ही एक सवय,तुम्हाला नक्की श्रीमंत बनवेल.

Think on paper

आपण कोणत्याही यशस्वी माणसाची ( मग तो गुन्हेगार का असेना ) एक सवय बघाल.

हे लोक डायरी लिहीतात.
..

“पुर्ण जगात मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे ” या अर्थाचं वाक्य सर्वत्र प्रचलित आहे,

आपण सामाजीक आहोत ,कारण आपण विचारी आहोत,माणूस सर्व प्राणी, मात्रांपेक्षा वेगळा आहे कारण?
आपल्यात विचार करण्याची क्षमता आहे

आता,विचार .. करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

आपण एकटे बसून विचार करू शकतो,
दोन माणसे बसून विचार करू शकतो अथवा,
ग्रुप मध्ये मिंटींग करून विचारमंथन होऊ शकते
पण ….
उद्योजक होण्यासाठी ,सर्वात महत्वाची ही जी सवय आहे ती म्हणजे पेन किंवा पेन्सील घेऊन पेपरवर विचार करणे.

आपल्या सर्व मेंबर्सला आपण अगदी पहिल्या दिवसापासून आपण हेच सांगतोय,कि लिहून व्यक्त व्हा.

फक्त विचार डोक्यात ठेवल्याने काही होणार नाही,लिहीते झाले पाहिजे. तेंव्हा कुठे तरी नेमके कळायला लागेल कि,आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे? आणि आपल्याला नेमके काय पाहिजे ? किंवा माझ्या जवळ काय आहे?

अगदी अश्मयुगा पासून,गुहेत रहात असताना पासून मनुष्य लिहीतोय , चित्रे काढतोय,व्यक्त होतोय,म्हणून तर उत्खनन करणारे शास्त्रज्ञअगोदर काय शोधतात ? तर काही लिहिलेले आहे काय ? अथवा चित्रे वगैरे आहेत काय ?

आपले पूर्वज काय करायचे ?त्यांनी काय शोध लावले ?त्यांचे विचार काय होते ? आपला इतिहास काय आहे ?त्यांनी कोणती औषधी वनस्पती , कशी वापरली ? आपल्या सर्वांच्याच धर्मग्रंथात काय तत्व सांगितलेली आहेत ?हे सर्व लिखीत स्वरूपात आहे .

जेंव्हापासून न्यायव्यवस्था अस्तीत्वात आली , तेंव्हापासून ते आज पर्यंत जे काही कोर्ट रूम मध्ये घडलं ते सर्व शब्द ना शब्द , लिखित स्वरूपात असतं , म्हणून करिता तर वेळ लागतो,या प्रक्रियेला .

मोठ्या मोठया कंपन्यांमध्ये सुद्धा , बोर्ड मिटींग मध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच दयावे लागते .

वरिल सर्व घटकांचा विचार करता , एक बाब ठळ्कपणे समोर येते , कि लिहून विचार करण्याला पर्याय नाही . ही सवय उद्योजकालाच नव्हे तर सर्व सामान्य व्यक्तीला सुद्धा ग्रेट बनवते .

का बरं ही पद्धत एवढी परिणामकारक आहे ?

1)आपला मेंदू हे फक्त मेमरीकार्ड नाही तर ते प्रक्रिया केंद्र आहे आणि कॉम्प्युटरसारखे मेंदूला सुद्धा क्लीअर ऑर्डर्स लागतात .
त्यामुळे जेंव्हा आपण लिहितो , त्यावेळी मेंदू,डोळयांना आणि हाताला काम देतो,लिहिले गेले कि,परत तीच प्रोसेस … कागद > डोळे > मेंदू .. अशी उलटी होते आणि प्रश्न सुटायला लागतात.

2) आपण हिशोब लिहितो,उधारी लिहितो,प्लानींग लिहितो पण डोक्यात आलेल्या भन्नाट आयडिया , workplan लिहितो का ?
फार कमी लोक, हे विचार,कल्पना लिहून ठेवतात.
पण सर्वांनी या लिहुन ठेवल्या पाहिजेत,याचा वापर .. आपल्याला रेफरंस म्हणून होतो .

3) एखादा विचार आपण लिहून ठेवला ,तारखे साहित,तर नंतर जेंव्हा कधी परत वेळ येईल तर,पुन्हा पहिल्यापासून A,B,C,D पासून चालू करण्याची गरज नाही.

4) प्रत्येक कंपनीच्या ऑफीसमध्ये , शोध संस्थांमध्ये ,एक Vision- Board असतो .
त्या बोर्डवर जाणीवपूर्वक काही चित्रे .. चिटकवलेली असतात,आकडे , दिनांक,सर्व लिहीलेले असतात,का बरं ??
तर सदैव आपण त्याच्याकडे पाहून , सजग रहावे,जे पाहिजे ते साध्य करता यावे, यासाठीच असतं ते!

5) निवडणूक प्रचारात नेत्यांची खुमासदार भाषणे , दमदार घोषणा , आरोप प्रत्यारोप,एकाच्या वाक्याला दुसऱ्याने दिलेली काट ,,, हे सगळं कसं शक्य होतं ???
कारण याची लिखीत स्क्रिप्ट तयार असते.
आणि त्या लिखीत डॉक्युमेंटचाच परिणाम आहे, निवडणुकीत विजय किंवा पराजय .

6) आपण बऱ्याचदा,आपल्याजवळ काय आहे? हे विसरून जातो आणि परेशान होतो .
बरं ते आपल्याजवळ असतय ना !

म्हणूनचयशस्वी व्यापारी हे एखादं लेजर ,स्टॉक रजीस्टर,inventory file,अपडेट ठेवतात .
त्यामुळे त्यांना , काखेत कळसा गावाला वळसा असे करावे लागत नाही .

7) एखादी भन्नाट कल्पना सुचलीये , पण तुम्ही त्या बद्दल सध्या काहीच करू शकत नाही,
मग तिच्याबद्दल लिहा !
लिहील्याने ती कल्पना डोक्यातून बाऊन्स होऊन बाहेर जात नाही.

मग परत आपण त्या लिहिलेल्या डॉक्युमेंटकडे फक्त बघून,ती कल्पना पुर्नजिवीत करू शकतो .

या सर्व वरिल बाबी पहाता,तुमच्या हे लक्षात आलेच असेल कि, फक्त डोक्याने विचार करून,अथवा तोंडाने वाचाळ बडबड करून काही साध्य होणार नाही.

त्यासाठी तुम्हाला कायम स्वरूपी,एक चांगला पेन अथवा पेन्सील आणि एक कोरा कागद जवळ ठेऊन,डोक्यात आलेला प्रत्येक विचार लिहून ठेवायचा आहे.

इथून पुढे .
फक्त , “वाचाल तर वाचाल ही म्हण थोडी बदलावी लागेल “.

मग आपल्याकरिता कामाचं काय आहे,तर?
“लिहाल तर वाचाल !”

लिहिण्याकरिता शुभेच्छा !

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क, औंध ,पुणे.
9518950764.

Office: श्री ओमकेश मुंडे सर 9146101663

Previous Post Next Post

One thought on “ही एक सवय,तुम्हाला नक्की श्रीमंत बनवेल.

  1. Kharach khup chhan sangital ahe. Actually mla hi savay adhipasun ahe. Mi mazy jawalchynapn sangat asato. Pn tynch ekch mhnan asat. Aamhala lihita yet nahi.😊 aso mi tumchy matashi sahamat ahe. 😍😍😍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *