100% गॅरंटीने सांगतो,पैशाचे हे 13 नियम पाळा,कधीच गरिबी येणार नाही.

” पैशाचे नियम ”

1 ) ” पैसा,काहीच नसतो ही सगळी मोहमाया आहे ‘त्याला खरंच काही किंमत नाही,आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार”

….. हे असले फालतू विचार डोक्यातून काढून टाका !

“पैसा हा जगण्याला बळ देतो , स्वाभिमानाचे रक्षण करतो” म्हणून त्याला कमावलं,सांभाळलं आणि वाढवलं पाहिजे .

2) सध्या प्रॉब्लेम झालाय कसा? सर्वांना पटपट श्रीमंत दिसायचे आहे. मग त्यासाठी काही खटाटोप करावा लागला तरी चालेल ,म्हणून लोक हातामध्ये पगार येण्याअगोदरच त्याला खर्चायची तयारी करून ठेवतात. आणि अशाप्रकारे आपला उद्या आपल्या आजच्या फालतूपणामुळे खराब करतात ,व्यवसायिकांनी तर हे केलंच नाही पाहिजे.

हे पैशाचे नियम आपल्याला कोणीही शाळेत कॉलेजमध्ये शिकवत नाही पण आपण स्वतः शिकलं पाहिजे ते पुढे वाचा.

3 ) पैशाचा कधीही पाठलाग करू नका उलट आपण स्वतः अशाप्रकारचं चुंबक बना कि पैसा आपल्याजवळ आकर्षित झाला पाहिजे.
यासाठी काय करावे लागेल? तर आपण स्वतः काही स्कील शिकावे लागतील आणि या स्किलसाठी लोकांनी पैसा मोजावा लागेल ,,

हे लोक आपल्यासाठी धावत-पळत पैसा कमावतील आणि आपल्याला आणून देतील…..म्हणजे काय? तर आपण पैशाचा पाठलाग करत नाही आहोत, तर पैसा आपल्याजवळ आकर्षित होत आहे.

4) पैसा गुंतवण्याच्या अगोदर स्वतःचा वेळ गुंतवा,आपण नेहमी म्हणतो की मला धंदा करण्यासाठी पैसा नाहीये ,पण मुळात आपण त्याचा कधी अभ्यासच करत नाही म्हणून पैसा गुंतवण्याअगोदर आपला स्वतःचा वेळ गुंतवा,भरपूर अभ्यास करा .

आत्तापेक्षा पूर्वी कधीही चांगली वेळ नव्हती,सध्या अभ्यास करण्याचे खूप काही पर्याय उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे हे पर्याय बऱ्याच अंशी फुकट उपलब्ध आहेत.

आपण आपला वेळ कुठे घालवतो? आपण किती पोकैमॉन पकडले? किंवा कँडीक्रश मध्ये आपली कितवी लेवल चालू आहे? यामुळे तर कोणीही आपल्याला पैसे देणारच नाही ना? मग कशाला तिकडे फुकटचा वेळ. घालवायचा?
इकडे तिकडे बघा ना जरा ! लोकांनी त्यांच्या अनुभवाच्या शिड्या उभ्या करून ठेवलेल्या आहेत,त्या वापरून वर चढा.
आपण शिकत असताना खूप बिळात हात घालून खजाना शोधावा लागेल, आता असतात काही बिळे खोल .
पण त्यामुळे काय शोधायचंच नाही का ? शिका प्रॅक्टीस करा आणि त्यानंतर काचावरचं … “L” काढून टाका …हीच पदधत आहे

6) आपल्याला पैशाचं गुलाम बनायचं नाही तर,त्याचा मालक बनायचं आहे कारण,गुलामांना फक्त कामापुरती मजुरीच मिळते,

आज काल लोकांना क्रेडीटकार्ड वापरायचं व्यसनच जडलंय,त्यावरून विनाकामाच्या वस्तु मागवत रहातात .
आणि उरावर “वाईट कर्ज” ज्याला Bad debt असं म्हणतात ते चढवत रहातात.

हे असं Bad debt आपल्याला गरिबच ठेवतं,शक्य होईल तेवढं याला लांबच ठेवा,आणि Good debt चे नियम शिकुन घ्या .

7) बघा असं म्हटलं जातं कि,पैसा का झाडावर उगवतो काय?
खोटं वाटेल,पण उगवतो !

पण !! त्यासाठी योग्य बीजे पेरावी लागतील,कष्टाची/श्रमाची बीजे.
याला खऱ्या जगात आपण गुंतवणूक सुद्धा म्हणू शकतो.
यासाठी काय लागते?तर एखादी चांगली आयडीया,आणि आयडीया बाबतीत सांगायचं झालं तर त्या फ्री असतात.
मग या आयडीयाच्या बिजाचं रूपांतर पैसेबरसवणाऱ्या झाडात कसं होईल?आपोआप होईल का?तर नाही, त्यासाठी आपल्याला माळी बनावं लागेल.
एखादा चांगला माळी एका चांगल्या बिजाला वृक्ष बनवतो.

पण हे काही एका रात्रीत होणारं काम नाही .

8) पैशाला बोअर होऊ देऊ नका :
खरं तर ही स्टेज पैसा कमावल्यानंतरची आहे .
पण लक्षात असू दया,पैशाची व्हेल्यू कमी-कमी होत जात असते,कारण? महागाई वाढते.

समजा तुम्ही गादीखाली पन्नास हजार ठेवलेत आणि पाच वर्ष त्याला हातच लावला नाही.

पाच वर्षानंतर तुम्हाला तिथे तीस हजारच दिसतील .
कारण ????? वाढती महागाई त्याची किंमत कमी करून टाकेल,त्यामुळे कामापुरता पैसा उशाशी ठेऊन बाकी योग्य गुंतवणूक करून टाका . inflation चा दर साधारण 7 टक्क्यांनी दरवर्षी वाढते,म्हणून आपण पैसा कमावून त्याला पण वाढत ठेवलं पाहिजे,याचाच अर्थ त्याला बोअर होऊ नाही दिलं पाहिजे,नाहीतर? तो कमी होईल .

9) आपले बाप/दादा कायम हा नियम सांगत आले आहेत कि … “कमाई जास्त करा आणि खर्च त्याच्या तुलनेत कमी करा” !
म्हणजे? याचा अर्थ चिकटपणा करा असा नाही,पण हा मुलभूत नियम आहे,त्यासाठी एकच पर्याय
“कमाई वाढवा”.

10) पैसा ही आपली खरं तर आर्मी आहे,जी आपलं रक्षण करते.
मानहानी,अपमान,हिन वागणूक मिळू देत नाही,म्हणून प्रयत्न हाच असला पाहिजे कि,रोज या आर्मीला कामाला लावा,बाहेर पाठवा,दुसरे बंदीवान बनवून आणायला,आपली ही पैशाची आर्मी दुसरे कैदी आणेल तेंव्हाच तर आपली आर्मी मोठी होईल ना ?
आपला पैसा,परतफेड न करणाऱ्याच्या हातात कधीही देऊ नका,कारण? तो वापस येण्याची शक्यता नसल्याने आपली कवचकुंडले ढील्ली होतात.

11) आपला लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर एकदम Rightttt असला पाहिजे,कारण चुकीचा पार्टनर आपल्याला कंगाल करून सोडतो.
त्याला आपली सगळी सिक्रेट्स माहिती असतात,त्यामुळे श्रीमंत बनून रहायचं असेल तर पार्टनर योग्य हवा.

12 ) पैशाचा पुढील नियम असा कि ,आपण जेवढया जास्त लोकांना सेवा पुरवू तेवढे जास्त आर्थीक दृष्टया सक्षम होऊ,त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सेवा दया.
आजकाल तुम्ही भोवताली बघा, कोणते बिझनेसेस भन्नाट चलतात?
ते दिवस गेले,जेंव्हा फार कमी ग्राहकातून सुद्धा जास्तीत जास्त प्रौफीट मिळायचे,आता नियम बदललाय,जास्तीत जास्त ग्राहकांकडून कमी/कमी प्रॉफीट कमवायचे दिवस आलेत.

13) शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा पॉईंट असा कि,पैसा हा फक्त आर्थिक प्रॉब्लेमच सोडवू शकतो.

इतर दुसरे कोणतेही प्रोब्लेम सोडवणे त्याला जमू शकत नाही, त्यामुळे पैसा तर कमवा,खूप कमवा पण स्वतः मधला माणूस जिवंत ठेवा .
कारण पैसावाला असणं आणि श्रीमंत असणं यात फरक आहे .

म्हणून नियोजन करूया आणि श्रीमंत बनूया .

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
आनंद पार्क,औंध,पुणे
9518950764

Office: 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *