“स्मार्ट सेल्स ॲप्रोच” कसा असावा? वाचा या शॉर्ट स्टोरीत

47 Views

#BusinessLessons : Approach_बदला

📌 आज आपण सगळेच घरात आहोत , क्लाएंटचे फोन येत नाहीयेत ,
जवळपास सर्वांच्याच डोक्यावर उद्या काय होईल याची टांगती तलवार आहे .

📌 जी मंडळी विक्री क्षेत्रात आहेत , त्यांनी आजवर जो ॲप्रोच घेऊन विक्री केलीये तो ॲप्रोच पूर्णपणे बदलावा लागणारय !

ही शिकवण काही जणांना पटणार नाही , पण समजून घ्या !पण कोणी कितीही युक्तीवाद केला तरीही जग पहिल्यासारखं नसणार आहे .

आत्तापर्यंत ग्राहकाला उज्ज्वल भविष्यासाठी मोटीवेट करून सेल्स केलाय,पण आता सगळ्यानाच माहितय काळ कठिण आहे,मग एका सेल्समनचा अप्रोच कसा असावा ?

तर …. #Encash_On_Pain.

आज ज्या गोष्टीमूळे लोक अडचणीत आलेत त्यावर सोल्युशन दया ! आणि अशीच परिस्थिती उद्या उद्भवली तर त्यासाठी तयार करा !

एखादया शार्प सेल्समनने अनोळखी इसमाला ग्राहक कसं बनवावं या बद्दल एक छोटी स्टोरी बघा ! म्हणजे आपला अॅप्रोच कसा असावा हे लक्षात येईल !

तर स्टोरी चालू अशी होते .
दोन मोठ्या कंपन्यांचे CEO मित्र, सुटाबुटात ,,कारच्या बाहेर , निवांत गप्पा मारत उभे असतात .

त्यापैकी एक जण आपल्या चार – पाच ट्रेनी ना , सेल्स कसा वाढवावा यावर ब्रिफ करत असतो . तर त्याचा दुसरा CEO मित्र Just गप्पा मारत उभा असतो .

तेवढयात तिथे , एक पैसा मागणारा 8-9 वर्षाचा पोरगा येतो , आणि नेमका ब्रिफींग देणाऱ्या सुटाबुटातल्या CEO ला पैसे मागतो .

आता तो खिसे चाळतो , पण पेमेंट साठी कार्ड घेऊन चालणारे उच्चवर्गीय श्रीमंत ते , त्याच्याकडे कॉईन कुठले आले ?

पण तो पोरगा काही हटत नाही ,
त्या CEO चे ज्युनियर त्याला हटवतात , दुसरा मित्र हटवण्याचा प्रयत्न करतो , पण छे !
तो पोरगा काही जात नाही .

त्याच्याकडे चिल्लर पैसे नाहीत , म्हटल्यावर त्याचे दोन ज्युनिअर खिशात हात घालतात आणि दहा रुपयांची नोट त्यांना काढून साहेबाची सुटका करतात .
त्या पोराला दहा रुपयाची नोट मिळाल्याने,तो खुश होऊन पळत सुटतो .
वाटेत त्याचे मित्र विचारतात … ” किती भेटले ” ????…. पण तो त्यांना काहीच सांगत नाही . हाताची मुठ गच्च आवळून तो आपल्या झोपडीत गेल्यावरच मूठ उघडतो , आणि आपल्या भावाला सांगतो … ” त्या कोटवाल्या माणसाने मला दहा रुपये दिलेत,आला तु पण जा ” !

📌ही साधी 5 मिनीटात घडलेली घटना पण जबरदस्त ट्रिक शिकवून जाते , ज्या शिकायला MBA च्या विद्यार्थयाला पण 3-4 वर्ष लागतील

📌तर काय आहेत ही तत्व ?

(1) #Talk_to_the_Decision_maker :
ज्यावेळी तुम्ही सेल करायला जाल , त्यावेळी इकडे तिकडे बोलत बसू नका , जो व्यक्ती निर्णय घेऊ शकतो त्यालाच भिडा .
जसे हा पोरगा त्या ज्युनियर पैकी कोणालाही मागू शकला असता , पण याने टारगेट निवडलं तो हा CEO .
म्हणून निर्णय घेणाऱ्या व्यक्ती समोरच प्रेझेंटेशन करा नाही तर वेळ वाया जाईल .

(2) #Persistance : तो पोरगा टिकून राहिला,गेला नाही .
मग परिस्थिती किचकट होऊ लागल्याने त्या ज्युनिअरनीच मार्ग काढला, त्याला पैसे दिले पण या पोराला काय त्याचं,याचे काम तर झाले, बघा त्याने जर धीर सोडला असता,तर त्याच्या फॅमिली ला उपाशी झोपावे लागले असते , म्हणून त्याने पिचींग ( बिझनेस संभाषन ) पण परफेक्ट केलं , आणि टिकून पण राहिला .

(3) #when_deal_is_done_Hold_for_yourself :

कधी एखादया मार्केट मधील एखादया दुकानदाराने स्पेशल वस्तु आणली,तर तो स्पर्धक दुकानदाराला कळू देत नाही,कि कुठून आणली ?

तसं या पोराने मित्रांना सांगितले नाही,कि त्या माणसाने किती पैसे दिले ते .
तसं काही गोष्टी स्वत:पुरत्या सिक्रेट ठेवा,उगाच छाती बडवून सगळ्या दुनियाला सांगू नका.

( 4 ) #He_shared_info_of_paying_customers :

त्याने घरी, झोपडीत म्हणा !
आल्यावर स्वतःच्या भावालाच सांगितलं की,ते paying customer आहेत,जा म्हणजे एक्स्ट्रा इन्कम होईल .
याचा अर्थ चांगल्या पेईंग कस्टमर कडून अजून जास्त प्रॉफीट कमवता येतं

(5)#There_is_always_a_Budget :

बऱ्याचदा नवीन ट्रेनी सेल्समन ऑर्डरला जातात,आणि समोरचा व्यक्ती म्हणतो,बजेट नाही ! तेंव्हा हा नीट्ट माघारी फिरतो .
या पोराच्या केसमध्ये पण तसं होत होतं,पण हा गडी टिकून राहिला आणि शेवटी बजेट तयार झालं .
लक्षात घ्या , बजेट नेहमी असतच आपल्याला ते काढता आलं पाहिजे .

आपण कोणत्याही घटनेतून शिकू शकतो,याचंच उत्तम उदाहरण आहे कि नाही वरची? स्टोरी .

तसंच आहे,शिक्षण सर्वत्र आहे,आप ल्याला फक्त घेता आलं पाहिजे .

शिकत रहा ! निसर्गाकडून , परिस्थीतीकडून , माणसांकडून , सर्वांकडून,त्यानेच आपली प्रगती होणारेय .

बिझनेस स्ट्रॅटर्जी साठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा , लिंक खाली आहे .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा .
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट.
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764 .

व्यवसाय असाच वाढत नाही, मेंटर लागतोच , तो तुमच्या विक्रीची स्पीड वाढवतो, आणि फायफळ खर्चाची स्पीड कमी करतो,बिझनेस कन्सलटींग हवी आहे ?
संपर्क करा .

उद्योगनिती पुणेऑफीस : 9146101 663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *