100 रुपया पासून 1651 करोड पर्यंत गेलेल्या ब्रान्डची कहाणी

आज आपण एका अशा कंपनी बद्दल एका अशा ब्रॅन्ड बद्दल वाचणार आहोत ज्याची सुरुवात एका छोट्या खोलीत होती आणि जेव्हा तो ब्रान्ड विकला गेला, तेंव्हा मार्केटमधले लोक डोळे फाडून बघतच राहिले.

हो ही स्टोरी आहे, एका तेलाच्या ब्रॅन्डची,केशकिंग ची,

तुम्ही जर गुगलवर असा शोध घेतला कि,” इथून पुढे कोणत्या इंडस्ट्रीमधले स्टार्टअपला फ्युचर आहे?तर त्यामध्ये, ही इंडस्ट्री नक्की समोर येईल, ज्याचे प्रॉडक्ट स्त्रिया आणि पुरुषांच्या डोक्यावरचे केस सांभाळतील.

हो, डोक्यावर केस असावेत, घनदाट असावेत, ही जगातल्या प्रत्येक स्त्री पुरुषाची सुप्त इच्छा असते,आणि ते येण्यासाठी किंवा शाबूत रहाण्यासाठी ती व्यक्ती कितीही खर्च करायला तयार आहे.

नेमकी हीच गरज ओळखली, चंदीगड पंजाब येथे रहाणाऱ्या संजीव जुनेजा यांनी.

संजीवचे वडील बीएएमस डॉक्टर, घरात आयुर्वेदाचे वातावरण,त्यामुळे संदीपने यातच करीयर करायचे ठरवले,आणि मग त्यांच्यासमोर प्रॉडक्ट आला…हेअर ऑईल,ते पण आयुर्वेदिक हेअर ऑईल, यांचं फॉरम्युलेशन 100 रुपयात तयार झाले.

संजीवने या करिता “Keshking” हे नाव अगोदरच रजिस्टर करून त्याचे हक्क घेतले होते,Divisha herbal हे कंपनीचं नाव .

आपल्यापैकी अनेक जण धंदा सुरू केल्यावर ब्रान्ड नेमच्या रजिस्ट्रेशनसाठी धावपळ करतात,पण बऱ्याचदा ते नाव, कोणीतरी अगोदरच रजिस्टर केलेले असते.
त्यामुळे बाकी प्रॉडक्ट डेवलपमेंट होत राहिल,पण हे रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यायला हवं.

भारतातली आयुर्वेदिक तेलाची इंडस्ट्री आज 630 करोड रु/ वार्षिक इतकी असून, केशकिंगचा यातील वाटा 35% इतका आहे.

पण सुरूवातीला म्हणजे 2009 मध्ये यांच्या कडे जाहिरात करायला मार्केटिंग वगैरे करायला पैसेच नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही, काऊंटर टू काऊंटर जाऊन या तेलाची विक्री चालु केली.

गोष्ट साधी आहे, ज्यावेळी तुमच्या ब्रान्डला कोणी ओळखत नसतं, त्यावेळी त्रास होतोच, यांच्या बाबतीतही तसंच व्हायला लागलं होतं, एकतर रेट जास्त आणि ब्रान्ड इमेज नाही.

पण तुमच्या प्रॉडक्ट मध्ये खराच दम असेल,तर माऊथ पब्लिसिटी व्हायला वेळ लागत नाही,आणि केशकिंगला पब्लिकनेच हिट करायला चालु केलं.

यांनी केशकिंग शाम्पू, कॅप्सूल अशी रेंज पण आणली.

थोडासं प्रॉफीट मिळवल्यानंतर संजीव ने लगेचच मार्केटिंगमध्ये जोर लावला, हेच करायचं असतंय, एकदा का प्रॉफीट यायला लागलं कि,त्या पैशाना मार्केटिंग मध्ये लावावं लागतंय,त्या पैशाना जपून ठेऊन धंदा वाढत नसतो.

तुम्हाला आठवत असेल?तर नॅशनल टिव्हीवर स्वस्तातल्या स्लॉटमध्ये म्हणजे?भर दुपारी, किंवा मध्यरात्री यांची जाहिरात यायची, कारण? स्वस्तात मिळायचे,ते स्लॉट !

बरं, नंतर यांना ब्रॅन्ड ऍम्बेसिडर म्हणून जुही चावलाला घेतलं, का ?तर कमी पैसे दयावे लागणार होते, आजच्या आघाडीच्या अभिनेत्रीला घेतलं असतं,तर मानधन जास्त द्यावं लागलं असतं.

मार्केट वाढत गेलं,प्रॉफीट चांगलं यायला लागलं,कारण? प्रॉडक्ट युनि कॉर्न होता, बरेचजण, मार्केट मध्ये चांगली कंडीशन असताना सुद्धा उगाचच दहा टक्के /वीस टक्कयावर व्यवसाय करत रहातात,पण पैसे कमावण्यासाठी टक्क्यात नाही,तर पटीत कमवावं लागतंय आणि यांनी तेच केलं…. कच्चून रेट लावला, 250rs /150 ml करता .

घ्या प्रॉफीटच प्रॉफीट .

तुम्हाला आठवत असेल तर, केशकिंग च्या जाहिराती वर्तमानपत्राच्या फुल्ल पेजवर यायच्या.

इतकी भयंकर मार्केटिंग केली , कि लोक तुमच्या प्रॉडक्टला दुर्लक्ष करूच शकत नाहीत, नंतर नंतर या ब्रान्डच्या टिव्ही जाहिरातीसाठी जैकी श्रॉफ, गोविंदा, श्रुती हसन, सानिया मिर्झा,हुमा कुरेशी यांना घेतलं गेलं.

रिजल्ट???? 2009 साली सुरु झालेल्या या FMCG प्रॉडक्टने 2015 पर्यंत 300 करोड रुपये इतका पल्ला गाठला .

मार्केटमध्ये तुम्ही ज्यावेळी चांगलं काम करत असता,त्यावेळी इतर प्लेयर्सचे तुमच्यावर लक्ष असंतच,वेगवेगळ्या कंपन्यांनी यांना विचारणा केली,त्यात डाबर, विप्रो सारखे तगडे प्लेयर देखील होते.

शेवटी बाजी मारली Emami Ltd. ने .

मार्केटमध्ये यांचा वार्षिक सेल 300 करोड असताना,1651 करोड रुपयाला हा ब्रान्ड विकला गेला, तुम्ही म्हणाल, इतकी किंमत ?तर मार्केटमध्ये तुमचा आजचा सेल नाही,तर तुमच्या प्रॉडक्टची ग्रोथ मिळवण्याची क्षमता बघुन किंमत लावली जाते.

Emami कडे नवरत्न/ बोरो प्लस असे,ब्रान्ड आहेतच भारतभर नेटवर्क आहे,त्यांना या ब्रान्डला पुढे नेणं अवघड नव्हतं,आणि आज 2021 मध्ये आपण बघतोय,कि या ब्रॅन्डची मार्केटमध्ये अत्यंत चांगली पोजिशन आहे.

आज शिल्पा शेट्टी या ब्रान्डकरिता जाहिरात करते

या व्यवहाराचा फायदा अजून एका कंपनीला झाला,केरळमधल्या indulekha या छोट्या ब्रॅन्डला हिंदुस्थान युनिलिव्हर ने 1000 करोड मध्ये विकत घेतले.

कारण? इंडस्ट्री वाढतेय .

आपण म्हणाल, ठिकंय संजीव जुनेजा यांनी Keshking स्वत: जवळच ठेवलं असतं तर त्यांना फायदाच होता कि, पण एक Entrepreneur असं करत नसतो,किंमत आली कि झालं,जास्त इमोशनल होत बसायचं नसतंय .

तरि आजही संजीव जुनेजा यांच्या कडे चांगले इतर ब्रान्ड आहेतच .

डॉ. ऑर्थो बाम,रूप मंत्रा,सच्ची सहेली,पेटसफा हे त्यांचे अजून काही प्रॉडक्टस .

यांच्या जाहिरातीवर लक्ष ठेवा .
तुम्हाला खूप काही शिकता येईल .

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस
आनंद पार्क,औंध,पुणे .
9518950764

ऑफिस : 9146101663

Previous Post Next Post

3 thoughts on “100 रुपया पासून 1651 करोड पर्यंत गेलेल्या ब्रान्डची कहाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *