1 करोड सॅलरी नाकारून यांनी,स्वतःचं स्टार्टअप चालु केलं.

Suger:

सध्या आपल्यापैकी किती जण सोनी टिव्हीवर येणारा Shark Tank हा शो बघताय? याच शोमध्ये एक जज आहेत,विनिता सिंग,आज आपण त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या स्टार्टअप बद्दल जाणून घेऊया.

विनिता सिंग पहिल्यांदा चर्चेत आल्या जेंव्हा त्यांनी 2007 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी मल्टीनॅशनल कंपनीची 1 करोड रुपये सॅलरीची प्लेसमेंट ऑफर नाकारली.

विनिता सिंग या IIT Madras च्या इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि IIM Ahemdabad मधून MBA आहेत.
ज्यांना या संस्था माहित आहेत,त्यांना हे पण चांगलच माहित असेल कि या संस्थेतून बाहेर पडणे म्हणजे ? सेटल लाईफ म्हणलं जातं.

याची सुरुवात देखील अगदी साधी होती,जेंव्हा विनिता सिंग यांनी जॉबची ऑफर नाकारली तेंव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढले,एवढच काय? अगदी आई वडिलांचासुद्धा राग झेलावा लागला .
साहाजिक आहे,मुळात भारतीय जनतेची मानसिकताच ती आहे कि, चांगलं शिक्षण घ्या = पट्टकन कुठेतरी नौकरी बघा = अन् 9 ते 5 च्या पॅटर्न मध्ये उरलेलं आयुष्य जगत रहा.

पण विनिता यांना ते मान्य नव्हतं त्यांच्या डोक्यात काहीतरी स्टार्टअप करायचच आहे असं वारं चालु झालेल होतच.

त्यांच्या डोक्यात पहिल्यापासुन भारतीय महिलांसाठी काहीतरी स्टार्टअप करायचं होतं,पण काय करायचं ? हा मुख्य प्रश्न होताच.

त्यांच्या डोक्यात आयडिया आली कि,आपण महिलांसाठी लेहेंगे ऑनलाईन विकूया,पण फंडिंग अभावी तो प्लान बारगळला,मग काय ? तर पैसे न लागणारा व्यवसाय तर HR फर्म सुरू करूया ! मग त्यांनी एका क्लासमेटबरोबर सुरु केली प्लेसमेंटची फर्म .

पण ती काही स्केलअप करेना ! विनिता सिंग एका इंटरव्हयु मध्ये सांगतात कि,”आम्ही फक्त पैसे कमवायचे”! याच हेतुने स्टार्टअप शोधत होतो अन् नंतर त्यांच्या लक्षात आलं कि प्युअर पैसे कमावणे या हेतुने स्टार्टअप पुढे जाऊच शकत नाही.”

Entrepreneurship ही काही 100 मिटरची रेस नाही,इथे तोच टिकतो ज्याच्यामध्ये उन्हाळे पावसाळे झेलायची ताकद आहे.

म्हणून मग त्यांनी, 2012 मध्ये कौशिक मुखर्जी या त्यांच्या क्लासमेट बरोबर मिळून,कॉस्मेटिक्स क्षेत्रातील FAB Bag नावाची एक सबस्क्रीप्शन बेस्ड इ-कॉमर्स कंपनी सुरु केली,ही कंपनी विनिता सिंग यांच्या प्रवासातला पहिला टप्पा होता असं म्हणता येईल .

या दरम्यानच त्यांनी भारतीय महिला आणि त्यांच्या कॉस्मेटीक्स इंडस्ट्री कडून असणाऱ्या अपेक्षा याबाबत अभ्यास सुरु केला.

त्यात त्यांच्या लक्षात आलं कि, भारतात तयार होणारे जास्तीत जास्त कॉस्मेटिक प्रॉडक्ट हे भारतीय स्किन टोनला अनुसरून बनलेलेच नाहीत,आणि जे आहेत ते अतिशय महागडे परदेशी ब्रॅन्डस आहेत.

vision : त्यांची व्हिजन क्लियर झाली होती, “चांगल्या दर्जाचे,भारतीय स्त्रियांच्या स्किन टोनला साजेल असे कॉस्मेटीक्स प्रॉडक्ट इतरांच्या फॅक्टरीत बनवून घ्यायच्या आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या ब्रॅन्डखाली विकायचे”

लक्षात घ्या ! 2015 साली, स्वतःच्या बँक अकाऊंट मध्ये खुप सारी रक्कम नसताना बघीतलेलं हे स्वप्नं पूर्ण करणं तसं शक्य झालं नसतं,परंतु विनिता आणि कौशिक यांनी मेंटर्स गाठले, इंडस्ट्री एक्स्पर्ट शोधले आणि सुरुवातीस काही लिपस्टिक पासुन सुरुवात केली.

फॉर्मुला साधा होता .

प्रॉडक्ट तयार करून घेतले = इंस्टाग्राम / युट्युब / फेसबुक वरिल कंटेट मार्केटिंगचा वापर केला आणि विक्री सुरु केली.

यांचा कस्टमर बेस ठरलेला होता : 25_40 दरम्यानच्या वर्किंग वुमन.

Suger : चालू करण्यापूर्वीच त्यांच्या रिसर्चमधे त्यांना हे समजलं होतं कि, आज मेकअप आणि कॉस्मेटिक्स हे फक्त सणावाराचे साहित्य न राहता, डेली वापराची बाब बनलीये.
आणि नवीन जनरेशन हे त्यांच्या आई किंवा आज्जीपेक्षा वेगळ्या दृष्टीने या कडे बघते.
तिचे चाईस वेगळे आहेत .
तिला रिव्हिव्ह्युज आणि इन्फो वाचुनच त्या प्रॉडक्टवरच विश्वास ठेवायचाय.

मग काय ? थोड़ी थोड़ी फंडिंग मिळवली, एक एक प्रॉडक्ट लाँच करायला सुरुवात केली, सोशल मिडियावर जोरदार मार्केटिंग सुरु केली,कॉस्मेटीक्सला फक्त कमोडिटीसारखं न ट्रीट करता सर्विस म्हणून बघीतलं,

लॅक्मे/ HUL/ P&G या सारख्या तगड्या स्पर्धकांना तोंड द्यायचे म्हणल्यावर यांना अशाच नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांप्रती डेडीकेटेड सर्विस देण्याची गरज असते, विनिता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांच्या या स्टार्टअपने हेच केलं अगदी प्रॉपरली.

आज …
Suger या स्टार्टअपचे मार्केट वॅल्युएशन 100 करोडचं बनलंय.

भारतातूनच नव्हे तर इतर देशामधील उत्पादकांकडून सुद्धा यांचे प्रॉडक्ट बनवून यायला लागले,अगदी Lockdown च्या कालावधी मध्ये सुद्धा यांच्या स्टार्टअपने मोठी झेप घेतली.

आज Nykaa,Mamaearth प्रमाणेच विनिता सिंग यांचं Suger हे कॉस्मेटिक्स मधील स्टार्टअप देखील प्रॉफीटेबल बनलंय.

इतकंच नव्हे तर … घेणाऱ्‍याने देत जावे या उक्तीप्रमाणे “shark Tank” मध्ये विनिता सिंग मॅडम,नविन येणाऱ्या स्टार्टअपला गाईड करून फंडिंग मिळवून देण्याचं काम करताहेत.

हीच असते एका खऱ्या Entrepreneur ची ओळख .

नाही का ?

मित्रांनो, आपल्या डोक्यात बिजनेसची आयडिया क्लियर असेल ? योग्य गाईड असतील ? तर मार्केटमधून पैसा मिळतो . . . . . . तुम्ही फक्त हिंमत दाखवा.

© निलेश काळे .
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस
5th Floor, विघ्नहर चेंबर्स, अभिनव चौक, नळस्टॉप,पुणे.
9518950764.
Office; 9146101663.

Previous Post Next Post

One thought on “1 करोड सॅलरी नाकारून यांनी,स्वतःचं स्टार्टअप चालु केलं.

  1. अप्रतीम पोस्ट खुपच प्रेरणा दायक पण कोणत्याही गोष्टि असो तुमची मनापासून जर झटण्याची तयारी असली तर कोणतीच गोष्ठ अशक्य नाही ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *