हे करत नसाल,तर हजारो ग्राहक घालवताय.

1,368 Views

#business
#business_mindset

हे करत नसाल तर हजारो ग्राहक घालवताय.

© निलेश काळे.

📌 एकदम जमाना होता ज्या जमान्यामध्ये सोशल मीडिया नव्हतं, व्हाट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं किंवा ईमेल्स सुद्धा नव्हत्या, त्या काळामध्ये ग्राहकांशी संपर्क करायचं फक्त एक माध्यम होतं ते म्हणजे फोन.

आपल्याला आठवत असेल ?तर बीएसएनएल ऑफिस येलो पेजेस डायरी छापायचं आणि त्यामध्ये प्रत्येक शहरा नुसार फोन आणि त्याच्या वापर कर्त्यांचेय क्रमांक असायचे,ज्याच्याकडे ती डायरी आहे तो व्यक्ती नाव नंबर शोधायचा आणि कॉल करायचा.

त्याकाळात व्यापारासाठी सरळ फोन करून विचारणा करणे,हीच पद्धत वापरली जायची,कारण? इंटरनेट नव्हतं.

इंटरनेट, सोशलमीडिया याचा वापर होऊ लागला आहे, तसं बऱ्यापैकी व्यापारी आणि ग्राहक यांचे संपर्क त्या माध्यमातूनच होत आहेत,मग पूर्वी वापरली जाणारी कोल्ड कॉलिंगची पद्धत खरंच बंद झाली आहे का? त्यातून काही फायदा होत नाहीये का?

असा प्रश्न स्वाभाविक पडणं शक्य आहे ,परंतु एक गोष्ट लक्षात घ्या , कि ज्या वेळेला आपण मेसेज मधून काही लिहून पाठवतो,त्यावेळेला त्या शब्दा पाठीमागे भावना व्यक्त करता येत नाहीत, पण ज्या वेळेला समोर एखादा जिवंत व्यक्ती आपल्याशी बोलतो तेव्हा त्याच्या आवाजाची लकब,त्याची बोलण्याची तऱ्हा ,भाषा यावरून तो व्यक्ती कामाचा आहे? किंवा नाही?हे ठरवलं जाऊ शकतं.
म्हणून आजही कोल्ड कॉलिंगची पद्धत परिणाम कारक आहे! फक्त ती कॉलिंग नीट करता आली पाहिजे.
मग का बरं अनेक लोक फोनवर बोलायचं टाळतात? याची कारणं आपण जाणून घेतली पाहिजे,बघा पद्धत तर आपल्या फायद्याची आहे पण तो कॉल गेला पाहिजे ,लोक यात मागे राहतात त्याची कारणं खालील प्रमाणे असू शकतात.

📌 आळशीपणा :
सोशल मीडियावर किंवा इतरत्र कुठेही आपण आपली जाहिरात केली की, त्याखाली खूप लोक नंबर देतात,आता असं समजा की यापैकी 80 टक्के लोक हे टाईमपास म्हणून फोन नंबर देतात,पण अशी शक्यता आहे की 20 टक्के लोक सिरियसली काहीतरी विचारायचं म्हणून त्यांनी नंबर दिलेला असतो.

पण खूप सारे लोक फॉलोअप करतच नाहीत, खूप वेळा ग्राहक फोनची वाट बघत असतो,त्याला विक्रेत्याने फॉलो केलेला आवडतं तरीसुद्धा पण आपण आळशीपणा करतो आणि इथे खूप सारे लोक आपल्या परस्पर आपल्या पासून दूर जातात आणि आपली विक्री होत नाही.
त्यामुळे आळशीपणा करू नका. आपल्याला जमत नसेल तर इतरांना ते काम द्या परंतु फॉलोअप झाला पाहिजे.

(2) Healthy Pipeline :

खूप वेळा असं घडतं की आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या भरपूर असते,आपल्याला असं वाटतं की आपल्याला अजून ग्राहकांची गरज नाही, आपल्यापर्यंत चालून आलेल्या लोकांना सर्विस दिली तरी पुरेसं आहे, तर हे चुक आहे.
आपण येतं तेवढयावर समाधानी असतो, म्हणून आपण नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याच्या गोष्टी करणं टाळतो.

मुद्दा असा आहे की एखाद्या व्यापाऱ्याला ग्राहक कितीही आला तरी कमीच पडला पाहिजे,हा निसर्ग नियम सुद्धा आहे,कारण?आज गोष्टी चांगल्या आहेत ,ठीक आहे परंतु उद्या गोष्टी चांगल्या राहतीलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही,म्हणून
आपण किमान ग्राहकसंख्या बाबतीत तरी समाधानी नाही राहिला नकोय. ग्राहकाने फक्त नंबर दिला कॉल करा ते आवश्यक आहे

(3) No_interuption:

माणसाला लहानपणापासून सवय लावलेली आहे,की कोणाच्या मध्ये मध्ये करायचं नाही.
लोकांचं काम चालू असताना त्यांना त्रास द्यायचा नाही आणि त्यामुळे हे संस्कार आपल्यावर लहानपणापासून झालेले आहेत.
आपल्याला कोणाला त्रास द्यायला किंवा त्यांच्या कामात व्यत्यय आणायला आवडत नाही.
आपण देत असलेली सर्विस किंवा आपण विकत असणारा प्रॉडक्ट ग्राहकांचा फायदा करणार असेल ?तर कॉल करून असा व्यत्यय आणणे पुण्याचं काम आहे.
त्यामुळे निर्धास्तपणे कॉल करा. व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन द्या आणि विक्री करण्याचा प्रयत्न करा.

(4 ) Fear Of insult:

प्रत्येक व्यक्तीच्या आत मध्ये आत्मसन्मानाची भावना असते, त्यामुळे इतराने कुणीही आपला अपमान करणं,हे आपल्याला आवडत नाही.
ज्या वेळेला आपण सेल्सप्रेझेंटेशन देण्यासाठी किंवा कॉल करण्याची वेळ विचारण्यासाठी ,फॉलोअप कॉल करतो ,त्या वेळेला शक्यता आहे की समोरचा ग्राहक आपला अपमान करेल पण हा अपमान आपल्या पर्सनल अपमान आहे का ?नाही
आपण व्यवसायासाठी फोन करतोय समोरच्या ग्राहकाला जर त्याची गरज नसेल वाटत तर तो प्रॉडक्टला किंवा सर्विस ला रिजेक्ट करतोय तो तुम्हाला रिजेक्ट करतोय का? तर नाही त्यामुळे असा अपमान आपण पर्सनली घेण्याची काहीही गरज नाही.

त्यामुळे जर फक्त अपमान होईल म्हणून आपण ग्राहकांना विचारणा करणारे फोन करणार नसू तर ती आपली फार मोठी चूक आहे.
असं टाळू,नका इथे आपला इगो आड आणण्याचा संबंधच येत नाही.

(5)Believe in your Product:

खूप वेळा असं होतं की,आपण जी सर्विस देतोय किंवा जो प्रॉडक्ट विकतो आहे तो आपण स्वतः वापरतच नाही, त्यामुळे आपल्या उत्पादनांमध्ये किंवा आपल्या सर्विसमध्ये आपल्याला स्वतःला विश्वास नसतो, जर विश्वास आपल्या स्वतःला नसेल तर तो समोरच्या पर्यंत पोचू शकतो का? तर नाही, म्हणजे इथे प्रॉब्लेम बेसिक आहे. त्यामुळे आपण जो प्रॉडक्ट विकतोय त्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा.
शक्य असेल तर तो प्रॉडक्ट स्वतः वापरा,आपण ज्यावेळेला प्रॉडक्ट किंवा सर्विस स्वतः वापरतो त्या वेळेला आपल्या मध्ये एक वेगळाच खमकेपणा येतो आणि हा खमकेपणा आपण कोणालाही प्रत्यक्ष किंवा फोनवर सांगू शकतो.
ही बेसिक सुधारणा केली तर आपल्याला समोरच्या ग्राहकाला फोन करण्यासाठी एक आत्मबळ मिळेल आणि आपण निर्धास्तपणे फोन करू शकतो.

📌 आपण जर सोशल मीडियावर जाहिरात करत असाल ?तर अनेक वेळेला आपल्याला ग्राहकांचे नंबर मिळतील, आपल्याला स्वतःला फोन लावावा लागेल आणि असा फोन लावणे म्हणजे कमीपणाची गोष्ट नाही हे आता आपल्या लक्षात आल असेल.

फक्त मेसेज वर किंवा व्हाट्सअप वर किंवा मेसेंजरबॉक्स मध्ये चॅटिंग करून विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल, धरती चुकतय तसं करू नका कॉल करा आणि आत्मविश्वासपूर्वक कॉल करा.

https://www.facebook.com/groups/675025626396370/?ref=share

शुभेच्छा.
©निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंटस
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764
office :
Omkesh Munde sir : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *