चांगल्या विक्रेत्याचेनऊ सिक्रेट गुण

349 Views

©निलेश काळे

📌 व्यवसाय किती छोटा असू दया अथवा मोठा ! विक्री नाही तर काहीच नाही.

अजूनही बऱ्याचठिकाणी
सेल्समन >> ग्राहक या संवादातुनच क्लोजिंग होताहेत ,म्हणजे????
सेल्समनच्या सॉफ्ट स्किलवर बराच खेळ अवलंबुन आहे ,तेंव्हा चांगल्या सेल्समनचे हे नऊ गुण समजाऊन घ्या आणि रोजच्या व्यहारात वापरा ! नक्कीफायदाच होईल !

(1) अतिउत्साहसेल_डाऊन!

📌वाचकापैकी किती जणांना वाटतं कि त्यांच्या मुलाने सेल्समन् बनावं ?

📌बरं डॉक्टर इंजिनिअर बनावं असं किती जणाना वाटतं ????

📌स्वाभाविक उत्तरं सगळ्यांना माहितीय याचं सगळ्यात मोठ्ठं कारण ? सेल्समन अवास्तव बडबड करतात ! ही अवास्तव /एककल्ली / अतीउत्साही बडबड विक्री न होण्याचं मुख्य कारण आहे.

मग कशी करायची विक्री ?
#Doctor_way, कोणतेही डॉक्टर ज्याप्रमाणे पुर्ण ऐकून घेऊनच मग औषध लिहितात ना ? त्याप्रमाणे शiतपणे घ्या ! बघा चांगला सेल्समन असाच वागतो शांत !

*********
(2) pitching_आताजुनंझालंय!

📌 आपण किती चांगली सर्विस देऊ शकतो ?

किती चांगले प्रॉडक्ट विकतो ?

किती चांगली आफ्टर सेल सर्विस देतो ? हे असं नॉनस्टॉप सांगत राहणे, बोलते जाओ बोलते जाओ याला pitching म्हणतात.

📌 Insurance विक्रेते किंवा Medical representative बहुतेक करून ही पद्धत वापरतात, पण Pitching चा जमाना खरंच दूर गेलाय !
त्याचं कारण पण असच आहे, आज ग्राहकाला खूप जास्त माहितीये ! Information च्या पुराचा जमाना आहे. मग अशी pitching कशी कामाला येऊ शकते, म्हणून चांगल्या सेल्समनने अशी विनाकामाची माहिती देत बसू नये , याऊपर जर माहिती दयायचीच आहे त्याला प्रोफेशनल पद्धतीने देणे हा एक उत्तम गुण आहे !

**********

(3) No_need_to_pursued :

📌पिच्छा करणे ,पाठलाग करणे, याला persuasion म्हणलं जातं !
सामान्यपणे सेल्समन लोकांना हे शिकवले जाते ! कि interest दाखवणाऱ्या ग्राहकाचा सतत फॉलोअप घ्या ! फोन करत रहा ! काहीही करून विक्री कराच !

📌 आजकाल पहिल्यासारखे हे घ्या ! ते घ्या ! म्हणुन फोन येतात का ? नाही ना !

कारण लोकांना यात कसलाच इंट्रेस्ट राहीलेला नाही किंवा असं म्हणा कि लोकांना त्यांची प्रायवसी डिस्टर्ब केलेली आवडत नाही !

मग पिच्छा करून विक्री करणे कसे शक्य आहे ?

📌 चiगले विक्रेते ग्राहकाने आपल्याशी संपर्क केला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करतात !

*********

(4) do_not_focus_on_closing

📌 सेल्समन आणि भावी ग्राहक समोरासमोर बसलेले आहेत असं समजा ! भावी ग्राहकाला असे वाटते की थोडी अजुन खोलात माहिती घ्यावी, आणि सेल्समनची मर-मर आहे डिल फायनल करण्याची !

📌 म्हणजे सेल्समनचे सगळे सगळे लक्ष डिल फायनल करण्याकडे आहे !

📌असं होत नाही ! ज्याप्रमाणे पुर्ण दिवस भरल्याशिवाय लेकरूसुद्धा जन्म घेत नाही,आणि घेतलाच तर प्रॉब्लेम होतात,तसेच सेल्सची पूर्ण प्रोसेस फॉलो केल्याशिवाय , सेल्स नीट होत नाही !

📌त्यामुळे घाई करू नका, आपली Value ज्याला समजली आहे, तो ग्राहक कुठेच जात नाही, तो येणार नक्की वापस येणार, घाई करू नका !
पिच्छा तर बिलकुलच नको !

📌 टारगेट असताना सुद्धा ग्राहकाचा पाठलाग न करणे हा एक मोठा गुणधर्म आहे .

**********

📌(5) Ask_Discovery_Questions

📌प्रेझेंटेशन दरम्यान ग्राहक आणि सेल्समन मधे संवाद व्हायला पाहिजे ,
तो प्रकार फक्त One sided game व्हायला नको … म्हणजे एक जण कायम बोलतोय आणि दुसरा फक्त ऐकून घेतोय .

📌या उलट हा सेल्समन साठी खरा चान्स असतो ,त्या ग्राहकाला बोलतं करण्याचा.
ऐकून घ्या, त्याच्या शंका समजावून घ्या, त्याचे साठी व्यवस्थितपणे असे प्रश्न विचारा ज्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नीट निटका कळेल .

ग्राहकाला पण हे बरं वाटतं !

हे ज्याला कळलं त्याला विक्री जमली .

*********

(6) Set_the_budget

📌ज्याप्रमाणे ग्राहक हा विक्रेत्याला जोखतो, त्याची पात्रता तपासतो.
त्याचप्रमाणे विक्रेत्याचा पण वेळ महत्वाचा असतो, हे पण लक्षात घ्या ना !

📌 चांगल्या सेल्समनने सुद्धा आपला किती वेळ दयायचा आहे ? आणि ग्राहकाजवळ तेवढे बजेट आहे का नाही ?याची खात्री करून पुढे गेलं पाहिजे !

📌 आणि चांगला सेल्समन असेच करतो !

***********

(7) learn_the_decision_ making_process

📌भावी ग्राहक समोर बसलेला आहे , आपलं प्रेझेंटेशन चालु आहे , समोरच्याला पटतंय सगळे , पण फायनल निर्णय घ्यायचा अधिकार त्याला आहे का? हे जाणून घेतलं पाहिजे .
📌 समजा समोर चार जण बसलेले आहेत, त्यापैकी निर्णय कोण घेणारेय?हे जाणून घेणे आणि त्याच व्यक्तीकडे लक्ष देऊन बोलणे हा एक गुण आहे !

📌ते जमलं पाहिजे .

***********

📌(8) Always_have_a_next_step:

📌 खरा विक्रेता तो जो ,बोलण्यात चाचपडत नाही/अडकत नाही.

📌 काहीही होऊ शकतंय ना ? समोरचा ग्राहक,हो म्हणील >>नाही म्हणील>>काय म्हणायचंय ते म्हणील , ते आपल्या हातात नसतंय, पण पुढची परफेक्ट स्टेप काय असू शकते हे त्याला माहिती असायला पाहिजे .

*********

(9) be _willing_to_make_mistakes

📌 शिकून चुकणे आणि चुकून शिकणे हे मनुष्य असण्याचे लक्षण आहे , पण कित्येकांना I am always Right म्हणायची सवय असते !

Wrong … Complete wrong !

चुकणे हे वाईट नाही,
चांगला सेल्समन चुका करायला आणि त्यातून शिकायला कधीच लाजत नाही !

माणसाने चोरी करायला लाजावं, चुकण्यात कशाची आलीये लाज ?

**********

📌 “Salesman is A Different Breed”
असं मुद्दाम म्हटलं जातं, ते यामुळेच !
वरिल गुणधर्म खरंतर सामान्य माणसात सुद्धा असावेत , पण एका सेल्समन मध्ये तर अत्यावश्यक आहेत.

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

 

© निलेश काळे.
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
ब्लॉक 2/3, माझदा अपार्टमेंट,
आनंद पार्क, औंध, पुणे.
9518950764
office:9146101663

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *