स्टीव जॉब्स,मार्क झुकरबर्ग एकाच कलरचे कपडे रोज का घालत ?

#businessCoaching

#Dicision_fatigue

📌 स्टीव जॉब्स,मार्क झुकरबर्ग,यांच्यासारखे प्रचंड बिझी आणि यशस्वी लोकांची एक खासियत तुम्ही बघीतलीये?
ही लोक नेहमी सेम कपडे घालतात.

यांच्याकडे एवढा प्रचंड पैसा आहे कि,हे लोकं रोज वेगळी कार खरेदी करू शकतात, मग रोज एकाच कलरचं टि-शर्ट आणि त्याच कलरची पँट घालण्यात काय लॉजीक असेल बरं?

या प्रकाराला Avoiding Decision Fatigue असं म्हणलं जातं.

कोणत्याही माणसाला दिवसभरातून किमान 800 प्रकारचे निर्णय ध्यायचे असतात,आणि खूप जास्त निर्णय घ्यावे लागले,तर त्यामुळे मेंदूवर ताण पडतो आणि महत्वाच्या निर्णय घेण्याच्या वेळी चुका होऊ शकतात .

म्हणून खूप यशस्वी लोकं, दिवसभरातल्या अनेक बाबीना ऑटोमेट करून टाकतात…….,म्हणजे??? असं करतात, त्याबद्दल फारसा विचार करायला लागुच नये.

आपण बघत असाल,कि खरे यशस्वी व्यावसायिक आपल्या व्यवसायातील अनेक गोष्टी Deligate करून टाकतात,आपल्या हाताखालच्या लोकांवर सोपवतात आणि आपण फक्त महत्वाचे निर्णय घेतात.

त्यापाठीमागे Decision fatigue होऊ नये, जास्तीत जास्त फोकस्ड राहुन महत्वाचे कामं करता यावीत हा त्या पाठीमागचा उद्देश असतो.

मार्क झुकरबर्ग,स्टीव जॉब्ज या दोघांनी या मुद्दयाला Extreme Level ला नेलं असलं,आणि आपण त्यांच्या एवढं तीव्रपणे याला फॉलो करू शकत नसलो, तरी आपल्यापरीने याला वापरू शकतो.

📌काही गोष्टी ऑटोमेट करवून टाका.

📌Ritual म्हणजे?अगदी नियमितपणे,परफेक्टली गोष्टी करायची सवयबनवुन टाका.

📌फोकस्ड राहुन काम करायचं असेल तर,रिकाम्या बाबींवर वेळ घालवू नका, Decision Fatigue.होऊ देऊ नका.
त्यामुळेच आपली प्रगती होऊ शकते.

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क , औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *