स्वतःसाठी योग्य बिझनेस असा निवडा. 6 Step Formula

स्वतःसाठी योग्य व्यवसाय असा निवडा

©निलेश काळे.

हा प्रश्न नेहमी नेहमी समोर येतो, अनेकांच्या तोंडून येतो ,व्यवसाय कसा निवडावा ?

याचे उत्तरं अनेक आहेत.

कोणी समाजाच्या गरजेवर व्यवसाय निवडेल /कोणी समाजामध्ये कशाची डिमांड आहे याच्यावर व्यवसाय निवडेल /कोणी स्वतःच्या आवडीवर व्यवसाय निवडेल किंवा कोणी आपल्या छंदाचा व्यवसाय निवडेल, परंतु अनेक वेळा माणसाचं मन कनफ्यूज होऊन जातं की नेमका व्यवसाय निवडायचा कशाच्या जोरावर?

याचे उत्तराचा शोध अनेक जण घेता आहेत ,पण मी माझ्या परीने काही प्रश्न काढले आणि त्यास तुमच्यासमोर मांडतोय बघा याचा वापर करून काही फायदा होतोय का?

📌बालपणाची आवड शोधा :

“बालपणाचे दिवस सुखाचे” ही फक्त म्हण नाही ,तर तो एक अत्यंत सुखद असा अनुभव असतो ,त्या काळामध्ये आपण समाजाला दाखवायला किंवा इतरांना इम्प्रेस करायला काहीही करत नाही.

त्यात अनेक गोष्टी असतात ज्यामध्ये आपलं मन हरखून जायचो, आपल्याला काळ वेळेचे भान राहत नसायचं , खूप साऱ्या मोठ्या व्यक्तींनी आपलं स्वतःचं करिअर /आपलं आयुष्य त्याच गोष्टीवर उभा केला आहे ज्या गोष्टींमध्ये ते लहानपणी खूप जास्त चांगले होते.

जसजसं वय वाढतं तसं आपण इतर गोष्टींकडे आपलं मन वळवतो ,पण जर स्वतःमधून खरोखर काही चांगलं शोधून काढायचा असेल? तर त्या काळात परत जा ! तिथे स्वतःचा शोध घ्या ! बघा आपल्याला तिथे काय आवडत होतं ? आणि जर ते आजच्या काळातदेखील फायदेशीर ठरत असेल तर त्याच्यावर स्वतःचं करिअर करण्याचा प्रयत्न करा .

नाही म्हटलं तरी तिथे आपलं मन आहे, मग आपण त्याच्यावर आपला डोलारा उभा करू शकतो .

परंतु ही एकच गोष्ट नाहीये ! चला बघुया अजून काय काय येते !

(2) मोठे झाल्यावर कोणती गोष्ट आपली पैशन होती?

काही जणांना आपल्या बालपणीच्या गोष्टी आठवणार पण नाहीत…. ओके! त्याला सोडून द्या, आता थोडं मोठं होऊ या ,,ज्यावेळी आपण शाळेत किंवा कॉलेजात होतो, त्यावेळी देखील काही गोष्टी अशा असतील ज्या आपण अगदी बेभान झाल्यासारखं करायचो.

त्या गोष्टी मध्ये सुद्धा आपला वेळ कसा जायचा? ते आपल्याला खरोखर समजत नव्हतं ,थोडं मोठं होत असताना आपल्या आवडी बदललेल्या असतात ,तर त्या गोष्टी काय होत्या? याचा चला शोध घेऊ , त्यातून काही निघतोय का ?

कारण बऱ्याचदा आपल्या घरांमध्येच खजाने लपलेल्या असतात ,पण त्याच्यावर धूळ् साचली की मग आपण त्याला विसरून जातो , त्या खजाना तून/ त्या पेटीतून काही निघतय हे बघू कारण खूप वेळा बरेच जण आपल्या शाळेतल्या किंवा कॉलेजातल्या आवडीवर स्वतःचा व्यवसाय किंवा आपलं करियर उपयोग करून मोठे झालेले आहेत.

(3) अशी एखादी_गोष्ट आहे_का?
ज्याचं खूप लोकं कौतूकbकरायचे !

कौन बनेगा करोडपती मध्ये सुद्धा एक लाईफ लाईन अशी असते, जिथे पब्लिक आपले स्वतःचे मत मांडतात आणि 80 टक्के वेळा पब्लिकचं मत हे योग्य असतं .

याचा अर्थ असा आहे की अनेक लोक जर आपल्या एखाद्या गोष्टीचं कौतुक करत असतील ,तर आपण त्या गोष्टीमध्ये नक्कीच स्पेशल आहोत असं मानायला हरकत नाही .

पण असा समज करून घेऊ नका की माझ्या कुटुंबातील किंवा माझे नातेवाईक अथवा माझे एक दोन मित्र या गोष्टीचं कौतुक करतात किंवा करत होते म्हणून मी त्याचा चांगला आहे.

असे कौतुक करणाऱ्यांची संख्या मोठी पाहिजे ( Validation By many ) तेव्हाच ती गोष्ट आपल्या मध्ये काहीतरी स्पेशल आहे असे आपण समजू शकतो, कारण लोक विनाकारण कोणाचाही कौतुक करत नाहीत .

लोकं या बाबतीमध्ये फारच सेलेक्टिव असतात . तेंव्हा तशी गोष्ट शोधा ज्या गोष्टीचं कौतुक व्हायचं !

त्याच्यावर आपण आपलं करिअर किंवा आपला व्यवसाय उभा राहू शकतो

(4) अशी एखादी गोष्ट आहे का? #ज्यात आपण निसर्गतः चांगले आहात?

या जगामध्ये आलेला प्रत्येक माणूस वेगळा आहे .

प्रत्येकाची मानसिक ,बौद्धिक आणि शारीरिक क्षमताही वेगवेगळी आहे.

आपल्या मध्ये जे क्षमता असतात त्या इतरांमध्ये असायलाच पाहिजे? असं काही नाही, म्हणून आपली अशी एखादी क्षमता/ काम ओळखा, जे आपल्याला करायला सोपे जाते पण इतरांसाठी ती अत्यंत अवघड आहे.

आपण अशा क्षमतांचे भांडवल करू शकतो आणि या भांडवलाच्या जोरावर आपले स्वतःचे आयुष्य घडू शकतो, कधी कधी आपण हे विसरून जातो की आपल्यात ही क्षमता आहे किंवा होती .

संसाराच्या रहाटगाड्यात मध्ये अशी क्षमता विसरून गेलेले वीर खितपत पडलेले आहेत , जोपर्यंत आपण आपल्या क्षमतांचा शोध घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला हात देण्यासाठी कोणीही महात्मा येणार नाही.

शा सुपरनॅचरल क्षमता आपल्या DNA मध्ये असतात, त्यांना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्यात दाबल्या जात नाहीत, फक्त आपणच स्वतःला त्याची जाणीव करुन द्यायला पाहिजे, एकदा का जाणीव करून द्या आणि मग बघा आपण या संसारांमध्ये किती लख्ख प्रकाश करू शकतो ते?

(5) #आजही_काय_करताना_आपण_वेळेचे_भान_विसरतो :

समजा आज तुमचे वय 25 आहे,

सोडून द्या लहानपणी आपण काय करत असताना काळाचे भान विसरायचो ? सोडून द्या !

शाळेत ,कॉलेजात असताना आपल्याला काय आवडायचं ? हे पण समजा आपल्याला आठवत नाही, परंतु आज सुद्धा एखादी अशी गोष्ट असेल जे करताना आपण खरोखर तल्लीन होऊन जातो.

असं तल्लीन होणे साधीसुधी गोष्ट नाहीये ,अनेक लोकांना हे जमत नाही.
आपण ज्या गोष्टीत तल्लीन होऊन जातो ,ती गोष्ट समाजाच्या कामाची आहे का ? त्यातून लोकांचं काही चांगलं होऊ शकते का? त्यातून काही लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवले जाऊ शकतात का, याचा शोध घ्या ! कारण असं तल्लीन होणं खरोखर फार मोठी संपत्ती आहे.

जर तुमच्यामध्ये अशी काही गोष्ट असेल ?तर तुम्ही खरोखर करोडपती झालाच म्हणून समजा, फक्त त्या गोष्टीमध्ये तुम्ही एवढे मास्टर असायला पाहिजेत कि ज्यामध्ये तुमचा हात कोणीही धरू शकणार नाही.

(6) #आपल्याला_कोणासाठी_काम_करावंसं_वाटतं?

ज्यावेळी पद्मश्री ,पद्मभूषण किंवा भारतरत्न पुरस्कार जाहीर होतात ते जरा नीट बघा.

हे पुरस्कार प्राप्त मंडळी असतात ना हे स्वतःसाठी काहीही न करणारे असतात, त्यांचे वैशिष्ट्य असं की यांच्याजवळ काहीही नसलं, तरी एखादी तरी अशी गोष्ट असते जी ते खुप लोकांचं भलं करण्यासाठी करतात.

ही गोष्ट त्यांची आवड नसेल ,त्यांचा छंद नसेल ,त्यांची पॅशन नसेल, परंतु या गोष्टीने खूप लोकांचा फायदा होतो म्हणून एक व्रत म्हणून यांनी ही गोष्ट स्वीकारलेली असते, असे समाजाच्या भल्याचा वसा घेणारे लोक खूप मोठा उद्योग उभा करू शकतात.

असं कुठलं व्रत तुम्हाला घेऊन वाटतंय का ? ते बघा आणि त्यावर व्यवसाय उभा करा, यशस्वी व्हाल!

*****************************

आता म्हणाल सर वरच्या गोष्टींपैकी एक ही गोष्ट माझ्या आयुष्यात आली नाही किंवा मला त्याची जाणीव झाली नाही. तर मग मी कोणत्या गोष्टीचा आधार घेऊन स्वतःचा शोध घेऊ शकतो? तर अशा वेळी लक्षात ठेवा आपल्याला कुठलीतरी एखादी अशी गोष्ट करायला पाहिजे जी आपल्याला वळण लावेल,

यासाठी एक गोष्ट करायला चालू करा अनेक मोठे व्यावसायिक उद्योजक आणि प्रसिद्ध या गोष्टीला फॉलो करतात.

मोठ्या प्रमाणावर व्यायाम करायला चालू करा, जीमला जायला चालू करा किंवा एखादा खेळ खेळायला चालू करा .

या गोष्टीचा आपल्या आयुष्यावर पॉझिटिव प्रभाव होतो आणि आपण व्यवस्थित निर्णय घेण्याच्या क्षमतेचे होतो.

हा सगळा प्रकार स्वयंशोध घेण्याचा आहे ,इथे कोणताच कोच किंवा कन्सलटंट तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही !

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

स्वयंशोधासाठी शुभेच्छा !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिझनेस कन्सल्टंट,
आनंद पार्क,औंध,पुणे !
9518950764
office:
श्री ओमकेश मुंडे सर 9146101663 .

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *