140 किलोचा अगडबंब माणूस,तेअमेरिकन सैन्यातला सगळ्यात टफ सैनिक…ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास

#Powerful_Books

#Cant_Hurt_Me

© निलेश काळे .

📌 एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर आपण त्याच्या पाठीमागे किती वेळ राहतो ? कधी ना कधी असं वाटायला लागतं की जाऊ द्या द्या सोडून कशाला एवढा ताण करून घ्यायचा आहे ? आणि आपण अर्ध्या वाटेतून वापस येतो, प्रयत्न करणेच सोडून देतो , ही सवय आपल्याला पुढे जाऊ देत नाही .

📌 परिस्थिती अवघड झाली आपल्या हाताबाहेर जाऊ लागली की आपल्याला वाटतं की आपल्याला आता हे जमू शकत नाही, पण अशा वेळीसुद्धा आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो फक्त आपल्याला काही तत्त्वे माहिती असायला हवीत !

📌 दरवेळी परिस्थिती आपल्या मनासारखी असत नाही पण याचा अर्थ असा नाही ,कि आपण त्याच्याकडून काहीही मार्ग काढू शकत नाही, तर आपल्याला डेवीड गॉगीन्स यांचं “Can’t HURT ME” हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे.

📌140 kg चा अवाढव्य झुरळ मारणारा मुलगा ते अमेरिकेच्या नेव्हीमधला एक सील कमांडो, ते एक अल्ट्रारनर , एक मोटिवेशनल स्पीकर, लेखक असा प्रवास करणाऱ्या 45 वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या प्रवास अनुभवाला लेखकाने या पुस्तकांमधून आपल्यासमोर मांडले आहे .

📌 या प्रवासामध्ये डेव्हिडला अनेक तत्त्वे सापडली ,जेव्हा जेव्हा त्यांना सगळं सोडून द्यावं असं वाटलं, तेव्हा त्यांना या तत्त्वांनी रस्त्यावर ठेवलं आणि त्यांनी आज जगातला “Tough Man Alive ” म्हणून ओळखलं जातं .

📌 तीन महिन्यांमध्ये 50 किलो वजन कमी करणं असो सतरा तासांमध्ये 4030 पुलंच काढणार असो , अमेरिकन सैन्याची हेल वीक ही ट्रेनिंग तीन वेळा करणे असो किंवा 24 तासांमध्ये 220 किलोमीटर रनिंग करण असो असे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स या माणसाच्या नावावर आहेत .

📌 Can’t Hurt Me , या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याच काही गोष्टींचा उल्लेख केला पण त्याच्यामध्ये तीन चार पॉईंट असे आहेत ,जे आपण आपल्या आयुष्यामध्ये दररोज वापरू शकतो , ते वापरले तर आपला खूप फायदा होऊ शकतो.

*************************

#1_Do_Something_that_Will_Make_You_Uncomfortable :

आपल्या डॉक्टरांनी जरा कडू औषध दिले ना तर, आपल्यात घ्यावेसे वाटत नाही परंतु आपली तब्येत बरी व्हायची असेल तर आपल्याला ते कडू औषध डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यावंच लागतं, तसं आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला करू वाटत नाही परंतु त्या जर आपण केल्या नाहीत तर आपलं आयुष्य वेगळं होऊ शकत, म्हणून डेवीड सांगतात दररोज एक तरी गोष्ट अशी केली पाहिजे जी आपल्याला करू वाटत नाही !

मुद्दाम असं करणे हे खूप महत्वाचं आहे .

****************************

#Use_40% _Rule …

कारचे इंजिनमध्ये गवर्नर नावाचा एक पार्ट असतो,, जो कारला खूप जास्त स्पीडने पळू देत नाही, त्याप्रमाणे आपला मेंदू आपल्याला खूप जास्त थकण्याअगोदर एक वार्निंग देतो तिथे आपल्याला वाटतं की आपण खूप थकलोय परंतु डेव्हिड सांगतात की मनुष्य आपल्या ताकदीच्या फक्त 40 टक्के भाग वापरतो पुढचे 60% वापरतच नाही ! ही 60% शक्ती आपण रिजर्व मध्ये ठेवतो , ती वापरता आली पाहिजे !

याचा अर्थ असा की आपण थकल्यानंतर सुद्धा अजून खूप वेळ काम करू शकतो मग ते काम शारीरिक असो किंवा मानसिक

**********************

#3_Use_Cookie_Jar_Method:

213 किलोमीटरची रनिंग करत असताना एकशे पन्नास किलोमीटर झाले असता आणि डेवीडचे स्नायू फाटू लागले त्यांच्या किडन्या फेल होऊ लागल्या, डायरीया सारखी परिस्थिती झाली पण त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रनिंग रेकॉर्ड पूर्ण करायचं होतं अशावेळी त्यांनी एक पद्धत अवलंबली त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी साध्य केल्यात त्या आठवायला चालू केलं,,, याचा फायदा असा झाला की त्यांच्या मेंदूला एक खुराक मिळाला की आपण ही गोष्ट त्यावेळी साध्य केली आहे,,, तर मग ही गोष्ट आता का साध्य होऊ शकत नाही? आणि अशाप्रकारे त्यांच्या शरीराला एक बुस्ट मिळाला आणि ते रेस पूर्ण करू शकले या मेथडला डेव्हिड , “Cookie in a Jar ” असं म्हणतात .

****************************

#4_make_After_Action_Report:

डेव्हिडला त्यांच्या सैनिक मित्रांना मदत करण्यासाठी फंड उभा करण्यासाठी एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं होतं आणि त्यांचे टार्गेट होता 4030 Pull-Ups .

पहिल्या प्रयत्नामध्ये ते 2500 pull-ups बनवू शकले , शरीर साथ देत नव्हतं म्हणून ते घरी आले घरी येऊन विचार करू लागले की नेमकं आपलं काय चुकतंय ???

तर त्या वेळी त्यांना असं जाणवलं की आपण जे काही तिथे टिव्ही स्टुडिओमध्ये पुल अप्स काढत असताना पॉझिटिव किंवा निगेटीव गोष्टी केल्या त्या लिहून काढू आणि त्यांनी त्या गोष्टीचा एक रिपोर्ट बनवला. त्या रिपोर्ट मध्ये त्यांना खूप काही चुका आढळल्या आणि त्यांनी दुसरा Attempt करायला घेतला.

📌 दुसऱ्या प्रयत्नामध्ये डेवीडने 3200 Pull-Ups काढले, परत घरी आल्यानंतर त्यांनी परत या प्रयत्नाचा आफ्टर ऍक्शन रिपोर्ट बनवला, त्यामध्ये त्यांना काही प्लस आणि काही मायनस गोष्टी आढळल्या.

📌 आणि तिसऱ्या प्रयत्नांमध्ये डेव्हिड ने 4030 Pull-Upsचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला तो पण सतरा तासात .

📌 म्हणून करतो डिलीट म्हणतात तुम्हाला पहिल्यांदा यश मिळालं नाही त्याचा आफ्टर ॲक्शन रिपोर्ट बनवा त्याच्यातल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीवर विचार करा आणि पुढच्या वेळी प्रयत्नांमध्ये त्या गोष्टी टाळा म्हणजे यश नक्की मिळेल !

************************
📌 अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये डेव्हिड गॉगीन्स यांनी स्वतःच्या अनुभवांना शब्दांचं रूप देऊन आपले अनुभव इतरांना काहीतरी शिकण्यासाठी मांडलेत !

📌 तेव्हा हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि त्याचे वाचन करा …एक झुरळं मारणारा मुलगा एवढा पक्का कमांडो अॅथलीट बनू शकतो तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये असे चांगले बदल करू.

📌 व्यवसाय विषयक अशा प्रकारचे स्ट्रॅटर्जीकल ज्ञान मिळवण्यासाठी आमचे पेज आजच लाईक करा लिंक खाली आहे.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890

© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
Anand Park , Aundh ,
Pune .
9518950764

office : 9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *