स्पर्धकांवर वरचढ ठरण्यासाठी हा पॉईंट नक्की कामाला येईल

स्पर्धकांवर वरचढ ठरण्यासाठी हा पॉईंट कामाला येईल.

तर हा Competitive Advantage म्हणजे काय? वाचा

एक असा पॉईंट असतो ,ज्यामुळे आपण आपल्या स्पर्धकांपेक्षा उजवे ठरतो.

एक असा पॉईंट ज्यामुळे ,आपण जास्त किमतीवर माल विकला तरीही ग्राहक नाराज होत नाही.

अशा पॉइंटला आपलं स्पर्धकांवर असणार कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज* असं म्हटलं जातं

📌 एखादी कंपनी दशकानुदशके व्यवसाय करत राहते, ती नफा मिळवत राहते, ग्राहकांना माल विकत राहते, त्याच्या पाठीमागे फक्त हा एकच मुद्दा असतो की त्या कंपनीकडे काही ना काही तरी अशी गोष्ट असते इतर कंपन्यांकडे नाही

📌 _उदाहरणादाखल असं समजा की A आणि B या दोन कंपन्या आहेत, त्यांचे उत्पादन सारखेच आहे,परंतु A ही कंपनी उत्पादन शंभर रुपयाला विकते आणि B ही कंपनी ते उत्पादन वीस रुपयाला विकते, दोघांनाही उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च हा 5 रुपये आहे पण , इथे A ही कंपनी मोठा नफा कमी कमावते आणि B ही कंपनी एवढा नफा कमवू शकत नाही.
याचं मेन कारण असं आहे की A या कंपनीने क्वॉलिटी च्या बाबतीमध्ये एक स्वतःच एक ऍडव्हान्टटेज बनवून ठेवलेलं असतं ,कारण समाजामध्ये असं समज आहे, की ज्या कंपनीची क्वालिटी चांगली असते त्यावर लोक जास्त भरवसा ठेवतात, आता बघायला गेलं तर B या कंपनीच्या उत्पादनांची क्वालिटी पण बरी आहे पण स्वतःला मार्केटमध्ये अशाप्रकारे पोझिशन केलेला आहे की तिथे त्या कंपनीला जास्त नफा मिळतो, हे का घडलं तर हे या कंपनीचं मार्केटिंग मुळे आलेलाच कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज आहे

📌 अशा प्रकारची स्पर्धकांवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज चा वापर करता येणे शक्य आहे.

आता बघायलं गेलं कॉम्पीटेटीव ऍडव्हान्टेजचे अनेक प्रकार आहेत

📌(1) Low cost leadership :
या प्रकारामध्ये आपल्या उत्पादनाचे रेट इतके खाली ठेवले जातात की, आपल्या स्पर्धकाला त्या रेट वर मार्केटमध्ये माल टाकणे परवडतच नाही आणि एक दिवस असा उजाडतो की तो स्पर्धक मार्केट मधून आपला गाशा गुंडाळून निघून जातो.
वॉलमार्ट ही मॉल ची चेन सगळ्यात जगभरामध्ये याच तत्त्वावर आपला व्यवसाय करते ,त्यामुळे ज्या गावांमध्ये वॉलमार्ट आपला दुकान उघडतं त्या ठिकाणी इतर स्पर्धकांचा व्यवसाय ठप्प होऊन जातो.
कारण?? स्वस्तामध्ये माल देणे हे वॉलमार्ट कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज आहे.

📌(2) High quality :
_ज्यावेळी कोणतीही कंपनी अत्यंत उच्च दर्जाचे उत्पादन मार्केटला आणत असेल त्यावेळी ती गोष्ट त्या कंपनीसाठी कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज बनवून जाते.

म्हणून तर मोबाईल फोनच्या दुनियेमध्ये जे फोन उच्चदर्जाची क्वालिटी देतात ,त्यांची मागणी वाढते त्याप्रमाणे अॅपल सारख्या कंपन्यांनी उच्च दर्जाची उत्पादने आणली आणि त्याप्रमाणे त्यांना मार्केट मधून रिस्पॉन्स देखील मिळाला.

📌 (3) First Mover Advantage :

ज्या वेळेला मार्केटमध्ये बदल होत असतात ,अशा वेळी जी कंपनी सगळ्यात अगोदर हालचाल करून इतरांपेक्षा पुढे राहते, अशा वेळी ही गोष्टसुद्धा त्या कंपनीसाठी फायदेशीर ठरते.

📌(4) Unique Technology:

प्रत्येक चांगल्या कंपनीमध्ये स्वतःचा एक रिसर्च करणारा विभाग असतो, तिथे उत्पादन किंवा विक्री होत नाही, तिथे फक्त आहेत या उत्पादनाला अजून चांगलं अजून चांगलं कसं बनवता येईल यासाठी संशोधन चालू असतं ,जी कंपनी स्वतः संशोधन करून एखादी नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करते, त्या वेळेला ती टेक्नॉलॉजी कंपनी साठी एक प्रकारचं एडवांटेज बनून जाते.

आजकाल आपण बघत असाल की, कंपन्या संशोधन केलं की तात्काळ त्याचं पेटंट घेऊन टाकतात आणि मग त्याचा वापर करून जास्तीत जास्त पैसे कमावतात, ज्याप्रमाणे मोबाईल फोन ला वापरण्यात येणारं Curved glass टेक्नॉलॉजी सॅमसंगच्या मालकीची आहे, एप्पल त्यांच्या फोनमध्ये जरी हे वापरायचा असेल तरी ते त्यांना सॅमसंग कडून विकत घ्यावं लागतं.

याचा अर्थ असा की जितके जास्त फोन ॲपलचे व्यक्तीला तेवढा जास्त फायदा सॅमसंगला होईल.

📌(5) Customer Loyalty:

मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे ग्राहक त्यांचे फॅन असतात, दुसऱ्या कंपनीने कितीही लालूच दाखवली तरी हे ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे बिलकुल ही जात नाहीत. याच्या पाठी मागे अनेक कारणे असू शकतात ,परंतु एखाद्या कंपनीसाठी असे ग्राहक किंवा असे प्रामाणिक ग्राहक म्हणा हे एक कॉम्पीटेटीव एडवांटेज असते.

त्यामुळे या कंपनीला कितीही स्पर्धक विरोधात उभे राहिले तरी ,काहीही चिंता करायचे कारण नाही ,कारण यांच्याकडे स्वतःचा हक्काचा एक ग्राहक वर्ग तयार असतो.

📌(6) Economy of the scale:

एखादी कंपनी आपल्या उत्पादनाचे 1000 पिसेस उत्पादक करत असेल त्यावेळी तिला येणारा खर्च आणि तेच 1000000 पीसेस उत्पादन करण्यासाठी येणारा येणारा खर्च हा वेगवेगळा असतो, याला इकॉनोमी ऑफ स्केल असं म्हणलं जातं, म्हणून तर काही व्यवसाय हे फक्त आणि फक्त अति प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यानंतरच परवडू शकतात असं माझं नेहमी म्हणणं आहे.

अशाप्रकारे प्रचंड उत्पादन घेऊन कमीत कमी खर्चा मध्ये एक उत्पादन तयार करणे ही, त्या कंपनी ची खासियत असते हे खुप जणांच्या लक्षातच येत नाही.

अशा कंपनीबरोबर थोडकं उत्पादन करणारी छोटी कंपनी धडक घेऊच शकत नाही.

📌(7) Vertical integration; .

ज्या वेळेला एखाद्या कंपनीकडे कलेक्शन , प्रोसेसिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्री या सगळ्याच गोष्टी स्वतःकडे असतात याला इंटिग्रेशन म्हणल जातं आणि हे एक प्रकारे कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज आहे.

साधी गोष्ट लक्षात घ्या अमूल ही कंपनी दुधाचं कलेक्शन करते ,दुधाची प्रोसेसिंग करते, त्याची पॅकिंग करते, दुधापासून वेगवेगळे आईस्क्रीम बनवते, आणि आईस्क्रीमची विक्री सुद्धा करते, या सगळ्या गोष्टी एकच कंपनी कंट्रोल करते आणि हा या कंपनीचा कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज आहे, त्यामुळे इतर कोणतीही कंपनी यांच्या इतका नफा कमावत शकत नाही, जेवढा ही कंपनी कमाऊ शकते.

📌(8) Government regulations::

अनेक वेळा सरकार काही कंपन्यांना किंवा काही उद्योगांना विशेष प्रकारची लायसन्स देते आणि असे लायसन्स धारक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मोनोपोली करू शकतात, ज्याप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळ्या पेमेंटवॉलेट देणाऱ्या कंपन्यांना लायसन्स मिळाले आहेत, परंतु अजूनही व्हाट्सअप स्वतः पेमेंट गेटवे आलेलं नाही, पण फोन पे किंवा गुगल पे या कंपन्यांना ते फार अगोदर मिळून गेलं याचा अर्थ काय आहे? तर हे हे लायसन्स, त्या कंपन्यांसाठी एक कवच बनतो.

बऱ्याच व्यवसायामध्ये लायसन्स मिळवणे आणि त्याचा वापर करून व्यवसाय करणे हेच एक कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज असतं.

📌 आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण जर इतर सगळ्या लोकांसारखे सेम टू सेम उत्पादने काढत असू आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज नाही, तर आपण इतरांच्या तुलनेमध्ये या मार्केट च्या स्पर्धेत टिकू शकत नाहीत.

अनेक डायरेक्ट सेलिंग कंपन्या अशीच ॲड करत असतात की आम्ही यांच्यासारखच उत्पादन बनवलेलं आहे, आमच्याकडे सुद्धा यांच्यासारखे उत्पादन आहे परंतु मित्रांनो या कंपन्यांकडे कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज कुठल्याच प्रकारे नसतं,त्यामुळे हे व्यवसाय एक दिवस बुडून जातात आणि कोणीही यातून फायदा करून घेऊ शकत नाही, सेम टू सेम उत्पादने काढून नाही तर स्पेशल काही तरी करूनच आज स्पर्धेत टिकाव लागू शकतो.

तेव्हा आपण त्याला जर व्यवसायामध्ये अत्यंत यशस्वी व्हायचं असेल तर वरील यादीमध्ये दाखवलेल्या कॉम्पिटिटिव्ह एडवांटेज पैकी एक किंवा अधिक गोष्टी आपल्या जवळ असल्याच पाहिजेत, जर आज नसतील तर लवकरात लवकर तयार केले पाहिजे , हीच आज या फास्ट युगात् टिकून राहायची गुरूकिल्ली आहे.

©निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टंट,
आनंदपार्क,औंध,पुणे.
9518950764.

आपल्याला बिझनेस कन्सलटींग हवीये तर कॉल करा.
office :9146101663

बिझनेससंबंधातील लेख वाचण्यासाठी
खालील वेबसाईटवर वाचा.
www.nileshkale.com

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *