Amazon/flipkart वर शोधलेल्या वस्तूची ऍड फेसबुकला कशा दिसतात?

एखादी गोष्ट ऑनलाईन सर्च केल्यानंतर सर्व सोशल मिडियावर त्याच्याच ऍड का दिसतात?

हा अनुभव तुम्हाला अनेक वेळा आला असेल,

“तुम्ही ऍमेजॉन किंवा फ्लिपकार्ट वर काहीतरी शोधता, आवडलं तर खरेदी करता किंवा न खरेदी करता वापस येता”.

मग त्यानंतर जेंव्हा जेंव्हा तुम्ही युट्युब, फेसबूक किंवा गुगल वर जाल तिथे, नेमक्या त्याच शोधलेल्या प्रॉडक्टच्या ऍड दिसायला लागतात.

प्रॉडक्ट तोच असतो,पण ब्रान्ड वेगवेगळे असू शकतात,.. झालंय तुमच्या बरोबर कधी असं?

झालच असणार, कारण ? या पाठीमागे एक टेक्नीकल कारण आहे, सोबतच यामध्ये एक सेल्स टेक्नीकचा वापर सुद्धा आहे.

AI : Artificial intelligence हे शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकले असतील, machine learning हे शब्द सुद्धा कानावर पडलेत का कधी?
तर नवीन टेक्नॉलॉजीच्या जमान्यात याच गोष्टींचा बोलबाला आहे.

AI मध्ये, अनेक भाग आहेत,पण सोप्या भाषेत समजुन घ्या ! आपली इकॉमर्स वेबसाईट वरची सगळी हालचाल ट्रॅक होते, आपली आवड निवड काय आहे?याचे पॅटर्न बनवले जातात, आणि त्याच्या आधारावर आपल्यासमोर कोणती जाहिरात आणायची ?हे ठरवलं जातं, हे सगळं घडतं ते मशीन लर्निंग मुळे.

आज आपल्यावर या AI चा वापर करूनच नजर ठेवली जाते, आपली सोशल मिडियावरची वर्तणूक AI ने ट्रॅक होत असते.

या सगळ्या टेक्नॉलॉजी कंपन्या या सर्व माहितीची देवाण घेवाण करत असतात,त्यामुळे ऍमेजॉनवर शोधलेले प्रॉडक्टची जाहिरात इतरत्र दिसते.

Impulse Buying Nature :

आता आपण,हे ऑप्शन दाखवण्या पाठीमागचे कारण बघू.

मनुष्य दोन प्रकारे खरेदी करतो,
1) Impulse Buying : भावनिक खरेदी
2 ) Logical Buying : तर्कसंगत खरेदी.

पण 8O% वेळा खरेदी ही भावनिक खरेदी असते,लोक त्या खरेदीच्या मुड मध्ये असतात,ऐन त्या पिरियडमध्येच त्यांना ऑप्शन दाखवले तर ते पटकन खरेदी करतात.

“ग्राहक मुड मध्ये असताना विक्री करणे”,याला impulse purchase म्हणलं जातं,आपण भरवसा करणार नाहीत,पण एकूण विक्रीच्या 30 % विक्री ही अशा प्रकारे सजेशन दिल्यामुळे होते.

30% ही काही साधी अमाऊंट नसते ना दादा ? त्यामुळे तुम्ही व्यापारी असाल?तर करा,याचा वापर जेंव्हा अशा मोठ्या मोठया कंपन्या सुद्धा करतात,तेंव्हा आपण का करू नये?

वापरा … सजेशन वापरा !

© निलेश काळे,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
आनंद पार्क,औंध,पुणे.
9518950764
office : 9146101663.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *