30 सेकंदात तुम्ही तुमचा बिझनेस समजुन सांगता येतो का ?याला Elevator Pitching म्हणतात

*_Business coaching_*

30 सेकंदात, तुम्हाला आपला बिझनेस समजून सांगता येतो का?
याला Elevator Pitching म्हणतात.

आज आपल्या सगळ्यांच्या जवळ बऱ्याच काही गोष्टी आहेत परंतु एका गोष्टीची मात्र कमतरता जवळपास सगळ्यांच्याच जवळ आहे ती म्हणजे वेळ लोकांजवळ वेळ नाही त्यातल्या त्यात जी लोक यशस्वी आहेत त्यांच्याकडे खरोखर वेळच नाही

📌 आता Pitching म्हणजे काय ?
: हा एक प्रश्न मराठी मुलांना नेहमी पडतो याचं उत्तर असं आहे की आपण आपल्या डोक्यातील एखादी बिजनेस ची आयडिया आपल्या जवळ असणाऱ्या या सोलुशन आयडिया किंवा आपल्या जवळ असलेलं एखाद्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर समोरच्याला पटवून सांगणे या प्रक्रियेला इंग्लिश मध्ये पिचिंग असं म्हणलं जातं

📌 शक्यतो पिचिंग व्यवस्थितपणे समोरासमोर बसून लॅपटॉप वर किंवा पावर पॉइंट प्रेझेंटेशन ने दिली जाते परंतु वर सांगितल्याप्रमाणे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती जवळ खरोखरच वेळ नसतो मग अशा व्यक्तीं पर्यंत आपल्या मेसेजला कसं पोचवायचं

📌 या या लेखाचं जे शीर्षक आहे त्याचं नाव एलेव्हेटर स्पीच याच्यासाठी आहे की आपण एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला समजा लिस्ट मध्ये भेटलो तर लिस्ट वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यापर्यंत येईपर्यंत आपण आणि ती व्यक्ती अगदी थोडक्या वेळेसाठी सोबत असतो तो थोडा वेळ 30 सेकंद ते साठ सेकंदापर्यंत चा असू शकतो

📌 एवढ्या कमी वेळा मध्ये जर आपण आपलं सांगणं समोरच्याच्या गळी उतरवू शकलो तर त्यामुळे अनेकांची आयुष्य पुर्णपणे बदलवुन शकतात या प्रक्रियेला स्पीच असं म्हणलं जातं

📌 समजा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या राजकीय नेत्याला फक्त 30 सेकंद भेटताय किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ बरोबर आपली भेट अगदी थोडक्या वेळेसाठी होत्या तर त्या थोडक्या वेळेचा सदुपयोग त्या व्यक्ती कडून काम करून घेण्यासाठी आपल्याला या प्रक्रियेचा फार चांगला उपयोग करून घेता येणे शक्य आहे

📌 तर जाणून घेऊया या एलेव्हेटर स्पीच मध्ये आपण काय कसं कधी बोललं पाहिजे जेणेकरून आपला प्रभाव समोरच्यावर अतिशय परफेक्ट पडेल आणि तो आपल्याला कायम लक्षात ठेवेल.

📌 Elevator pitch चा उपयोग , जॉब मिळवण्यासाठी , नेटवर्किंग इव्हेंट मधे आपल्या बद्दल माहिती सांगण्यासाठी , किंवा आपल्या व्यवसायाच्या असोसिएशनच्या कार्यक्रमात आपलं म्हणणं हजारो लोकांसमोर मांडण्यासाठी करू शकतो .

📌 बघा ना ? अशा प्रकारचे वाक्य आपण अनेकदा ऐकले असतील
1) “आता xxxxx साहेब आपल्याला 2 मिनीटात मार्गदर्शन करतील ” !

2) ” तुमच्या बद्दल थोडं सांगा ” !

आता इथे आपल्याकरिता वेळेचं बंधन असल्याने मांडणी परफेक्टच पाहिजे !

#Tip: Elevator pitch हे आपली Expertise आणि आपला अनुभव समोरच्या बरोबर शेअर करण्याचं साधन आहे,जेणेकरून तो आपल्याला कायम लक्षात ठेवेल !

******************************
(1) आपलं नाव_पूर्ण आणि स्पष्ट सांगा:

📌 पहिला पॉईंट आपलं पूर्ण नाव स्पष्ट आवाजात समोरच्याला सांगितलं पाहिजे ! बऱ्याच वरिष्ठ राजकिय नेत्यांचं वैशिष्ठये आपल्याला माहित असेल , कि ते एकदा ऐकलेलं नाव विसरत नाहीत.

*****************************
(2) Know Your Audience and Speak to them:

समोर दोन/ चार व्यक्ती आहेत तर नेमकं कोणाला उद्देशून बोलायचं आहे आणि त्यांचा इंटरेस्ट काय आहे ?हे विचार करूनच बोला.

*****************************
(3) Keep it Brief:

हे कायम लक्षात ठेवाच ! कि आपल्या जवळ फारच कमी आहे , आणि इथे आपल्याला काय ? आपलं आत्मचरित्र सांगायचं नाही त्यामुळे अगदी थोडक्यात ऊरका ! पाल्हाळ लावायचं नाही !

*****************************
(4) Explain and put on:

आपण कोण आहेत ? आपलं क्वालिफीकेशन काय ? आपल्याजवळ कोणत्या वैशिष्ठयपूर्ण स्कील आहेत ? आपण कशा प्रकारे अवघड आणि मोठया समस्या सोडवू शकतो हे एखादया उदाहरणासहित सांगावं !

*****************************
📌 (5) Mention Your Goal:

अपयशी मानसिकतेच्या लोकांजवळ कसलीच ध्येयं/ स्वप्नं/ आकांक्षा/उद्दीष्टे नसतात, ते लोकं एखादया महत्वाच्या व्यक्तीच्या जवळ जरी गेली तरी अघळपघळ बोलत रहातात , तसे न करता, आपली रिएलिस्टीक ध्येयं पण सांगा !
कारण अनेकांना महत्वाकांक्षी माणसं आवडतात !
*****************************
(6) Spark the interest

लक्षात ठेवा Elevator speech जरी एकदम छोटंसं असलं तरीही, त्यामुळे पुढचं रिलेशन spark पडू शकतो .

जसं मोठयातलं मोठं इंजिन सुरू होण्यासाठी अगदी बारीक ठिणगी कामाला येते तसं हे छोटं बोलणं कामी पडू शकतंय .
*****************************
(7) Practice practice practice:

हो ! याची सुद्धा प्रॅक्टीस केली पाहिजे ! काय बिघडतंय ?

थोडक्यात आपलं म्हणणे समोरच्याच्या डोक्यात /मनात/ बुद्धीत उतरवणे ही काही साधी गोष्ट नाही.

त्याची प्रेक्टीस करा !
#Tip1: “आपल्या मित्राला सांगा , कि माझं बोलणं रेकॉर्ड कर” !
अशा अनेक रेकॉर्डिंग ऐैका म्हणजे आपल्या चुका आपल्याच लक्षात येतील !
#Tip2: “सेल्समन सारखे फक्त तोंडानेच बडबड करू नका ! चेहऱ्यावरचे हावभाव पण नॅचरल ठेवा ! म्हणजे ते नाटकी वाटत नाही!

*************************

(8) Be positive and Flexible:

इथे काही आपण कोणाला जॉब इंटरव्ह्यू दयायला नाही आलोय , त्यामुळे पॉजिटीव/ रिलैक्स/ कॉन्फीडंट रहा !

**********************”
(9) Business Card तयार ठेवा

ही भेट , चंद-लमहों कि असते, भेट झाली बोलणं झालं मग फोन , पत्ता कसा दयायचा ? ना पेन असतो ना कागद ! अशावेळी पटकन देण्यासाठी आपलं व्हिजिटीग कार्ड तयार ठेवा !

काम फत्ते ! ! !

********************************

अशा प्रकारे खूप वेळा बसमध्ये , विमानात ,टॅक्सीमधे किंवा कुठेही
अतिमहत्वाच्या व्यक्तींबरोबर भेट होऊ शकते, त्यांच्याकडून कामं काढून घ्यायला , हे Elevator pitch वापरलं जातं , तुम्ही पण वापरा ! कधी काय जाणो .. फायदा मिळेलच !.

अशा प्रकारचे बिझनेस स्ट्रॅटजी मॅनेजमेंटच्या लेख वाचण्यासाठी उद्योगनितीच्या फ्री व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा !
त्यासाठी संपर्क करा !
श्री ओमकेश मुंडे : 9146101663

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

**************************

शुभेच्छा .
©निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट,
आनंद पार्क , औंध ,पुणे .
9518950764 .

Previous Post Next Post

2 thoughts on “30 सेकंदात तुम्ही तुमचा बिझनेस समजुन सांगता येतो का ?याला Elevator Pitching म्हणतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *