हॉवर्ड युनिवर्सिटीत या कंपनीबद्दल शिकवलं जातं !जाणुन घेऊया युरेका फोर्ब्स बद्दल

743 Views

आजकाल डोअर टु डोअर सेलिंग हा प्रकार विक्रीचा सर्वात निम्न प्रकार संबोधला जातो,अगदी MBA करणाऱ्या विद्यार्थांमध्येसुद्धा या प्रकाराचं आकर्षण नाही, परंतु भारतात एक कंपनी आहे ज्या कंपनीबद्दल हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकवलं जातं.

हो आंतरराष्ट्रीय स्तरावर या कंपनीची केस स्टडी शिकवली जाते,या कंपनीतून जेवढे सेल्स कोच बाहेर पडले तेवढे भारतातल्या कोणत्याच कंपनीतुन बाहेर पडले नाहीत.

कंपनीचं नाव…. Eureka Forbes, या दोन लॅटीन शब्दांचा अर्थ होतो .. संपत्ती मला मिळू दे !

आज आपण या कंपनीबद्दल का वाचतोय?तर भारतात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या या कंपनीची विक्री Shspoorji palonji यांनी अमेरिकेतील private equity fund ..Advent international ला 4200 करोड रुपयात केलीये .

आज आपल्या सर्वांच्या घराघरात RO water purifier आहेत, पण जुन्या काळात काही ठरावीक ऑफिसेस मध्ये किंवा पेट्रोल पंपावर असे वॉटर प्युरिफायर दिसायचे.
काही ठिकाणी तर ते अजुनही चालू असतील कदाचित ते विकायचं काम केलं असेल युरेका फोर्ब्सच्या कर्मचाऱ्यानी .

तो काळ होता 1982 दरम्यानचा स्वीडनची कंपनी Electrolux आणि Forbes Gokak या दोघांनी मिळून मुंबईमध्ये एक कंपनी स्थापीत केली, विशेष म्हणजे?या कंपनीमध्ये TATA चा देखील हिस्सा होता .

पण 2001 मध्ये त्यांनी तो विकुन टाकला आणि त्यानंतर Electrolux ने देखील तेच केलं.

तेंव्हापासून आत्तापर्यंत मुंबईस्थित अब्जाधिश फर्म Shspoorji palonji या फर्मकडे याची मालकी होती .

वॉटर प्युरिफायर,व्हॅक्युम क्लिनर,सिक्युरिटी सिस्टीम्स आणि एअरप्युरिफायर या सारखे प्रॉडक्ट, सुपर स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, रिटेल काऊंटर अशा चॅनेल मध्ये न टाकता, वैयक्तीक सेल्समन द्वारे विकणे आणि यातून भारतीय लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी काम करणे हे या कंपनीचं व्हिजन होतं.

या उत्पादनांमध्ये अनेक पेटंटस देखील या कंपनीच्या नावे आहेत.

पूर्वी कंपनीमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये 60% महिला असत आणि त्याचं सरासरी वय 26 वर्ष असायचं,जास्तीत जास्त पोरं ही गरिब घरातुन यायची, आणि सेल्स मध्ये आपलं करियर करायची .

या कंपनीतून ट्रेन्ड होऊन बाहेर पडलेला कर्मचारी कुठेच फेल गेला नाही.

Training : नवीन भरती झालेल्या कर्मचार्यांना ट्रेनिंग द्यायची यांची पद्धत एकदम परफेक्ट होती.
तीन आठवडे चालणाऱ्या ट्रेनिंगमध्ये, सेल्समनचे कपडे कसे असावेत? इनशर्ट कसा करायचा ? टाय कशी बांधायची? शु पॉलिश कशी असावी ? इथपासुन ते प्रॉडक्टचा डेमो कसा द्यायचा ? इथ पासून क्लोजिंग म्हणजे ? विक्री कशी घडवून आणायची ? इथपर्यंत ट्रेनिंग दिली जात असे.

अतिशय शिस्तबद्ध रित्या सेल्सफोर्स कामाला लावली,त्यांना सतत ट्रेनिंग दिली गेली, तर एखादी डायरेक्ट सेलिंग कंपनी काय जादू करू शकते ? हे या कंपनीने सिद्ध करून दाखवले,मार्केटींगच्या क्षेत्रात अनेक नवे नियम या कंपनीने मार्केटला दिले.

म्हणुन तर जगप्रसिद्ध मार्केटिंग गुरू Philip kotler यांच्या मार्केटिंग वरिल पुस्तकात देखील या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीचा अभ्यास आहे.

सध्या माधुरी दिक्षीत यांची ब्रॅन्ड ऍम्बेसिडर असून .. Aquaguard … पानी का डॉक्टर अशी टिव्ही जाहिरात ही कंपनी करते .

आजकालच्या युगात D2C हे बिझनेस मॉडेल परत एकदा जोमाने सुरु झालंय,परंतु त्याला तंत्रज्ञानाची साथ आहे.

परंतु ज्या काळात तंत्रज्ञान देखील अद्यावयत नव्हते अशा काळात प्युअर मार्केटिंगच्या प्रोफेशनल ज्ञानावर,जनतेची दिशाभूल न करता धंदा करता येतो ! हे या कंपनीच्या इतिहासावरून कळते.

या कंपनीने केवळ व्यवसायच केला नाही,तर वृद्धांसाठी सर्वत्र दिसणारे “नाना-नानी पार्क” ही संकल्पना आणली,अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याची सोय केली,अनेक अवार्ड मिळवले,आणि भारताचा SuperBrand सुद्धा ठरली .

आजही,ज्या ज्या व्यावसायिकांना डायरेक्ट मार्केटिंग कशी करायची असते?हे जर शिकायचंय? त्यांनी या कंपनीची कार्यपद्धती अभ्यासावी.

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट,
आनंद पार्क, औंध ,पुणे
9518950764

office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *