50 पैशाच्या जिवावर,उभी असणारी 1450 करोड वॅल्युएशनची कंपनी : Cavincare

18,920 Views

50 पैशाच्या जिवावर उभी असणारी,1450 कोटीची कंपनी.

Cavincare.

एखादा ब्रँड आपली पाळं मुळं रूजवत मोठा होतो प्रत्येक वेळी तो,आपल्या नजरेत येतोच असे नाही,पण तो ब्रँड कित्येक वेळा मार्केट चेंजर असतो .
त्या पाठीमागे फार मोठी मेहनत , जिद्द,चिकाटी,संवेदना असतातच.

अशाच एका 1450 कोटीचा टर्न ओव्हर असणाऱ्या एका भारतीय ब्रँडची कथा पाहूया.

त्यांच्या स्टोरीतून खूप काही घेता येईल .


C .K .Rangnathan ….
चार भावंडात धाकटा.
शिक्षणात पण फारसा रस नसलेला.
वडील शेतकरी कम छोटे उद्योजक
उद्योगफार्मा क्षेत्रातला होममेड शाम्पू वगैरे बनवण्याचा.

शेंडेफळ:

वडिलांनी त्याला धंदयात घेऊन,थोडं फार शिकवले त्यांना वाटायचं, हे पोट्ट फार काही शिकलं नाही,तर शेती तरी करेल नाही तर फॅमिली बिझनेस तरी.

वडिलांचा छोटा का असेना व्यवसाय असेल तर,मुलांना तो वाढवायला फारसा अवघड जात नाही.

पण या पठ्ठयाला प्राण्यांचा,पक्ष्यांचा भलताच छंद .पाचवीला असेल तेंव्हा त्याच्याकडे,500 कबूतरं, कुत्रे , मांजर , सोनेरी मासे वगैरे असे त्याने पाळलेले, तो हे फक्त तो पाळायचा नाही, तर त्याची विक्री पण करायचा.

वडिलांचं नाव R . Chinnikrishnan .
त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती .
कि लिक्वीडला छोटया छोटया सॅशेत विक्री करायची .

तोपर्यंत शाम्पू फक्त बॉटल मध्येच विक्री व्हायचा,तो पण फक्त शहरी आणि श्रीमंत ग्राहकांसाठीच .
….
….
1982 साली,रघुनाथन यांनी हा शाम्पूचा फॅमिली बिझनेस जॉईन केला ,कॉलेजला ऍडमिशन घेतलं,पण त्यांचे वडिल वारले .
दोन भाऊ डॉक्टर झालेले ,एक वकिल आणि रघुनाथन कॉलेजला.

घरात किरकिरी वाढल्या तसे रघुनाथन घरा बाहेर पडले,जवळ प्राणी विकून आलेले आणि काम करून साठवलेले 15,000 रू होते .

नॉलेज कामी येतं:

येत काय होतं ?तर प्राणी सांभाळणं आणि शाम्पू बनवणं .
जे कि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं होतं.
एक सायकल आणि वडिलांनी दिलेलं ज्ञान यावर ..
तामिळनाडू च्या Cuddalore या गावात,त्यांनी 200 रू .महिन्याने खोली भाडयाने घेतली,एक गोडावून आणि 3000 रूपयाची सॅशे बनवण्याची मशीन घेतली.

वडिलांनी पाहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
भारताच्या FMCG क्षेत्रात क्रांती घडवली !शाम्पू सॅशे स्वरूपात तो पण अगदी 50 पैशाच्या किंमतीत पहिल्यांदा मार्केट मध्ये आणला,मग इतरांनी त्याची कॉपी केली.

गोर गरिब जनतेला पण शाम्पू वापरता यावा ! ही वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली.

बोटभर सॅशे फक्त आणि फक्त पन्नास पैशात.

CHIK शाम्पू आजही … त्याच किमतीत मिळतो .

#CHIK हे नाव जरी odd वाटत असले तरी ,हे नाव एका मुलाची आपल्या वडिलांना श्रद्धांजली आहे .
तो शॉर्टफॉर्म आहे .. “Chinnikrishnan” या नावाचा.

पहिल्या महिन्यात फक्त 20,000 सॅशेच विकले .
कारण वडिलांबरोबर त्ते फक्त प्रॉडक्शन बघायचे, मार्केटिंग दुसरे भाऊ बघायचे .
पण रंगनाथन थांबतील ते कुठले?

त्यांनी आक्रमक मार्केटिंग चालू केली .
FMCG मधे अशीच आक्रामक मार्केटिंग करावी लागते , नेहमीच Defensive भूमिका घेऊन चालत नाही

Grassroot marketing:

पूर्ण तामिळनाडूच्या गावा गावात डेमो द्यायला चालू केले,,, ज्याप्रमाणे आयुर्वेदीक तेल विक्रेते, बाजारात लोकांच्या पायाला मालिश करून तेलं विकतात तसे यांनी लोकांचे केस धुऊन दाखवायचेत,सुगंध घ्यायला लावायचे.

मार्केट वाढत गेले .
नवीन सुगंध असणारे उत्पादने ते आणत राहिले .
Godrej सारख्या मोठया कंपन्या , आणि त्यांच्या भावाची कंपनी Bottle मध्ये velvette शाम्पू विकत .
म्हणून यांना सैशे मध्ये ग्रामीण मार्केट मिळाले .
# याचा अर्थ दर वेळी मोठया कंपन्या ज्या प्रॉडक्टलाईन मध्ये काम करतात त्याच लाईन मध्ये जाऊन त्यांना धडकायची गरज नसते , त्या मोठ्या कंपन्या कडून काही क्षेत्रं सुटतात , आपण त्याचा वापर करायचा !

9 वर्षात यांनी आपल्या स्वतःच्या फॅमिली बिझनेस ला मागे टाकले आणि पुन्हा कधीच मागे वळून बघीतले नाही .
1992 मध्ये त्यांनी कंपनीच्या नावात बदल केला,त्या साठी कर्मचाऱ्यात स्पर्धा ठेवली .. आणि Cavin Care हे नाव निश्चीत झाले .
Cavin चा तामिळ मध्ये अर्थ होतो , सौंदर्य आणि अशा प्रकारे बनली cavinkare .
या नावात पण त्यांनी त्यांच्या वडलांच्या नावाचे initials यावेत या साठी care ऐवजी Kare असा शब्द प्रयोग केला .
..

Goodwill:

रघुनाथन यांचा बँकेतला एक किस्सा पण प्रसिद्ध आहे.
त्यांनी Apply केलं .
त्यांच्या अर्जावर बँकेच्या अंतर्गत पत्रव्यवहारात मॅनेजरनं रिमार्क लिहला, “या स्मॉल स्केल इंडस्ट्री Unit कडे तारण ठेवायला काही नसेलही,पण विशेष कौतूकाची बाब अशी कि,हे SSI,Unit सातत्याने income tax भरते आहे ,
यामुळे त्यांना बँकेचे कर्ज उपलब्ध झाले.

बरेच जण बँकेने कर्ज दिले नाही, म्हणुन त्या संस्थांनी वेठीस धरतात, तसं करून उपयोग नाही,आपण देखील कागदोपत्री परफेक्ट असलो, तर कर्ज देणे हाच त्यांचा व्यवसाय आहे, त्या बँका शेवटी ते देणारच आहेत.

मोठी रेंज :

1992 पासून मग …. Cavin Kare वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आली,त्यांनी अनेक ब्रँड बनवले .
प्रत्येक वेळी गरिबवर्गाला फायदा होईल अशीच विक्री किंमत ठेवली, मोठं मार्केट मिळवलं, आणि आज त्यांचं नाव FMCG सेक्टर मधे आदराने घेतलं जातं.

त्यांचे काही प्रॉडक्टस पुढील प्रमाणे .
spinz Perfume, .
indica Hair Dye
Nyle shampoo,
fairever Cream,
Meera Herbal,
Maa beverages,
Garden Namkeen,
chinni’s Energy snacks,
Cocoma Coconut water

अशा प्रकारे, तामिळनाडू च्या छोट्याशा गावातून चालू झालेली एक कंपनी,आज पूर्ण भारतात तर सोडा .
पूर्ण आशियाई देशात व्यापार करते आहे .

सध्या प्रायवेट लिमिटेड असणारी ही कंपनी , 2020 पर्यंत IPO आणून , share market मध्ये लिस्ट होईल

ही कथा बरंच काही शिकवून जाते

मोठी कंपनी करायचीये,तर पैसे नसतील चालतय,पण fundamental knowledge अत्यावश्यक .
* दर वेळी आपले प्रॉडक्ट महाग विकावेत असं काही नाही , प्रॉडक्ट ची किंमत वाजवी ठेऊन पण श्रीमंत होता येतं .
ज्या firm,आपलं नाव हे Fancy असावं असं काही नाही.

छोट्या खेडयात सुरुवात केली म्हणून काय झालं ?

जगाला माल पुरवायची ताकद आणि धमक आपल्या सगळ्यांच्या धमन्यात असते .

….
….
50 पैशात बाजारात आणलेल्या CHIK शाम्पुमुळे ही कंपनी Hit झाली, त्यामळे या south india च्या कंपनी बद्दल मुद्दाम हून आपण स्टोरी केली .
ही कंपनी आजही मोठया मोठया मल्टीनॅशनल कंपन्यांना टक्कर देत वाढतेच आहे.
..
त्यांची अशीच प्रगती होवो आणि आपल्या मराठी जनमाणसातून कित्येकांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा,

स्टोरी आवडली असेल,तर आपल्या मित्रांपर्यंत पोहचवा,त्याला 50 पैसे सूद्धा लागत नाहीत.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

© निलेश काळे .
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट्स
आनंद पार्क, औंध ,पुणे.
Connect : 9518950764

ऑफिस : श्री ओमकेश मुंडे सर : 9146101663

असे लेख आवडत असतील तर , आमचे फेसबुक पेज लाईक करा, आणि आमच्या ब्लॉगवर रोज विजीट करा.

धन्यवाद .

Previous Post Next Post

8 thoughts on “50 पैशाच्या जिवावर,उभी असणारी 1450 करोड वॅल्युएशनची कंपनी : Cavincare

  1. Dear sir
    Chin shampoo story is really great . I request you that kindly share bank name and number to this page because for growing business people want loan but bank doesn’t help .

  2. खूपच सुंदर आहे लेख, काही तरी बोध घेण्यासारखे आहे 👍

  3. खरंच सर तुमच्या post मधून प्रत्येक वेळी नविन उर्जा मिळते Very Inspiring story 👍

  4. नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी खूप गरजेचं वाटलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *