“हर्षद मेहता” माहित असेल,पण हा माणूस त्याचा पण दादा होता,एका स्कॅमरची कहाणी

1,235 Views

The_Wolf_Of_WallStreet

लेखक_जॉर्डन_बेलफोर्ट

©निलेश काळे .

📌 आपल्याला हर्षद मेहताची कहानी तर माहितच आहे, पण ही कहाणी आहे एका आर्थिक गुन्हेगाराची ज्याने अमेरिकन शेअर मार्केट मध्ये हजारो गुंतवणुकदारांची अरबो डॉलर्सला फसवणुक केली>> लोकांना चुना लावला>>त्याला चार वर्षाची जेल आणि 110 मिलियन डॉलर्सचा दंड झाला , शेवटी माफीचा साक्षीदार होऊन आणि 22 महिने जेल भोगून तो बाहेर पडला, आणि आज सेल्समोटीवेशनचा गुरू म्हणून जग त्याला ओळखते.

📌 जेल मधेच त्याला दुष्कर्माचा पश्चाताप झाला, आपल्याकडच्या सेल्स टेक्नीक्स विधायक कामासाठी लावायच्या ठखल्या आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं ठरवलं , त्याच पुस्तकाचं नाव “The way of Wolf ”

📌हे पुस्तक फक्त इंग्लीश मध्ये असलं तरी , याच नावाने 2013 मध्ये, एक सिनेमा बनलाय , ज्यात त्या टायटॅनिकमधल्या हिरोने जॉर्डनची भूमिका केलीये हा व्हिडिओ युटयुबवर उपलब्ध आहे .

📌 जॉर्डन बेलफोर्ट हे आज “सेल्स” मधील गुरू म्हणून ओळखले जातात, त्यांनी केलेल्या वाईट कर्मासाठी जाहीर माफी मागून , ज्याचं ज्यांचं नुकसान केलंय त्यांच्यासाठी फायदा करून देण्यासाठी संकल्प केलाय !

एके काळी पाटर्या करनारा , ड्रग्ज घेऊन स्वतःचं हेलीकॉप्टर अपघातग्रस्त करणारा,नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपणारा ,हा माणूस आज उद्योग जगताला मोटीवेट करतोय सेल्स शिकवतोय ,

📌ते आज सेल्स सेमीनार घेतात त्यांच्या ऑनलाईन सेल्स कोर्ससाठी भली मोठी लाईन असते, आपण पण तो कोर्स करू शकता त्याची फिस केवळ 2000 डॉलर्स आहे( 1,40,000 Rs ) ,

📌 जॉर्डन बेलफोर्ट लहानपणापासूनच विक्री करण्यात पटाईत होता , त्याने न्युयॉर्कच्या बीच वर सोळाव्या वर्षीच आईसगोळ्याची गाडी लाव , बर्गर विक असले धंदे करून पैसे कमवायला सुरुवात केलेली, त्यातून त्यांनी बक्कळ पैसा कमावला ,पण पुढे जाऊन तो बिझनेस फेल होऊ लागला मग त्यांनी LF Rothschild या स्टॉक ब्रोकर फर्म मध्ये नोकरी धरली .

एखादया उद्योजकाने ज्या ठिकाणी नौकरी करतोय,तिथुन सुद्धा फक्त पगारच नाही , तर व्यवसायाचे ज्ञान पण घेतले पाहिजे, तसं जॉर्डनने पण स्टॉक मार्केटचे बारकावे शिकायला चालू केले, पण याचं नशिब खराब 1987 मध्ये अमेरिकन शेअर मार्केट ,
ढासळलं आणि ले ऑफ ( ज्याला कामावरून काढून टाकणे म्हणतात ते )मधे यiची नौकरी गेली ,आता नोकरी गेली म्हणून दादानं हातं पायं गाळले नाहीत,तर “स्ट्रॅटन सिक्युरिटीज” या दुसऱ्या फर्मची फ्रँचायजी घेतली , आणि स्वतःची शेअर मार्केट मध्ये ट्रेड करणारी stranton Okmond नावाची कंपनी चालु केली !

📌 जॉर्डन कडे बोल बच्चन करायची अफलातून कला होती, म्हणून त्यांने गुंतवणुकदाराला फोनवरच पटवून सांगायला स्टाफ ठेवला,त्या स्टाफला फोनवर कशी डील करायची असते? हे शिकवलं ! त्या बदल्यात ते स्टाफला भला मोठा बोनसपाटर्या वगैरे दयायचे .

या स्टाफला यांनी शिकवलेली कला फार भारी होती !

📌 यांचा खरा खेळ चालू होतो ते इथुन ,त्यावेळी अमेरिकेतले स्टॉक मार्केट सूद्धा कॉम्प्युटराईज्ड नव्हते ,

म्हणून यांनी गुंतवणुकदारांना सुरुवातीला ब्लू चीप म्हणजे चांगल्या कंपन्यामधे गुंतवणुक करायला लावायचे आणि त्यात नफा भेटला की त्या गुंतवणुकदारांचा विश्वास वाढायचा आणि मग नंतर ते गुंतवणूकदारांना पेन्नी स्टॉक असणाऱ्या कंपन्याचे स्टॉक खरेदी करायला लावायचा , या पेन्नी स्टॉक कंपन्या म्हणजे अशा कंपन्या की ज्या कधी पण बुडू शकतात .

📌 त्या काळी इंटरनेटचा जमाना नव्हता कि एखादया कंपनीबाबतीत गुगल वर सर्च करता येईल, त्यावेळी वर्तमानपत्रात येणाऱ्या रिपोर्टवरच अवलंबून रहावे लागे.

गुंतवणुकदार त्या कंपन्यांबद्दल मार्केट मध्ये लिहुन येणारी माहिती वाचुन त्यावर विश्वास ठेवायचे आणि त्या कंपनीत पैसा लावायचे .

📌अशा खोटया रिपोर्ट लिहिण्यात जौर्डन पटाईत होता ( ही त्याच्याकडे असणारी एक जबरदस्त सॉफ्ट स्कील होती) ते रिपोर्ट वाचुन आणि जॉर्डनच्या टेलीकॉलरनी फक्त बाता मारून विश्वास जिंकल्यामुळे लोक दणादण इन्वेस्ट करायचे , आता या कंपन्या छोटया असल्याने यांच्या स्टॉकची ट्रेडिंग डायरेक्ट शेअर मार्केट मध्ये न होता काऊंटरवर व्हायची ! त्यामुळे कधी कोणाला यावर जास्त संशय येत नसे !

📌 एकदा का त्या पेन्नी स्टॉक कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढली कि जॉर्डन आणि त्यांचे पार्टनर स्वतःकडचे शेअर्स विकून मोकळे व्हायचे आणि पुन्हा दुसऱ्या गुंतवणुकदारांना त्याच कंपनीचे शेअर घ्या म्हणून फोर्स करत नसायचे,म्हणून आपसूकच त्या कंपन्यांचे शेअर ढासळायचे,या सगळ्या प्रकाराला इंग्लिशमध्ये manipulate करणे म्हणतात .

📌 अशी धूर्तपणाने इन्वेस्टरची फसवणुक केल्यामुळे अनेक लोक देशोधडीला लागले, इकडे जॉर्डन आणि त्यांच्या पार्टनरनी बंगले घे , लक्झरी कार्स घे, तुफान पैसा उडव ,स्वीस बँकेत पैसे जमा कर ! असा सपाटाच लावला !

📌 पण पापाचा घडा कधीतरी भरतो, तसा यांचा पण भरला,आणि FBl ने यांची चौकशी लावली , जॉर्डनला चार वर्ष जेल आणि 110 million डॉलर्सचा दंड झाला ,

📌 पण जॉर्डनने इथे पण आपल्या पार्टनर आणि जे जे लोक स्कॅममध्ये भागिदार होते,त्यांच्या विरुद्ध साक्ष दिल्याने त्याची सजा 22 महिने एवढी कमी झाली .

📌 अमेरिकेच्या सिक्युरिटी मार्केटने जॉर्डनला आयुष्यभरासाठी व्यवहार करण्यावर बंदी घातली .

📌 जॉर्डनने नंतर catching the Wolf of wall street आणि Way of Wolf ही पुस्तके लिहिली , जी दोन्ही पुस्तके सुपरहीट झाली .

📌 2013 मध्ये जॉर्डनच्या आयुष्यावर The wolf of Wall Street हा हॉलीवुड पट बनला ,जो पण सुपरहिट झाला .

📌 पुस्तके,सिनेमा यातून सुद्धा जॉर्डनने प्रचंड पैसा कमावला ! अजूनही कमावत आहेत.

📌 या दरम्यान जॉर्डन बेलफोर्टने

“Sales_Line_persuasian”

ही सेल्समधील प्रसिद्ध थेअरी बनवली, या थेअरीचा वापर करून , सरळ सरळ आणि कमी अडचणी निर्माण होता विक्री कशी घडवून आणायची याची ट्रेनिंग ते जगभरातील मार्केटरला देतात.

यांचे ऑनलाईन वेबिनार्स पण असतात, जे आपण सुद्धा अटेंड करू शकता, त्याकरिता जॉर्डन बेलफोर्ड यांच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, तिथे नोटीफिकेशन येत असतात.

📌 ही थेअरी आणि जॉर्डनचा प्रवास वाचण्यासाठी,आपण हे पुस्तक नक्की वाचावे किंवा यूट्यूबला अथवा जिथे मिळेल तिथे हा सिनेमा बघावा !

📌 कधी – कधी अपराध करणारे, गुन्हेगार सुध्दा शहाणे होऊन ,उद्योगजगताला खूप काही शिकवून जातात .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

शुभेच्छा
©निलेश काळे ,
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क , औंध , पुणे
9518950764

उद्योगनितीचे मिशन नव्या मराठी रक्ताला उद्योजकतेचे पाठ शिकवणे हे आहे , त्यामुळे जरा जास्तीचे टचमध्ये रहाण्याकरिता,आमच्या फ्री व्हाटस अप ग्रुप मध्ये सामिल व्हा !
त्यासाठी संपर्क करा .

श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *