119 स्वतःची विमानं असणारी जेट एअरवेज अचानक बंद का पडली? वाचण्यासारखी केस स्टडी

#Business_Lessons:

जेट मधून शिकू थेट :

तारीख 17 एप्रिल .. जेट एअरलाइन्स या भारताच्या दोन नंबरच्या विमान कंपनीने शेवटचा श्वास घेतला.

नरेश गोयल …. या अतिमहत्वाकांक्षी पंजाबी,सध्या NRI असणाऱ्या , लंडनमध्ये रहाणाऱ्या माणसाची ही कहाणी एखादया रोलरकोस्टर सारखी आहे.

या कहाणीतून आपण फक्त तेच उचला ,जे आपल्याला sharp Businessman बनवेल .

22 July 1949 ला पंजाबमधील, संगरूर या छोटया गावात जन्म घेतलेला हा माणूस .
वडिलांचा सोन्या = चांदीचा चांगला व्यवसाय,पण काही कारणास्तव .. नुकसानीत गेला आणि घराचे वासे फिरले.

अकराव्या वर्षी घर निलाम झाले

शाळा सोडावी लागली … सहावीला असताना .
पण तरिही … त्यांनी बी .कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केलेच.

याचा अर्थ असाच कि,काहीही झाले तरिही .. शिक्षण पूर्ण कराच ! त्याचा फायदा पुढे होतो !

अनुभव घ्याच :

त्यानंतर 1967 मध्ये आपल्या एका आजोळच्या पाहूण्याच्या … ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करण्यासाठी … दिल्लीत आले आणि इथूनच त्यांचा हा प्रवास चालू झाला ( काही दिवस आपले नातेवाईक,पाहूणेयांचेकडे नौकरी केली म्हणजे,ज्या व्यवसायाचा अनुभव मिळतो )

काही दिवस अकाउंटटची नौकरी केल्यानंतर …
ते विदेशात गेले … जॉर्डन एअरलाइन्स फिलीपिन्स एअरलाइन्स,मिडल एस्टर्न एअरलाईन्स . इ .एअरलाईन्स मध्ये काम करत करत … त्यांनी टिकेटींग , रिझर्वेशन,सेल्स,याची अमूल्य ट्रेनींग घेतली.

संबंध वाढवले:
व्यवसायात एकवेळ पैसा नसला चालते पण चांगले संबंध हवेतच.
दिल्लीत स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालू केली.
नाव ?? ” जेट एअर प्रा.लि .

“हसू करवून घेतलं कारण ट्रव्हल एजन्सीचं असं नाव कोणी ठेवत नव्हते
प्रेरणा होती ?. Air France एक विमान कंपनी.

पॉलिसीचा फायदा घ्या :

साल उजाडलं 199.
भारताने open sky policy अवलंबली आणि नरेश गोयल यांनी ,, जेट एअरवेजची स्थापना केली .
फंडींग मिळवली आणि चार विमाने लीज वर घेतली .
याच्या बदल्यात Gulf Air आणि Kuwait Air ला कंपनीचा 40% हिस्सा दिला.

यावेळी मार्केट मध्ये एअर इंडीया ही सरकारी कंपनी मार्केटवर राज्य करायची,पण ती सुद्धा परेशान असायची .. स्ट्राईक,संप,कमी दर्जाची ग्राहक सेवा,सुमार सेवेमुळे हे सेक्टर बऱ्यापैकी बदनाम होते .

पण नरेश गोयल यांना जगातील अनेक एअरलाइन्सचा अनुभव असल्याने , त्यांनी सुरूवातीपासूनच .. चांगल्या दर्जाची सेवा,उत्तम मेनू,ब्रँडीग यामुळे ग्रीप घ्यायला चालू केली .

लॉबींग : सर्वात जास्त वापरलेला फॅक्टर .

सरकारी नियम , आपल्या बाजूने वळवून घेणे , बनवून घेणे , त्यासाठी वाट्टेल ते करुन स्पर्धकांना त्याचा फायदा न होऊ देता , आपल्यासाठीच उत्तम संधी निर्माण करणे याला लॉबींग असे म्हणतात .
पाश्चिमात्य देशात , ही गोष्ट जरी कायदेशीर असली तरी भारतात तरी त्यास मान्यता नाही .
पण अनेक उद्योजक लॉबींग करतातच , याशिवाय धंदा मोठा होत नाही .
लॉबींग आपण पण शिकलीच पाहिजे !
हा अलिखित .. महत्वाचा नियम आहे .
नरेंद्र गोयल यांनी याचा पूरेपूर वापर केला .

1997 साली सरकारने एक नियम बदलला कि, परदेशी एअरलाईन्स भारतीय विमान कंपन्याबरोबर पार्टनर शीप करू शकत नाहीत आणि मग Gulf Air आणि Kuwait Air नी त्यांचा हिस्सा गोयल यांना विकला .
लॉबींगचा पहिला फायदा .

एका माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी जेट एअरवेज बरोबर काम करायला सुरुवात केल्याने,जेट मध्ये सुरूवातीच्या काळात युनियन संप असले काही घडले नाही .

5/20 Rule …. नावाचा एक नियम सरकारने लावला , या नियमात जेट एअरवेज परफेक्ट बसत होती .
नियम असा होता कि , एखादया एअरलाईन्स ला लायसन्स कायम ठेवायचे असेल तर , त्यांनी 5 वर्ष पूर्ण केलेले असावे आणि किमान 20 विमाने त्यांच्या ताफ्यात असाव्या .
हा नियम लागू पडला जेट एअरवेजसाठी .
कंपनीची प्रगती होतच गेली .

त्या काळात .. SAHARA, ModiLuft , आणि East – West Airlines या मुख्य स्पर्धक होत्या .
जेट साठी .
काही इतर कंपन्या … आजारी Air india ला विकत घेण्याचा प्रयत्न करत होत्या .
पण Jet Airways ने अशी व्यवस्था केली कि , यां निर्णयाचा पार्लमेंट मध्ये विरोध होईल .
आणि तसे झाले ही Air india चे खाजगीकरण झाले नाही .
अशा प्रकारे इतर स्पर्धक कंपन्याना पिछाडीवर टाकत . जेटची घोडदौड चालू होती .

2004 मध्ये … जेट एअरवेज शेअर मार्केटला लिस्ट झाली , आणि 20% शेअर्सच्या बदल्यात , कंपनीने 8200 करोड रुपये उभे केले .

पैसा जास्त झाला कि , एक पोकळ अभिमानाने मनुष्य फुगतो .
त्यातल्या त्यात .. स्वतःच्या हिंमतीवर मोठया झालेल्या उद्योजकांसाठी ही तर धोकादायक स्थिती असते .
तसाच एक खड्डयात नेणारा निर्णय जेट ने घेतला .
2005 साली ..2200 करोड रुपयांना एअर सहारा ,
विकत घेतली .
एक तर हा सौदा त्यांना महागात पडला , अधिक सहाराच्या विमानांना रिपेअर करुन घ्यावे लागले ते वेगळेच .
फक्त एका आकांक्षेपायी घेतलेला हा निर्णय . घात करायला कारणीभूत ठरला .( सेम घडले किंगफिशर बरोबर .. एअर डेक्कन विकत घेतली आणि स्वतःच संपले )
पण या टेकओव्हर बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे . जेट एअरवेज ने आंतराष्ट्रीय उड्डाने करण्याचा परवाना मिळवला .
पैसे खर्च करून रूट आणि पार्किग स्लॉट विकत घेतले . पुढील काळ अवघड होता .
2008 मध्ये Lehman Brothers या संस्थेने Aviation industry साठी पुढचा काळ कठीण आहे असे जाहीर केले .
पाठोपाठ जागतीक बाजारात तेलाचे भाव कडाडले .
$147 / बॅरल असा भाव झाला .
जागतीक मंदीला सुरुवात झाली .
संपूर्ण जग यामुळे परेशान होते , कच्चे तेल हाच मोठा खर्च असतो एअरलाईन्स ला आणि त्याचेच भाव वाढत होते .
भारतात spiceJet आणि indigo सारख्या बजेट एअरलाइन्स चालू झाल्या , तिथे Jet प्रिमियम एअर फेअर वर काम करत राहिली , त्यामुळे अर्थातच भारतासारख्या किंमती बाबतीत सेंसेटीव मार्केट मध्ये जेट चा नफा कमी होऊ लागला .
2011 मध्ये जेट आर्थिक संकटात सापडली .
सरकारने नवीन नियम आणला .
परकीय विमान कंपन्यांना 49% गुंतवणुकीला परवानगी दिली.
जे नरेश गोयल याचा विरोध करत , त्यांनी च Etihad Airways ला जेट मधील 24 % हिस्सा 2040 करोडला विकला,जेटचे आर्थिक संकट थोडे कमी झाले,पण अजून पैशासाठी लंडनमधील Heathro Airport चे Landing slot पण जेटने Etihad ला विकले,याला म्हणतात बुडत्याचा पाय खोलात !

Competition does waiting:

indigo आणि spicejet … हे मुळातच जाणून होते कि जेट कर्जात आहे,त्यामुळे त्यांनी कळ सोसली, तिकीट रेट कमीच ठेवले,एकाच प्रकारचे विमान जास्तीत जास्त रूट वर वापरले, यासाठी स्पर्धकाचा अभ्यास लागतो.
त्यांनी बरोबर गेम केला.

Extra खर्च :

जिथे Jet कर्मचाऱ्यांवर 13- 14% खर्च करत होते,तिथे या लो फेअर कंपन्या 8- 9% खर्च करत होत्या.
आपण जर अशा गंभीर चुका करत असू तर आपले पण असेच हाल होणार .

परिस्थिती सुधारेल अशी स्थिती 2016 – 2017 मध्ये झाली परंतु ती फक्त इंधन दर कमी झाल्याचा परिणाम ठरली.

2018 मध्ये इंधन किंमती वाढल्याने कंपनीची परिस्थिती पार बिघडली .
शेवटी ही कंपनी 8000 करोड रुपयांच्या कर्ज विळख्यात सापडली .
कर्ज पुर्नबांधणीसाठी बँकांनी .. नरेश गोयल यांचे सर्व शेअर्स ताब्यात घेतले , त्यांना कंपनी बोर्डवरून पायउतार व्हावे लागले .
22,000 कर्मचारी ,119 विमाने,600 देशाअंर्तगत रूट असणाऱ्या या एअर लाईन्सने 17 एप्रिल 2019 ला शेवटचे उड्डाण ,अमृतसर _ मुंबई असे केले,
आणि एका उत्तम स्टार्टअपचा शेवट झाला.

ही स्टोरी कुणाचे हेवे _ दावे म्हणून नव्हे तर,अभ्यास म्हणून नक्की पहावी .

source : Internet .

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध,पुणे.
9518950764

Office :श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663
.
आवडलं तर नक्की शेअर करा .

Previous Post Next Post

One thought on “119 स्वतःची विमानं असणारी जेट एअरवेज अचानक बंद का पडली? वाचण्यासारखी केस स्टडी

 1. १)अप्रतिम सुन्दर…..
  संबंध वाढवले:
  व्यवसायात एकवेळ पैसा नसला चालते पण चांगले संबंध हवेतच.

  २)पण अनेक उद्योजक लॉबींग करतातच , याशिवाय धंदा मोठा होत नाही .
  लॉबींग आपण पण शिकलीच पाहिजे !
  हा अलिखित .. महत्वाचा नियम आहे .

  ३)पैसा जास्त झाला कि , एक पोकळ अभिमानाने मनुष्य फुगतो .
  त्यातल्या त्यात .. स्वतःच्या हिंमतीवर मोठया झालेल्या उद्योजकांसाठी ही तर धोकादायक स्थिती…

  मनोहर
  9422809682

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *