नीट नीटक्या स्वरूपात मांडाव्या लागतात.

तर त्याची पद्धत ही दस्तरखुद्द रतन टाटांनीच सांगितलीये !

तर हे प्रेझेंटेशन आपण slide स्वरूपात किंवा video स्वरूपात असावं या प्रेझेंटेशन लाच pitch deck असं म्हणलं जातं.

या pitch deck मध्ये खालील घटकांचा समावेश नक्की असावा .

(1) PROBLEM:
आपण एखादं स्टार्ट अप जेंव्हा करत असतो,त्यावेळी आपल्याला नेमकं माहित पाहिजे कि,आपण नेमका कोणता प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत?आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम तरी नक्की कळाला आहे का ? हे दाखवावं लागतं,तो प्रॉब्लेम आपण कसा दुर करू शकतो?हे स्लाईड मध्ये सांगावं लागतं .

(2) Solution :

आपण हा xyz प्रकारचा प्रॉब्लेम दुर करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे ABC हे सोल्युशन आहे हे पण दाखवावं लागेल ना ? ज्या प्रकारे आपण प्रॉब्लेम Discuss केला,त्यापेक्षा चांगल्या प्रकारे solution मांडावं लागतं.म्हणजे कसं??? एका पाठोपाठ दोन्ही स्लाईड मध्ये matter क्लीअर होतं

(3) USP:

प्रॉब्लेम सांगितला,सोल्युशन सांगितलं पण आपणच ते सोल्यूशन दयायला किंवा समाजाची गरज पूर्ण करायला कसे लायक आहोत?त्यासाठी आपल्याकडे काय विशेष आहे? काय Unique आहे? हे पण सांगावं लागेल ना? हे वैशिष्टय म्हणजे USP

आपण विशेष आहोत आपली पण विशेषता म्हणजे USP आहे आणि आपण दाखवायला बसलोत.

(4) Competition & Entry Barrier :

आपल्या स्पर्धकाबद्दल बोलायलाच काय ? विचार पण करायला आपल्याला आवडत नाहीपण Pitch deck मध्ये याचा अभ्यास पण मांडावा लागतो,सध्या मार्केटला कशा प्रकारे सोल्यूशन उपलब्ध आहेत? आणि आपले सोल्यूशन कसे मार्केटला बदलवू शकते? हे पण सांगावे लागते,त्याचप्रमाणे जे आपल्या मागून याच क्षेत्रात उतरणार आहेत?त्यांच्यासाठी Entry करायला किती अवघड असू शकते? , हे पण slide मध्ये मांडावं लागतं.

*(5) Revenue model*:

आपण investor कडून किंवा बँकाकडूी पैसा घेतोय,तो अजून जास्त पैसा कमावण्यासाठी ! मग त्याचं मॉडेल कसं असेल? म्हणजे सबस्क्रीप्शन मौडेल आहे का, विक्री प्रकार आहे?का सेवा क्षेत्र आहे?, म्हणजे एकूणच Revenue मॉडेल म्हणजे पैसा कसा येईल? हे आपल्याला सांगता आले पाहिजे !
साधारण 3-4 वर्षांनी आपला व्यवसाय कुठे असेल? कसा असेल? यांचं प्रोजेक्शन आपल्याला मांडता येतं का ? ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर सगळं भविष्य क्लीअर असेल?तेंव्हा मांडा ना मग !

(6) Target Market:

आपल्याला वस्तु किंवा सेवा नेमका कोणाला विकायचाय ? मार्केट किती मोठं आहे ?आपल्याला किती percentage मार्केट मिळू शकेल? किंवा आपल्या ग्राहकाची granular property म्हणजे ?,, त्यांच वय काय असेल?तो वर्ग ग्रामीण असेल का शहरी असेल ? शिक्षीत असेल का अशिक्षित?त्यांना काय आवडतं? हे सगळं सगळं आपल्याला माहित ही असावं जे कि मांडता येईल !
या स्लाईडमध्ये Target market असं मांडतात .

*(7) Milestone :
बँका किंवा investor आपल्याला पहिल्या दिवशी पैसे देत नसतात , असं म्हणा कि, ते प्रयोग करायला पैसे देत नाहीत तर वाढ करायला पैसे देतात,म्हणजे? साधारण एखादा व्यवसाय चालु केल्यानंतर 2-3 वर्षांनी,मग तोपर्यंत आपण पेटंट घेतलं असेल,प्रोटोटाईप तयार केलं असेल,किंवा काही मान सन्मान मिळाले असतील तर त्यांचा फायदा होतो,याला Milestone म्हणतात,आणि हे मुद्दे सुद्धा पिच डेक मध्ये मांडावे लागतात.

(8) Funding so far :

बरीच लोकं आत्तापर्यंत घेतलेली कर्जे लपवुन ठेवतात,पण लक्षात घ्या,जसं डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवून ठेवू नये तसं investor समोर सुद्धा काहीच लपवून ठेऊ नये,उलट बघा ना ही स्टार्ट अप्स कर्जे सुद्धा पब्लीकली सांगतात,तसंच करावं लागतं,

(9) The Team : कोणतंही स्टार्ट अप एकट्या माणसाचं यश नसतं तर ते एका टिमचं यश असतं,म्हणून आपल्या टिममेंबर्सचा पण उल्लेख Pitch-deck मध्ये करायचा असतो,
म्हणजे त्यांचं शिक्षण, त्यांचा टिम मधील रोल काय?त्यांना का टिम मध्ये घेतलय?वगैरे हे पण विस्तारपूर्वक मांडावं लागतं, जेणे करून समोरच्याला त्यांची देखील व्यवस्थित ओळख होईल.

म्हणजे काय तर एकंदरीत सर्व डाटा , आकडे खरेपणाने खोटारडेपणा न करता ) मांडावे,कारण? इथे खोटेपणा लगेच उघडा पडतो.

बघा pitch – deck मध्ये जास्तीत जास्त कितीही पॉईंट घेतले तरी ते कमीच वाटू शकतं पण तो खूप लांब आणि बोअरिंग नसावा .

आणि आपण प्रेझेंटेशन जरी करत असलो तरी ते स्टोरी प्रमाणे वाटलं पाहिजे कारण स्टोरी ऐकायला बोअर होत नाही,प्रेझेंटेशन ऐकायला होऊ शकतं.

Google वर किंवा युटयुब वर अनेक स्टार्टअप्सचा Pitch deck बघायला उपलब्ध आहे,तो बघावा.

एकूणच काय ? तर

मनात धगधगती आग असली कि काहीही शक्य आहे

Happy Learning

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
Office: 9146101663

Previous Post Next Post

One thought on “स्टार्टअप ला फंडिंग मिळवून देणारा Pitchdeck काय असतो?ते वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *