1848 आणि आज 2021 मध्ये काहीच बदललं नाही हे सांगणारी रियल स्टोरी

California Gold Rush (1848-1855)

उत्तर अमेरिकेचा पश्चिम भाग जो , आज नेवाडा कैलिफोर्निया नावाचं अमेरिकेचं 31 वं राज्य आहे,तेथील ही सच्चीकहानी .

साल होतं 1845, John Sutter नावाच्या एका श्रीमंत शेती व्यावसायिकाला, आपली हजारो एकर शेती आणि हजारो जनावरे सांभाळत सांभाळत,नवीन काहीतरी करावं वाटले,

त्याने जेम्स मार्शल नावाच्या त्याच्या क्लर्क ला सांगून,अमेरिकन नदीच्या काठावर एक सॉ- मिल बांधायचं ठरवलं.
काम चालू झालं .
एक दिवस … दिवसभराचं काम करून दमलेला मार्शल नदीकाठी बसलेला होता आणि नदीपात्रात काठावर काहीतरी चमकलं.

मार्शलने जाऊन पाहिलं असता,
तो एक सोन्याचा तुकडा दिसला,
एक – दोन – तीन आणि सापडतच गेले छोटे छोटे तुकडे.

मार्शल, ते तुकडे घेऊन मालक जॉन सत्तरकडे आला आणि त्यांनी तुकडयाची बारकाईने तपासणी केली असता Confirm झाले कि,ते सोनेच आहे.

जमीन जॉन सत्तरची पण …
त्याकडे काम करणाऱ्या मजूरांकडून ही बातमी बाहेर पसरली,तसे जॉनला हे व्हायला नको असे वाटत होते.

त्याकाळी कॅलिफोर्नीया हे अमेरिकन स्टेट नव्हते,राज्यघटना नव्हती, कायदा नव्हता,पोलीस व्यवस्था पण नव्हती.

मुळात हा भाग उजाड असल्याने, सॅनफ्रान्ससिस्कोची लोकसंख्या पण अतिशय कमी होती.

इथुन पुढे खरी कहाणी सुरू होते, आणि सुरू होते इतिहासातील सर्वात मोठा खजिना मिळवण्याची कसरत.

या घटनेला,कॅलिफोर्निया गोल्ड रश असं म्हणलं जातं, या गोंधळातून खूप काही गोष्टी बाहेर पडल्या, त्या आपण पुढे बघूच.

सॅम ब्रॅनन ….
हा एक चतुर व्यापारी …
तो या घटनेचा खरा हिरो ठरला ..

ते कसे ?? पाहुया .

सॅम ब्रॅनन हा उद्योजकिय डोक्याचा होता, त्याची विचारसरणी फार पुढची होती, त्यानं असं डोकं लावलं.

1) सोने फुकट मिळणार म्हणून खूप लोक येणार.

2) लोकांना इथे खूप दिवस रहावे लागणार.

3) आणि सर्वात महत्वाचे .. ” लोकांना नदीपात्रातून,वाळू मिश्रीत , सोने बाहेर काढण्यासाठी,फावडे , कुदळ,टोपली,चाळण्या,इ सामान लागणार.

त्याने सर्व प्रथम,नदीकाठी एक जनरल स्टोर्स उघडले,संपूर्ण राज्यातील दुकानांमधून या सामानाचा स्टॉक उचलला,आणि आपल्या दुकानात मांडला .

त्यानंतर सॅम ब्रैननेच सगळीकडे, जाहिरात करायला सुरुवात केली कि, कि,अमेरिकन रिव्हर मध्ये सोनं आहे, या आणि घेऊन जा !

सोन्याचा मोह कोणाला सुटतो,मग ते 1848 असो कि 2021 असो, या जाहिराती ला बघून लोकांनी कॅलीफोर्नियात यायला गर्दी केली .
आणि बघता बघता, या भागात सोने काढून घेऊन जाणाराची लोकसंख्या प्रचंड वाढली .

ही घटना अमेरिकन इतिहासात .. ” कॅलीफोर्निया गोल्ड रश या नावाने प्रसिद्ध आहे,

ही गोल्डरश 3 Jan 1848 ते 1855 पर्यंत चालली,जवळपास 3,00,000 लोक यात सहभागी झाले होते, कोणाला किती सोनं सापडलं? कोण कधी लखपती, करोडपती झाला?हे माहित नसलं, तरी

यात सर्वात अगोदर,लखपती कोण झाला असेल बरं

?तर…………..सॅम ब्रेनन.

ज्याने नदीकाठी बसून सोने चाळले नाही,तर,सोने खोदण्यासाठी लागणारे टोपले,चाळण्या,फावडे इ.सामान .. प्रचंड प्रमाणात आणि जास्त किंमतीला विकले.

या सैम ब्रॅनन ची नऊ आठवडयात विक्री होती, 37,000 डॉलर.
आजच्या काळात त्याचे मूल्य मिलीयन डॉलरकडे जाईल.

हा नियम आज पण लागू पडतो,असं दिसतंय का तुम्हाला कि,
नौकरीला लागून नौकरीतून कमाई करणारांपेक्षा,नौकर भरतीचे फॉर्म विकणारेच जास्त कमावतात ” .

हा सगळा खेळ सप्लाय X डिमांडचा आहे, आपण नेमकं काय करतोय? सोन्याचे कण चाळत बसतोय?का टोपले, फावडं, विकून पैसे कमावतोय ?

दुर्देवाने आजही अशा अनेक घटना घडतात, मन सुन्न व्हायला होतं, नौकर भरती निघतात, फॉर्म भरले जातात, प्रवास होतात, बस स्टॅन्डवर रात्री जागून काढल्या जातात, आणि अचानक कळतं कि,परिक्षाच कॅन्सल झाल्यात.

मित्रांनो,हे नैसर्गिक आहे,काही बाबी आपल्या हातात असत नाहीत,याला अनेक पर्याय असू शकतात,त्यामुळे उद्योजकतेकडे वळा !

आता हे फार सोप्पं नाही, मान्य आहे ! पण इथून पुढे Artificial intelligence मुळे सगळीकडे ऑटोमेशन होतच आहे, नॅचरली नौकऱ्या कमी होणारच आहेत, त्यामुळे उगाचच भाबडया आशेवर विसंबून राहूच नका,

या जगाला तुमच्या टॅलेंटची फार गरज आहे, काहीतरी असं देण्याचा प्रयत्न करा, ज्याचा हे जग मोबदला देईल.

उद्योगी बना !

शुभेच्छा
© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764

Office 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *