स्पर्धक त्रास देतोय? या फक्त 3 स्ट्रॅटर्जी वापरा,तुमच्या व्यवसायाला फायदा होईल

स्पर्धक त्रास देतोय ? फक्त या तीन स्ट्रॅटर्जी वापरा ! तुमच्या व्यवसायाला फायदा होईल.

व्यवसायात म्हणा कि,जगताना कुठल्याही क्षेत्रात , स्पर्धा कोणालाच आवडत नाही , दरवेळी आपल्याला वाटतं कि , आपण जिंकलं पाहिजेच त्याच्याशिवाय आपल्या आत्म्याला शांती मिळणार नाही , पण या स्पर्धा करण्यामागे किंवा स्पर्धला तोडण्या पाठीमागे एक शास्त्र आहे , काही Techniques आहेत ज्यामुळे आपण स्पर्धला तोंड पण देऊ शकतो आणि . स्वतःची मनःस्थिती पण नीट – नीटकी मेंटेन ठेऊ शकतो .
कारण “डासाच्या चावण्यामुळे नव्हे तर त्याच्या सारख्या गुणगुण करण्यामुळे आपल्याला झोप येत नाही” . खरंय कि नाही ?

मुळात आपल्याला वाटतं कि आपली स्पर्धा xyz या व्यक्ती बरोबर आहे , जसं Kodak ला वाटलं कि , त्याची स्पर्धा Nikon किंवा Canon या दुसऱ्या कॅमेरा उत्पादक कंपन्या बरोबर आहे, पण तसे होतं का? तर नाही , त्यांची खरी स्पर्धा ही बदलत्या ट्रेंड बरोबर होती,वेगळयाच टेक्नॉलॉजी बरोबर होती,लोकांजवळ पैसा तर होता , पण त्यांनी त्यांचा पैसा दुसऱ्या कॅमेराला पण दिला नाही तर स्मार्टफोन्सला दिला ज्यात कॅमेरा होता , म्हणून समजून घ्या कि आपली स्पर्धा आपल्या शेजाऱ्या बरोबर नाहीये तर ती वेगळ्याच फॅक्टर बरोबर आहे ज्याला आपण कधी बघितलेले पण नसतं .

तर खालचे काही मुद्दे समजून घ्या .

(1) Keep Competition closer :

बऱ्याचदा असं दिसतं कि, लोकं स्पर्धकाला बोलतच नाहीत,त्याच्याशी खुन्नस ठेवतात मनामध्ये किंवा त्याच्या प्रॉडक्टकडे बघत सुद्धा नाहीत , साहजिक आहे हे,

सवतीमत्सर असाच असतो,

आपल्याला स्पर्धकाचे तोंड पण पहायचं नसतं,त्याचे उत्पादनाला विकत घेणे किंवा वापरण तर फार लांब राहिलं.

तेवढंच कशाला त्याला पैसे दयायचे? ही त्याच्या पाठीमागची भूमिका असते,असते का नाही!
पण आपण इथे मूलभूत चूक करतो , लक्षात घ्या मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात शिकवलं जातं “Keep your friends close and competition closer ”

रागावू नका, उद्धटासारखं त्याचं मला काय करायचंय , मी त्याच्याकडे लक्ष देत नाही असा इगो आडवा आणूच नका , शिकावं लागतं , स्पर्धकाचं युटयुब चॅनेल असेल सबस्क्राईब करा , फेसबुक पेज लाईक करा , त्याची उत्पादने वापरा , सतत वापरा , त्याचे Analysis करा , त्यांची पुढची प्लानींग काय आहे हे जाणून घ्या , त्यांची कस्टमर पॉलीसी जाणून घ्या , त्यांची टीम कसं काम करते हे जाणून घ्या , उगाचच गुस्सा करून काय उपयोग ?

उलट डोळसपणे अभ्यास केला तर स्पर्धकामुळे आपल्यात सुधारणा होते .

********************************

(2) Study them but focus on yourself :

वरच्या पॉईंटमध्ये सांगितलय म्हणून चोवीस तास स्पर्धकाचाच विचार करत बसू नका , फक्त त्यांचा अभ्यास करा उगाचच त्याच्या प्रगतीचा घोर जीवाला लावून घेऊ नका,फक्त डोळ्यानं अभ्यास करायचा डोक्यात जाऊ दयायचं नाही , नाहीतर डोकं खराब होईल , Focus करताना आपल्या ग्राहकावर त्यांना किती चांगली सर्वीस देता येईल यावर फोकस करा .
मार्केट मध्ये स्वतःची value वाढवण्यावर फोकस करा , कारण
Valuable माणसाला,उद्योगाला , व्यवसायाला इतक्या सहजासहजी रिप्लेस करता येत नाही !

********************************

(3) Think long Term :

आपल्या स्पर्धक काही घातकी पावलं उचलतो , स्वतःचे नुकसान करवून घेऊन जास्त ग्राहक मिळवायला बघतो़ , Red Ocean stratergy लावतो ,जास्तीच्या ऑफर दयायला चालू करतो अशावेळी काय कराल ?
लांबचा विचार करा ,
या जगात फक्त सगळ्यात स्ट्राँग , सगळ्यात fast , सगळ्यात बेस्ट असे प्रकार असतीलही पण सगळ्यात दमदार , सगळ्यात टिकाऊ , सगळ्यात मजबूत सुद्धा विशेषणं आहेत हे लक्षात ठेवा .
ऑलम्पीक मध्ये 100 मिटर स्प्रिiट ही रेस पण असते आणि कित्येक किलोमीटरची मॅरेथॉन सुद्धा .
लंबी रेस का घोडा बना .
Endurance ठेवा , आपण गेम मध्ये जास्त वेळ टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे .
नुसतं “हम अभी जिंदा है ” या वाक्यानं पण भल्या भल्यांची हवा टाईट होते .

तर अशा प्रकारे आपण आपली मनःस्थिती न खराब होऊ देता स्पर्धा नीट हाताळू शकतो .

असे लेख आवडत असल्यास आमची वेबसाईट लक्षात ठेवा.

www.nileshkale.com

शुभेच्छा .
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764 .

तुम्हाला व्यवसायात मदत हवीये .
प्रोफेशनल बिझनेस कन्सलटिंगसाठी
संपर्क करा .
श्री ओमकेश मुंडे सर :
9146101663

Previous Post Next Post

2 thoughts on “स्पर्धक त्रास देतोय? या फक्त 3 स्ट्रॅटर्जी वापरा,तुमच्या व्यवसायाला फायदा होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *