स्टोरी 405 Audi,BMW, Rolls-Royce चा मालक असणाऱ्या “भारतातील सर्वात श्रीमंत सलून व्यावसायिकाची”

आपण आपल्या एखाद्या व्यवसायामध्ये यश मिळवून त्यातून कमावलेला पैसा इतर व्यवसायात लावणे या पद्धतीला Boot strapping असे म्हणतात .

आज आपण अशाच एका माणसाबद्दल जाणून घेऊ,ज्याने स्वतःच्या सलून व्यवसायातून पैसा बाहेर काढला,तो दुसऱ्या व्यवसायात गुंतवला आणि त्या व्यवसायाला इतकं मोठं केलं तो व्यक्ती आज अरबपती बनला आहे.

हे घडू शकतं हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं,फक्त गरज असते ती त्या व्यवसायाचे सगळे बारकावे निटनिटके जाणून घेणे / ग्राहकाप्रति प्रामाणिक सेवा देणे आणि थोडी कल्पनाशक्ती लावणे या गुणांच्या आधारावर.

हा विषय आहे एका सामान्य व्यक्तीचा जो आजही स्वतः आपल्या जुन्या व्यवसायामध्ये रोज काम करतो,त्यांचं नाव आहे रमेश बाबू आणि यांचा लौकिक असा आहे की हे भारतातले सर्वात श्रीमंत न्हावी आहेत.

आपण बघतो कि एखादया नटाकडे इतक्या गाडया आहेत, या गाडया आहेत, पण एखाद्या सामान्य व्यक्तीकडे किती गाड्या असाव्यात?आणि कोणत्या असाव्यात? याची कल्पना तुम्हा केलीये का?

प्रत्येक सामान्य माणूस नेहमी स्वप्न बघतो, कि माझ्याकडे एक कार असावी, पण आज या माणसाकडे 400 गाड्या आहेत,त्यापैकी शंभर गाड्या या लक्झरी सेगमेंटमध्ये येतात, त्यात Rolls Royce, Lamborghini, Mercedes, BMW,तुम्ही म्हणाल ती गाडी या व्यक्तीकडे उपलब्ध आहे आणि ती गाडी तुम्हाला Ramesh tours& travels कडून किरायाने मिळू शकते.

यांचं नाव आहे रमेश बाबू .

रमेश बाबु हे दहावी पास आहे,
त्यांचं स्वतःचं सलुन आहे, रमेश बाबू हे ज्यावळी लहान होते, त्या वेळेलाच त्यांचे वडील वारले, त्यांच्या आईने त्यांचे दुकान हे त्यांच्या काकांना चालवायला दिलं होतं, पण रमेश बाबू जेंव्हा मोठे झाले, तेव्हा काकांनी ते दुकान त्यांना वापस द्यायला नकार दिला, आता स्वतःची रोजीरोटीच्या दुकानावर अवलंबून आहे ते दुकानाच, वापस मिळत नसेल? तर माणूस तळमळ करणारच ना?मग त्यांच्या आईने संघर्ष केला आणि शेवटी ते दुकान वापस मिळवलंच .

त्या दुकानांमध्येच मग रमेश बाबूंनी न्हावी काम करायला सुरुवात केलं.

थोड्या दिवसांमध्ये रमेश बाबूची हेअर स्टाईल करण्याची पद्धत ही प्रसिद्ध झाली आणि बघता बघता अख्या बेंगलोर मध्ये ते प्रसिद्ध झाले.

प्रत्येक सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये एक घर आणि एक कार ही स्वप्न तर नेहमीच असतात तसं मेश बापूंच्या डोक्‍यात देखील एखादी कार घेण्याचे स्वप्न होतं, कारण? त्यांच्या काकांनी एक कार घेतली होती आणि ते बघून रमेश भाऊंना वाटायचं की आपल्याकडे देखील एखादी छोटी का असेना फॅमिली कार असावी.

1993 मध्ये रमेश बाबूंनी साठवलेले पैसे आणि थोडीशी उसनवारी करून एक मारूती व्हॅन घेतली.

बऱ्याचदा माणूस स्वतःची हौस म्हणून अशी मोठा खरेदी करतो, परंतु मग ज्या वेळेला त्याचे कर्ज फेडायची वेळ येते त्या वेळेला थोडीशी तारांबळ उडते, रमेश बाबूंची पण झाली, पण त्यांच्या शेजारच्या काकूंच्या ओळखीने आणि सल्ल्यावरून त्यांनी त्यांची कार किरायाने द्यायला सुरुवात केली.

आता तो काळ विचार करा, त्या काळामध्ये देखील आणि आज सुद्धा कार ही गोष्ट लग्जरी म्हणून मानली जाते,रमेश बाबूंचा गोड स्वभाव विनम्रता आणि सलूनच्या व्यवसायामुळे ग्राहकांची असलेली त्यांची जोडले गेलेले नाळ या स्वभावामुळे या गोष्टीमुळे त्यांच्या व्यवसायाला सातत्याने मागणी वाढू लागली.

ग्राहक जास्त आणि कार कमी, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी परेशानी होऊ लागली असं करत करत त्यांनी दुसरी कार घेतली.

बँकेचे हप्ते वेळेवर फेडणे, त्याचबरोबर सुरळीत व्यवहार ठेवणे, या गोष्टीमुळे बँकेचा मॅनेजर देखील त्यांच्यावर खूष होता आणि असं करत करत त्यांनी दुसरी, तिसरी,चौथी अशी कार घ्यायला सुरुवात केल.

फक्त कार घेऊन व्यवसाय होतो का?तर नाही तर,,,,,,,,,त्यांनी मग ड्रायव्हरदेखील लावायला सुरुवात केली,बघा फक्त यंत्र घेऊन किंवा मशीनरी घेऊन,आपण आपला व्यवसाय पुढे मिळू शकत नाही तर त्यासाठी एक चांगली टीम असायला लागते.

गोड स्वभावाचा माणूस व्यवहारामध्ये पारदर्शकता माणूस या गोष्टी करू शकतो आणि तीच गोष्ट रमेश बाबू न साठी फायदेशीर ठरली.

अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय वाढत गेला ,मग पुढे जाऊन त्यांच्याकडे कारची संख्या आणि ड्रायव्हरची संख्या वाढली, परंतु एक मार्केटचा एक सेगमेंट असा होता की,ज्यांना वेगळी कार तर हवी होती, पण ती कारण त्यांना विशेष कार्यक्रमासाठी आणि विशेष पाहुण्यांसाठी आवश्यक होती, मग रमेश बाबूंनी मोठ्या मेहनतीने आणि थोडसं धाडस करुन एक लक्झरी कार विकत घेतली.

लक्झरी का सेगमेंट थोडा वेगळा आहे,इथे पैसा जास्त लागतो, देखभालीचा खर्च जास्त असतो आणि ग्राहक देखील तशाच प्रकारचा हवा असतो, खूप सारे व्यवसायिक कित्येक वर्षे फक्त सामान्य ग्राहकांना सामान्य उत्पादने विकत राहतात,परंतु मार्केटचा एक सेगमेंट असा देखील आहे ज्यांना प्रीमियम उत्पादने .

आज तुम्ही बघत असाल,प्रत्येक कंपनी ही स्वतःचे दोन प्रकारचे प्रॉडक्ट किंवा सेगमेंट करते, एक असतो तो सामान्य सेगमेंट आणि एक असतो तो प्रीमियम सेगमेंट.

मग रमेश बापूंनी आपल्या वाहनांचा ताफ्याध्ये, एक एक लक्झरी कार ऍड करायला सुरुवात केली,नावलौकिक वाढत होता,व्यवसाय वाढत होता, आणि व्यवसायाबरोबर येणारा पैसा वाढत होता,फक्त वाढला नाही तो या व्यक्तीचा “माज”.

कित्येक व्यावसायिकांमध्ये हा प्रॉब्लेम होतो,कि जसजशी प्रसिद्धी वाढायला लागते,जसे यश मिळायला लागतं तसं अंगातला अहंकार हा दुर्गुण देखील वाढायला लागतो,परंतु आज देखील रमेश बाबू तेवढेच विनम्र आहेत .

त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज कार सुद्धा ठेवाव्या, यासाठी कंपनीने त्यांना लेटर पाठवलं होतं, ही गोष्ट रमेश बाबू मोठ्या अदबीने सांगतात.

आज रमेशबाबूकडे 400+ कार्स आहेत,त्यात 75+ गाडया या लक्झरी सेगमेंट मधील आहेत.

आज रमेश टूर्स आणि ट्रॅव्हल्स ही कंपनी दक्षिण भारतातील एक ख्यातनाम कंपनी आहे, इतकं सगळं यश मिळाल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती आजही आपल्या सलूनमध्ये रोज चार ते पाच तास आपलं अजून काम करतो.

आपण रमेश बाबूंची स्टोरी युट्युबला किंवा गुगलला सर्च करून पाहू शकता, या माणसाच्या स्टोरीमधून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळू शकतात.

त्यातील काही मुद्दे खालील प्रमाणे.

📌 आपण जो कोणताही व्यवसाय करताय? तो अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने करा म्हणजे त्यातून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा उभा राहू शकतो.

📌 आपल्या आजूबाजूला असणारी कोणतीही व्यक्ती आपल्याला खूप चांगल्या आयडिया देऊ शकतो, म्हणून चांगले संबंध ठेवा आणि नेहमी नवीन आयडियासाठी ओपन रहा.

📌 आपले मित्रांशी संपर्क चांगले असतील तर आपण कोणताही व्यवसाय पुढे नेऊ शकतो म्हणून एका व्यावसायिकाने आपले मधुर संबंध ठेवायला हवेत.

📌 रमेश बापूंकडे इतक्या कार विकत घेण्यात कितपत संपत्ती होती का? तर नाही,,, इथे ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की ,बँकिंग व्यवस्था जर आपण व्यवस्थित वापरली, त्यांच्याशी योग्य प्रकारे व्यवहार केले,तर बँकिंग व्यवस्था आपल्याला पाहिजे तेवढी फंडिंग देऊ शकते ,परंतु इथे गरज असते ती आपली सचोटी आपली पारदर्शकता आणि आपली मेहनत दाखवण्याची.

📌 शेवटचा गुणधर्म असा की माणसाने कितीही पैसा आला तरी जमिनीशी असणारी आपली नाळ तोडली नाही पाहिजे, लोकांना तुमचा माज बघायचा नाही, तर लोकांना तुमची विनम्रता आणि सेवाभाव बघायचा आहे ,

लोक देतात पैसे देतात,पण लोकांना विनम्र माणूस हवाय माज असलेल्या माणसाला फक्त लाथा मिळू शकतात.

रमेश बाबूंच्या स्टोरी मधून आपण हे गुणधर्म घेतले पाहिजेत आणि आपल्या आयुष्यात वापरले पाहिजेत म्हणजे आपले देखील प्रगती होणे चालू होते.

शुभेच्छा .
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट ,
किल्ले धारूर , जि. बीड .
9518950764

Office: 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “स्टोरी 405 Audi,BMW, Rolls-Royce चा मालक असणाऱ्या “भारतातील सर्वात श्रीमंत सलून व्यावसायिकाची”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *